ऐसी चा Activity कट्टा

या काल्पनिक कथेत उल्लेख आलेल्या तसेच न आलेल्या सर्व व्यक्तींनी, प्रतिसादात जरूर सहभागी व्हावे. कोणाला मुद्दाम वगळण्याचा , तसेच कोणाला मस्का polish करण्याचा हेतू नसून उलट ज्यांची अभिव्यक्ती मला ठोस कळली त्यांच्यावर मुद्दाम प्रसंग बेतला आहे. Smile
___________________
हातातली जाडजूड पुस्तकं कशीबशी सांभाळत अन एका हाताने नाकावरून घसरणारा चष्मा सावरत, मेघना वेटरने दाखविलेल्या सीटवर स्थानापन्न झाली. अन्य कोणी अजून आले नसल्याचा तिला अतिशय आनंद झाला अन तिने पुस्तकातली वाचनखूण शोधून वाचन परत सुरु केले. आह what अ ब्लिस!!!
५ मिनिटात अस्मि हाशहुश करत येउन पोचली अन मग मात्र मेघनाला पुस्तक ठेवावेच लागले.
तर मित्रांनो थोडी पार्श्वभूमी देणे सूत्रधार आवश्यक समजते.
तर स्थळ आहे "वैशाली" अन पात्रे आहेत नेहमीचे यशस्वी कलाकार, येतील तशी त्यांची ओळख होताच जाइल म्हणा. पण मुख्य म्हणजे मीटॆंगचा अजेंडा आहे - चर्चा. कोणतीतरी Activity एकत्र करण्यासाठी चर्चा करून सर्वानुमते कौल घेणे .
अस्मि आल्यावर मेघना म्हणाली "माझ्या मते एक बुक-club चालू करावा. प्रत्येकाने दर आठवड्याला म्हण महिन्याला हवं तर १ सामाईक पुस्तक वाचायचं अन मग चर्चा करायची "
पण अस्मि चं मत वेगळच पडलं - "मेघे त्यापेक्षा दर महिन्या एखादा सिनेमा तोही सर्रास टुकार समाजाला जाणारा पाहून त्यावर चर्चा केली तर? कारण लोकांचा शब्द का नेहमीच ग्राह्य धरायचा, सत्य आपण का नाही पडताळायचं ?"
यावर मेघना काही बोलणार तितक्यात सारिका प्रवेशती झाली. आल्या आल्या तिने उशीर झाल्याबाद्दल माफी मागितली. पण त्या माफ़ॆनाम्याकडे कोणाचे लक्षच गेले नाही अन मेघना अन अस्मि दोघी आपापले मुद्दे मांडते झाल्या. "तुला काय वाटतं सारू?" - अस्मि उवाच.
सारिकाला एक बाजू घेणं जड गेलं न ती म्हणाली दोन्ही पर्याय रोचक आहेत.
त्यामुळे तिसरी व्यक्ती आल्याचा फायदा झालाच नाही अन चर्चा तशीच लोंबकळत राहिली.
इतक्यात ऋ, अदिती , अजो अन baTyaa येताना दिसले. ठाम मते असलेले आघाडीचे वीर पाहून सर्वांचे चेहरे खुलले. परत एकदा दोन्ही मुद्दे त्यांच्यासमोर मांडले गेले.
ऋ चे उत्साही मत पडले की backsack घ्या अन चालू पडा भ्रमंतीला. चालू तर पडा पुढचं पुढे.अदितीचे मत पडले पिंक girl -power दाखवणारी कोणती ही activity स्वागतार्हच होती. यावर अजो म्हणाले "तो शब्द तेवढा डिफ़ाइन करा बुवा. पिंक? की गर्ल की power की आणखी काही?" ऋ डोळे फिरवत अजोना काहीतरी लागत बोलणार तोच Batyaa मुद्दाम आडवा पडत म्हणाला म्हणजे "पुरषाच्या विरुद्ध पिंका न गरळ टाकणारी Activity बरोबर;)?" अन ग्रुपमध्ये खसखस पिकली
अदिती काही या खसखशीवर काही टिप्पणी करणार तोच समोरून, राघा अन गब्बर मजेत येताना दिसले.
सर्वांनी पुन: एकवार स्वत:ची मते मांडली वगैरे अन राघा म्हणाले विदा तर आहे आता एक ग्राफ काढू म्हणजे बघा क्ष अक्षावर ..... गब्बर त्यांना काटत म्हणाला "अरे लेकांनो विदा न ग्राफ कसचे बनवता, इथे पोटात "विदा" उट अन्न, कावळे कोकालातायात." आपल्या विदा जोकवर स्वत:च खूष होउन तो अजून काही जोक मारणार तोच रागरंग ओळखून वेटर आला अन ओर्डरी सुरु झाल्या.
अन ऐसीचा Activity कट्टा डोसे , इडली, बरोबर सांबारात बुडूSSSन गेला.
________________________________________________

