ही बातमी समजली का? - २९
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं.
अश्या बातम्यांसाठी या धाग्याचा वापर करावा.
==========
आता हमखास प्रगतीशील भारताचे आरोग्यमंत्री यांना लवकरच पोप संतपद देणार बहुतेक! शाळांतील लैंगिक शिक्षणही बंद करायला हवे असे म्हणताहेत.
सॉरी पोप कसे संतपद देतील? भारतात संतांची निंदा/टिका करण्यास मज्जाव येणारे विधेयक येणार आहे अशी बातमी कालच वाचली. म्हणजे संत कोणाला म्हणावे याची डेफिनेशन सरकारच देणार आहे तर! बाहेरचे पोप कशाला हवेत सरकार आहे की?
हे सगळे वाचून एकुणच भारतात 'अच्छे दिन' येण्याला सुरूवात तरी झालीये का उलट दिशेने प्रवाह सुरू झालाय? अशी शंका उत्पन्न करणार्यांना हुच्चभ्रु म्हणून हिणवले की आपण कोशात रहायला मोकळे!
अत्यंत प्रतिगामी निर्णय!
अत्यंत प्रतिगामी निर्णय!
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
नशिबाने हा निर्णय
नशिबाने हा निर्णय आरोग्यमंत्र्यांच्या कक्षेत नसल्याने तसा निर्णय झालेला नाही.
मात्र स्वतः डॉक्टर असलेल्या आरोग्यमंत्र्याचे हे वक्तव्य धक्कादायक व प्रतिगामी आहे हे खरेच.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सु? शिक्षित?
उच्च शिक्षित माणसाचे राजकारणात गेल्यावर माकड का होते हे समजत नाही. आधी ते केजरीवाल, आता हे हर्षवर्धन.
प्रत्येक
प्रत्येक पार्टीमध्ये स्वतःचे असे खास दिग्विजयसिंग असतात!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
हे सगळे वाचून एकुणच भारतात
'रोचक' श्रेणी दिलेली आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अच्छे दिन
अच्छे दिन येणारेत का?
ठौक नाही.
सद्य सरकार काही बिन्डोकपणाचा कहर करतय किंवा अत्यंत घातक अशा काही गोष्टी करतय का ?
असेलही; नक्की सांगता येत नाही. पण ---
आधीच्या सरकारांपेक्षा फार असा वेगळा काही तमाशा ही मंडळी करताहेत का ?
पहा जरा विचार करुन.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
अत्यल्प प्रमाणात मुद्दा
अत्यल्प प्रमाणात मुद्दा मान्य. सदर बाबी या तुलनात्मक असतात.
आणि (पोस्ट-९०)आधीच्या सरकार प्रमुखांनी आपणच काय ते मसीहा असल्याचे चित्र उभे केले नव्हते! पार्श्वभूमीही महत्त्वाची आहे.
दुसरे असे की आधीच्या सरकारवर चुकीच्या गोष्टी केल्यावर टीका होत नव्हती काय? टिकेचा स्तर काय होता? पहा जरा विचार करून
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शाळांतील लैंगिक शिक्षणही बंद
शाळांतील लैंगिक शिक्षणही बंद करायला हवे
१) या लोकांना कारणं का देता येत नसावीत ? लैंगिक शिक्षणावर बंदी असावी असे तुम्ही का म्हणताहात ते सांगा ना.
२) मूल्यशिक्षण हे ठीक आहे. पण मूल्यशिक्षण हे कुटुंबात आईवडील पण देतात व देऊ शकतात. मुलांच्या विकासात आईवडील हे भाग घेतात की नाही ??? आणि मूल्यशिक्षण हा लैंगिक शिक्षणास पर्याय का ? मूल्यशिक्षण आणि लैंगिक शिक्षण हे दोन्ही मिळून पॉलीसी का नाही ?
put strong emphasis on exposing students to India's cultural relations
३) सेक्स चा विषय आला रे आला की यांना फक्त संस्कृती आठवते. जणूकाही लैंगिक मूल्ये हा संस्कृती चा "मोस्ट इंपॉर्टंट बिल्डिंग ब्लॉक" आहेत. काय चक्रमपणा आहे ??? मॅथॅमॅटिक्स्/भौतिकशास्त्र शिकवताना लगेच मूल्यशिक्षणाचा मुद्दा उपस्थित का केला जात नाही ? कल्चरल रिलेशन्स मधे वात्सायन का येत नाही ?
४) मागे महाराष्ट्रसरकारने ही असाच चक्रम निर्णय घेतला होता (असे वाचल्याचे स्मरते आहे). म्हणे शिक्षकांना लाज वाटते शिकवताना. अरे यार मग व्हिडिओ क्यासेटा बनवून त्या दाखवा. स्टँडरडाईझ्ड पण होईल. (लगेच आम्ही गरीब आहोत ... व्हिडिओ परवडत नाहीत चा बकवास सुरु.)
thanks to vinoba
thanks to vinoba.
एकदा त्यांच्या मातोश्री त्यांना म्हणाल्या :-
"जो व्यवस्थित संसार करतो तो आपले पितृऋण फेडत असतो.मागच्या पिढीचा उद्धार करतो. पण जो आजन्म ब्रम्हचारी राहतो तो मागील पन्नास पिढ्यांचा उद्धार करतो." (अध्याहृत अर्थ :- "तसे" करणे म्हणजे काहीतरी गलिच्छ च्छी च्छी असते. काहिच न करता एकटे बसणे म्हणजे मानववंश संपवायला हातभार लावणे हिच्च काय ती कर्तबगारी. बाकी सगळे वैट वैट्ट.)
हे उदाहरण प्रातिनिधिक समजता येउ शकेल, इतकं रुजलय.
