मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसक (वेब डिझायनर्स /डेव्हेलपर्स) यांची माहिती हवी

मराठीतील पहिले संकेतस्थळ मायबोलीच्या स्थापनेला जवळपास १८ वर्षे होत आली आहेत. मराठी संस्थळांना तंत्रज्ञान, स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त करून देण्यामध्ये मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांनी (वेब आर्कीटेक्ट्स/ डिझायनर्स /डेव्हेलपर्स) महत्वपूर्ण भूमीका निभावली आहे.

उल्लेखनीय मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांबद्दल आणि मराठी संकेतस्थळे विकासात कार्यरत व्यावसायिक आस्थापनांबद्दल माहिती हवी आहे.

* या माहितीत (पूर्ण) नाव , जन्म दिनांक, कार्यक्षेत्र, (असल्यास) पुरस्कार आणि गौरव,व्यक्ती परिचयः बालपण आणि शिक्षण, कारकीर्द: नौकरी विषयक कारकीर्द, मराठी संकेतस्थळ रचना आणि कारकीर्द आणि संबंधीत अनुभव आणि त्यांच कार्य तुम्हाला उल्लेखनीय का वाटत ? (वेगळेपण) , ते हौशी विकसक/रचनाकार आहेत का व्यावसायिक दृष्ट्या कार्य करतात?, विकसीत केलेली/सेवा दिलेली प्रमुख संकेतस्थळे, (आस्थापना उभारली असल्यास आस्थापनेचे नाव आणि स्थापना वर्ष), इतर क्षेत्रातील कार्य, आक्षेप अथवा टिका आणि भूमीका. उपलब्ध असल्यास माध्यमात प्रकाशीत वृत्ते आणि संदर्भ दुवे इत्यादी पैकी जी, जेवढी माहिती मिळेल त्याचे स्वागत आहे.

**(धागा प्रतिसादांच्या माध्यमातून थोडा थोडा करून, प्रती मराठी संकेतस्थळ रचनाकार एकुण किमान चार परिच्छेद तरी मजकुर गोळा व्हावा अशी माझी इच्छा आहे. आवश्यक नाही पण जिथे माहितीस संदर्भ नाहीत तेथे अजून एखाद्या प्रतिसादकाकडून दुजोरा प्राप्त झाल्यास बरे पडेल)

* सर्वच मराठी संस्थळ रचनाकारांची नावे मला आत्ता लगेच आठवणार नाहीत आठवली सूचली तशी देईनच, ती तुम्हीही देऊ शकता, चर्चा चालू करण्या साठी या क्षणी आठवणारी नावे म्हणजे अर्थातच मायबोलीचे अजय गल्लेवाले, माधव शिरवळकर, प्रसाद शिरगावकर, मिपाचे नीलकांतजी आहेतच, ऐसी अक्षरेचे विकसक कोण आहेत याची मला कल्पना नाही, तेव्हा त्यांचे आणि अजून इतरही नावे येऊद्यात.

* प्रताधिकारमुक्त छायाचित्रे विकिमीडिया कॉमन्सवर चढवून येथे दुवा द्यावा.

* धागा मुख्यत्वे विकिप्रकल्पांसाठी असल्यामुळे अर्थातच आपले या धाग्यावरील प्रतिसाद प्रताधिकारमूक्त गृहीत धरला जाईल.

* आपल्या प्रतिसादांसाठी धन्यवाद

** अजय गल्लेवाले - मायबोली

** माधव शिरवळकर,

** प्रसाद शिरगावकर,

** नीलकांत - मिसळपाव

** शशांक जोशी - उपक्रम

** महेश वेलणकर - मनोगत

** चित्तरंजन भट

** संहिता जोशी - ऐसी अक्षरे

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

http://www.sureshbhat.in/ या संकेतस्थळाचे रचनाकार व विकसक हे चित्तरंजन भट आहेत. मायबोली या सर्वात जुन्या मराठी संकेतस्थळाचे विकसक व रचनाकार हे अजय गल्लेवाले आहेत. मिसळपावचे आताचे व तेव्हाचे रचनाकार व विकसक निलकांत आहे. उपक्रमचे शशांक जोशी आहेत. मनोगतचे वेलणकर आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

माहितीपूर्ण प्रतिसादाने चर्चेचे उद्घाटन करण्यासाठी धन्यवाद. वेलणकरांचे पहिले नाव काय आहे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