साधारणतः १ महीन्याने मंडळी परत नव्या सवंगड्यांना बरोबर घेऊन जमा झाली. तेच भिजलेलं घोंगडं, अ‍ॅक्टिव्हिटी चा मुद्दा. गेल्या कट्ट्याची चूक दुरुस्त करुन, आल्या आल्या पहीलं खाणं मागवून अंतरात्मा तृप्त केला गेला न मग सांगोपांग चर्चेला सुरुवात झाली. बॅट्या ने सुरवातीलाच एक शिखरीणी श्लोक म्हणून दाखवला अन सर्वांच्या कानाचे पारणे फेडले -

"आरंभशूराणां न अथागतो अभ्यातुराप्रति समस्त विगतः
अपि सामुद्रे किं दरिद्रता?किं महत्तता? किं पवित्रता"

अन सर्वांनी अर्थ विचारला असता नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवला अन सांगीतले की तेवढे मात्र कृपा करुन विचारु नका __/\__

या त्याच्या नेहमीच्या गुगलीवर मन अन सारीका खट्टू तर झालेच पण मनोबा ने "आता नाही तुला संस्कृतच्या परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन दाखवले तर नावाचा मनोबा नाही" अशी तेजस्वी, प्रतिज्ञा घेऊन सर्वांच्या कानाचे पारणे परत एकदा फेडले. सारीकाने "पण कधी अभ्यास करणार तू?" अशी चिंतायुक्त पृच्छा केली असता मनोबा मिष्किलपणे हसत म्हणाला "हाकानाका, आय डी च बदलेन Wink " या उत्तरावर सर्वजण हसू लागले. मग मात्र रोचनाने एक उत्तम सुचवणूक केली की दर ३ महीन्यांनी "रोपटे" एक्स्चेंज कार्यक्रम करायचा का? म्हणजे घरी ३ महीन्यात वाढवलेले, जोपासलेले एक रोप प्रत्येकाने मध्यभागी आणून ठेवायचे अन मग चिठ्ठ्या टाकून एकेक निवडत "व्हाईट एलिफंट एक्स्चेंज" खेळ खेळायचा.
तरी बॅट्या मनात कुरबुरतच होता की "फ्लॅट्मध्ये कसे ब्लावायचे रोप वगैरे" पण...... ही सुचवणूक अदितीची नसल्याने तो आडवा बिडवा पडला नाही Wink अन मग सुचवणूक " TBD" सदराखाली घालण्यास सर्वांची मान्यता मिळाल्याने एकदाचा आईस ब्रेक झाला. तरी अजोंना प्रश्न पडलाच की - रोप आपणच लावले हे कशावरुन ठरणार? ते मुख्य सिद्ध कसे करणार? अन सिद्ध झालेच तरी, ते .... वगैरे वगैरे. अजोंचा आवाज दाबून टाकण्याचा नेहमीप्रमाणे अयशस्वी "मुद्द्यावरुन गुद्दागुद्दी" प्रयत्न ऋ अन बॅट्या तन्मयतेने राबवणार तोच, राघांचा बूमींग आवाज घुमता झाला "हां, शाब्दिक हिंसा नको. एका व्यक्तीवर दात नको. वेळ आलीच तर, आपण माहीतगारमराठींच्या पावलावर पाऊल टाकून कौल घेऊ शकतो." वगैरे वगैरे.
रुचि इतका वेळ एकाग्रतेने एका नव्या डीशमधले इन्ग्रेडीअन्ट्स फिगर आऊट करत होती, तिला कोपराने ढोसून अदिती म्हणाली "तुझं काय मत रुचि?" पटकन सावरत रुचि उवाच - "माझ्या मते दर ३ महीन्यात पॉटलक छान होईल" यावर गब्बरने खूष होऊन दुजोरा दिला. अन हा मुद्दादेखील " TBD" सदराखाली घालण्यास सर्वांची मान्यता मिळाली.
एकदा असे प्रश्न मार्गी लागल्यामुळे डोक्याचा काल्पनिक शॉट दूर होऊन आदूबाळदेखील त्यांचे मत मांडू लागले. (काल्पनिक डोक्याचा नाही Wink तर डोक्याचा काल्पनिक) पण आता या एकाच बैठकीत ओव्हरचिव्ह्मेन्ट नको, अति तेथे माती वगैरे संतुलित विचाराने, ऋ ने अधिक इवेन्ट आयोजित करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
व "रोपटे-व्हाईट एलिफंट एक्क्स्चें़" अन "पॉट्लक" हे दोन सर्वानुमते (अर्थात अजो सोडून Wink ते अध्यार्हुत धरावे) निर्णयांच्या दैदीप्यमान , ट्रेल ब्लेझर संकल्पांनी ऐसीचा दुसरा कट्टा न उतता न मातता साजरा झाला. त्यांचा कट्टा जसा यशस्वी ठरला,तडीस गेला तसा आपला प्रत्येक सुसंकल्प तडीस जावो हीच प्रार्थना.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