मग ह्यातूनच ररा म्हणतात तसे लैंगिक शिक्षण म्हणजे "संभोग करण्याचे शास्त्र" असा समज मनी धरुन बसतात काही मंडळी.
पर्यायाने लैंगिक शिक्षण दिल्याने मुले मुली (विशेषतः पौगंडावस्थेतील) अतिरिक्त कामवासनाप्रेरित होतात आणि दिसलं कुणी भिन्नलिंगी की तत्काळ संभोग करण्यास आतुर होतात ; हा अध्याह्रुत समज आहेच.
जियो!
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
पर्यायाने लैंगिक शिक्षण
पर्यायाने लैंगिक शिक्षण दिल्याने मुले मुली (विशेषतः पौगंडावस्थेतील) अतिरिक्त कामवासनाप्रेरित होतात आणि दिसलं कुणी भिन्नलिंगी की तत्काळ संभोग करण्यास आतुर होतात ; हा अध्याह्रुत समज आहेच.
चित्रपटातील हिंसाचार बघून हिंसा करायला उद्युक्त का होत नाहीत ? ---- हा प्रश्न विचारायला हवा.
(आता लगेच अॅपल्स टू ऑरेंजेस चा मुद्दा उपस्थित होणारच.)
चित्रपटातील हिंसाचार बघून
होणारच नाहीत असंही नाही.
?
'चित्रपट पाहूनच लोक खून करावयास प्रवृत्त होतात' असाच समज आमच्या लहानपणी तरी (आमच्या पालकांच्या पिढीत) प्रचलित होता ब्वॉ. विशेषतः, जोशी-अभ्यंकर प्रकरणाच्या काळात याबद्दल खूपदा ऐकलेले आहे.
"खून-मारामार्यांचे चित्रपट पाहून मुले खून करायला तेवढी शिकतात; 'संत ज्ञानेश्वर' पाहून ज्ञानेश्वरांसारखे (म्हणजे नेमके कसे, कोण जाणे!१) बनायला तेवढी शिकत नाहीत" ही तत्कालीन टिपिकल पालकपिढीची पेट पीव्ह होती, असेही या निमित्ताने स्मरते.
असो.
------------------------------------------------------------------------------------------------------------
१ पुढे मोठे झाल्यावर आम्हीही ज्ञानेश्वरांप्रमाणे 'भिंत' चालवून दाखविली, हे जरी खरे असले, तरी त्यामागील प्रेरणा 'संत ज्ञानेश्वर' हा चित्रपट नव्हे, हे या निमित्ताने येथे नमूद करणे इष्ट आहे. किंबहुना, त्या चित्रपटातील 'भिंत' चालविण्याचे चित्रीकरण तथ्यास धरून नाही - त्या चित्रपटात 'भिंत' चालविण्याच्या नावाखाली भलतेच काही दाखवले आहे - असेच आमचे प्रतिपादन आहे. असो.
ज्ञानेश्वरांसारखे (म्हणजे नेमके कसे, कोण जाणे!१)
म्हणजे त्यांनी १६व्या वर्षी समाधीरूपे कल्टी मारण्याचे केले, त्या संदर्भात असावे असा कयास आहे
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
एकदा त्यांच्या मातोश्री
विनोबांच्या मातु:श्रींची शिकवण त्यांच्या वडिलांनी (द्याटिज विनोबांच्या मातुल आजोबांनी) पाळली असती तर किती बरे झाले असते, नै?
तैत्तिरीयोपनिषदात तर सरळ सरळ याविरुद्ध लिहिलेले आहे.
"प्रजातन्तुं मा व्यवत्छेसी:". प्रजातंतूचा नाश करू नको म्हणून. वर पिन पण सगळ्यात भारी मारून ठेवलीये:
"यान्यस्माकं सुचरितानि, तानि त्वयोपास्यानि- नो इतराणि |" जी आमची योग्य कृत्ये असतील, तीच तेवढी पुढे आचरणात आण, बाकीची नको. आता योग्य कुठली अन अयोग्य कुठली याबद्दलचा "औखम्यस्-क्षुर" त्यांनी पुढच्या पिढीस बहाल केले किंवा नाही, याबद्दलचा विदा आमच्याकडे नसला तरी आधीची पिढीच सर्वज्ञ आहे इ.इ. क्र्याप उपनिषदानेच तोडल्यामुळे बरे वाटते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
लग्नाची वयं वाढल्यामुळे हा
लग्नाची वयं वाढल्यामुळे हा बकवा सुरू झालेला आहे. ट्रांझिशन पीर्यड आहे, पुढे जरा ष्ट्रीमलाईन होईलशी आशा आहे. पूर्वी कित्ती वैट्ट वैट्ट वगैरे दिवस असले तरी एक बरे होते, योग्य त्या वयात लैंगिक संबंध ठेवणे शास्त्र-समाज-रुढीसंमत होते. आता लग्नाची वये तर वाढली, पण फ्रिजिड रूढींचे ओझे तसेच राहिले, सबब लग्न होईपर्यंत कैकदा के एल पी डी होतो आणि फ्रस्ट्रेषण येतं. अगोदर तसं नव्हतं ते एक बरं होतं च्यायला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
तुम्ही 'नाथमाधव'१ नावाच्या प्राण्याच्या ('मनुष्य' म्हणवत नाही हो त्यास!) कादंबर्या वाचल्या आहेत काय? '
लैंगिकशिक्षण दिल्यानेमुलेमुली (विशेषतः पौगंडावस्थेतील) अतिरिक्त कामवासनाप्रेरित होतात आणि दिसलं कुणी भिन्नलिंगी की तत्काळ संभोग करण्यास आतुर होतात' असा काहीसा अध्याहृत समान धागा त्याच्या लिखाणात निदान मला तरी दिसला ब्वॉ.'नाथमाधव' माझ्या अंदाजाप्रमाणे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरचा / विसाव्या शतकाच्या सुरुवातीसुरुवातीचा. गेल्या शंभरसव्वाशे वर्षांत अध्याहृतात ('लैंगिक' आणि 'मुले' या) दोन शब्दांची भर पडली, हे (संथ परंतु सुनिश्चित) प्रगतीचेच द्योतक नव्हे काय?
