कृष्णा नदी

मराठी विकिपीडियावरील कृष्णा नदी बद्दलच्या ज्ञानकोशीय लेखात माहिती जमा होण्यास बराच कालावधी लागला आहे.

मी २००९ मध्ये लेखाच्या चर्चा पानावर एक कॉमेंट टाकली "इंग्रजी कन्नड आणि तेलुगू विकिपीडियांनी या नदीची दखल मराठी विकिपीडियापेक्षा अधीक घेतली आहे . ज्या पश्चिम महाराष्ट्रात ही उगमपावते तेथील मंडळीना कृष्णा नदीची पुरेशी दखलसुद्धा घ्यावी वाटू नये असे का बरे ? कृष्णेच पाणी पील नसेल तरी तिच्या काठच पिकवलेल अन्न घेणार्‍या मंडळींनी थोडी दखल घेऊन हा लेख अधीक माहिती पूर्ण करण्यास काय हरकत आहे ? गोदावरी नदी हा आपल्याच विकिपीडियावरील लेख पहावा" एकच प्रतिसाद आला २०११ मध्ये: "मला वाटते सांगली जिल्ह्यातन आलेली हळद साखर किंवा वांगी काहितरी कधीतरी खल्ल्याचा परिणाम असेल आज दोन चार संपादने करून झाली" कृष्णामाई प्रमाणेच लेखही जरा संथपणेच वाढतो आहे. आज वाळवा नावाच्या कृष्णेच्या खोर्‍यातील गावाचा लेख अपडेट झाल्याकडे लक्ष गेले त्यात "या नदीच्या अंगा -खांद्यावर बागडणारे तिचे लाडके बाळ म्हणजे वाळवा एक जिवंत रसरशीत कर्तबगार गाव." हि वर्णनात्मक आलंकारीक शैली ज्ञानकोशास फिट बसणारी नसताना सुद्धा नदीच्या काठावरील एका तरी गावातली मंडळी नदी बद्दल आपुलकी दाखवतात हे वाचून बरे वाटले. आणि ऐसीचे आपले हे सदर आठवले. कृष्णे काठच्या मंडळींनो मी थोडी टिका केली तरी लिहिण्यास उद्यूक्त करण्याच्या उद्देशाने तेव्हा हलकेच घ्यावे आणि लेख वाढवण्यास मराठी विकिपीडियास साहाय्य करावे हि विनंती.

* नदी काठच्या भौगोलीक प्रदेश, उंची, पूर रेषा, पूल, प्रदुषण समस्या इत्यादींबद्दल अधिक माहिती हवी.

* कृष्णा नदी आणि खोर्‍यातील जल सिंचन आणि जलव्यवस्थापना बद्दल अधिक माहिती द्या.
* नदी खोर्‍यात आढळणार्‍या जीवसृष्टी विषयी माहिती द्या मासे, पक्षी, वन्यजीवन, वनस्पती इत्यादी.

* वाई (वैराजक्षेत्र), लिंब-गोवे, माहुली, कराड, नरसोबाची वाडी (अमरेश्वर), औदुंबर (भुवनेश्वरी) , कऱ्हाड, वाई, सांगली, वाळवा, अथणी, कुरुंदवाड, चिक्कोडी, धनगांव, धोम, नृसिंहवाडी ( नरसोबावाडी), पसरणी, बहे, माहुली, मेणवली, काशीळ, उंब्रज, संगमेश्वर, हरिपूर, रायबाग,कुरवपूर, श्री शैल्यम या कृष्णेकाठच्या गावांचा क्रम आणि ज्या गावां बद्दल अधिक माहिती असेल ती सांगा, एखाद्या गावाचे नाव सुटले असल्यास जोडण्यास साहाय्य करा (त्या त्या गावांबद्दलचे स्वतंत्र लेखातही टाकता येईल) आणि नदी काठच्या मानवी संस्कृतीच्या माहितीचेही स्वागत असेल.

* नृसिंहवाडी आणि नरसोबावाडी हि दोन्ही गावे वेगळी आहेत का एकच ? एकच असतील तर कोणते नाव कोणत्या नावा कडे वळवावे म्हणजे मुख्य/अधिकृत नाव कोणते/ जास्त प्रचलीत नाव कोणते ? नरसोबाची वाडी (अमरेश्वर) हे वेगळे गाव आहे का ?

* बहे आणि बहेबोरगाव हे एकच गाव आहे का वेगवेगळे आहेत ?

* नदी बद्दल साहित्यातील उल्लेखांबाबत समर्थ रामदासांनी कृष्णा नदीची एक आरती लिहिली आहे एवढीच माहिती आहे. काही अजून माहिती मिळाल्यास हवी आहे.

