पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगती अकबर बीरबल कहाणी

पंतप्रधान कार्यालयात मी ज्या केबिन मध्ये बसतो ती एका मोठ्या हाल मध्ये आहे. मधोमध दरवाजा आणि दोन्ही बाजूला साडेतीन फूट उन्च पार्टिशन असलेल्या सहा केबिन्स आहेत. त्यात सहा अधिकाऱ्यांचे निजी सचिव व अन्य कर्मचारी मिळून जवळपास २४-२५ स्टाफ बसतो. दरवाजा उघडल्या बरोबर समोर मी जिथे बसतो ती केबिन दिसते. हालचा दरवाजा उघडा असेल तर माझ्या समोरच्या केबिनचा काही भाग दरवाजाच्या मागे झाकला जातो, तिथे एक ३ फुट उंचीची अलमारी आहे. सहजासहजी कुणाला दिसत नसल्यामुळे, तिथला स्टाफ त्यांचे रिकामे चहाचे कप इत्यादी त्या अलमारीवर ठेवतो.

त्या दिवशी दुपारचे साडेतीन झाले असतील, नुकतच सर्वांचा चहा झाला होता, अचानक दरवाजा उघडून हाल एक कर्मचारी आत आला, कापऱ्या पण सर्वाना ऐकू येईल अश्या आवाजात म्हणाला, पंतप्रधान इकडेच येत आहेत. मी चमकलोच, गेल्या १७ वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात कार्य करतो आहे, या आधी पंतप्रधान तर सोडा कुणा वरिष्ठतम अधिकार्याने सामान्य कर्मचार्यांच्या केबिन मध्ये डोकावल्याचे मला आठवत नाही. कदाचित त्यांना त्याची गरज भासली नसेल. म्हणतात ना देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जावे लागते, देव क्वचितच भक्तांना दर्शन देण्यासाठी त्यांच्या घरी येतो. सर्वांनीच लगबगीने आपला पसारा व्यवस्थित करणे सुरु गेले. पण कुणालाच वेळ मिळाला नाही. त्या कर्मचारीच्या पाठोपाठच पंतप्रधान नरेंद्र मोदी आत आले. साहजिकच होते, पहिलेच केबिन असल्या मुळे त्यांची प्रथम दृष्टी माझ्यावर गेली. कामाबाबत जुजबी माहिती विचारली. प्रत्येक केबिन समोर उभे राहून त्यांनी कर्मचार्यांची विचारपूस केली. सर्वात शेवटी, अर्थात माझ्या केबिनच्या समोरच्या केबिन मध्ये बसणाऱ्या स्टाफ ची विचारपूस केली. त्यांची दृष्टी अलमारीवर ठेवलेल्या ७-८ चहाच्या रिकामच्या कपांवर ही गेली. त्यांनी मिस्कीलपणे, विचारले बहुत चाय पितो हो आप लोग. स्टाफ मधल्या एका कर्मचार्याने उत्तर दिले, सर, सारे कप हमारे नाही है और लोग भी यहाँ अपने खाली कप यहाँ रख देते है. पंतप्रधान हसले आणि म्हणाले दोस्तों, आपने अकबर बीरबल की कहानी सुनी है. आम्ही सर्व टक लाऊन त्यांच्या कडे बघू लागलो, पंतप्रधान काय म्हणतात ते ऐकायला कान टवकारले.

त्यांनी अकबर बीरबलची कहाणी सांगायला सुरवात केली. (पुढची गोष्ट मला जितपत कळली मराठीत)

एकदा अकबर बादशाह, बीरबलच्या घरी गेले, पाहतात काय, बीरबल आपल्या बेगम बरोबर एका मंचकावर बसून आंबे खात होता. आत येताच अकबर बादशाहचे लक्ष आंबे खाऊन जमिनीवर टाकलेल्या आंब्यांच्या कोयींवर गेले. अकबर बादशाहने मनात विचार केला बीरबल स्वत:ला शहाणा समजतो, आज चांगला मौका आहे. बीरबलला दाखवायला पाहिजे कि बादशाह ही किती बुद्धिमान आहे. अकबर बादशाहने त्या कोयी मोजल्या. अकबर बादशाह म्हणाला, बीरबल मी सांगू शकतो, माझ्या इथे येण्या अगोदर तुम्ही किती आंबे खाल्ले आहेत ते. अकबर बादशाहने मोजलेल्या कोयींच्या आधारावर खालेल्या आंब्यांची संख्या सांगितली. आपणास सर्वांना माहित आहे. बीरबल हा अत्यंत बुद्धिमान होता. बादशाहच्या मनात काय आहे, बीरबलने सहज ओळखले. तो मिस्कीलपणे म्हणाला, जहाँपनाह, आपण चुकत आहात, या खाली टाकलेल्या कोयी, मी खालेल्या आंब्यांच्या आहेत. माझी बेगम तर कोयीं समेत आंबे खाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी क्षणभर थांबले, आणि सर्वांकडे बघितले. त्यांचा बोलण्याचा आशय कळला. आम्ही ही मुक्तपणे हसलो. (कहाणीचा अर्थ मला जो अर्थ कळला- बीरबलले आपल्या चातुर्याने बेशक बादशाहला मूर्ख बनविले असेल, पण मला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करू नका, उगाच दुसर्यांचे नाव कशाला घेता हा सर्व चहा, तुम्हीच गटकला आहे).

पंतप्रधान निघून गेले. पण कर्मचार्यां सोबत अश्यारितीने संवाद साधणारा आणि त्यांना अकबर बीरबलची कहाणी सांगणारा कदाचित हा पहिलाच पंतप्रधान असेल.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ. चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रत्यक्ष पंतप्रधानांची भेट होणं, त्यांच्याशी चार शब्द बोलायला मिळणं आणि त्यांच्याकडून माफक ओरडाही इतक्या नर्म पद्धतीने खायला मिळणं ही भाग्याची गोष्ट आहे. मला खात्री आहे तुम्हाला हा दिवस कायम लक्षात राहील.

पंतप्रधान कार्यालयात काम करता तेव्हा आत्तापर्यंतच्या पंतप्रधानांच्या कार्यपद्धतीविषयी काही आतल्या गोष्टी समजल्या असतीलच. त्याबद्दल काही लिहिलंत तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत. पंतप्रधानांची भेट होणं भाग्याचंच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे? त्यांनी मनमोहनसिंगांबरोबरचा फोटो टाकला होता तो धागा विसरलात की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक शंका - ही गोष्ट खरी आहे का? असेल तर घासकडवी म्हणतात तसं खरच लिहा बुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ किस्सा खरा आहे का?
पण अकबर बिरबलाची गोष्ट सिच्युएशनला सूट होइल अशी कस्टमाइझ केली आहे. हुश्शार आहेत हो आपले पंप्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण पंतप्रधान कार्यालयात आणि पंतप्रधानांपासून बर्‍यापैकी जवळ बसून काम करतो हे इतक्या जाहीरपणे सांगणे कितपत सुज्ञपणाचे आहे ह्याबाबत मला शंका आहे. ह्याबाबत तुम्हाला अंतर्गत सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना मिळाल्या नाहीत काय? (नसल्या मिळाल्या तर मला ते चिन्ताजनक वाटते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad बापरे!!! उडवा हा धागा Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सुज्ञपणाचे' हा शब्द का प्रयोजिला आहे? पंतप्रधान कार्यालयात काम करण्याबाबत, करत असण्याबाबत असे काय विशेष आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकदा श्रेणी दिली की परत घेता येत नाहीये Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखक म्हणतात, की त्यांच्या कार्यालयात पंतप्रधान समान्यपणे येत नाहीत उच्चपदस्थांशी या कार्यालयातील कर्मचर्‍यांचा विशेष घरोबाही नसावा, असे कथेवरून वाटते. बहुधा लेखकाची नित्याच्या कामाची जबाबदारी विशेष गोपनीय नसावी, (कमीतकमी लेखकाची उघड जबाबदारी तरी विशेष गोजनीय नसावी.)

पंतप्रधान कार्यालयातील एखाद्या (उघडपणे सांगण्याकरिता तरी) अ-गोपनीय विभागात काम करणार्‍या, पंतप्रधानांशी अगदी क्वचित, फक्त समारंभपूर्वक भेट होणार्‍या कर्मचार्‍याने अशी कथा सांगण्यात मला काही अयोग्य वाटत नाही.

उदाहरणार्थ पुढील दुव्यावर यू.एस.च्या राष्ट्रपतिकार्यालयात काम करणार्‍या ~५०० लोकांची यादी आणि त्यांचे पगार आहेत :
http://www.whitehouse.gov/briefing-room/disclosures/annual-records/2013

पैकी पहिल्याच Marie Alberger या कर्मचार्‍याची माहिती या पानावर मिळते (छोटेखानी वर्तमानपत्रातील दुवा). आपण व्हाईट हाऊसमध्ये (उघडपणे तरी) काय करतो, कुठे शिकलो, आपणास जोडीदार आहे का, वगैरे असले तपशील दिलेले आहेत. पगारावरून ही व्यक्ती सामान्य स्तरावर आहे, विलक्षण महत्त्वाची वगैरे नाही.

थोडक्यात काय... येथील लेखकाने पुरवलेली माहिती पंतप्रधान कार्यालयाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हानिकारक वाटत नाही. त्यांना सुरक्षिततेबाबत सूचना मिळाल्या वा नाही, याबाबत मला चिंता वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारत सरकारच्या (गुप्तहेर, सीबीआय, डिफेन्स इ सोडून) सर्वच अधिकार्‍यांचे सारे डिटेल्स नेटवर असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वा! प्रसंग वाचुन मोदींचे कौतुक वाटले.
शेवटी आपला स्टाफ हा मनुष्य आहे हे विसरण्याची चुक भले भले करतात. मोदी अपवाद असतील तर स्वागतार्ह आहे.

बाकी १७ वर्षे तुम्ही तिथे आहात तर मला श्री.वाजपेयी आणि श्री.राव यांचे काही किस्से असतील तर वाचायला आवडतील. दोघेही माझ्या आवडत्या पंतप्रंधानांपैकी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका गुजरात्याकडून अकबर-बीरबलाच्या गोष्टी ऐकायची वेळ येण्याविषयी खट दिल्लीकर सरकारी कर्मचारी खाजगीत काय म्हणत असतील ह्याबद्दल कुतुहल आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला वाटलं की चहावर/कपावर एक खवचट कमेंट एखाद्या कर्मचार्‍याकडून ऐकायला मिळेल, इथे मात्र मुख्याध्यापक एकदम वर्गात आल्यासारखे दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0