सम्राट अकबर - एक परिशीलन (???) भाग १

सम्राट अकबर हा एक सम्राट आपल्या देशाच्या इतिहासात होऊन गेला. तो सम्राट असल्याने राजाही होता हे कोणीही इतिहासकार किंवा सामान्य माणूसही सहजपणे मान्य करेल. हा दरबारात तख्तावर बसताना सतत नाकासमोर फुल धरून बसत असे (चुकून “सुत धरून” असे लिहिणार होतो). हाताला रग लागली असतानाहि ते नाकासमोर धरूनच तो दरबार्यांशी बोलत असे. हे खरच अचाट म्हणावे असे काम .
अकबर सम्राट असल्याने त्याला राज्यकारभार करण्याची सक्ती नव्हती. त्यामुळे हा विषय ऑप्शनला टाकून तो साहित्य संगीत वगैरे विभागात मनमुराद आपल्या कारभाराचे नमुने दाखवीत असे. त्याने आपल्या पदरी नवरत्ने ठेवली होती. बिरबल नावाच्या बेरकी इसमाबरोबर त्याच्या संवादाचा ग्रंथ जगप्रसिद्ध आहे (त्याकाळी आजच्यासारखी “अकबर युनिवर्सिटी असती तर हा ग्रंथ राज्याशास्त्रावरील पाठ्यपुस्तक म्हणून लागला असता. शिवाय त्याच्यावर कॉमिक्स निघाली असती ते वेगळेच ) . अकबराने कोडे घालावे व बिरबलाने ते सोडवावे असे त्या कलाकृतीचे स्वरूप आहे. येथे या ग्रंथाच्या शैलीशी तुलना सध्याच्या जयपूर गायकीबरोबर करण्याचा मोह होतो. पण मूलतः संगीत व राज्यशास्त्र हे वेगळे विषय असल्याने अशी तुलना गैरलागू ठरते..आपल्याकडे अशी तुलना नेहमीच केली जाते आणि ती प्रत्येक क्षेत्रात केली जाते. का? अशाने आपण आपले बौद्धिक दिवाळे दाखवत नाही का?तुलना केलीच पाहिजे, या अट्टाहासाने आपण काय सिद्ध करायचा प्रयत्न करतो? अस्तु….
त्याच्या दरबारात मौलवी व पंडित होते. पंडित त्याला “महाराज” असे संबोधित. अकबराने दक्षिणेचा रेट वाढवून दिल्यावर ते त्याला राजर्षी म्हणू लागले. पण आपण ब्रम्हर्षी म्हणून ओळखले जावे असे नसते डोहाळे त्यास लागून त्याने एक स्वतःचा नवीन धर्म स्थापन केला. पण हा नवीन जगत्गुरू आपली दक्षिणा बुडवेल या भीतीने मुल्ला व भटजींनी त्याची डाळ शिजू दिली नाही.
अकबराने पदरी तानसेन वगैरे गवयी ठेवले होते, पण संगीत समीक्षक मात्र नाही, त्यामुळे त्याच्या राज्यात संगीत कलेची भरभराट झाली. त्याने कवी ठेवल्याची नोंद आहे पण विडंबनकार ठेवल्याची मात्र नाही हे हि येथे उल्लेखनीयच….
हे झाले अकबराच्या जनरल स्वभाव व शैलीबद्दल. इथे मी फार थोडक्यात आढावा घेतला आहे, याची खेदयुक्त जाणीव आहे. इथे मला लिहायचे आहे ते त्याच्या राज्यकारभाराबद्दल त्यासाठी मी त्याचे १) युद्धकला २) महसुल व्यवस्था ३) न्यायव्यवस्था हे पैलू विचारात घेतले आहेत.
१) युद्धकला - अकबर असंख्य लढाया लढला. काही लढाया त्याचे सरदार लढले तर काही तो स्वतः. त्याच्या उजव्या बाजूला त्याचा सेनापती डाव्याबाजूला एखादा शहजादा व मध्ये हत्तीवर तो स्वतः अशी एकंदर आखणी असे. तो शह्जाद्याला नेहमी आपल्याबरोबर ठेवी याबद्दल विविध मते आहेत. काही इतिहास्कारांच्यामते त्याला युद्धाचा अनुभव मिळावा म्हणून तर काहींच्या मते युद्ध चालू असताना याला डुलकी लागली तर त्याच्यावर लक्ष राहावे म्हणून. इथे अंबारीत बसतानाही तो नाकासमोर फुल धरे का नाही याचा निश्चित पुरावा नाही त्यामुळे हा महत्वाचा प्रश्न अनुत्तरितच राहणार. त्याच्या हत्तीला केंद्रबिंदू धरून एकंदर त्याच्या सैन्याची रचना असे. काही लोक घोड्यांवरून लढाया करीत काही हत्तीवरून. इथे प्रश्न उद्भवतो घोडदळ व गजदळ हे एकमेकांना पूरक अशी पाश्चात्य सिम्फनीसारखी स्वरमेळ राखणारी संवादी युद्धकला पेश करू शकतात का? इथे मात्र अकबराचे यश थोडे दुणावलेले दिसते.
अकबराच्या युद्धकलेबद्दल्च्य सखोल अभ्यासपूर्ण व प्रातिभ विवेचनानंतर पुढील भागात त्याच्या मुलकी कारभार व न्यायव्यवस्था यांच्यासंबंधी अशाच प्रकारे विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