महेश

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नोंद घेतली, धागा लिहिताना का कोण जाणे विवेक वेलणकर हेच नाव आठवत होत आणि काहीतरी चुकतय हे लक्षात येऊन लिहिल नव्हतं. महेश वेलणकर हे नाव बरोबर आहे, माहिती साठी धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

गूगल शोधात चित्तरंजन भट http://www.sureshbhat.in/ सोबतच http://www.marathiabhyasparishad.com या मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळाचेही विकसक आहेत असे दिसते. लोकमत गझल स्पर्धेत चित्तरंजन भट यांना प्रथम पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख http://www.manogat.com/node/5311 या धाग्यावर मिळाला. पण ते हौशी विकसक आहेत का व्यावसायीक विकसक आहेत याचीही माहिती मिळाल्यास बरे पडेल.

*मराठी विकिपीडिया लेखासाठी परिच्छेद (अर्थात अजूनही माहिती हवी) :

चित्तरंजन सुरेश भट (जन्मः.... - हयात) हे मराठी गझलकार आणि मराठी संकेतस्थळांचे रचनाकार आणि विकसक आहे. चित्तरंजन भट हे मराठी कवी [[सुरेश श्रीधर भट|सुरेश भट]] यांचे चिरंजीव असून http://www.sureshbhat.in/ सोबतच http://www.marathiabhyasparishad.com या मराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळाचेही विकसक आहेत. चित्तरंजन भट हे त्यांचे वडील, गझलकार सुरेश भट यांच्या प्रमाणेच मराठी गझलकार असून २००६ सालच्या (दुजोरा हवा) लोकमतने घेतलेल्या कै. सुरेश भट स्मृती स्पर्धेत त्यांनी प्रथम पुरस्कार प्राप्त केला. (संदर्भः http://www.manogat.com/node/5311 )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

तुम्ही जी विकीपानं बनवताय त्यांची लिंक इथे लेखात देता येइल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी मनातला प्रश्न.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी विकिपीडियात मराठी संकेतस्थळे, मायबोली संकेतस्थळ, मिसळपाव संकेतस्थळ, मनोगत संकेतस्थळ, उपक्रम संकेतस्थळ, आणि अजय गल्लेवाले यांच्या नावांची स्वतंत्र लेख पाने आहेत त्यांचे दुवे धागा लेखात जोडले. मिसळपाव आणि अजय गल्लेवाले यांच्या नावांच्या लेखपानावर अगदीच परीचयपर ओळींशिवाय सध्या काहीच मजकूर नाही. आणि खरे म्हणजे सहसा चार परिच्छेदतरी ज्ञानकोशीय मजकुर हवा तरच लेख पानास न्याय दिल्या सारखे होते किमान दोन-तीन परिच्छेद मजकुर झालाकी इतर लेख पाने बनवू असा मानस आहे.

मराठी विकिपीडियात रिकाम्या पानांची संख्या वाढल्याने कमी मजकूर असलेली पाने बनवणे (मराठी विकिपीडियातील) जाणत्यांनी तरी टाळावे असा सध्या जरासा दबाव आहे. अर्थात उल्लेखनीय व्यक्तीमत्वांची लेख बनवायचे आहेतच. जशी लेख पाने बनतील तसे तसे दुवे नक्की देईन. मनमोकळ्या सुचवणी अशाच येऊ द्याव्यात हि विनंती.

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

सुरेश भटांना गज़लकार म्हटल्याने त्यांच्या काव्यकर्तृत्वाचा संकोच होतो असे वाटते. गज़लांव्यतिरिक्त अन्य प्रकारांतही त्यांनी उत्तम कविता लिहिल्या आहेत. आघाडीचे कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख व्हावा. अर्थात हा मज़कूर चित्तरंजन भटांविषयी असल्याने त्यात सुरेश भटांविषयी विस्तृत माहितीची अपेक्षा नाही. पण जे काही दोन शब्द सुरेश भटांविषयी असतील, ते अचूक असावेत इतकेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गज़लकारच्या एवजी मराठी कवी असा बदल केला. ज्ञानकोशात उल्लेखनीय व्यक्तींचाच उल्लेख होतो, विकि संकेतानुसार सहसा विशेषणे टाळत असतो तसे 'आघाडीचे' हे विशेषण मात्र टाळले आहे. मनमोकळ्या सूचनेकरीता धन्यवाद . अशाच सूचना पुढेही करत रहाव्यात हि नम्र विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माणसांचं पूर्ण नाव आणि जन्म दिनांक वगैरे माहिती विकीपीडीयावर देऊ नये असं माझं मत आहे. एकवेळ लोकांच्या डेबिट कार्डाचा पिन नंबर आणि आईचं माहेरचं नाव विचारा पण वाढदिवस कधी असतो ते जिवंत असेपर्यंत जाहीर करायला लावू नका.