-------------------------------------------------------------------------------------------------
१ द्वारकानाथ माधव पितळे.
नाथमाधव _/\_ ती वीरधवल नामक
नाथमाधव _/\_
ती वीरधवल नामक धवल कव्हरात बांधलेली मोठ्ठी कादंब्री वाचण्याचा कोणे एके काळी प्रयत्न केला होता. जितकी शब्दबंबाळ आणि मजेशीर/जोरकस शैली तितके ते पुस्तक जास्ती आवडावे अशा काळात वाचल्यावरही अंमळ टर्न ऑफच झाला होता. अतिशय भिकार लेखन अशी समजूत झाल्यावर मग ते पुस्तक पुनः आजवर हातात घेतले नाही, किमान गेली १० वर्षे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
'वीरधवल' संग्रही आहे, परंतु त्याचे अर्धेएक प्रकरण वाचल्यावर जो एक भीषण कंटाळा आला, त्यानंतर पुन्हा त्या पुस्तकास हात लावण्याचे धारिष्ट्य केलेले नाही.
माझा रोख बहुतांशी 'रायाक्लब/सोनेरी टोळी' किंवा 'डॉक्टर'सारख्या वाचनास अत्यंत सोप्या, परंतु अधूनमधून घुसडलेल्या 'सामाजिक संदेशां'च्या भडिमाराचा सुकाळ असलेल्या कादंबर्यांकडे होता.
धारिष्ट्य न करण्याबद्दल सहमत.
धारिष्ट्य न करण्याबद्दल सहमत. बाकी त्यांचे वीरधवल सोडून अन्य वाङ्मय ओझरतेदेखील वाचलेले नाही किंवा कधी पाहिलेलेही नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
...
सुखी आहात.
एकंदरीत, 'सतीबंदी झाली, इतपत प्रगती ठीकाय, परंतु त्यापुढे स्त्रियांना शिक्षणसुद्धा देणे म्हणजे फारच झाले ब्वॉ! शिक्षणाने स्त्रियांच्या डोक्यांत नाही नाही ती खुळे शिरतात, स्त्रिया व्यभिचारी बनतात; लोकांनी त्यांचा गैरफायदा घ्यायला व्हल्नरेबल होतात; विशेषतः जेथे मुलेमुली एकत्र शिकतात तेथे तर मुले-मुली-शिक्षक-शिक्षिकांचे कायकाय प्रकार चालतात, रामारामारामा! हा सगळा त्या सुधारणावाद्यांनी पाश्चात्यांचे पाहून चालवलेला फाजीलपणा आहे. मुलींना पारंपरिक कौटुंबिक शिक्षण जे मिळत होते, तेच छान होते, उपयुक्त होते, भारतीय संस्कृतीस अनुकूल होते' असा एक सूर कायम दिसतो.
शिवाय, 'रायाक्लब'मध्ये यांच्या हीरोगुलींनी नाही नाही ते पालथे धंदे केले, तर ते मात्र चालते, हे डब्बलष्ट्याण्डर्ड आहेच.
असो. यू गॉट मी ष्टार्टेड, पण आता आवरते घेतो.
हम्म...
रोचक प्रकार आहे सगळा. वीरधवलकारांवर हा पांढरा डाग असल्याची कल्पना नव्हती!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ह्ये आलं ढकलून :
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
३) सेक्स चा विषय आला रे आला
प्रचंड सहमत. सगळी नीतिमत्ता दोन इंचाची.
चीनमध्ये कसं सगळं च्चान चान
चीनमध्ये कसं सगळं च्चान चान आहे, तिथे कशी प्रगती आहे असे मत असणार्यांसाठी ही ताजी बातमी
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अवाक.
अवाक.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
चीनमध्ये असले लै प्राब्ळम्स
चीनमध्ये असले लै प्राब्ळम्स आहेत, मात्र त्यासोबत प्रगतीही आहेच. दोहोंपैकी कुठलीही गोष्ट नाकारणे वेडेपणाचे आहे. इतके अत्याचार असतील तर ती खरी प्रगतीच नव्हे इ.इ. मॉरल गणिते निरर्थक आहेत, कारण पॉवर आहे ती नाकारू शकत नाही कुणी. पण येस- गवर्मेणची एकाधिकारशाही तिकडे प्रचंड आहे.
झालंच तर अच्छे दिनवाल्यांनाही असंच वाटत असेल इ.इ.इ.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ब्याक टू स्क्वेअर वन. प्रगती
ब्याक टू स्क्वेअर वन.
प्रगती म्हणजे काय आणि ती कोणाची?
असो. या विषयातलं आपल्याला
असो. या विषयातलं आपल्याला फारसं कळत नाही, पण ५-६ ट्रिलियनची अर्थव्यवस्था म्ह. काहीतरी प्रगती असावीसे वाटते खरे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अर्थात, चालू व्याख्येप्रमाणे
अर्थात, चालू व्याख्येप्रमाणे ती प्रगतीच. आणि त्यांनीतरी का प्रयत्न करु नये?
