ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका
पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.
तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.
तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:
१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.
२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.
३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:
- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.
४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.
५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.
६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.
७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.
८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.
९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे
१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.
११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.
असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.
(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.
बंदीयोग्य वाक्ये आणि गोष्टी
ह्यांनाहि बंदी घाला -
१)त्यांच्या संसारवेलीवर लवकरच एक फूल उमलले.
२)हल्ली मला वयोमानपरत्वे कमी ऐकू येतं/कमी दिसतं/कमी भूक लागते छापाची वाक्ये.
३)ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ/ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ/ज्येष्ठ पत्रकार टाईपची वर्णने.
४)अमुकतमुकच्या हातांना बळ द्या...
५)अमुकतमुक आगे बढो, हम तुम्हारे साथ है...
६)शरच्चन्द्ररावजी पवारसाहेब...
७)ग्रामीण भागातील धडाडीचे नेतृत्व
८)मुपीचे अश्राप हौशी लेखक
९)डॉ.श्री.बालाजी तांबे, द्रष्टे विचारवंत संदीप वासलेकर आणि एकंदरच सगळा दैनिक 'सकाळ' परिवार.
१०)पोलिसांनी आपल्या स्टाइलने चौकशी केल्यावर...
११)बहुतेकांना न समजणारे संस्कृत श्लोक 'ऐसी'वर उधळणारे लेखक
इ.इ.
तांबे
आजच्याच फ्यामिली डॉक्टर मध्ये कर्णपूरण नामक लेख आहे.
त्यातील पहिला परिच्छेद :-
कानाचे आरोग्य टिकविण्यासाठी स्वतः स्वतःच्या कानात तेल टाकणे, तसेच अधूनमधून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कर्णपूरण करून घेणे उत्तम होय. सध्या तर मोबाईल, रहदारी, कर्णकर्कश संगीत, हेडफोन्सचा अति वापर यामुळे कानांवर जो ताण पडतो, त्याचे दुष्परिणाम कमीत कमी होण्यासाठी कर्णपूरण करून घेणे ही गरज बनली आहे.
एकवेळे "आयुर्वेदिक तज्ञ्/वैद्य वगैरेंच्या निरीक्षणाखाली " असा क्लॉज जोडून मग कानात तेल घालणे योग्य वगैरे विचारही समजू शकतो; पण स्वतः कानात तेल घालायचे ?
आमच्या नेहमीच्या डॉक्टरकडे माझा कान दुखत असताना गेलो होतो. नातेवाइकांपैकी कुणीतरी एकजण "कानात तेल घालून पाहूया" स्टाइल काहीतरी बोलल्यावर मॉडर्न मेडिसिनचे ("अॅलोपथी"चे) डॉक्टर जे संतापले होते; ते आठवले.
चिडून "कानात तेल घालताय; उद्या कानात शिरलेला किडा मारायला कानात पिस्तुलातली गोळी झाडाल" असं म्हणून
खेकसलेले स्पष्ट आतह्वते आहे.
आम पब्लिकनं ऐकावं तरी कुणाचं ?
=))
=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=))=)) =)) =)) =))=)) =)) =)) =))=)) =))
=))
=))
फारेण्डा __/\__!!
याव्यतिरिक्त,
१. केसात माळलेल्या सोनचाफ्याचा सुगंध नायकाला येऊन तो तिथे आपोऑप वळून बघणे नॉट अलाऊड.
२. तिचे तो एकच कटाक्ष वगैरे बघून होऊन भान हरपलेला नायक नी मग त्याच्यापुढे येऊन टिचक्या मारत त्याला जागे करणारे कोणीही यावर बंदी
३. एका लेखनात कमाल एकाच फुलाचा, प्राण्याचा व पक्षाचा उल्लेख झाला पाहिजे अशी अट घालावी. तीचे डोळे हरीणीसारखे असतील तर सिंहकटी नॉट अलाऊड. तिचा आवाज कोकीळेसारखा मंजूळ असेल तर समोर येणार 'बेभान पाऊन' (हा ही पाऊस दरवेळी बेभान असणे वर्ज्य करायला हवे) मोरासारखे नृत्य तिला करता येणार नाही. गाल गुलाबाच्या पाकळ्यांसारखे कोमल वगैरे असतील तर केसात मोगर्याचा गजरा (वा चाफा) माळाता येणार नाही (गरजच काय म्हंटो मी, गालावरच भागवून घ्याना! किती ती सुगंधांची मारामारी!!)