ROFL

---/\---

पण हात फार आखडता घेतलात

अवांतर :-
मिपावरील २००८च्या आसपासचा कोलबेर ह्याचा जोधा-अकबर चित्रपटाअवरील लेखही अवश्य वाचावा . भन्नाट आहे.

तुमचा हा लेख वाचून उत्पल ह्यांच्या दिवाळी अंकातील लेखाच्या शैलीची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मिसळ पाव ओपन होत नहिये. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

अजून येवू द्या...

बाकी, हेमूचा आणि राणा प्रतापचा उल्लेख टाळल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिथे व्यक्तीपेक्षा विचारांना प्राधान्य तिथेच रहावे.व्यक्तीस्तोम माजले की नाश हा ठरलेलाच.

काहो, तुम्ही 'जरासंधाचा ब्लॉग'वालेच का? तुमच्या 'ऐसी'वरच्या पानावर 'प्रवेश प्रतिबंधित' असं येतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

:D> Sad तो मि नव्हेच!! जरासन्ध केतकर ते बदोद्याचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

त्यामुळे हा विषय ऑप्शनला टाकून तो साहित्य संगीत वगैरे विभागात मनमुराद आपल्या कारभाराचे नमुने दाखवीत असे.

ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

पुढच्या भागात अकबर-बिरबल विनोद, त्यात अकबराला कायम विनोदाचं लक्ष्य बनवणं, या पुराव्यांमुळे अकबर हा क्रूर हुकूमशहा होता हे सिद्ध होतं, याचा उहापोहही येऊ द्यात. (आठवा, हिटलर आणि स्तालिनवर बरेच विनोद होतात. आणि हा पहा संदर्भ.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जबरी आहे. अजून येउ दे :). हाताला रग लागली तरी जबरी लोल आहे.

तो शाहजादा नेहमी तोच असे की चिठ्ठ्या टाकून निवडत असत, यासंबंधी कृपया संशोधन करावे. तसेच त्याच्या दरबारात जगातील सर्वोत्तम पन्हे मिळत असे असे ऐकले. मराठीती एकारान्त शब्द (हो एकारान्तांपैकी फक्त शब्दच) हिंदीत आकारान्त होतात (उदा: पुणा गाडी), त्यामुळे जहाँपन्हा असे जे म्हणत ते पन्ह्याबद्दलच असणार यात शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ROFL
शिवाय प्रत्येक लढाईत एक असं करत करत अकबराने ३०० बायका जमा केल्या होत्या म्हणे. त्यांच्या व्यवस्थेचंही प्रातिभ विश्लेषण येउं द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अकबराने पदरी तानसेन वगैरे गवयी ठेवले होते, पण संगीत समीक्षक मात्र नाही, त्यामुळे त्याच्या राज्यात संगीत कलेची भरभराट झाली.

हान तेजायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

ROFL

बाकी हा लेख आपल्या नव्या शिक्षणमंत्री तै एखाद्या पाठ्यपुस्तकातही घालतील हो! बघा पाठवून Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बाकी हा लेख आपल्या नव्या शिक्षणमंत्री तै एखाद्या पाठ्यपुस्तकातही घालतील हो! बघा पाठवून

नै हो. जुन्या शिक्षणमंत्र्यांनी घातला असता. नवीन सगळे भडक भगवे अकबराला कसे बरे जवळ करतील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथे खुसखुशीत खिल्ली उडाली आहे असा माझा समज झाला आहे. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अकबराने पदरी तानसेन वगैरे गवयी ठेवले होते, पण संगीत समीक्षक मात्र नाही, त्यामुळे त्याच्या राज्यात संगीत कलेची भरभराट झाली.

विनोदी स्टफ असला तरी हे विधान फार नेमकं बसलं आहे. हे समीक्षक लोक आपल्याच निरर्थक जगात जगतात, कलाकार नि रसिक दोघांना त्रास देतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे समीक्षक लोक आपल्याच निरर्थक जगात जगतात, कलाकार नि रसिक दोघांना त्रास देतात.