हा हा हा.. मस्त..
मात्र अजून कल्पनाविस्तार करा हो.. हे बरंच त्रोटक झालंय
घाब्रु नका.. ऐसी आहे घर्च होऊ द्या खर्च! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हाहाहा एक वाक्य टाकायला विसरलेय अन तेही तुमच्याच बद्दल होतं, आता टाकते - ऋ चे उत्साही मत पडले की backsack घ्या अन चालू पडा भ्रमंतीला. चालू तर पडा पुढचं पुढे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चालू तर पडा पुढचं पुढे.

ऐला! हे माझं प्रत्यक्षातलं (अ-जालीय ऋ चं) नेहमीचं सुत्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

I have noticed that you have serious wanderlust Smile & it might even take over your usual "meticulous planning" nature. Somehow I think so Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

जाडजूड पुस्तकं... हम्म...

Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जाडजूड फक्त पुस्तकांना म्हटलेय, रुसका चेहरा का बरे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

@मनोबा, गपे, दात काढायला काय झालं?
@सारिका, अगं, रुसका चेहरा अशासाठी की... हल्ली (आम्ही कट्ट्यांमध्ये इतके बिझ्झ्झ्झी झालो आहोत की) जाडजूड वाचनाला पूर्वीसारखा वेळ मिळत नाही... Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

सारीका?
सारीका?
Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चूक संस्थळाच्या मालकांची आहे. ना ते 'ऐसी अक्षरे' सुरू करते, ना मला फोनवरून बाऽऽरीक टायपातही संस्थळ चाळत राहण्याचा चस्का लागता, ना कट्ट्यांच्या आयोजनात - आस्वादात माझे लक्ष विचलित होते, ना या असल्या चुका होत्या...
चूक मालकांची आहे, यू सी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

च्यायला. Biggrin सहीच सुरुवात आहे. अजून फुलवता आला असता म्हणा, पण हेही चांगलेच आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL मस्त! अजून कल्पनाविस्तार कर.
अॅक्टिव्हीटी कट्ट्याला जंतूंना ग्रँड मस्तीची समिक्षा करायला लावूयात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे पोटात "विदा" उट अन्न, कावळे कोकालातायात.

मत्प्रिय गब्बरभौ.. उपास करा .. उपास .. आणि पोटात कावळे कोकालातायात असली भाषा वापरल्याबद्दल दहा मिनिटे नैष्ठिक मौन पाळा ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

नैष्ठिक मौन पाळा ..

बटाट्याच्या चाळीत इतक्यावेळेस गेलो असू, पण आजवर वरील शब्दसमुच्चयाचा अर्थ काही उमजला नाही. तरी क्रुप्या करून आचार्य बाबा बर्व्यांनी याचे निराकरण करावे, ही विनंती. अजूनही गांधारदेशात आपले पुष्तू भाषेतील पांडवप्रताप वाचल्याखेरीज पश्तून बांधव अन्नग्रहण करीत नाहीत असे कळते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नैष्ठिक मौन

बटाट्याच्या चाळीत पण हा शब्दप्रयोग केला गेलाय ????

माझ्या माहीतीत हा - तुझे आहे तुजपाशी मधे आहे. व अ‍ॅक्च्युअली - नैष्ठिक निग्रह - असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नैष्ठिक मौन आहे बटाट्याच्या चाळीत. मनातल्या मनात धरलेलं मौन. तसच नैष्ठिक उपोषण, नैष्ठिक ब्रह्मचर्यही ठेवतात आचार्य बाबा बर्वे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अनुपरावांनी अगदी बरोब्बर अर्थ सांगितलाय नैष्ठिक मौनाचा ...
साध्या मौनात तोंडात पानाची पिंक धरून ठेवल्यासारखा (बोलायचं आहे पण बोललं तर पानामुळे तोंडात झालेली रसनिष्पती वाया जाते आणि नाही बोललं तर समोरची व्यक्ती त्याला सोयीचा अर्थ घेऊन मोकळी होते) जो आत्मक्लेशाचा भाग आहे तो नैष्ठिक मौनात टळतो ..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

बाय पापुलर Wink डिमांड, रेघेखाली नवीन मसुदा वाढवला आहे. पहीला (रेघेच्या वरचा) जसाच्या तसा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोल भारी आहे अपडेट Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
ROFL ROFL

मस्त झालाय आता धागा!
मनोबाचं "मी आयडीचं बदलेन" हे तर जामच आवडलं! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मनोबाचं "मी आयडीचं बदलेन" हे तर जामच आवडलं!