चीनला नावं ठेवणारे लोकच ही उत्पादने वापरतात तेव्हा त्यांना ती कुठून येतात ते विचारावसं वाटत नाही; उलट त्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायलाही झुंबड उडते. युरोप-अमेरिकेत (किंवा भारतातही) साधं-सरळ सुखवस्तु आयुष्य जगणारे लोक आपला त्यात काहीच हात नाही असं सोयीस्करपणे ठरवून टाकतात.
नाइकी व अॅपल सारख्या कंपन्या चीन, बांग्लादेशात सर्रास स्वेटशॉप्स चालवतात आणि वेस्टर्न मिडियात ज्या पानावर या कंपन्यांचं कौतुक छापतात त्याच पानावर चीनमधल्या मानवहक्कभंगावर टीका करतात.
सगळ्यात वाईट काय असेल तर आपल्यासारख्या लोकांचा दुटप्पीपणाच. आपण स्वतःला समजतो तितके आपण निष्पाप नाही एवढंच यातून समजलं म्हणजे पुरे.
पूर्ण सहमत. चीन किंवा
पूर्ण सहमत. चीन किंवा बांग्लादेश अथवा सौथ ईस्ट एशियातले स्वेटशॉप्स नसते तर युवरूप आणि आम्रविकन कंपन्यांना तितके प्रापीट झालेच नसते. प्रगतीची काहीएक चव वेष्टर्न लोकांनी गेल्या १००-२०० वर्षांत दाखवली, तेच सांबार आता आशिया खंड बनवू लागला तर लैच आंबट म्हणून गोरे वराडतात.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यश
वैधानिक इशारा :-
पुढील प्रतिसाद गलिच्छ्/गचाळ वाटण्याची शक्यता आहे.
वॉट्सअॅपवर आलेला एकोळी सुविचार :-
यश हे संडासच्या वासासारखं असतं. आपलं असतं तेव्हाच सहन होतं.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
-१
आपलं असतं तेव्हाच सहन होणे हा धागा जरी दोहोंत असला, तरी यश कायम हुंगावेसे वाटते हे लक्षात घेतल्यास ते साधर्म्य अंमळ विचित्र ठरावे. अर्थात स्क्याट फेटिश असेल तर आमचे काही म्हणणे नाही, पण त्याच्या बाहेरही लोक लै असतात, इतकेच...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
... (अवांतर)
नाही म्हणायला, आपण छुपे (मराठीत: क्लॉज़ेट) लिबरल असाल, अशी शंका अलीकडे आम्हांस येऊ लागली होतीच. (इन विच केस, वेल्कम टू द क्लब.१)
मात्र, तसे काही नसल्यास, कदाचित आपला लिबरलत्वाच्या दिशेने प्रवास आपल्या नकळत सुरू झालेला असू शकेल, अशी पूर्वसूचना/इशारा देण्याचे कर्तव्य एतद्द्वारा पार पाडू इच्छितो, इतकेच.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
१ बोले तो, लिबरलांच्या क्लबात. क्लॉज़ेट लिबरलांच्या क्लबात नव्हे. अर्थात, 'कमिंग औट'संबंधीचा निर्णय सर्वस्वी आपला आहे, परंतु कधी तो निर्णय घेतलातच, तर क्लबाची दारे आपणांकरिता सताड उघडी आहेत, इतकेच. (सदस्यत्वासाठी अर्जाची आवश्यकता नाही.२)
२ अर्थात, 'I don’t care to belong to any club that will have me as a member' असे जर आपले काही असेल, तर त्याचाही आदर आहेच.
(No subject)
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
.....
तसे काही बाबतीत लिबरल आम्ही आहोतच. फक्त ब्र्यांड अंमळ वेगळा आहे. आयदर वे, धन्यवाद.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
चीनमध्ये सगळ चान चान आहे असं
चीनमध्ये सगळ चान चान आहे असं मत फार कोणाचं ऐकलं नाही. पण इन्फ्रा आपल्यापेक्षा भारी आहे यात वादच नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
छान छान म्हणजे कसं, आता ही
छान छान म्हणजे कसं, आता ही झोपडपट्टी हटवायची म्हटली की रातोरात हटवली जाते.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
पण इन्फ्रा आपल्यापेक्षा भारी
अरे वा! अख्ख्या देशात की काही मोजक्या शहरांत? बाकी आपल्या कुठल्या ठिकाणच्या 'इन्फ्रा'ची तुलना चीनमधील कोणत्या इन्फ्राशी चालली आहे?
बाकी तुम्हाला वादच नाही म्हणण्याइतकी ठाम माहिती आहे म्हणून विचारलं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हॅहॅहॅ... आमची ऐकीव माहिती
हॅहॅहॅ... आमची ऐकीव माहिती हो... २-३ दोस्तं जाऊन आलेत. वेगवेगळ्या भागात. शहरी आणि निमशहरी. त्यांच्या कडून ऐकलेले.
(गुजराथ सोडून इतर भारतापेक्षा चांगले असं लिहायचा मोह आवरलेला आहे)
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मिपावर इस्पीकचा एक्का हे
मिपावर इस्पीकचा एक्का हे चीनला स्वतः जाऊन आलेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओव्हर ऑल इन्फ्रा बर्यापैकी चांगले आहे. मिपावरच त्यांची चीनवरची लेखमाला आहे ती पाहणेचे करावे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यातला तर्क समजला नाही.
"आपले नितिन थत्ते गुजराथमध्ये राहिले आहेत आणि त्यांना गुजराथमध्ये फार प्रगती झाली आहे असं वाटत नाही", या वाक्याला जितपत महत्त्व देता येईल त्यापलिकडे वरच्या वाक्याला द्यावं का? (नितिन थत्ते आकडेवारी दाखवून आपल्या वाक्याला पुरावे देतात, पण त्यात त्यांच्या गुजराथ वास्तव्याशी काही संबंध नसावा.)
