"टी "

असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो.

" जिवंत आहेस का? बऱ्याच दिवसात तुझा उदास आवाज कानावर पडला नाही . म्हंटल आपणच फोन
करावा ।"

"अरे काही नाही रे. असाच busy होतो ऑफिस च्या कामात. "

" तुझा आवाज बराच cheerful येतोय . काही चांगल तर घडल नाही न तुझ्या कारकुनी आयुष्यात ?"

" नाही रे बाबा ."

" आभार देवाचे . कलिंगा ला बसुयात. . अर्ध्या तासात पोहोंच ."

फोन कट .

हे हल्ली नेहमीचच झाले आहे. . "टी " पुण्यात पुन्हा वापस आल्यापासून आमच प्यायला बसण हल्ली फार वाढल आहे अस माझ्या बायकोच म्हणण आहे . ते खर असल्यामुळे मला प्रतिवाद करायला फारसा स्कोप नाहि. 'टी " ला माझी बायको असे म्हणते असे सांगितल्यावर तो चारमिनार चा झुरका घेत बायकाना पावसाळा कसा आकळत च नाही हि त्याची आवडती theory पुन्हा ऐकवायला लागतो. वास्तविक पाहता "टी " ने नुकताच beer चा तिसरा ग्लास संपवताना त्याच्या माजी प्रेयसीची पहिल्या पावसाशी तुलना करणारी कविता मला वाचून दाखवली असते. पण विरोधाभास आणि "टी " हे समीकरण मला माहित असल्याने मला याचे काही वाटत नाहि. आमच्या पहिल्या भेटी पासूनच तो असले भयंकर विरोधाभास घेऊन आदळत राहिला होता .

गरवारे होस्टेल मध्ये येउन काहीच दिवस झाले होते . आणि मला already खूप एकटे एकटे आणि असुरक्षित वाटायला पण लागले होते . असाच एका दुपारी मी बधिर होऊन घराच्या आठवणीचे कढ काढत असताना "टी " धाडकन रूम मध्ये आला . आणि मी अमुक तमुक म्हणून ओळख करून द्यायला लागला . त्याचे आडनाव जरी एका जुन्या ख्यातनाम कॉंग्रेस नेत्याचे असले तरी त्याच्या मते तो कट्टर संघाचा स्वयंसेवक होता . कुठली तरी भारीची jeans घालून आणि हातातल्या पेप्सी च्या कॅन मधून घुटके घेत घेत त्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मध्ये आल्याने माझे आयुष्य कसे बदलून जाइल यावर माझे प्रबोधन केले . भारी jeans घालणारा आणि पेप्सी पिणारा "टी " स्वदेशी जागरण मंचाचा कार्यकर्ता झाल्याचे पण नंतर कळले . म्हणजे "टी " आणि विरोधाभास हे नात आमच्या पहिल्या भेटि एवढ जुन.

नंतर " टी " अजून कळत गेला त्याच्या चक्रम पणाने . भारत -पाकिस्तान - बांगलादेश यांचे एकत्रीकरण झाल्याशिवाय मी केस वाढवणार नाही अशी प्रतिज्ञा करून त्याने डोक्याचा चकोट केला होता . जेंव्हा त्याच्या वडिलाना हे कळल तेंव्हा ते रागारागाने त्याला शोधायला आले तेंव्हा मीच त्याना तुम्हाला बघून "टी " स्टोर रूम मध्ये लपला आहे असे सांगितले होते. भारतामधून अल्पसंख्य जमातिना पूर्ण पणे नष्ट करण्यासाठी त्याने त्याच्या होस्टेल च्या रूम मध्येच 'झंझावात ' नावाची संघटना स्थापन केली तेंव्हा पहिल्या बैठकीला पण मी हजर होतोच.

"टी " च्या दोन महत्वाकांक्षा होत्या . पहिली म्हणजे भारताला हिंदू राष्ट्र बनवणे आणि दुसर म्हणजे देशासाठी Oscar जिंकण . पहिली आकांक्षा पूर्ण होणे अवघड आहे हे कळल्यावर तो दुसरी पूर्ण करण्याच्या मागे लागला . Mass Communication पूर्ण करून त्याने मुंबई चा
रस्ता पकडला . मग रात्री अपरात्री त्याचे "आज मी नेहा धुपियासोबत Ferrari बसून फिरलो " ,
आज समीरा रेड्डी सोबत cocktail प्यालो, आज एक naked पार्टी ला गेलो होतो असे SMS यायला लागले. "टी" आगा पीछा न बघतो थापा मारतो हे माहित असल्याने आमच्या group मध्ये त्याला कुणीच गंभीरतेने घेतले नाहि.