४. नायकाची छाती पहाडासारखी आहे असे म्हणायचे असेल तर नायिकेने माउंटेनेरिंगचा कोर्स केला असणे अनिवार्य ठेवावे! त्याच बरोबर नायिकेच्या डोळ्यात स्वप्नांना तरळायला अलाऊड नाही, जर ती तरळणार असतील व नायक त्यात बुडणार असेल तर त्यालाही स्कूबाडायविंगचे सर्टिफिकेशन अत्यावश्यक करावे
५. नायकाच्या एका कवितेने, एका बुद्धीबळाच्या खेळाने त्यावर कोणतीही बालिका मुग्ध व्हायला नामंजूर
६. नायिकेच्या डोळ्यावरील बट बघुन नागिणीचा भास होण्याचे पेटंट एका गाण्याने घेतले आहे, तर दरवेळी ते कुंतल रेशमीच करून कोणत्याही शांपूची अॅड करू नये.
७. कथेत होणारी पहाट कधीतरी उकाड्याने हैराण करणारी असली पाहिजे, प्रत्येक पहाट मंजूळ व/वा आल्हाददायक असता नये
८. 'अग बाई आलात का इतक्यात. आज काम लवकर झालं वाटतं! थांबा हं चहा टाकते" नावाचे विविध पातळ्यांवर अतिशय काल्पनिक संवादांना पूर्ण मज्जाव
९. "माझं हृदय आता माझ्यापाशी कुठे उरलंय?" असं म्हणणारे नायक व/वा नायिका यांना मृत घोषित करावे.
१०. संसार म्हटला की नेहमी "भांड्याला भांडंच" लागण्याचा काळ मागे सरला आहे - तेव्हा त्यावर बंदी. फार तर दाव्यावर प्रतिदावा होणारच यावर मांडवली होऊ शकेल
बाकी तुमच्या प्रस्तावाला अनुमोदन आहेच!
+
५. नायकाच्या एका कवितेने, एका बुद्धीबळाच्या खेळाने त्यावर कोणतीही बालिका मुग्ध व्हायला नामंजूर
हे मात्र खरे. दुसर्याला बुद्धिबळे खेळताना पाहणे यासारखे बोअरिंग असे त्रिभुवनात दुसरे काही नसेल. ते पाहून जर बालिका मुग्ध होत असेल, तर तिचे डोके तपासावयास हवे.
च्यामारी, आज बुद्धिबळाचा खेळ पाहून मुग्ध होतेय, उद्या नाक शिंकरताना पाहून टर्नऑन होईल! हे दुष्टचक्र थांबायचे कधी?
६. नायिकेच्या डोळ्यावरील बट बघुन नागिणीचा भास होण्याचे पेटंट एका गाण्याने घेतले आहे,
"नागीण" बोले तो कोणतातरी रोग असतो ना? त्वचारोग बहुधा?
आणि डोळ्यावरील "बट"???
ऊन मी म्हणत होते
१. ऊन मी म्हणत होते..
२. बच्चे कंपनी
३. अरे लब्बाडा !
४. ऑमी नाई ज्जा..
५. कुणी कुणाचीही वाट चातकप्रमाणे पाहाण्यावर बंदी.
६. मोती, टिप्या, ढवळ्या-पवळ्या, कपिला इ. नामकरणे
७. अस्वस्थ झाल्याचे दाखवायचे असल्यास पदराची टोके एकमेकांभोवती गुंडाळण्यावर आणि लाजायचे असल्यास हाताची बोटे चावण्यावर बंदी.
८. त्यांच्याकडे 'न्यूज़' आहे बरं का !
९. तरूणाई
इ, इ.
अत्यंत खास फारेंड टच.. ह ह पु
अत्यंत खास फारेंड टच.. ह ह पु वा.. भारी.. (हेही शब्द लिस्टमधे यावे मला वाटते)
लेख ठ्ठो आहेच. पण वाचकांनी भर घालावी या वाक्याने प्रेरित होऊन कुठेतरी जुने ल्हिवलेले आठवले. माल जुना आहे आणि आंजावर कुठे दिसत नसून पुस्तकात छापील रुपात असल्याने खाली चोप्य पस्ते करतो
बंदी घालण्यालायक घरांची नावं: श्रमसाफल्य, मातृकृपा, पितृकृपा, कोणाचीही कृपा, मातृस्मृति, पितृस्मृति, कोणाचीही स्मृती, मातृछाया, पितृछाया, कोणाचीही छाया, सावली, समाधान, योगायोग, बंधुप्रेम..
उपरोक्त नावं एकतर वापरून वापरून झिजली आहेत..आणि ती नेहमीच जीर्ण "धोकादायक इमारतीं"ची नावं वाटतात....
चेम्बुरास एक "पिवळा बंगला" या नावाचाच बंगला आहे..अशी नावं ठेवावीत..
टी.व्ही. सीरियल्स मधल्या संवादांत बाळबोध बुळबुळीत म्हणी आणि चौथीत शिकलेले वाक्प्रचार वापरून वाक्यांचा दर्जा "ड" करून टाकला जातो..
उदा.
डाव खेळणं..डाव उलटवणं..डावाचं काहीही करणं..डावपेच..खेळी.. पुढची खेळी.. फासे टाकणं..
एका दगडात दोन पक्षी मारणं..
अस्तनीतला साप..सापाला ठेचणं,साप पाळणं, सापाला दूध पाजणं, सापाचं काहीही करणं..
खेळखंडोबा होणं..आगीतून फुफाट्यात पडणं..
उलटवार, पलटवार, काटा काढणं, काट्यानं काटा काढणं, सुंठीवाचून खोकला जाणं..
बाजी उलटवणं, टक्कर, "गाठ माझ्याशी आहे", "काखेत कळसा गावाला वळसा.."
...
...बंद करा..फ्रेश शब्द हवेत आम्हाला...
(कथा,कविता, नाटक, कादंबरी इ. ची नावं किंवा त्यातले शब्द): गोची, बोच, डूख, चकवा, जाळ, जोळ, कोहम, झाकोळ, काळोख, नाग, गिनीपिग, अंगार, अग्निकुंड, झुंजूमुंजू, सांजवेळ, यज्ञ, आहुति..
अश्वत्थामा, अश्वत्थाम्याची जखम.. त्या जखमेला आता लावा बँड-एड..
...वर्तमानपत्रांतून वापरलेले कागदी शब्द..
तपास, आढावा.. हे.कॉ. तावडे अधिक तपास करत आहेत..गृहमंत्र्यांनी परिस्थितीचा (हेलिकॉप्टरमधून) आढावा घेतला..
.. इशारा, सडेतोड इशारा, रोखठोक इशारा, कसलाही इशारा,पाकला किंवा कोणालाही (चोख) प्रत्युत्तर..
निधन, त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार..
..एकाच घरातील तिघांचा दुर्दैवी अंत, विचित्र अपघात, तिहेरी अपघात..
..मृतांत महिलांचा समावेश वेगळा कशाला दाखवावा लागतो ?
काहीही आढळणं.. उदा. झाडीत मृतदेह आढळून आला..
..दिल्लीत किंवा कुठेही चक्रं वेगानं फिरू लागणं..राजकीय वारे वाहू लागणं.. याक.. !!
जनजीवन विस्कळीत होणं (विशेषत: मुंबईत.. एरव्ही वेगळं काय असतं की जे पावसानंतरच "विस्कळीत होईल???)
रॉकी माउंट्न ऑयस्टर्स
रॉकी माउंट्न ऑयस्टर्स नावाचा प्रकार ऐकलायत की नाही?
http://en.wikipedia.org/wiki/Rocky_Mountain_oysters
साहित्येतर क्षेत्राबाबत वेगळा धागा काढावा का ?
@ रोचना आणि अरविंद कोल्हटकर, संपादक मंडळाची हरकत नसेल तर याच विषयावर पण साहित्येतर/ललितेतर क्षेत्रातील ठोकळेबाज उपमा आणि विशेषणांच्या अतीरेकी तोच तोच पणा बद्दल वेगळा धागा काढू इच्छितो, कारण माझ्याकडे बरीच उदाहरणे आहेत.
या साहित्य विषयक धाग्यास अनुसरूनः अलंकृततेच्या अती कौतुकाने भारतीय साहित्यात आणि हा तोच तो पणा येतो का ? आणि हिच पट्टी साहित्येतर क्षेत्रातही दिसते. संस्कृतमधील बर्याच ग्रंथांच कौतुकही अलकांरीकतेमुळेच होत असेल का ? तात्पर्य हा भारतीय साहित्यसृष्टीची हि जूनीच समस्या आहे किंवा कसे.
मी मराठी कोशकारांच्या एका संमेलनास मी अनाहुत (घूसखोर) वक्ता म्हणून बोलण्याची संधी मिळवली होती. संमेलन कक्षात संमेलनाचे इंग्रजीतील नावात कोणतेही विशेषण नव्हते मात्र मराठीतील अनुवादात विशेषण होते. मी या बाबीकडे माझ्या बोलण्यात उल्लेख केला (खचीतच औचीत्याचा अल्पसा भंग) तर संमेलनाच्या आयोजीका नाराज झाल्या त्यांनी नंतर बोलणे जरासे टाळलेच. इंग्रजी विकिपीडियाते मराठी विकिपीडिया सरळ सरळ केवळ तथ्य मांडणार्या वाक्यांच्याही अनुवादात तीचती विशेषणे प्रत्येकजण जोडत असतो.