नैतर काय तेच्यायला. कविता कशी असावी, वाङ्मय कसे असावे, झालंच तर जुना काळ, नवा काळ, पाल्टिक्स, कांदा, लसूण...लै पिडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खरं सांगू समीक्षक असा काही वेगळा प्रकार काडह्ता येणारच नाही.
बहुतांश समीक्षक स्वतःला रसिक म्हणवतात्/मानतात.
बहुतांश वेळेस इतर लोक त्यांना समीक्षक म्हणवतात.
सिनेरसिक, नाट्यरसिक्,संगीत रसिक वगैरे म्हण्वली जाणारी मंडळी इतरांच्या नजरेत समीक्षकच असतात.
(
अवांतर :-
अशाच काही हल्कट जालसमीक्षकांनी " मगधीरा " हा लै भारी पिच्चर आहे म्हणून लै हवा केली.
प्रत्यक्ष पाहिला तर काय जाणवलं ? तो एक सरळ साधा मसालापट आहे.
मसालापट असण्यात काहीही गैर नाही. पण मग हीच मंडळी इतर मसालापटांची कातडी सोलत
आपल्याला कसे वेगळे चित्रपट आवडतात; आपण कसे चोखंदळ आहोत; व हे मसालापट कसे भिकारडे
असतात असे ढोल पिटतात. रेडी, बॉडीगार्ड, राउडी/रावडी राठोर हे चित्रपट पाहून ह्यांचा कसा भ्रमनिरास झाला ते लिहितात.
हैट आहे. (फारएण्ड स्टाइल मुद्दाम मिश्किल नजरेनं गल्लाभरु पिच्चर पाहणं वेगळं; पण ही मंडळी शिरेसली पाहून मग बोंब मारतात;
आणि मगधीरा सारख्या मसालापटालाही अचानक चांगलं म्हणतात.
)
)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मगधीरा पाहिला वगैरे नाही आहे. पण मगधीराचे कौतुक करणारे समीक्षक नक्की कोण हे जाणण्याची उत्सुकता आहे. (आता इतक्या वेळा म्हणताय म्हणजे ...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मीही कौतुक करतो मगधीराचं. आता आम्ही समीक्षक नाही तो भाग वेगळा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला माझं जालस्तित्व लैच प्यारं वगैरे आहे. त्यामुळे अधिक काही लिहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गुगलवर शोध घेतला असता ऐसीवरती हे सापडले! ऐसीवरचे तरी आणखी काही सापडले नाही. बाकी स्थळांवरचे जे थोडेफार सापडले ते लिहिणारे इथे नसतात बहुधा. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याही धाग्यावर बोललो होतो. मला जाल अस्तित्व प्यारे आहे. अधिक काही लिहीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

असे के एल पी डी करून मनोबाला काय मिळतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL लय भारी! लय भारी!!
च्यायला त्या नाकासमोर फूल धरण्याची चित्र बघूनबघून; लहान असताना एक तासभर त्याच स्टाइलने गुलाब हुंगत बसलेवते. नंतर डोकं एवढं जाम दुखत होतं ना... परत गुलाबाच्या वाटेला गेले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नंतर डोकं एवढं जाम दुखत होतं ना...

नक्की गुलाबच हुंगत होता की दुसरे काही Wink

अन डोके दुखण्याचे कारण म्ह. भुकेमुळेही असू शकेल. उगीच बिचार्‍या गुलाबाला दोष देता ते!

(गुलाबप्रेमी) बॅटमॅन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही गुलाबप्रेमी तर आम्ही शेवंतीप्रेमी Smile
बादवे अकबर नक्की कोणते फूल नाकासमोर धरायचा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय पत्त्या नाय बा. त्याची जी चित्रे उपलब्ध आहेत त्यांत खरीच अशी पोज़ आहे किंवा कसे, ते पाहिले पाहिजे. की तत्कालीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे, ते पाहिले पाहिजे. तसे काही नसेल तर मग शिन्माचेच इन्व्हेन्शन मानावे लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मलाही राम सीतेची चित्रे पाहून नेहमी वाटे - इतके नटून थटून हे दरबारात कसे बसत असतील? कधी झोपेतून उठलेला राम का नाही काढत कोणी? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसा रामही काढलेला आहे.
गुलाम महमंद अलींच्या लेक्चरमध्ये सामान्य रुपातील, किंवा वनवासात जटा-दाढी वाढलेला, स्टबल ठेवलेला रामही काढलेला त्यांनी दाखवला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

गुलाम महमंद अली ना? ते आमच्या देवदेवतांची अशी चित्रे काढणारच. महम्मदाचे चित्र काढ म्हणावं !!! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

महंमदाची चित्र काही मुस्लिम राश्तृआत मध्ययुगात काढली गेली होती असं ऐकून आहे. बहुतेक इराण/पर्शिया मध्येच काढलेली दिसतात. सध्या मात्र अशी चित्रं काढता येतील का ह्याबद्दल खरोखरच साशंक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो. महंमदावरचे विकीपान पाहिल्यास तशी काही उदा. तिथे दिसून येतील. इतकी बोंबाबोंब असताना तिकडे हे चित्र कसे टिकले काय की.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गुलाम मोठा लबाड आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चित्रे पुराणकाळात काधलेली होती (काही जुनागढच्या पेंटर्सने, काही अकबरी रामायणातली इत्यादी). श्री अली यांनी नव्हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!