* आपले या धाग्यावरील प्रतिसाद लेखन प्रताधिकारमुक्त होत असल्याचे गृहीत धरले जाईल.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नृसिंहवाडी आणि नरसोबावाडी हि दोन्ही गावे वेगळी आहेत का एकच ?

नृसिंहवाडी, कुरुंदवाड ही गावे कॄष्णा आणि पंचगंगा च्या संगमावर वसली आहेत. नृसिंहवाडी हे नाव स्वामी नरसिंह सरस्वती यांच्या वरुन पडले. नरसिंह चा अपभ्रंश होउन बोलीभाषेत त्याचा नरसोबा झाला. गावाकडे सगळी जनता शक्यतो नरसोबावाडी/वाडी असेच म्हणते. सच्च्या वाडीला चल्लोय येतुस काय?. कॄष्णा नदीच्या पलिकडे असलेल्या औरवाड गावास अमरेश्वर असे नाव पुर्वीच्या काळी वापरत असावेत. एका मठाच्या नावामध्ये अमरेश्वर वाचले आहे.

बाकी २००५ आणि २००६ च्या पुराच्या आठवणी अजुन ताज्या आहेत.

-- यन्त्रमानव
(कुरुंदवाडकर)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सांगलीकोल्लाप्रात सगळीकडं वाडीच म्हंटात.

(मिरजकर) बट्टमण्ण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असंच कै नै. औदुंबर-भिलवडी-पलूसकडे वाडी म्हटलं की किर्लोस्करवाडी असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

धन्यवाद. या गावच्या लोकांशी संपर्क तसा कमी आल्याने हे ठौक नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तळकोकणातील काही भागात वाडी म्हटलं बाय डिफॉल्ट सावंतवाडी असच समजतात म्हणे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वाडी (नि:संदिग्धीकरण) असा मराठी विकिपीडियावर लेख आहे आणि त्यात वेगवेगळ्या वाडींची यादी आहे. अनेकवाडींची नावे भाज्या, फळझाडे आणि व्यक्ती नामावरून आहेत असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

माहितीसाठी धन्यवाद, सहज शक्य असेलतर गावांच्या चतु:सीमांची माहितीही हवी आहे. आणि तालुका कोणता हेही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कुरुंद नावाचे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यात गाव असावे. नरहर कुरुंदकरांच्या आडनावात येणारे 'कुरुंद'ही वेगळे असण्याची शक्यता वाटते. कुरुंद नावाचा भारतभरात आढळणारा विशीष्ट प्रकारचा दगडही आहे. खाप्रे डॉट ऑर्ग मध्ये "पु. १ एक प्रकारचा तांबूस रंगाचा , जातें , निसणा यांच्या उपयोगी पडणारा दगड . हा हिंदुस्थानांत फार सांपडतो . हें हिर्‍याच्या खालोखाल कठिण द्रव्य आहे . शुद्ध कुरुंद अल्युमिना मातीचा बनलेला असुंन त्यांत चुना व सिकता यांचे अंशा असतात " अशी माहिती दिसते तर केतकर ज्ञानकोशात या दगडांबाबत अधिक विस्तृत माहिती आहे.:

हिंदुस्थान देशांत गंध उगाळावयाच्या सहाणा; धान्य दळण्याचीं जातीं; चाकू, वस्तारे वगैरे हत्यारांस धार देण्याचीं चाकें इत्यादि जिन्नस शुद्ध कुरुंदाचे करितात. तसेंच कुरुंदाची फार बारीक पूड करून वस्त्रगाळ करितात व तीत सरस, चपटालाख किंवा गंधकमिश्रित रबर घालून तें मिश्रण साच्यांत खालून त्याचीं धार लावण्याचीं चाकें, शाई काढण्याचें रबर, हिरे कापण्याचीं चाकें, पॉलिश करण्याचे कागद, पालिश कापड इत्यादि उपयुक्त जिन्नस तयार करितात. [वॅट. कमर्शि. प्रॉ.] संदर्भ: केतकरांचा ज्ञानकोश

मोल्सवर्थात कुरुंद शब्दाचे गवताचा प्रकार तसेच डोळे लाल करणारा आजार असेही अर्थ दिसतात. या उल्लेखांचा उद्देश कुरुंदवाड परिसरात दगडांच्या खाणी वगैरे राहील्या असल्याची काही शक्यता आहे का ?