काही उदाहरणे:
* त्यांना [[बॅकस-नौर फॉर्म]] ( BNF ) चा अग्रदूत मानले जाते.
* गर्द वनश्रीच्या सान्निध्यात
* या सार्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती
* एखाद्या जातिवंत हिर्याला जाणकार जोहरी भेटावा तसा हा साहित्यक्षेत्रात रत्नकांचन योग घडून आला.
* हे आपले महत्भाग्यच!
* .....या जगप्रसिद्ध ग्रंथावर आधारित पुस्तक......
* अभिजात यांत्रिकी हा सर्वात जास्त न्युटनी यांत्रिकी नावाने प्रसिद्ध आहे.
अगदी अगदी, अजून येऊद्यात
अगदी अगदी, अजून येऊद्यात विकिपीडियातील संपादन गाळणी अद्ययावत करण्यास अत्यंत उपयूक्त. सध्या आमची गाळणी "प्र(सि|सी)(ध्द|द्ध)|अ(ति|ती)(सू|सु|सूं|सुं)(न्द|द)र|रम(णि|णी)य|अग(दि|दी)|सर्वोत्तम|अ(त्यु|त्यू)च्च|महान|लोकहृदयसम्राट|थोर|परम(पू|पु)ज्य|(प्र|वि)ख्यात|ख्यात(की|कि)र्त" एवढ्या शब्दांची नोंद घेते (हे शब्द खूपचवेळा रिपीट होतात)
अजून उदाहरणे: *प्रमेय सिद्ध
अजून उदाहरणे:
*प्रमेय सिद्ध करण्याचे किंवा ते चूक असल्याचे सिद्ध करायचे जंगी प्रयत्न अनेक बुद्धिमान गणितज्ञांनी केले, पण त्या प्रदीर्घ काळात कोणालाही त्यात यश मिळाले नव्हते! सरतेशेवटी [[en:Andrew Wiles]] ह्या ब्रिटिश गणितज्ञाने अनेक वर्षांच्या भगीरथ प्रयत्नाने १९९४ साली ते प्रमेय अचूकपणे सिद्ध केले! (हि अलंकारीक वर्णनात्मक शैली ज्ञानकोशात अभिप्रेत नाही.)
त्यांचे आत्मचरित्र हे मराठी
त्यांचे आत्मचरित्र हे मराठी आत्मचरित्रात्मक वाङ्मयात महत्त्वाचे आत्मचरित्र मानण्यात येते.
हे वाक्य एका मराठी व्याकरणकाराबद्दलच्या लेखात आहे.
हे मराठीतील अग्रगण्य ............. आहेत.
प्रत्येक गोष्ट आणि व्यक्ती जग/विश्व प्रसिद्ध असलीच पाहीजे नाहीतर किमान अग्रगण्य/अग्रदूत वगैरे.
...........म्हणून अतिशय/भयंकर प्रसिद्ध आहे.
केवळ प्रसिद्ध शब्दही कमी पडतो विशेषणाला विशेषण अतिशय/भयंकर पाह्यजेच.
.......अत्यंत पवित्र/प्रसन्न आहे.
केवळ पवित्र/प्रसन्न पुरेसे नसते,सहसा ते आत्यंतीक अतीशय अत्यंत सुद्धा असते.
* अजून काय काय अत्यंत असते.
** ....अत्यंत बौद्धिक खेळ/हुशार आहे.
** ....अत्यंत योग्य/सोयीस्कर/दयाळू/शिस्तप्रिय/मेहनतीने आहे
** .....अत्यंत चुकीचे/चीड/क्लेशकारक/क्लिष्ट/कृश/अरूंद आहे
** .....अत्यंत खूश/आनंद आहे
** .....अत्यंत /विशाल/मोलाचे/निकडीचे आहे
अतोनात
मराठी लोकांमध्ये हाल/नुकसान/प्रेम या गोष्टी अतोनातच होत असतात.
......केवळ श्रेष्ठ आहेत असं नाही, तर ........मध्येसुद्धा ते श्रेष्ठतर आहेत.
पुनरुच्चार
........सर्व/सबंध देशांचे/जगाचे/विश्वाचे लक्ष वेधून घेतले
ललित साहित्यात चित्तवेधकताही ठायी ठायी भरलेली असते
अमूकला धक्का दिला, तमूक मध्ये उडी घेतली.