एका मध्यरात्री "टी " ने फुल टल्ली होऊन फोन केला . रडवेल्या आवाजात बोलत होता ।

" ऐकून घे माझ . मला हि मुंबई मुळीच आवडत नाहीये . जीव घुसमटतो माझा इथे . अख्ख्या शहरात एक घाणेरडा वास येत असतो. नाही सहन होत मला तो . आणि केवढी ती दगदग . दिवस कधी संपतो ते कळतच नाही . मला पुण्यात यायचे आहे . I Hate this crowded dump city . "

"अरे पण तुझ्या field ला पुण्यात फारसा scope नाही . आणि तुझी बायको काय म्हणेल ?"

"ते मला माहित नाही . मला पुण्यात यायचं आहे . बस . तू मला मदत करणार आहेस. "

आणि खरेच "टी " त्याच चंबू गबाळ आवरून पुण्यात आला . अनेक लोकाना हि त्याची professional हाराकिरी वाटत होती . पण "टी " ठाम होता . मी पण माझा अंगभूत आळस सोडून या काळात त्याला बर्यापैकी मदत केलि. अगदी त्याला भाड्याचे घर शोधून देण्यापासून ते नौकरी शोधून देईपर्यंत . या काळात आमचे गोत्र अजून जमले . याला काही कारण होती . मधल्या काळात आमच्या group मधले बाकी मेम्बर्स व्यवसायिक दृष्ट्या बरेच पुढे गेले . मागे पडलेले असे आम्ही दोघेच. ज्याप्रमाणे नेमाडे कोसला मध्ये म्हणतात कि मागे पडलेल्या लोकांनी पण आपला एक समूह तयार करावा आणि पुढे गेलेल्यांना आपणही काही कमी नाहीत हे दाखवून द्यावे. अगदी तसच . "टी " तर मला अनेकदा तोंडावर बोलतो ," हे बघ तू आयुष्यात पुढ जावस अस मला मुळीच वाटत नाहि. तू पण पुढे गेलास तर मी एकटाच मागे राहील ना . आणि तुझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला १० ते ५ कारकुनी आयुष्यच ठीक आहे . कुठे दगदग करत बसतोस ." माझ्या पण "टी " बद्दल पण याच भावना आहेत , मी बोलून दाखवत नाही एवढंच .

"टी " जबरी वक्ता आहे . "टी " भन्नाट कवी आहे . पण "टी " महा आळशी पण आहे .त्यामुळे "टी " ने आता फ़क़्त १०-५ करून आयुष्य काढायचं असा अतिशय योग्य निर्णय केला आहे . पण आपण आता तिशीला आलो आहोत आणि आपल मोठ म्हणता येईल अस काहीच नाही हि जाणीव कधी कधी "टी " ला मधून मधून ढुश्या द्यायला लागते तेंव्हा "टी " मला भेटण्यासाठी फोन करतो. कलिंगा मध्ये २ ते ५ या वेळात happy hours स मध्ये खूप beer प्यायला मिळते म्हणून ऑफिस ला कलटि मारून आम्ही तिथे भेटतो . दारू पिण्यापुर्वीचा " टी " आणि नंतरचा "टी " यांच्यात फारसा गुणात्मक फरक नाही . कारण "टी " दारू न पिताच भयाण बडबड करतो .

"टी " ला स्वतः सोडून कशाबद्दलच प्रेम नाही . त्याला पनवेल बद्दल (त्याच जन्मगाव ) एक अढी आहे . त्याच कारण विचारलं असता तो असे म्हणाला होता कि पनवेल मध्ये इमारतींची दाटी आहे आणि त्यांच्या Flat मध्ये त्यामुळे मुळीच सूर्यप्रकाश येत नाही . त्याच बरोबर पनवेल नाव पण काही बरोबर नाही .