असो. ऐसी अक्षरेसाठी, ड्रुपॉलचे ठोकळे जोडण्याचं काम संहिता जोशी करते. ती काहीही काम करत नाही. ऐसी अक्षरे ही हौस आहे, व्यवसाय नाही. कागदोपत्री शिक्षण खगोलशास्त्र-भौतिकशास्त्र या विषयांमध्ये. सध्या जो फोटो उपलब्ध आहे तशी ही आता दिसत नाही. सध्या जशी दिसते त्याचा (विकीपीडीयावर दाखवण्यालायक) फोटो उपलब्ध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माणसांचं पूर्ण नाव आणि जन्म दिनांक वगैरे माहिती विकीपीडीयावर देऊ नये असं माझं मत आहे. एकवेळ लोकांच्या डेबिट कार्डाचा पिन नंबर आणि आईचं माहेरचं नाव विचारा पण वाढदिवस कधी असतो ते जिवंत असेपर्यंत जाहीर करायला लावू नका.

Smile चांगली शंका विचारलीत, विकिपीडिया व्यक्तींच्या गोपनीयतेचा आदर करते, पब्लिक डॉमेन मध्ये नसलेल्या कोणत्याही हयात व्यक्तीच्या व्यक्तीगत माहितीची जबरदस्तीने अपेक्षा नाही. कोणतीही खासगी गोपनीय गोष्ट विकिपीडियाला नको आहे. आजोळ जर ज्ञानोकोशीय उल्लेखासाठी महत्वाच असेल तरच विकिपीडिया नोंद घेते. चित्तरंजन भट कवी आहेत आणि समजा त्यांच्या आजोळच्या वातावरणाचा त्यांच्या काव्य प्रतिभेवर/ व्यक्तीमत्वावर प्रभाव असेल तरच आम्ही आजोळची नोंद घेऊ. त्यांचे वडील अथवा आजोळची व्यक्तीही कवी असेल अथवा ज्ञानकोशीय दृष्ट्या उल्लेखनीय असेल तरच नोंद घेऊ. एका व्यक्तीने दिलेल्या माहितीवर शक्यतोवर विसंबणार नाही आहोत किमान अजून एका व्यक्तीचा दुजोरा येई पर्यंत माहिती स्विकारल्या जाण्याचा संभव नाही म्हणजे जी माहिती एक पेक्षा अधिक त्रयस्थ व्यक्तींना माहिती आहे ती गोपनीयतेत फार मोडते असे होणार नाही. शिवाय लक्ष ठेऊन प्रकाटा करीता आपण संपादक मंडळी आहातच. धागा तसाही आंतरजाल आणि संगणन क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींबद्दल आहे. त्यातील लोकांना पूर्ण नाव आणि जन्म दिनांक देण्यात असुरक्षीत वाटत नाही त्या व्यक्ती ते देऊ शकतातच. अजय गल्लेवाले, माधव शिरवळकर, प्रसाद शिरगावकर, या पब्लिक स्फेअर मध्ये बर्‍या पैकी माहित असलेल्या व्यक्तींचे पूर्ण नाव बर्‍याच जणांना माहित असण्याची शक्यता आहे जसे की चित्तरंजन भट यांच्या वडलांचे नाव जगजाहीर आहे.

विकिपीडियाच्या सदस्यांना त्यांच्या सदस्य खात्याची पूर्ण गोपनीयता पाळता येते. जिथ पर्यंत व्यक्ती नावांच्या शीर्षकांचा प्रश्न आहे, एकाच नावाच्या अनेक व्यक्ती असतात आणि व्यक्तीचे नाव पूर्ण नसेल तर एका माणसाची माहिती अनवधानाने दुसर्‍याच्या लेखात कुणीतरी जोडली अशा शक्यता नाकारता येत नाहीत, ते चुकीची माहिती देणे होते. त्यामुळे नि:संदिग्धीकरणासाठी पूर्ण नावाची अपेक्षा असते. जन्म तारीख अत्यावश्यक नाही पण त्या शिवाय लेख अपूर्ण वाटतो, आणि वेगवेगळ्या जनरेशन मध्ये त्याच नावाच्या व्यक्ती असतील तर नि:संदिग्धीकरणासाठी लगेच नाही तरी भविष्यात समस्या उद्भवू शकते.