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
किमान एक विदाबिंदू म्हणूनही
किमान एक विदाबिंदू म्हणूनही पहायचं नसेल तर प्रष्णच मिटला.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
तेवढ्यापुरतंच पहायचं तर
तेवढ्यापुरतंच पहायचं तर गुजराथच्या फेसबुकीय जाहिरातींमध्येही चीनची बरीच प्रगती पाहिली की, अहमदाबाद आहे म्हणत. कोणाला तिथे प्रत्यक्ष जायची गरज काय?
विदाबिंदू म्हणून अंबानी फार श्रीमंत माणूस आहे, भारताची प्रगती झाली असंही म्हणता येतं. वरचा नगरीनिरंजन यांचा प्रतिसाद आणि बहुतेकांचे आक्षेप संपूर्ण चित्र न पाहता एक तुकडा काढून त्यावर समाधान मानण्यावर असतात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
समग्र चित्र दाखवणारा प्रतिसाद
समग्र चित्र दाखवणारा प्रतिसाद पाहिल्यास आम्हांसही बरेच वाटेल. नपेक्षा जिगसॉमधला हाच तुकडा आवडतो इ.इ. लै पाहून झालंय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
उत्सुकता
वरचा हा प्रतिसाद संपूर्ण चित्र न पाहता एक तुकडा काढून समाधान मानणारा आहे असे म्हणायचे आहे काय?
वाटलंच होतं चीनमध्ये टुरीझम
वाटलंच होतं
चीनमध्ये टुरीझम रेस्ट्रीक्टेड आहे.
अतीरेस्ट्रीक्टेड!
काही शहरांच्याबाहेर टुरीस्ट जाऊ शकत नाहीत. विशेष विजा लागतो जो सहजी मिळत नाही.
) बघुन भार्ताबद्दल मत बनवण्यासारखे आहे.
इतकेच नाही या शहरांअम्धील ट्रान्सपोर्ट विमानाने आवश्यक आहे, त्यामुळे "देश" दिसत नाही. त्यावर चीनबद्दलचं मत बनवणं म्हंजे मुंबईला (किंवा फक्त गुजरातला
चीनमध्ये तिबेटला कित्येक गावांत वीजेची लाईनही पोचलेली नाही.
गावात दळणवळणाच्या काय-किती सोयीआहेत या बाबत उलटसुलट माहिती येते (आपल्याकडे गाव तिथे रस्ता व रस्ता तिथे एस्टी खरंच आहे) तेव्हा हे विधान इतके ठामपणे कसे करावे याबद्दल आश्चर्य वाटले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
+१
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
...
इन्फ्रा तसे सौदीमध्येही भारी असेल हो (चूभूद्याघ्या.), पण उपयोग काय?
http://www.economist.com/news
http://www.economist.com/news/china/21605942-first-two-articles-chinas-s...
चीन मधील आत्महत्येचे प्रमाण ....... घटले
आत्तापर्यंतच्या निरीक्षणावरून
आत्तापर्यंतच्या निरीक्षणावरून (मी बरेच निरीक्षण केले आहे, आमच्याकडे ते भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते) हर्षवर्धन एक सुविचारी, संतुलित, इ इ गृहस्थ वाटत आलेले आहेत. त्यांनी संक्षेपात आपल्या ब्लॉगवर "सो-कॉलड सेक्स एज्यूकेशन" असे लिहिले आहे. यात ते सो-कॉलड कशाला म्हणत आहेत हे समजेपर्यंत धीर धरावा.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
आता कस्सं! सगळं कसं नार्मल
आता कस्सं! सगळं कसं नार्मल चाल्लंय!
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
होय, अगदी नॉर्मल आहे.
डॉक्टरसाहेबांच्या आजच्या स्पष्टीकरणानंतर खालिल गोष्टी पुन्हा प्रकर्षाने जाणवल्या-
१. टाईम्सला सनसनी फार आवडते. खास करून लैंगिक. टाईम्सच्या वाचकांना अजूनच.
२. इश्शू काय आहे ते फेसबूकवरून (माझा एक कमेंट) चिपकावतोय.
There is mutifold confusion in this. First is that it a random statement on this poitician's site written long back under title 'views on education.' The minister has written that he is opposed to only the "so-called" sex education. Second part is the sensation friendly, commercially motivated and libertian subserviant daily Times of India which has needlessly made this a news. Lastly it is the NRI diaspora which does not take much to start thinking that all things are stupid about India. Mr. Harshvardhan is a doctor himself, he was BJP's chief ministerial candidate for Delhi and I have wateched him talking on this issue. His concern is when sex education is given in colleges it appears as if " 'doing sex', irrespective of marital status, is being promoted" than "teaching safe sex" which is against Indian values. While safe sex falls in purview of sex education, marital or pre-marital does not. The liberals/ultra-liberals may disagree with this, but condom vending ,machines in colleges have not gone well with the conservative parents of the students and the governments sympathizes with them.
३. आज त्यांनी माझा सेक्स एज्यूकेशनला विरोध नाही , २००७ मधे मी सो-कॉलड हा शब्द पश्चिमेकडच्या थेट ए इ पी साठी वापरला होता, असे विधान केले आहे. Adolescent Education Program चे पश्चिमेकडचे रुप म्हणजे इथल्या मुलांसाठी पॉर्न असेल इतका दोन्हीकडे संस्कृतीत फरक आहे. स्थानिक वर्जन बनवण्यासाठी भारतात व्हॉल्यूटीअर मिळतच नाहीत.