प्रचंड संवेदनशीलता आणि त्यातून आलेलं विलक्षण एकटेपण , हातातून वाळू निसटत चालली आहे हि खुपणारी जाणीव , सातत्य असणार्या कुठल्याही गोष्टीबद्दल एक आदरयुक्त कंटाळा, नौकर्या मधला धरसोड पणा आणि rat race मध्ये न धावता एक आळशी मनमुराद आयुष्य जगायचं या किमान सामायिक कार्यक्रमावर आमच्या मैत्रीच आघाडी सरकार चालू आहे आणि मुख्य म्हणजे ते खूप स्थिर आहे .

मध्येच "टी " ला काही तरी मोठ करण्याचा झटका येतो. मी लिहिलेली स्क्रिप्ट आशुतोष ला खूप आवडली आहे . मी त्याला भेटायला मुंबई ला चाललो आहे असे तो मला सांगतो . राधा कैसे न जले या लगान मधल्या गाण्यात कोरस मध्ये नाचणाऱ्या माणसाच्या हातात घड्याळ दिसत या तुमच्या मोठ्या blunder मुळे तुमच Oscar हुकल हे मी आशुतोष ला कस सांगणार आहे हे हि तो मला सांगतो . एकदा मी नवीन नौकरी साठी दुबई ला चाललो आहे असे सांगून त्याने मला पार्टी पण दिली होती . मी पण घेतली .

पण एका मुलाचा बाप झाल्यापासून "टी " बदलत चालला आहे . त्याच्या आत्मकेंद्री वर्तुळात एका नवीन परीघाने प्रवेश केला आहे . परवा कलिंगा मध्ये दारू पिल्यानंतर तो चक्क सिगरेट नाही प्यायला मुलाला आवडत नाही म्हणुन .

आता "टी " खरच पहिल्यापेक्षा अजून महत्वाचा वाटत आहे . प्रत्येकाला तोंडाची वाफ दवडून frustration ला वाट देण्याची एक जागा हवी असते . माझ्यासाठी "टी " हि ती जागा आहे . त्यामुळे माझ्यासारखा प्रचंड ' highly anti social ' (बायको ने मला दिलेली पदवी ) माणूस पण त्याचा फोन आला कि तडक निघतो .

असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना एकदम फोन वाजतो. फोन त्याचाच असतो.

field_vote: 
4.11111
Your rating: None Average: 4.1 (9 votes)

प्रतिक्रिया

असाच ऑफिस मध्ये पाट्या टाकण्याचा अजून एक दिवस . पावसाळी दुपार . एके काळी आपण स्वतहाशिच काय काय गगनचुंबी promises केली होती आणि आपण आता हे काय करत आहोत हि मनातून मधूनच टोचण्या देणारी जाणीव अजूनच टोकदार झालेली. असेच स्वतहाला कुरतडत बसण्याचा खेळ चालू असताना ...

वाव्व. काय गजब शेवट आहे. खूपच आवडला.

प्रचंड संवेदनशीलता आणि त्यातून आलेलं विलक्षण एकटेपण , हातातून वाळू निसटत चालली आहे हि खुपणारी जाणीव , सातत्य असणार्या कुठल्याही गोष्टीबद्दल एक आदरयुक्त कंटाळा, नौकर्या मधला धरसोड पणा आणि rat race मध्ये न धावता एक आळशी मनमुराद आयुष्य जगायचं या किमान सामायिक कार्यक्रमावर आमच्या मैत्रीच आघाडी सरकार चालू आहे आणि मुख्य म्हणजे ते खूप स्थिर आहे .

खूप नेमकं.

अख्ख्या शहरात एक घाणेरडा वास येत असतो.

यालाच मी लोक अख्खं आयुष्य संडासात कसे काढू शकतात असे म्हणायचो. मुंबईचा वास ... !!! बर्‍याच हायड्रोकार्बन्सचा वास दोन मिनिटांनी जाणवायचा बंद होतो, पण हा वास त्याला अपवाद आहे. वर्षे गेली तरी जाणवत राहतो.
------------------------------------------------------------------------------------------------------------
"मागे राहणे" या थीमवर अत्यंत मनस्वी लिखाण. फार आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बर्‍याच हायड्रोकार्बन्सचा वास दोन मिनिटांनी जाणवायचा बंद होतो, पण हा वास त्याला अपवाद आहे. वर्षे गेली तरी जाणवत राहतो.

