११वीचे ऑनलाईन प्रवेश

या वर्षीच्या ११वीच्या ऑनलाईन प्रवेशामध्ये जे असंख्य हास्यास्पद प्रकार झाले आहेत, त्याची फारशी दखल वृत्तपत्रांनी घेतलेली दिसत नाही. प्रवेशसमिती विद्यार्थी आणि पालकांचा असंतोष दाबुन ठेवण्यात यशस्वी झालेली दिसते.

महाविद्यालयातील जागांचे समान वाटप फक्त विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित आहे. अध्यापकवर्गाचे समान वाटप असे होऊ शकेल का? तसं झालं तर शिक्षणातील हाल-अपेष्टांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी समान वाटेकरी होतील.

सीबीएसई अभ्यासक्रमाची ज्युनिअर कॉलेजे़स नव्याने सुरु करण्यात अडचणी आहेत असे कळते, पण आहेत त्या महाविद्यालयात सीबीएसईच्या तुकड्या चालु करून एसएससीच्या हुषार विद्यार्थांना तिकडे वळविण्यास काय हरकत आहे (म्हणजे त्यांच्या खर्‍या-खोट्या हुषारीचा काय तो उजेड पडेल).

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

मुळात यासंबंधी काहिहि पार्श्वभूमी माहिती नसल्याने या धाग्यातील विचारणेबद्दल काहीही कळले नाही.
अधिक तपशील काय आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पालक म्हणुन देता येता येईल असा तपशील एव्हढाच की महाविद्यालयांचे वाटप करताना असंख्य मुलांना त्यांना जाण्या येण्यास अत्यंत अवघड अशी कॉलेजेस मिळाली आहेत. चांगले गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना दर्जाहीन कॉलेजात प्रवेश घ्यावा लागला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नक्की कसं होतंय सध्या?
म्हणजे लॉटरी वगैरे काढून किंवा घरापासून सगळ्यात जवळचं कॉलेज - अशी काही पद्धत सुरू झाली आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या अकरावीसाठी काय प्रवेशपद्धत आहे याबद्दल थोडक्यात ओळख करून दिली आणि त्यानंतर तुमचा अनुभव, इतर पालकांचे अनुभव, एकूण सिस्टीममधल्या तृटी, त्या कशा सुधारता येतील अशी लेखाची मांडणी केली तर आम्हाला माहितीही कळेल आणि चर्चादेखील करता येइल.

आमच्या काळी CBSC कॉलेज नव्हती महाराष्ट्रात आणि प्रवेशदेखील सेंट्रलाइज होत नव्हते. त्या त्या कॉलेजात जाऊन फॉर्म भरायचा आणि मार्क चांगले असतील तर लगेच तिथल्यातिथे अॅडमिशन मिळायची.
आता नक्की आठवत नाही पण बहुतेक आमची इंजिनीअरींगची अॅडमिशनदेखील सेंट्रलाइज नव्हती. ३०%चा पहीला राउंड तेवढा सेंट्रलाइज म्हणता येइल. त्यापुढच्या राउंडसाठी त्या त्या विद्यापीठात जावे लागायचे.
त्यानंतर एकदा सेंट्रलाइज अॅडमिशन अनुभवलीय. पण तेव्हादेखील पहिल्या राउंडच्या पुढे जावे न लागल्याने त्यात नक्की काय होते याची कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ए.... असं ओपनली सांगायचं नाही काय!

मग सेंट्रलाइझ्ड अ‍ॅडमिशन कधीपासून सुरू झाल्या, त्या आधी तु ११वी अ‍ॅडमिशन घेतली वगैरे वगैरे वरून संतूर-गर्ल चे वय शोधतील बरं लोक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सध्या ११वीच्या प्रवेशासाठी सर्व प्रवेश केंद्रीय प्रवेश समिती मार्फत निश्चित करण्यात आले आहेत. यासाठी आपल्या पसंतीची १५ आणि आपल्या निवासी झोन साठी २० अशा एकंदर दोन याद्या देऊन प्रवेशसमितीकडे अर्ज करायचा असतो. अर्ज केल्यानंतर तो एका ब्लॅकबॉक्समध्ये काही काळ राहतो. तो ब्लॅकबॉक्समधुन बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला कॉलेज अलोट झालेले असते किंवा नसते. अलोट झाले नसेल तर उर्वरीत अर्ज परत ब्लॅकबॉक्समध्ये जातात दुसरी फेरी/प्रवेश यादी जाहीर होते. यात प्रवेश मिळाला नाही तर तिस-या फेरीत उर्वरीत विद्यार्थ्याना प्रवेश देऊन प्रवेश प्रक्रिया संपते.

यात १ल्या आणि २-या प्रवेश यादीच्या वेळेला मिळालेले कॉलेज पसंत नसेल तर तर पुनर्विचाराची संधी या फेरीत प्रवेश मिळालेल्याना मिळते. ही सुविधा तिस-या यादीतप्रवेश मिळणा-यांना नसते.