उड्या आणि धक्के
(लेखकांनु ह. घ्या)
तेच ते आणि तेच ते (उर्फ ठोकळेबाजपणा)
*........मुलांचा व्यक्तीमत्त्व विकास करणे म्हणजे त्यांचे अंतरंग विकसित करणे होय............
*......खरेतर आपली संस्कृती एवढी महान आहे की,........
*.......यांचे बालमनावर आक्रमण होत आहे........
*........व्यस्त आणि अत्यंत धकाधकीच्या जीवनात पालकांनाही........
*.......ची आवश्यकता लक्षात आली आणि आम्ही या क्षेत्रात उतरलो.....
*......असा या .......चा मर्यादित उद्देश नसून खऱ्या अर्थाने........
(लेखकांनो ह. घ्या.)
अजून काही शब्द प्रयोग
*सुप्रतिष्ठित/गर्दी खेचणारे/जनपाठिंबा/महत्त्वाचे/प्रबळ/ग्रासरूट लेव्हल/तळागाळातील/जनाधार/ मोठी फळी असलेले एकमेव राजकीय पुढारी समजले जातात.
*उमदे/प्रभावी/धडाडीचे/ताकदीचे/महत्त्वकांक्षी/आधुनिक जागतिक विचाराचे/सर्वांत जास्त जनपाठिंबा असलेले/आक्रमक भाषाशैली असलेले महाराष्ट्रातील व्यक्तिमत्त्व/नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
*झंझावाती प्रचाराने/सभांमुळे/दौऱ्यांमुळे/ कडाडून हल्ल्याने उभा महाराष्ट्र ढवळून काढला
*राजकारणातील एक पिढी महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीच्या तख्ताकडे निघाली होती.
*महाराष्ट्राच्या उद्धारासाठी आणि मराठी माणसाच्या स्वाभिमान जागृतीसाठीच....
* ......अतिशय प्रभावीत झाले........सुप्त नेता हेरला.
*.......पाठीत खंजीर खुपसला' अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी दिली
*....हे कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले.
*....भल्याभल्यांनी धडकी घेतली होती.
*.....हा त्यांच्या कारकीर्दीचा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल.
*.....त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो.
*....क्षेत्रातील एक थोर अधिकारी .....जगातील/भारतातील/महाराष्ट्रातील सर्व जातिधर्मांच्या आणि पंथांच्या लोकांत त्यांचे चाहते/भक्त/शीष्य आहेत.
*....लोकोद्धार करण्याचा आदेश दिला. .......धन्य झाले
*.....सर्व छळ आणि अपमान सोसून भक्त तसेच अभक्त ह्यांचा एकसारखाच उद्धार केला.
(लेखकांनु वाचकांनु हलकेच घ्या)
मराठी वारसा
*जागतिक संस्कृतीचा पुरा/सना-तन, समृद्ध, अनोखा, निखळ, परम मंगल, परम सुंदर, क्रांतिकारक, उज्वल, सकस, जबरदस्त, ऐतिहासिक, घराणे वारसा चालवणार
*आज परिस्थिती अशी आहे की, आपण आपला वारसा विसरलो
*यातील बहुतेक तरुण उमेदवारांना राजकीय वारसा आपल्या घरातून मिळालेला आहे.
*शास्त्रीयदृष्टय़ाही मुलाला आईकडून मिळणारा वारसा हा वडिलांकडून मिळणाऱ्या वारशापेक्षा खूप मोठा आहे...(संदर्भः दैनिक लोकसत्तातील मदर्स डेच्या दिवशीचा एका लेखाचे गूगल दृश्यांश www.loksatta.com/.../on-the-occasion-of-mothers-day... May 11, 2014 )
(लेखकांनु आणि अखील मराठी वारसदारांनो ह. घ्या.)
हाहाहा अतिशय हहपुवा
हाहाहा :) अतिशय हहपुवा लेख.
फारेन्ड यांच्या, चळवळींतर्गत "क्लिशे" टळण्याची जशी जोरदार मोहीम सुरु झाली आहे (परत क्लिशेच;)) तसे (मुद्दाम झाकलेले) कोणते व्यावहारीक मुद्दे कथा-कादंबर्यांत येऊ द्यावेत तेही चर्चिले तर बरे होईल. उदा.-
(१) नायक लाडात आल्यावर नायिकेला गुदगुल्या झाल्या असे एकाही कादंबरी-कथेत वाचले नाही पण ..... असो!
(२) नायक - नायिका मीठीत असताना एकमेकांच्या उच्छ्वासाचा त्रास होणे म्हणजे ओडर या दृष्टीने नसून हुळहुळणे व गुदगुल्या होणे...... हादेखील फक्त आमचाच प्रॉब्लेम आहे की युनिव्हर्सल आहे देव जाणे :(
(३)नायकाने नायिकेला गादीवर मीठीत घेतले असताना, प्रेमसंवादात, मध्येच नायिकेने, "तुझा हात माझ्या मानेखालून जरा काढतोस का?" आदि रसभंग करणारी वाक्ये ऐकविणे. :D
ढिश्क्यँव
हे म्हणजे अगदी 'ह्या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखे' वाटले होऽ. म्हंजे की नै असं बघा... की काही गोष्टींना काव्यात बंदी घालावी असं मला फार पूर्वीपासून वाटतं. पण कवड्यांची पैदास फार, सारे मिळून अंगावर धावून आले तर म्या सुदाम्याचा काय पाड लागणार म्हणून बोलायचा धीर होत नव्हता.
१. प्रियेच्या नजरेबाबतची सारी विशेषणे त्या नजरेसकट बाद. अशी कविता लिहिणार्या कवड्यास डोळे बांधून घाटात सोडून देण्यात येईल.
२. पाऊस या विषयावर कविता लिहिण्यास बंदी. अशी कविता लिहिल्यास कवड्याला सहारा वाळवंटात बदाऊं लोकांच्या संगतीत दोन वर्षे ठेवण्याची शिक्षा ठोठावण्यात यावी. (त्यानंतर 'रखरखीत वाळवंट' या विषयावर कविता लिहिण्यास मरेपर्यंत बंदी.)
३. कवितेमधे मरवा-पारवा-मारवा ही यमकाची जुडी वापरण्यावर जगाच्या अंतापर्यंत बंदी.
४. कवितेमधून प्राजक्त (यालाच पारिजात म्हणतात बरं का), चाफा, निवडुंग, केवडा, अबोली आणि पिंपळ या झाडाझुडपांच्या उल्लेखाला संपूर्ण बंदी.
५. चंद्र, चांदण्यांना आभाळातून खाली आणून कवितेत वापरणे हा आंतरराष्ट्रीय कटाचा भाग समजून त्या कवड्याला चंद्रावर नेऊन सोडण्याची शिक्षा द्यावी (घे लेका किती चंद्राची शीतळता चाखून घ्यायची आहे ती घे.)
६. 'निळ्या' रंगाच्या प्रत्येक उल्लेखाबद्दल विधात्याने 'लाल करण्यासाठीच' निर्माण केलेले कवड्याचे दोन्ही अवयव ताबडतोब रंगवण्यात येतील असे जाहीर करावे.
७. मांड आणि जोगिया या रागांची जुडी वापरण्यावरही निर्बंध घालण्यात यावेत.
८. मुक्तच्छंद ही कविताच काय, साहित्यही नव्हे असे जाहीर करून अशा न-साहित्य प्रसवण्याबद्दल कवड्याला 'हिंदू - एक समृद्ध अडगळ' इंग्रजी भाषांतरित करण्याची शिक्षा द्यावी.
९. मोरपिस, पिंपळपान, वहीत सुकलेला गुलाब... नाट अलौड.
१०. ज्ञाना-तुका वा नामाला वेठीला धरत अध्यात्माच्या लेंड्या टाकणे हे पवित्र परंपरेचा अपमान समजून 'धार्मिक भावना' ऊर्फ ढाबा कायद्याखाली दंडनीय अपराध मानला जावा नि शिक्षा म्हणून कवड्याला यातल्या कोणत्याही एका संताचे अभंग कॅटलॅन भाषेत अनुवादित करण्याची शिक्षा द्यावी.
आणखीही बरेच आहेत. सध्या एवढे पुरेत.
जाऊ दे सध्या एवढे पुरे. टंकाळा आला.
मुक्तच्छंद ही कविताच काय,
मुक्तच्छंद ही कविताच काय, साहित्यही नव्हे असे जाहीर करून अशा न-साहित्य प्रसवण्याबद्दल कवड्याला 'हिंदू - एक समृद्ध अडगळ' इंग्रजी भाषांतरित करण्याची शिक्षा द्यावी.
बहुत दिवस झाले, वाढला मुक्तछंदू|
लिहि कुणिहि पुराण्या छंदि, तो होय भोंदू|
सकल जन असेही, वर्डिती फार वर्षे |
बघुनि तधिं वरीचे, शांतलो फार हर्षें ||
ज्ञाना-तुका वा नामाला वेठीला
ज्ञाना-तुका वा नामाला वेठीला धरत अध्यात्माच्या लेंड्या टाकणे हे पवित्र परंपरेचा अपमान समजून 'धार्मिक भावना' ऊर्फ ढाबा कायद्याखाली दंडनीय अपराध मानला जावा नि शिक्षा म्हणून कवड्याला यातल्या कोणत्याही एका संताचे अभंग कॅटलॅन भाषेत अनुवादित करण्याची शिक्षा द्यावी.
किंवा कवी भूषणाचे काव्य फारसी भाषेत अनुवादिल्या जावे.
'फर्ज़ंद-ए-शाह, शेर-इ-कोह, बफ़ौज मुगल खल्लास करदन, मलिच्छहा जहन्नम रफ्त' इ,इ.
लै भारी लेख! आई म्हटलं की
लै भारी लेख! =)) =))
आई म्हटलं की कारुण्यसिंधूच हवी
दणकट नदी किंवा अवखळ झरा चालणार नाही
बाप कसा आधारवडासारखाच हवा
खेळकर बांबू किंवा लाजरी लाजाळू चालणार नाही
आकाशाची ना! छत्रीच असायला हवी
टोपली किंवा कुंची चालणार नाही
धरणीसुद्धा आईसारखीच पाहिजे
मावशी किंवा आत्या चालणार नाही
मुखडा नेहमी चंद्रावाणीच पाहिजे
उगंच शुक्र अन गुरु चालणार नाहीत
नाकसुद्धा चाफेकळीच पाहिजे
निशीगंधाची कळी चालणार नाही
प्रेम गुलकंदासारखं गोडमिट्ट हवं
पाणीपुरी किंवा ठेचा चालणार नाही
संतापाचाही तिळपापडच पाहिजे
मोहरी किंवा तिरफळ चालणार नाही
उपमा आणि रुपक ठरलेलीच हवी
भलतंसलतं काही चालणार नाही
गुळगुळीत आणि गुळमुळीत आयुष्यात
डोक्याला शॉट चालणार नाही.
लै भारी धागा आणि
लै भारी धागा आणि प्रतिसाद.
हल्ली लोकांच्या तोंडी ऐकलेला आणि भयंकर डोक्यात जाणारा शब्द म्हणजे 'बेबी'. "आमच्याघरी 'बेबी' येणारे", "त्यांच्या 'बेबी'ला बघून आलो" इ. वाक्य धोत्र्याच्या रसात उकळून त्या पोराला पाजावीत अशी फार इच्छा निर्माण होते.
मास्तरचं मास्तरडा करतात, तसं कविचं कवडा केलेलं दिसतंय...
कवडा हा शब्द 'झेंडूची फुले'मध्ये अत्र्यांनीही वापरला आहे. जुनाच आहे.
फार एन्डी
पुढील वाक्यांचा पण कंटाळा आला आहे.
१. अमुक तमुक अतिशय आवडल्या गेले आहे.
२. प्रत्येक बातमीत लहान मुलीला चिमुकली न म्हणता चिमुरडी म्हणणे.
३. हल्ली फ्लायओव्हरला सर्रास 'उन्नत मार्ग' म्हणायला लागलेत. आमच्या लहानपणाच्या वाचनापासून 'उन्नत' हा शब्द फक्त उरोजांसाठी राखीव आहे.
माझी आवडती तणतण
गुळगुळीत निर्जीव उपमा आणि ठोकळेबाज वाक्प्रचार टाळावेत, ही माझी नेहमीची तणतण असते. ती व्यक्त केल्याबाबत फारएण्ड यांना +१
(काही तारतम्य असे : काही उपमा इतक्या निर्जीव होतात, की त्या उपमा न राहाता नवीन साधेसुधे शब्द होतात. टोकाची उदाहरणे म्हणजे बहुतेक शिव्या. अथवा साधेसुधे उदाहरण म्हणजे "टोकाचे उदाहरण", "चांदीचा भाव कोसळला", "पोलियो निर्मूलन" वगैरे वाक्प्रचार. यात "टोक", "मोठ्या उंचीवरून किंवा मोठ्या प्रमाणात वरतून खाली पडणे", "मुळासकट काढून टाकणे" या प्राचीन चित्रदर्शी उपमा नाहिशा झालेल्या आहेत. म्हणूनच निर्जीव उपमांचा कंटाळा येतो, तसे येथे होत नाही.)
नव्हे, सुयोग्य विशेषण
नव्हे, त्या परिच्छेदात वापराकरिता ते सुयोग्य विशेषण आहे :-)
"नवीन शब्द घडताना पुष्कळदा उपमा-म्हणून-अर्थ गेलेले शब्द उपमेयाकरिता साध्या अर्थाने वापरात येतात, अशा शब्दांबाबत "ठराविक उपमा" म्हणून निंदा अयोग्य आहे, कारण इतिहासात कधी ती उपमा असली, तरी आता ती उपमा राहिलेली नाही." असा आशय आहे.
...
ऊठसूट (१.) पु.ल.१ आणि/किंवा (२.) सुरेश भटांची 'गझलेची बाराखडी' यांतील उद्धृते फेकणारांस उलटे टांगून मिरच्यांची धुरी देण्याची शिक्षा जाहीर व्हावी. ('उलटे टांगून मिरच्यांची धुरी' हादेखील क्लीशे आहे, ही बाब अलाहिदा२.)
-------------------------------------------------------------------------------------------------
१ एक्सेप्ट इन सारक्याज़म. (केवळ 'कारण शेवटी आम्ही भटेच' या उद्धृतास या नियमातून सूट मिळावी, याच हेतूने हा अपवाद अत्यंत शिताफीने आणि बेमालूमपणे घुसडलेला आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून, इ.इ.)
२ हा 'अलाहिदा' शब्द खास आमच्या सोयीसाठी क्लीशेंच्या यादीतून कृपया वगळला जावा, एवं प्रार्थना.
एक्सेप्ट इन सारक्याज़म. (केवळ
एक्सेप्ट इन सारक्याज़म. (केवळ 'कारण शेवटी आम्ही भटेच' या उद्धृतास या नियमातून सूट मिळावी, याच हेतूने हा अपवाद अत्यंत शिताफीने आणि बेमालूमपणे घुसडलेला आहे, हे चाणाक्ष वाचकांच्या नजरेतून, इ.इ.)
वस्ताद हो नवीबापू! कोडतांत साक्षीदार म्हणून नाव काढाल.
-बॅटू बरवा.
क्लिशे नावाचा ठोकळा
Cliché या शब्दाचा उगमही रोचक आहे -
The word cliché is drawn from the French language. In printing, a cliché was a printing plate cast from movable type. This is also called a stereotype. When letters were set one at a time, it made sense to cast a phrase used repeatedly, as a single slug of metal. "Cliché" came to mean such a ready-made phrase.
Many authorities say that the French word "cliché" comes from the sound made when the molten stereotyping metal is poured onto the matrix to make a printing plate, including the statement that it is a variant of cliquer, "to click" though some authorities express doubt.
(येथून - en.m.wikipedia.org/wiki/Cliché)
अवांतर - या पार्श्वभूमीवर लेले आडनावाच्या व्यक्ती आपल्या नावाचा शिक्का केवळ 'ले' एवढाच बनवून दोनदा वापरतात, हा विनोदही आता शब्दशः क्लिशे म्हणावा लागेल ;)
मस्त
फक्कड लेख! कॉलेजची ती रंगीबेरंगी, फुलपाखरी वर्षं + धरतीचा हिरवा शालू हे तर 'क्लिशे' शब्दालाही ओशाळायला लावणारे :)
चटकन आठवणारी अजून काही उदाहरणं -
१. प्रत्येक अॅक्टिव्ह वृद्धाच्या उत्साहाचं वर्णन हे 'तरूणांना लाजवेल अशा' ह्या प्रिअॅम्बलसकट आलं नाही, तर उपसंपादक जातीने हा शब्दसमूह पेरत असावेत.
२. सोन्याचा गोळा होऊन बुडणारा सूर्य + श्रावणातल्या ऊन-पावसाचा लपंडाव + वटवृक्षाची शीतल छाया
३. सांद्र संगीत, गर्तेत पडणार्या अबला इ. उपमा जरी किंचित कालबाह्य झाल्या असल्या तरी अजूनही मनोरंजक.
मात्र अशा ठोकळेबाज रूपकं/उपमांच्या पार्श्वभूमीवर 'बनगरवाडी'तली चुरगळून रस्त्याच्या कडेला टाकून दिलेल्या कागदाच्या बोळ्यासारखी झोपडी किंवा लंपनचं 'आधी एकमेकांच्या हातांत हात घालून जाणाऱ्या मित्रांसारखे मुख्य रस्ते. मग झाडांना फुटणाऱ्या फांद्यांप्रमाणं त्यांच्यापासून फुटणारे दुसरे रस्ते' असं गावातल्या रस्त्यांच्या मॅड जाळ्यांचं वर्णन किंवा 'कधी न धुतलेलं गरम जाकीट घातलेल्या दमेकरी म्हाताऱ्यासारखी हवा' असं पहिला पाऊस पडण्यापूर्वीच्या त्रासदायक, कोंदट उकाड्याचं गाडगीळांचं वर्णन कसं उठून दिसतं.