पिंपरीच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या वासाची कल्पना आहे का? निव्वळ वासाच्या दर्जाची तुलना केली तर मुंबईत प्रवेश करताना चेंबूर किंवा शहाड/मुरबाड येतात फक्त त्याच वासाशी ही तुलना होऊ शकते. असो. माझ्या बसच्या मार्गावर ही कंपनी होती. कॉलेजातून घरी येताना निवांत झोप काढायची. वास आला की उठायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉलेजातून घरी येताना निवांत झोप काढायची. वास आला की उठायचे.

डि.वाय. कॉलेज असावे, पण आता वास येणे बंद झाले आहे कारण कंपनी दुसरीकडे शिफ्ट केली आहे, पण हा वास नवी-मुंबईमधे कोपरखैरणे/महापेला नक्की येतो/येत असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डीवाय कॉलेज म्हणजे अगदी एचेच्या अंगणातच होते. तिथे असतो तर तक्रार केलीच नसती. (गोठ्यात झोपणाऱ्याने बैलाच्या... ) तिथे नव्हतो. तिथे फक्त मुली पाहायला मित्रमंडळी घेऊन जात असत. Wink असो. (अरुणजोशी, थत्तेचाचा, ब्याटम्यान आणि आमचे कॉलिज एकच. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरुणजोशी, थत्तेचाचा, ब्याटम्यान आणि आमचे कॉलिज एकच

असं वाटत नाही....असो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अरुणजोशी, थत्तेचाचा, ब्याटम्यान आणि आमचे कॉलिज एकच. )

मग आमची आत्ताची स्वाक्षरी आपणांस परिचित असावी बहुधा. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान लिहिलय. आवडलं. जुन्या मित्रांबरोबर रेग्युलरली एवढा वेळ घालवायला मिळण भारी आहे.

नौकर्या मधला धरसोड पणा आणि rat race मध्ये न धावता एक आळशी मनमुराद आयुष्य जगायचं

यात विरोधाभास जाणवला. मला तरी.

बाकी मुंबई आणि वास या जोडशब्दांबद्दल सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आवडलं! असे टी काही पाहिलेले नाहीत फारसे, पण

आळशी मनमुराद आयुष्य जगायचं

ह्याच्यामुळे जास्त भिडलं. पण तसं वाटणं एक गोष्ट, स्वतःशी कबूल करणं दुसरी गोष्ट आणि अंमलात आणणं तर फारच पुढची गोष्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्या पहिल्या भेटी पासूनच तो असले भयंकर विरोधाभास घेऊन आदळत राहिला होता .

अतिशय आवडले.

"टी " तर मला अनेकदा तोंडावर बोलतो ," हे बघ तू आयुष्यात पुढ जावस अस मला मुळीच वाटत नाहि. तू पण पुढे गेलास तर मी एकटाच मागे राहील ना . आणि तुझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला १० ते ५ कारकुनी आयुष्यच ठीक आहे . कुठे दगदग करत बसतोस ." माझ्या पण "टी " बद्दल पण याच भावना आहेत , मी बोलून दाखवत नाही एवढंच .

क्या बात है!!

प्रत्येकाला तोंडाची वाफ दवडून frustration ला वाट देण्याची एक जागा हवी असते . माझ्यासाठी "टी " हि ती जागा आहे .

पुरुष स्वतःच्या मित्रांकडे नक्की कोणत्या दृष्टीने/ अँगलने बघतात हे माहीत नव्हते. कळले.

खूप छान ललीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरुष स्वतःच्या मित्रांकडे नक्की कोणत्या दृष्टीने/ अँगलने बघतात हे माहीत नव्हते. कळले.

सरसकट असेच असते असे नाही. सामान्यिकरण टाळण्यासाठी वेळीच सांगितलेले बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! छान लिहीलय. आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त.
ह्यातला "टी" हा विषेशावतार नसून बहुतांशी सर्वत्र आढळणार्या लोकांचाच एक भाग आहे असं अधल्यामधल्या काही वाक्यांवरून वाटलं.
आणि मुंबईचा वास +१११११! ह्याला आम्ही केमिकल अलार्म म्हणायचो. सक्काळी उठून कधी लोकलने प्रवास केला, की लागलेली गाढ झोप वांद्र्याला संपायची. आणि पुढे माहिम-माटुंगा हे अहि-मही आले की खेळ खलास.
निव्वळ एअरपोर्टवरून उतरल्यावरसुद्धा मुंबई नाकात भिनतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ एअरपोर्टवरून उतरल्यावरसुद्धा मुंबई नाकात भिनतेच.