या पद्धतीचा सर्वात मोठा दुष्परीणाम तुम्हाला जे कॉलेज मिळेल तिथे तुम्ही राहता त्या ठिकाणापासुन जायची यायची सोय असेलच असे नाही.

ही प्रवेश प्रक्रियापारदर्शक पणे होते असे म्हणायला काहीही पुरावा किंवा आधार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म एकंदर इंजिनिअरींग प्रवेशयादीत पर्याय देण्यासाठी जसे बर्यापैकी ब्रेनस्टॉर्मिंग करावे लागते (कोणते विद्यापीठ, कॉलेज, ब्रांच, कितव्या क्रमांकावर द्यायचे, काही आकडे ब्लँक सोडायचे का) तसाच प्रकार दिसतोय अकरावीलादेखील. अवघड आहे.
१५+२० अशी जी नावे आपण देतोय त्यातली काही दोन्ही यादीत असू शकतात का?
सर्व ३५ पर्याय द्यायचेच की ब्लँक सोडले तरी चालते?
आधी १५ची यादी पाहायची त्यापैकी एकही पर्याय न मिळाल्यासच २० च्या यादीकडे वळायचे असे आहे की १५तला पहिला नंतर २०तला पहिला मग १५तला दुसरा असे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पद्धत आवडली.
प्रत्येक कॉलेजात जाऊन खेटे घालण्यापेक्षा हे चांगले, शिवाय कॉलेजेसना द्यायची डोनेशन्स, भर पावसात एका कॉलेजात स्वतः, एकात भावंड, एकात आई, एकात वडीत , एकात आणखी कुणी असे आधी प्रवेश अर्ज विकत घ्यायला लाईन लावायची, मग एकदा भरायला, मग प्रत्येक कॉलेजच्या याद्या पहा, त्यापेक्षा हे कितीतरी चांगलंय

पर्याय तुम्हीच दिलेले असल्याने मला नको ते कॉलेज मिळाले या तक्रारीला अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पर्याय तुम्हीच दिलेले असल्याने मला नको ते कॉलेज मिळाले या तक्रारीला अर्थ नाही. >> +१. काही वर्षांपूर्वी JEE परीक्षेसाठी अंदमान सेंटर मिळाले म्हणून पालकांनी आंदोलन वगैरे केलेलं तेव्हादेखील हेच झाले असणार.
पण तरीही तर्कतीर्थ ज्याला ब्ल्याक बॉक्स म्हणतायत तो शक्य तितका व्हाइट झाला पाहीजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्याय पूर्ण भरायचे या अटीमुळे शेवटी नको असलेले पर्याय पण भरावे लागणार, त्याचे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अकरावीबद्दल माहीत नाही. पण इंजिनीअरींगची केंद्रीय पद्धतीने अॅडमीशन घेताना पहिल्या राउंडला १२पर्याय द्यावे लागायचे. त्यातल्या पहिल्या ९पैकी कोणत्याही पर्यायाला नंबर लागल्यास अॅडमिशन कंपल्सरी होती. आमचातर एकच पर्याय पक्का होता. मग आम्ही बाकीचे ८पर्याय देताना जिथे अॅडमिशन मिळाण्याची अजीबात शक्यता नाही असे उच्चभ्रू पर्याय दिले. म्हणजे आपल्या मार्कांपेक्षा २०+ला गेल्यावर्षीची अॅडमिशन क्लोज झालीय असे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळा गोंधळ याच अटीमुळे वाढला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता आपण गंमत बघुया, नी अन्याय होतोय का ते ही पाहुया
इथे नियमावली उपलब्ध आहे.
-- त्यात त्यांनी गट अ मध्ये किमान २० (अनिवार्य) व जास्तीत जास्त ३० पर्याय देऊ शकता असे म्हटले आहे. (संपूर्ण कॉलेजेसपैकी कोणतीही)
-- तर गट ब मध्ये किमान १५ व जास्तीत जास्त २० पर्याय देऊ शकता असे म्हटले आहे. (कोणत्याही एका निवासी क्षेत्रातील)

आता गट अ व ब मध्ये सारखीच कॉलेजेस असु नयेत असे बंधन दिसले नाही म्हणजे प्रत्यक्षात तुमच्या घराजवळचे कॉलेजच हवे असल्यास गट अमध्ये गट ब मधे दिलेलीच कॉलेजेस दिली तर आपल्या निवासी झोनच्या बाहेर जायची शक्यता फक्त ५ कॉलेजेस उरते.