अधिक अवांतर : या निमीत्ताने शोधताना मोल्सवर्थात उंड शब्दावरचा शोध रोचक होता, उंद शब्दावरही मोल्सवर्थात शोध घेतला उंदीरवगैरे शब्द होतेच पण मोल्सवर्थात सउंदर (p. 801) [ sundara ] m Commonly सौंदर. अशी अर्थ न नोंदवलेली एंट्री मिळाली आणि जरासा विचारात पडलो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

काशीळ, उंब्रज, संगमेश्वर, हरिपूर या गावांची सुद्धा माहिती हवी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

कृष्णेचा उगम महाबळेश्वरला आहे. क्षेत्र महाबळेश्वरचे पंचगंगा मंदिर उगमस्थानी आहे असे म्हणतात, आणि तेथील स्वयंभू लिंगावरून सतत वाहणार्‍या पाण्यात पाच नदींचा उगम आहे असे मानतात - कृष्णा, वेण्णा, कोयना, सावित्री आणि गायत्री. त्याच मंदिरात कृष्णेची प्रतिमा आहे, आणि दर बारा (सोळा?) वर्षांनी तिला भेटायला भागीरथी येते असेही मानतात, तेव्हा वाईला जत्रा भरते. क्षेत्र महाबळेश्वरचे मंदिर फार जुने आहे. जावळीच्या मोर्‍यांच्या इलाक्यात होते, आणि जावळीकर मोर्‍यांच्या बखरीत मोर्‍यांनीच ते बांधले असे वाचल्याचे (अंधुक) स्मरते.

समर्थ रामदासकृत कृष्णेची आरती:

(शं. न. जोशी, संपा. "रामदासांचे समग्र ग्रंथ", खंड १, पुणे: चित्रशाला प्रेस, १९१८, पृ. ६६:)

||आरती कृष्णेची||
सुखसरिते गुणभरिते दुरितें नीवारी|
नि:संगा भवभंगा चिद्गंगा तारी|
श्रीकृष्णे अवतार जलवेपधारी|
जलमय देहें निर्मल साक्षात हरी||
जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे|
आलों तुझिया उदरा निरसी मम तृष्णे||१||

हरिहर सुंदर ओघ ऐक्यासी आले|
प्रेमानंदें बोधें मिळणीं मीळाले|
ऐशीया संगमीं मिसळोनि गेले|
रामदास त्यांची वंदी पाऊले||
जयदेवी जयदेवी जय माये कृष्णे|
आलों तुझिया उदरा निरसी मम तृष्णे||१||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहा, धन्यवाद! 'दास डोंगरी राहतो' मध्ये या आरतीचे केवळ ध्रुवपद होते, उरलेली आरती पाहिजे होती पण कुठे मिळत नव्हती ती आज मिळाली. बहुत धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आपण दिलेला आरतीचा पाठ मराठी विकिपीडियात दुवा देऊन मराठी विकिस्रोतात जोडला आणि पंचगंगा मदिराची माहिती कृष्णा नदी लेखात जोडली. खूप खूप धन्यवाद.

काव्यातील तालसूरांचे मला फारसे लक्षात येत नाही तरीही या आरतीची चाल - लय काहीशी वेगळी वाटते त्या बद्दल जाणकार माहितीचा झोत टाकतील अशी अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मनातल्या मनात म्हणून पाहिली. नेहमीच्या चालीतच म्हणता आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला काव्याची एखादी ओळ सुद्धा लयात म्हणता येणे अवघड जाते आणि या आरतीची तर मला लय लक्षात आली तर काहीतरी वेगळे असे उगीचच वाटून गेले Smile माहितीसाठी धन्यवाद.

तळटीपः उपरोक्त वाक्यातील माहितीसाठी धन्यवाद च्या आधीचे वाक्य >span style="color: #ccc;"> ने बनवलेले आहे पण गेल्या काही दिवसांपासून span style="color: #ccc;">

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मनातल्या मनात म्हणून पाहिली.

सोयिचे नास्तिक Tongue

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्कट सांधुनि शीळा सेतू बांधोनी, (माधवदासस्वामी) किंवा अगदी लवथवती विक्राळा (स. रामदास) ह्यांची चाल अशीच तर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आणि आरती दिल्याबद्दल अनेक धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे बालपण जसिंगपूरला गेले. नृसिंह्वाडी नाव हे थोडे संस्कृतप्रचुर असल्याने कमी वापरात आहे. नेहमिच्या बोलण्यात व लिहिण्यात नरसोबाची वाडी (नरसोबावाडी नव्हे)हे नाव प्रचलीत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गावरान

(कोणते लेखन बरोबर या बद्दल मनात कन्फ्यूजन होतेच) नरसोबावाडी एवजी नरसोबाची वाडी हे बरोबर असल्याचे नोंदवण्या बद्दल धन्यवाद.

जयसिंगपूर हे कृष्णा नदीच्या जवळ आहे का कृष्णा नदीच्या काठावर कोणता उल्लेख अधीक स्यूक्तीक असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

मस्त धागा. प्रतिसादही आवडले.

-- छोरा कृष्णा किनारेवाला

----

----

----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0