प्लस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या प्रतिसादावरून हा लेख आठवला
http://www.askthepilot.com/letter-from-mumbai/

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान लेखन आहे.
याला टीचे व्यक्तीचित्र म्हणावं की टी कडे बघताना स्वतःच्या प्रतिमेला मनातच बांधणारं स्वगत म्हणावं हे सांगता येणार नाही. पण भट्टी छानच जमलीये

कशी मला त्या टी मध्ये मला माझी झलक दिसली तर कधी निवेदनकर्त्यात! वाचकाला असे गुंतवणून घेण्याची ताकद असलेले प्रांजळ लेखन आहे.
अजून येऊ दे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

याला टीचे व्यक्तीचित्र म्हणावं की टी कडे बघताना स्वतःच्या प्रतिमेला मनातच बांधणारं स्वगत म्हणावं हे सांगता येणार नाही.

कोरेक्टो आणि पर्फेक्टो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋषिकेश, लोकांच्या मनातले नेमके विचार तशाच तसे चोरण्यास काय शिक्षा आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद सर्वाना : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

जमलय.
मस्त उतरलय कागदावर.
मिपावर एकदा चारपाच वर्षापूर्वी एका अपयशी कलावंताच्या आयुष्यावर लेख होता; त्याचीही आठवण झाली.
लेख बहुतेक धमु, पिडां,सोत्रि(की भडकमकर मास्त्र ) ह्यापैकी कुणा एका आय डी चा होता. नक्की आठवत नाही;
आणि मिपा इथून उघडतही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लोक आपलं लेखनकौशल्य जगासमोर मांडण्यासाठी लिहितात कि आपल्या मनीचा भाव जगासमोर मोकळा करण्याकरिता लिहितात? जे अगदी प्रथितयश लेखक आहेत ते देखिल समाजासमोर आपल्या अंतरीची अभिव्यक्ती करणे हे लेखनव्यवसायाआधारे उदरनिर्वाह करणे यापेक्षा प्राधान्याचे मानत असावेत ना? लेखकांना त्यांच्या लेखनशैलीचे कौतुक अभिप्रेत असते कि मांडलेल्या विषयाशी एकध्यान होणे अपेक्षित असते?

इथे लेखक नि टी यांच्या भावविश्वात स्वतः जाऊन बसण्यापेक्षा लेखन कितपत चांगले कागदावर उतरले आहे हे सांगणे लेखकाला भावावे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय म्हणायचे आहे समजले नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

There is nothing specific to your own comment here. It only provides a pretext to make following observation in general-
मी ललित लेखनावरचे दोन प्रकारचे प्रतिसाद पाहतो-
१. लेखनाचे मूल्यमापन, कौतुक, टिका, इ करणारे.
२. विषयाशी, साराशी, एखाद्या निरीक्षणाशी एकात्मता दाखवणारे*

पैकी लेखकांस जनरली काय प्रतिक्रिया अभिप्रेत असते असे वाटले आहे.

(वा न दाखवणारे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दा विचार करण्याअसारखा आहे.
तुमचा प्रतिसाद समजल्यावर माझी पहिली प्रतिक्रिया :-
सार्‍याच लेखकांना सार्‍याच वेळी एकच गोष्ट अपेक्षित असेल असं नसावं. कधी हे, कधी ते असं अपेक्षित असावं.
शिवाय ह्या दोन प्रकारचे प्रतिसाद mutually exclusive नाहित.
एकाच प्रतिसादात त्याची सरमिसळ झालेली असू शकते.

त्याहून महत्वाचं म्हणजे :-
लेखकाला काय अपेक्षित आहे; हे पाहिलं जावच असं काही नाही; आपल्याला वाटतय ते लिहून मोकळं व्हावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्यक्तीचित्रण आवडलं. चौकटीपेक्षा वेगळं जगणं डोळ्यासमोर उभं राहतं. अशीच व्यक्तीचित्रणं अजून येऊ द्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0