एखाद्या व्यक्ती बद्दल दोन-चार परिच्छेदही ज्ञानकोशीय मजकूर होत नसेल तर ज्ञानकोशीय लेख कसे बनतील अशी शंका वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माहिती चालेल पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आवरा.

(अवांतर - अनेक ठिकाणी, बँका, इमेल खाती, इ. पासवर्ड विसरला तर तो शोधण्यासाठी आईच्या माहेरचं नाव विचारतात.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

माहिती चालेल पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आवरा.

ओह, मला वाटल तुम्ही सायबर सेक्यूरीटीच्या (पासवर्डच्या) संदर्भाने म्हणताय आणि किमान संकेतस्थळ रचनाकार पासवर्ड आणि सायबर सेक्यूरीटीच्या दृष्टीने स्वतःची जन्म तारीख टाकणे टाळत असतील असा बाळबोध विचार केला.

माहिती चालेल पण वाढदिवसाच्या शुभेच्छा आवरा. बाकी हे ही खरय, (अमोल पालेकरांचा मराठी संकेतस्थळांवर मी जरा चघळून चघळून बोथट झालेला एक किश्शास त्यांच्या वाढदिवसाचाही गमतीदार पैलू आहे, अमोल पालेकरांनी एका राष्ट्रीय दैनिकाला दिलेल्या इंटरव्ह्यू मध्ये आपण म्हणता त्या कारणानेच त्यांची स्वतःची जन्म तारीख १ एप्रिल सांगितली, त्या पत्रकाराला त्यांनी बाकी असे अजून फिरवले, माहितीची शहानिशा नकरता कलाकारांच्या व्यक्तीगत जीवनात जास्तीच डोके खूपसणर्‍या पत्रकारांची त्यांना मजा घ्यायची असावी Smile ती माहिती खरी समजून बातमी प्रसिद्ध झाली इंग्रजी विकिपीडियाने नंतर मराठी विकिपीडियाने संदर्भासाठी वापरली. सगळ्या कार्यक्रमांच्या परिचयात निवेदकांनी त्यांचा परिचय करून देताना विकिपीडियावरून दिलेली माहिती वापरण्यास चालू केली. सरते शेवटी पृथ्वी गोल असते म्हणतात तसे मराठी विकिपीडियाच्या बन्धू प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या वेळी माहितीस दुजोरा न घेण्याच्या पत्रकारांच्या आळसावर बोट ठेवण्याची संधी पालेकरांना आपसूक मिळाली कारण श्रोते सगळे विद्यापीठीय पत्रकारिता विभागातली गुरू मंडळी पत्रकार आणि पत्रकारीतेची विद्यार्थी मंडळी होती. Smile )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मराठी विकिपीडियावरील मराठी संकेतस्थळे लेखात विजय चाळके, सचिन पिळणकर, राजेंद्र मेस्त्री यांनी मराठी वेबमास्टर म्हणून नोंद केली पण कोणत्या मराठी संकेतस्थळाकरता काम/योगदान केले असल्यास (मराठी विकिपीडियातील उल्लेखनीयता सुद्धा ) स्पष्ट नसल्यामुळे ते डिटेल्स मराठी विकिपीडियावरून वगळून येथे स्थानांतरीत केले आहेत. या विषयी कुणाला अधिक माहिती असल्यास येथे द्यावी.

[http://www.avishkarsolutions.com विजय चाळके] vijay@avishkarsolutions.com

[http://www.sachinpilankar.com सचिन पिळणकर] avakashvdh@gmail.com

[http://www.tumchiwebsite.co.cc राजेंद्र मेस्त्री] ekvicharu@yahoo.com

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

अनुषंगिक अवांतर: १९९८ ते २०१० या काळात कार्यरत असलेला मराठी याहू ग्रूप्स मध्ये सर्वाधिक सदस्य संख्या राहिलेल्या marathipeople2 या याहू ग्रूपचे प्रवर्तक (मालक) कोण होते याची माहिती हवी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.