आता केस १: घरा जवळ कॉलेज हवी आहेत. मला ब३, ब४ हे पर्याय मिळाल्यास सर्वाधिक आवडेल नंतर ब१, ब२ व तेही न मिळाल्यास ब६ ते ब१५ उतरत्या क्रमाने चालतील. ब १५ पर्यंत एकही कॉलेज न मिळाल्यास परिसराबाहेरच्या कॉलेजेसपौकी मी अ४,५,६,७,८ या कॉलेजेसना जायला तयार आहे. तर मी पर्याय असे भरेन
गट अ:
ब३, ब४, ब१, ब२, ब६ ते ब१५, अ४,५,६,७,८
गट ब:
ब३, ब४, ब१, ब२, ब६ ते ब१५

आता समजा माझ्या टक्केवारीला ब१ ते ४ मध्ये अ‍ॅडमिशन शक्य नसेल नी मला ब६ मिळाले तर मला फक्त रू ५० भरून तिथे अ‍ॅडमिशन घ्यायची आहे.
राउंड २ मध्ये रिझर्व्ह्ड कॅटेगरीच्या जागा वगैरे मैदानात आल्यावर मला बेटरमेंट मिळणार आहे.

यात नक्की कुठे प्रश्न/अन्याय आहे हे समजले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी भन्नाट एरियात रहातो. मला चारच ऑप्शन द्यायचे आहेत. नाही आले तर दुसर्‍या राउंडला जायचे आहे.
ही केस या नियमात कशी बसवाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नियम हे नियम आहेत, नी ते सगळ्यांना समान आहेत. त्यात काहिंवरच अन्याय कसा होतोय कळत नाही.

मुळात तुम्हाला त्या चार कॉलेजात प्रवेश मिळाणार नसेल तर काय? जे कॉलेज मिळते आहे तिथे अ‍ॅडमिशन घेऊन ठेवायची आहे. पुढिल राउंडला तुम्हाला त्या चार कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळणार असेल तर बेटरमेंट मिळेलच. जर सगळ्या राउंड्स होऊनही तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये अ‍ॅडमिशन मिळत नसेल तर तुम्ही केवळ चार पर्याय देऊनही तुम्हाला ती मिळाली नसती. हे मान्य आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जर सगळ्या राउंड्स होऊनही तुम्हाला त्या कॉलेजेसमध्ये अ‍ॅडमिशन मिळत नसेल तर तुम्ही केवळ चार पर्याय देऊनही तुम्हाला ती मिळाली नसती. हे मान्य आहे का? १००% मान्य.
पण दुसर्‍या राउंडला मला कॉलेज मिळणे शक्य असतांना पहिल्या राउंडला भलत्या कॉलेजात अ‍ॅडमीशन घ्यायला लागू शकते, हे मान्य आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते मान्यच आहे, पण ती फुलफ्लेज्ड अ‍ॅडमिशन नाहिये, फक्त प्लेसहोल्डर आहे.
जर तुम्हाला मिळालेले कॉलेज मान्य नसेल, तर ती अ‍ॅडमिशन फक्त ५०रू भरून घ्यायची आहे. बेटरमेंटमध्ये हवे ते कॉलेज मिळाले की आधीच्या कॉलेजातील जागा रद्द होऊन तुम्हाला हवे ते कॉलेज मिळेलच.

त्यामुळे ५० रुपये जातात (ते ही रिफंडेबल नसतील तर - ते बघितले नाहि) ही तक्रार ग्राह्य ठरावी. "अन्याय" काय होतोय? आणि तोही ठराविक मुलांवरच कसा होतोय? (हे मी खरचं समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आता मंडळी मुख्यमंत्र्यांकडे वगैरे गेलीयेत म्हणजे काहितरी अन्याय होत असेलही, पण तो मला समजलेला नाहिये)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके, ती फुलफ्लेज्ड अ‍ॅडमिशन नाहिये, फक्त प्लेसहोल्डर आहे. हे आधी माहीती नव्हतं. आता मला पण हेच प्रश्न आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१
हेच सगळं टंकणार होतो.
आमच्या अभियांत्रिकीच्या वेळेसही असच होतं.
पहिल्या राउंडला सिव्हिलला सुद्धा नम्बर लागला नै लोकांचा .
त्यांनाच पुढच्या राउंड्समध्ये मेकेनिकल, कॉम्प वगैरे मिळालं.
विशेष तक्रार कुणाचीच नव्हती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१५+२० अशी जी नावे आपण देतोय त्यातली काही दोन्ही यादीत असू शकतात का?

असु शकतात...

सर्व ३५ पर्याय द्यायचेच की ब्लँक सोडले तरी चालते?

द्यावेच लागतात.

सर्व ३५ पर्याय द्यायचेच की ब्लँक सोडले तरी चालते?

कदाचित अर्ज अपूर्ण म्हणुन नाकारला जाईल

आधी १५ची यादी पाहायची त्यापैकी एकही पर्याय न मिळाल्यासच २० च्या यादीकडे वळायचे असे आहे की १५तला पहिला नंतर २०तला पहिला मग १५तला दुसरा असे?

दोन्ही याद्या एकदम द्यायच्या असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उशीरा का होईना उजाडत आहे.

"ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थ्यांवर अन्याय"

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/Admission/articl...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0