४. आपले विचार कसे लिबरल आहेत हे आगा पिछा न पाहता दाखवायची भलतीच खाज सो-कॉलड मध्यमवर्गीय भारतीयांना आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
याला निरर्थक श्रेणी देणारांस
याला निरर्थक श्रेणी देणारांस या खाजेची समस्या अधिकच तीव्रतेने असणार.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
...
आम्ही या प्रतिसादास अद्याप श्रेणी दिलेली नाही, हे या निमित्ताने नोंदवू तथा स्पष्ट करू इच्छितो.
मात्र, पुढेमागे श्रेणी देणेचे झाल्यास, 'विनोदी' अशी श्रेणी द्यावी, की 'माहितीपूर्ण' अशी, याबद्दल मनःस्थिती तूर्तास द्विधा आहे, हेही या निमित्ताने नमूद करणे आम्ही गरजेचे तथा इष्ट समजतो.
आम्ही या प्रतिसादास अद्याप
माझ्या मते आपण जी श्रेणी द्याल तिच्या योग्यतेबद्दल सहसा कोणी बोलू नये. आपण जे काही लिहिता ते बरेचदा महितीपूर्ण, खट्याळ, अवांतर, इ इ असते. जिथे आपले काही विरोधी मत असते तिथे आपण योग्य तो प्रतिवाद करता. सबब असे स्पष्टीकरण द्यायची गरज आपणांस भासू नये.
शिवाय "याला निरर्थक श्रेणी देणारांस या खाजेची समस्या अधिकच तीव्रतेने असणार." यात अनेकवचन वापरले आहे, श्रेणी देण्याचा अधिकाराचा सन्मानच आहे. पण पुढच्याची बाजूच न ऐकणे ही वृत्ती निर्दिष्ट करायची आहे नि तिला उद्देशून वाक्य आहे, कोण्या एका माणसाला उद्देशून नाही.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
सह्याद्री देऊ पाही मोदींना साथ, पण दैव येई मध्यात
महाराष्ट्रातील अधिकारी मोदींना नकोसे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बास काय राव!
आता, "चांगले दिवस" जर यायचे असतील, तर त्याकरिता पत्रिकांची जुळवाजुळव नको का व्हायला?
महाराष्ट्रातल्या त्या
महाराष्ट्रातल्या त्या (यडझव्या) अधिकार्यापेक्षा दिल्लीच्या कितीतरी अधिकार्यांच्या प्रतिक्रिया पाहाव्यात.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
http://www.independent.co.uk/
http://www.independent.co.uk/life-style/gadgets-and-tech/facebook-manipu...
Facebook manipulated the emotions of hundreds of thousands of its users, and found that they would pass on happy or sad emotions, it has said. The experiment, for which researchers did not gain specific consent, has provoked criticism from users with privacy and ethical concerns.
http://timesofindia.indiatime
http://timesofindia.indiatimes.com/india/India-Pak-to-discuss-fresh-time...
मताची पिंक टाकतो : if goods cannot cross borders soldiers will ____ Frederic Bastiat (1801-1850)
मोदींचे व्यवहारचतूर +
मोदींचे व्यवहारचतूर + कौतुकास्पद गेश्चर
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यात मोदींच्या चातुर्याचा नि
यात मोदींच्या चातुर्याचा नि कौतुकाचा संबंध काय?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
या मोठ्या व्यावसायिक संधीला
या मोठ्या व्यावसायिक संधीला त्यांच्या उपस्थितीने अँप्लिफाय करण्याचे चातुर्य. आणि त्यामुळे मला त्यांचे वाटलेले कौतुक
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
आत्तापर्यंत अशी ऑट्सोर्सड लॉचं करून ४०-५० मिलियन डॉलर्स कमावलेत. हा आकडा छोटा वाटलाअ तरी यात पोटेंशियल बरच असेल.
http://indiatoday.intoday.in/story/india-launched-35-foreign-satellites-...$17.17-million/1/269549.html
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
व्यवहारचतुर + कौतुकास्पद जेश्चरसह एक मुक्ताफळ फ्री
डीएनएत आलेल्या बातमीतून उद्धृत -
(रामराज्य आलं आहे हे मान्य करून) एक शंका - ते पुष्पक विमानाविषयी बोलत असावेत की हनुमानाविषयी?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
हा हा हाबादवे, बहुदा माझी
हा हा हा
बादवे, बहुदा माझी खजिना ही कथा मला वाटते त्याहून अधिक जास्त वाचकांनी वाचलेली दिस्तेय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कॅन्सस टॅक्स कट्स
(अगदी रूपर्ट मर्डॉकच्या दावणीला बांधलेल्या) वॉल स्ट्रीट जर्नलनेही अखेरीस कॅन्सस राज्याने बड्या कंपन्यांच्या दबावाखाली येऊन केलेल्या टॅक्स कट्सचा परिणाम व्यापारी उलाढाल/नोकर्या वाढण्यात होण्याऐवजी वित्तीय तूट वाढण्यात झाला असल्याची बातमी दिली आहे - http://online.wsj.com/articles/sam-brownbacks-tax-cut-push-puts-kansas-o...
केवळ करांचा दर कमी करून अर्थव्यवस्थेला चालना मिळत नाही, हे रेगन - बुश (थोरले) - क्लिंटन - बुश (धाकले) यांच्या कारकीर्दीवर अगदी धावती नजर टाकली तरी समजून येईल; पण ALEC किंवा तत्सम मूठभर उच्चपदस्थांच्या हितसंबंधांसाठी घेतल्या गेलेल्या निर्णयांचा हा परिणाम आहे.
सध्या द ग्रेट एनरॅव्हलिंग ऐकत
सध्या द ग्रेट एनरॅव्हलिंग ऐकत आहे. युट्युब वर. सप्लाय साईड वर टीका आहे.