ही हा हा हा, तंतोतंत ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त झालाय आता धागा!
मनोबाचं "मी आयडीचं बदलेन" हे तर जामच आवडलं! (जीभ दाखवत)

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणाचा मनपरिवर्तनावर विश्वास नाहीये? आता पुढे या पाहू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनोबा ने आयडी बदलला तर कोणता असेल ?

मनमन ??? (आंधी आठवला)

नमोबा ????

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तरी बॅट्या मनात कुरबुरतच होता की "फ्लॅट्मध्ये कसे ब्लावायचे रोप वगैरे" पण...... ही सुचवणूक अदितीची नसल्याने तो आडवा बिडवा पडला नाही
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कट्टा मस्ते पण...

कट्टा पुण्यात का घडतो आहे? पश्चिम महाराष्ट्र म्हणजे दुनिया काय? मराठवाड्याने काय घोडं मारलयं. पुढच्या वेळेचा कट्टा मस्तपैकी बीड/उस्मानाबाद/सांगोला इथे होउ दे. - मराठवाडकर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्र मुंबईत कुलाब्याला चालू होतो नि इंदापूरला संपतो. वर अहमदनगर्ला चालू होतो नि खाली बेळगावला संपतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आणि सगळी भल्या लोकांची दुनिया उद्गीरहून सुरु होते आणि उदगीरलाच संपते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या मते अशी धारण "intellectual field fades as you go farther from Pune" अशा वैज्ञानिक शोधापेक्षा बरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गटारीत लोळले काय आणि हात घातला काय, दोनीबी येकच. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा ही शोध वरील शोधाशी समाविष्ट करता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इंटेलेक्च्युअल फील्ड हे पुण्यात केंद्रित नसून, प्रत्येक पुणेकराभोवती असते. मात्र, पुणे हा (व्याख्येनेच) पुणेकरांचा परमसमुच्चय असल्याकारणाने, इं.फी. तेथे केंद्रित असल्यासारखे केवळ भासते, इतकेच.

त्यामुळे, पुणेकर पुण्यापासून दूर, अगदी अटलांटातदेखील कडमडला, तरीही त्याच्या भवतालचे इं.फी. यत्किंचितही कमी होत नाही.

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे, पुणेकर पुण्यापासून दूर, अगदी अटलांटातदेखील कडमडला, तरीही त्याच्या भवतालचे इं.फी. यत्किंचितही कमी होत नाही.

असहमत. "केवळ पुणेकर आहे म्हणून शहाणा आहे" हा भाव महाराष्ट्राबाहेर नाही. दिल्लीतल्या लोकांच्या मते पुण्याचे लोक नि कांचीपुरमचे लोक सारखेच शहाणे असतात. कोणी पुणेकर वाफा काढू लागला तर त्याला ते दोन मिनिटात गप करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

दिल्ली काय असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दिल्ली काय असतं?, धन्यवाद.

हा फॉरमॅट आहे न? पुणेकर म्हणून धन्यवाद पण नाय का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुणेकर होण्यातले कंगोरे ओळखल्याबद्दल अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अगदी अगदी. कोण कुठली दिल्ली?

शेवटी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात पाहिलं तर पुणेकर अन नॉनपुणेकर हे आपसांत कितीही भांडोत, दिल्लीला मध्ये आणायचं काम नाही.

ते शत हि वयं पञ्च परस्परविदादतः|
परे तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् ||

असे खुद्द दिल्लीकर युधिष्ठिरच म्हणून गेलाय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असले सगळे आदेश शेवटी दिल्लीवरून येतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकदा आदेश दिल्यानंतर पुढची हजारो वर्षे आक्रमकांपुढे वाकणार्‍या दिल्लीचे कौतुक ते काय Wink दिल्लीकर इ. चं कौतुक दिल्लीत. तो शेर माहिती असेलच-

अय शहनशाह-ए-आलम, अज दिल्ली ता पालम Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं