हे शक्य आहे?

भारतीय-पाश्चात्य पेहरावातील ती...
सखीसमवेत ती...
गंभीर-अवखळ-प्रसन्न मुद्रांतील ती..
नग्न-अर्धनग्न ती...
तर्‍हतर्‍हेचे दागिने ल्यालेली ती...
रेखांकनातून स्वत:ला साकारणारी ती...
कॅनव्हाससमोर उभी चित्रकर्ती ती...
तीच ती, अमृता शेरगिल... स्वत:ला विविध रंग-रुपांत रेखाटणारी!

`मी अशी - मी तशी’.... थेटपणे स्वत:ला साकारणं...
प्रत्येक कलाकाराला स्वत:ला ‘दाखवावं’ असं वाटत असणार.
किंबहुना,
अवगत असणार्‍या माध्यमातून ‘स्वत:ला अनेक तर्‍हांनी न्याहाळणं’ हेही कलेचं प्रयोजन असणार.
चित्रं-शब्द-शिल्प... मूर्त माध्यमांतून थेटपणे स्वत:ला ‘दाखवता-न्याहाळता’ येतं.

गीत वाद्यं च नृत्यम च, त्रयं संगीतमुच्च्यते!
सूर-ताल-शारीर हालचाली ह्या अमूर्त माध्यमांतून हे कसं बरं साध्य होत असेल?
रागबध्दतेत सुरांचं अवधान, तालबध्दतेत आवर्तनांचं अवधान, शारीर हालचालींत नृत्यशैलीचं अवधान सांभाळत स्वत:ला थेटपणे कसं बरं ‘दाखवता-न्याहाळता’ येत असेल?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

लेख फारच संक्षिप्त आहे. अर्धा लेख नि अर्धी कविता आहे. तरीही -

रागबध्दतेत सुरांचं अवधान, तालबध्दतेत आवर्तनांचं अवधान, शारीर हालचालींत नृत्यशैलीचं अवधान सांभाळत स्वत:ला थेटपणे कसं बरं ‘दाखवता-न्याहाळता’ येत असेल?

असे प्रश्न हाताळताना -त्यांना इश्वरी वरदहस्त आहे - असे म्हणावे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण ईश्वर आहे काय?
(प्रतिसाद मजेत दिला आहे, या लेखावर ते अवांतर नको.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काहीतरी वेधक आहे असं वाटलं, पण दुर्दैवाने डोक्यावरून गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला तरी वाटतं की कला हे स्वत:ला न्याहाळणं नसुन ईश्वराची केलेली आराधना अन ईश्वरप्राप्तीचा नितांत सुंदर प्रयत्न असावा .अर्थात मतमतांतरे असू शकतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेरगिल यांचे चित्रप्रदर्शन मुंबईत होते असे ते संपल्यावर कळले Sad

बाकी उत्तरे देण्याची कुवत नाही, मात्र सिरीयस उत्तरांची उत्सुकता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!