---
I do not support trickle down or up.
माझे मत हे आहे की - We should have poll tax.
फूटबॉल - एक लिबरल कट
'ओनियन'पेक्षाही विनोदी विधानं वाचायची असतील, तर अमेरिकन फार राईट विंगर्सची मुक्ताफळं वाचावीत.
Ann Coulter ह्या अतिउजव्या 'विचारजंत'बैंनी परवाच उधळलेली ही काही मौक्तिकं -
कोल्टर बाईकडे फक्त टक लावून
कोल्टर बाईकडे फक्त टक लावून बघत बसावे. हॉट्ट. तिखी मिरची. Jalapano
तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे. फक्त एक मुद्दा सोडून - ती वेल्फेअर स्टेट विरोधी आहे. तेवढ्या एका मुद्द्यावर माझे कुणाशीही सुद्धा सख्य होऊ शकते.
फ्रीडम चिलीज्
जपून हो. उपमा म्हणून का होईना, पण अन-अमेरिकन अशा मिरचीचा उल्लेख केल्याबद्दल तुम्हांला छुपा कम्युनिष्ट ठरवायचे
उदा. - http://en.wikipedia.org/wiki/Freedom_fries
+१ दिलेला आहे.
+१ दिलेला आहे.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
=))
आवरा.
मागे ते काहीतरी legitimate rape will not result in pregnancy असं काहीतरीपण आलं होतं वाचण्यात.
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
मेक द बेस्ट ऑफ इट (रेप) - सँटोरम
हो, ते तर झालंच पण त्यानंतरही अनेक बिनडोक विधानं करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याची परंपरा कायम राहिली. अगदी 'स्त्रियांबद्दल बोलावे कसे?' याचं ट्रेनिंगही रिपब्लिकन पक्षातर्फे आयोजित केलं गेलं - http://www.huffingtonpost.com/2014/01/27/republican-candidates-women_n_4...
अर्थात त्याचा फारसा परिणाम दिसला नाही. कारण अलीकडेच बिलकाका ओरायलींनी "there's got to be a downside to having a female president" म्हणून या उज्ज्वल परंपरेला पुढे नेलं आहे.
there's got to be a downside
मग यात काय चुकीचंय? अश्या थेट दिल्लीतून विचारल्या जाणार्या भावी प्रश्नाला उत्तर तयार ठेव म्हंजे झालं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
...
क्लासिक कोल्टरबाई.
वाचा, आणि तुम्हीच ठरवा हसायचे की नाही ते.
-
'विनोदी'बद्दल असहमत आहे. 'प्याथेटिक' म्हणेन फार तर.
पेलिनबाईबद्दल हेच. २००८मध्ये विनोदी वाटली होती. इतकी नाचक्की झाल्यावर लाज असलेली दुसरी कोठली व्यक्ती हटली असती, पण बया हटण्याचे नाव तर घेत नाहीच, उलट तिच्या मूर्खपणाला चेव चढतो. आणि असल्या लोकांकडे कचरा१ आकर्षित करण्याच्या र्याबलरौज़िंग 'र्यालीइंग पॉवर्स' असतात, ते धोकादायक वाटते. (दोन्ही) बया काय, तो शॉन ह्यानिटी काय, नि रश लिंबॉ काय.
बाकी, अॅज़ अ ट्रू लिबरल, विष्ठेकडे टक लावून बघण्याच्या इतरांच्या अधिकाराचा आदर आहेच - पसंद अपनी अपनी, त्याला काय करणार! - पण मधल्यामध्ये फॉल्स ईक्विवॅलन्समुळे हालापेन्योचे नाव नाहक खराब झाल्याचे वाईट वाटते. मिरच्यांची बदनामी थांबवा!!!!!!
(संभाव्य आक्षेप: आणि विष्ठेच्या बदनामीचे क्कॉय?)
-------------------------------------------------------------------------
१ शब्द जाणूनबुजून वापरलेला आहे. काँट्ररी टू पॉप्युलर बिलीफ, उजव्या मतदारांत कचरा, फडतूस, भुक्कड, र्याबल, ट्रेलरट्र्याशादि सकलगुणालंकृत सज्जनांचा भरणा कमी वगैरे नसतो. रिपब्लिकनांपुरतेच बोलायचे तर, दे सीम टू थ्राइव ऑन द सपोर्ट ऑफ र्याबल दीज़ डेज़. (अन्यथा, फॉक्स न्यूज़ काय नि तमाम राइटविंग टॉक रेडियो सर्किट काय, यांना इतका भाव मिळाला नसता. हं, आता, बीइंग ट्रू लिबरल्स, आम्ही या फडतूसांच्या अस्तित्वाच्या अधिकारास प्रश्नांकित करत नाही - वी डोण्ट बिलीव इन सेकंड अमेण्डमेण्ट रेमेडीज़ - पण तो भाग वेगळा.) किंबहुना, पोल ट्याक्स जारी केल्यास (अनइण्टेण्डेड कॉन्सीक्वेन्सेसमधून) कोणत्या पक्षाचे अधिक नुकसान होईल, ते पाहणे रोचक ठरावे.
(अवांतर: पोल ट्याक्स बोले तो हेड ट्याक्स हा त्या संज्ञेचा अर्थ लक्षात घेता, बहुतांश (बिनडोक) रिपब्लिकन मतदार आपोआपच बाद ठरावेत.)
जगात जर्मनी
जर्मनीमधे अतिरीक्त विज-उत्पादनामुळे कोळसा लॉबी संकटात, एक बातमी -
किंवा नविन उपमा वापरून - जर्मनीमधे ढिगभर लाईट पैदा झाल्यामुळे कोळसेवाल्यांच्या कासेखालचे कोळसे पेटले.
काय एकेकाचे प्राब्ळम्स
काय एकेकाचे प्राब्ळम्स तरी..अतिरिक्त वीज आमच्याकडे वळवा म्हणावं. तेवढ्यावरही लय पैशे कमवता येतील, पण साला डिष्टन्स जास्ती पडतो...
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आपली समस्या सोडवता येणे शक्य
आपली समस्या सोडवता येणे शक्य आहे पण बहुदा त्या लायकीची इतर कोणती समस्या राजकीय लाभ उठवण्यासाठी मिळत नाही तोपर्यंत तरी हि सोडवली जाणार नाही.
खरंय.
खरंय.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
आता राष्ट्रवादी, बसपा आणि
आता राष्ट्रवादी, बसपा आणि माकपा हे "राष्ट्रीय पक्ष" नसणार.
पैकी 'बसपा'वर अशी वेळ यावी याचे वाईट वाटते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
विकीलीक्स
विकीलीक्सः अमेरीकेच्या वॉचलिस्टमध्ये आता भाजपा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ह्या बातमीनुसार भारतीय
ह्या बातमीनुसार भारतीय मुस्लीम महिला आंदोलन ह्या संस्थेने मुस्लीम लॉ (मॅरेज अँड डिवोर्स) बदलण्यासाठीचा ड्राफ्ट रिलिज केलाय ज्यात खालील मुख्य मुद्दे आहेत.
Key highlights of the proposed draft:
•Age of marriage for girls to be minimum 18 and minimum 21 for boys
•Total ban on oral, unilateral and triple divorce
•No to polygamous marriage
•Well-laid out Quran-based procedure, Talaak-e-Ahsan for a husband to divorce the wife and vice-versa
•Minimum mehr or dower in consonance with the groom’s annual income
•Compulsory registration of marriages
•Maintenance support for wife and children during marriage, separation and divorce
•Rules for custody of children in the event of divorce based on the principle that mother and father are natural guardians of the child
•Responsibilities of the Qazis and Arbitrators have also been laid down
ह्या ड्राफ्टंचं पुढे काय होईल माहित नाही, पण उपक्रम स्तुत्य आहे!
-अनामिक
Well-laid out Quran-based
याचा अर्थ कोणी समजावला तर इन्फॉर्म्ड स्तुती करता यावी.
बाकी, स्तुत्य आहेच, अधिक स्तुत्य हे की हे मुस्लिम महिलांकडूनच आले आहे.
यानिमित्ताने, हामीद दलवाईंना (पुरूषांच्या तुलनेत) मुस्लिम महिलांचा मोठा सपोर्ट होता हे वाचल्याचे(काहीसे उगाचच) आठवले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
शिक्षण - नया जमाना, पुराना जमाना
http://www.hindustantimes.com/hteducation/educationnews/srcc-announces-f...
पुराना जमाना - One dreams to fly. Efforts =0. Flights =0.
नया जमाना - 100% dream to fly. 0.001% fly highest. 1% fly. 98.99% watch.
Bravo!!
भर्या जवानीत, सगळा वेळ देऊन, १० वीला, १२ वीला , एम बी ए नि तत्सम परीक्षांसाठी किती लोक अपिअर होतात, किती लोक किती घासतात, पैकी किती पास होतात याचा कै हिशेब?
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
भर्या जवानीत, सगळा वेळ देऊन,
चांगला प्रश्न आहे.
अजो, याचे उत्तर शोधुन आम्हाला नक्की सांगा.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
यू पी एस सी ला साडे पाच लाख
यू पी एस सी ला साडे पाच लाख लोक अप्लाय करतात (२०१३). पैकी अर्धे तरी सलह तीन वर्शे काहीही इतर न करत सतत घासत असतात. २५००००*३ स्टुडेंड यिअर्स.
२०१२ ला १००० जण सिलेक्ट झाले. ०.४%. हे लोक दिवसात १६ तास घासतात. काहीच मनोरंजन नाही. मेसचे फालतू जेवण खातात. कोचिंग क्लासेसजवळच्या गलिच्छ (नाहीतर कंजेस्टेड) गल्ल्यांत राहतात. घरापासून दूर राहतात. आन जे काय वाचतात , इ त्याचा अन त्यांच्या वास्तविक कामाचा काही संबंध नसतो. मग नंतर आयुष्यात , बहुसंख्य, प्रचंड इगोने वागतात.
इच्छुकांचा रेशो ०.२%.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
@संपादक 'सर्वज्ञ' अशी एक
@संपादक
'सर्वज्ञ' अशी एक श्रेणी चालू करता येईल का?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
ठ्ठो
--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars
तैसाहेब, जे सर्व ज्ञात आहे,
तैसाहेब, जे सर्व ज्ञात आहे, ते सगळे टंकायला वेळ नाही. वास्तव याही पेक्षा प्रचंड घाण आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
बर्मग??? प्रचंड अपयशी सिस्टिम
बर्मग??? प्रचंड अपयशी सिस्टिम आणि फेल्युअर ऑफ अ वर्तमानकाळ, राईट?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वा वा! पक्के हिशोबी आहात!
वा वा! पक्के हिशोबी आहात!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अरुणजोशींना प्रश्न आहे-जुन्या
अरुणजोशींना प्रश्न आहे-जुन्या जमान्यात परत जायची तयारी आहे का?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
यस्स.
यस्स.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.
हा हा हा.
ठीके. रहा गावाकडं महिना दोन महिने आणि सांगा काय ते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
संसद बातम्या
This comment has been moved here.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
बायकांनी पबमध्ये जाऊ नये:
This comment has been moved here.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!