जीवसृष्टीचा शोध : निरर्थक उद्योग

माणुस अवकाशात जीवसृष्टीचा पृथ्वी व्यतिरिक्त शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण माझ्या काही मूलभूत शंका आहेत...

समजा जीवसृष्टीचा शोध लागलाच तर ते जीव आपल्यापेक्षा मूलत: वेगळे असतील का? एकपेशीय जीव, प्राणी आणि वनस्पती यापेक्षा तिथे निराळी जीवसृष्टी असु शकेल का? मला वाटतं नाही. याची मुख्य कारणे अशी की, तिथली मूलद्रव्यं, तिथले पिरीयॉडिक टेबल आपल्यापेक्षा वेगळे नसणार. साहजिक ही मूलद्रव्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट नियमांनी तीच संयुगे निर्माण करणार. कदाचित त्यांचे प्रमाण कमी-जास्त बदलेल, जसे वाळवंटात पाण्याचे प्रमाण कमी असते.

थोडक्यात निसर्गाचे मूलभुत नियम तिकडे वेगळे असायचे कारण नाही. आता हाच युक्तीवाद पुढे खेचला तर असे लक्षात येते की अंतराळातील जीवसृष्टी आपल्यापेक्षा फार वेगळी असेल असं नाही फक्त तेथील वातावरणानुसार काही जीवांचे प्राबल्य असेल. उदाहरणार्थ, अंतराळातील एखादा ग्रह जर फक्त पाण्याने आच्छादलेला असेल तर तिथे कदाचित फक्त जलचरच सापडतील. कदाचित तिथले काही जलचर पृथ्वीवर अस्तित्वात नसतील किंवा यायचे असतील. एव्हढेच... पण पाण्याखाली वसती करून राहणारा मानव तिथे अस्तित्वात यायची शक्यता किती. मला वाटतं शून्य. कारण पृथ्वीवर अजुन मनुष्य पाण्याखाली वस्ती करू शकत नाही.

थोडक्यात पृथ्वीवर कोट्यवधीवर्षात निसर्गनियमांच्या मर्यादांनी जे घडु शकलेलं नाही ते अवकाशातील जीवसृष्टीमध्ये पण घडु शकायची शक्यता पण शून्यच वाटते. निसर्गाचे नियम तिथे पण तेच असल्याने त्याच्या मर्यादा पण त्याच असणार.

म्हणुनच मला अंतराळातील जीवसृष्टीचा शोध एक निरर्थक उद्योग वाटतो...

field_vote: 
2.25
Your rating: None Average: 2.3 (4 votes)

प्रतिक्रिया

आत्ता निरर्थक वा निरोपयोगी वाटला तरी भविष्यात तो अर्थपुर्ण व उपयुक्त वाटू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

भविष्यात तो अर्थपुर्ण व उपयुक्त वाटू शकतो.

असा कोणताच प्रयत्न नसावा ज्यापुढे हे वाक्य जचत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ज्यापुढे हे वाक्य जचत नाही. >> हे वाक्य वाचताना कोण 'खचत' नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मी तर चचलो बॉ.

-बॅटू नेना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या शोधाचा काळ किती असावा आणि तितक्या काळात जीवसृष्टी सापडण्याची शक्यता किती?

समजा एखाद्या ग्रहावर आपल्यासारखीच तंतोतंत सृष्टी "आत्ता" अस्तित्वात आहे. तिथेही आपल्यासारखीच तंतोतंत टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. आणि आपल्यासारखेच दुसर्‍या ग्रहांशी संपर्क करायचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण तो ग्रह आपल्यापासून ५०० प्रकाशवर्षे दूर आहे. त्या लोकांना आज आपण "सापडायची" शक्यता किती? त्यांच्या दृष्टीने आपण आज मध्ययुगात असू. म्हणजे इलेक्ट्रोनिक संपर्क आपण त्यांच्याशी साधू शकणार नाही. त्यांनी किती शतकं शोध घेऊन नाद सोडून द्यावा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुद्दा अगदी बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या शोध लागलेल्या अफाट विश्वात आपण एकटेच आहोत का ?
प्रुथ्वीवरील मानवजातीला सोडून इतर कुणीही आपल्याएव्हढे प्रगत नाही का ?

जर आणखी कुठे (ग्रह, ऊपग्रह, धूम्केतू, इ.) जीवस्रुष्टी असल्यास ती कशी असेल ?

या आणि या अनुषंगाने इतर अनेक प्रश्नांची ऊत्तरे हवी आहेत. ती आज मिळत नाहीत, म्हणून प्रयत्न सोडून देणे, कितपत योग्य आहे ?

- शेखर

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या शोध लागलेल्या अफाट विश्वात आपण एकटेच आहोत का ?

समजा एकटे नसलो तरी, दुकटेपणाचा फायदा काय? याप्रश्नाचे पटेल असे उत्तर मिळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वगृह शोधुनि होतां, कंडुअतिशमनार्थ अन्यत्र जीवसृष्टी शोधावी |
तेहीं नसतां मग, स्वगृहींचि काडी खुल्ली सारावी ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समजा तुमचं म्हणणं एकवेळ खरं आहे असं गृहित धरू - म्हणजे इतरत्र जीवसृष्टी असेल पण ती पृथ्वीवरच्यासारखीच असेल. आणि त्यातले बौद्धिकदृष्ट्या प्रगत जीव माणसांसारखेच असतील. पण त्यामुळे शोध निरर्थक कसा ठरतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निरर्थक म्ह. 'वांझोटा' सो टु स्पीक असे काहीसे म्हणायचे असावेसे वाटते, चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निरर्थक अशासाठी की तेथिल जीवनाचा त्यांच्या प्रश्नांचा आपल्याला अ‍ॅक्सेस असा कितीसा मिळणार आहे. कोलंबसाचा अमेरीकेशी संबंध प्रस्थापित झाल्यावर अमेरिकेचा शोध सार्थ ठरला. शहरात बसुन आपण जंगलातल्या प्राण्यांचा अभ्यास करू शकत नाही. तर त्यासाठी जंगलात जावे लागते. शिवाय बौद्धिकदृष्ट्या प्रगत जीव माणसांसारखेच असले तरी त्यांचे प्रश्न त्यांच्या आहार निद्रा भय आणि मैथुन यांच्याशीच निगडित असणार फारसे नवे काही असणार. ते आपल्यापेक्षा प्रगत निघाले आणि संपर्कात आले तर आपल्याला कमी लेखुन वागवणार किंवा आपण प्रगत ठरलो तर आपण त्यांना कमी लेखणार...थोडक्यात फार नवे काही कळेल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शोध सार्थ होण्यासाठी 'त्यांच्या प्रश्नांना अॅक्सेस मिळणार नाही' हेही क्षणभर गृहित धरू. तरीही आपल्याशिवाय या विश्वात दुसरीकडे प्रगत-अप्रगत कशी का होईना, जीवसृष्टी आहे हे ज्ञानच मनुष्याचं स्वतःविषयीचं चित्र बदलायला लावण्याइतकं शक्तिमान आहे.

अॅक्सेस मिळणार नाही हे पुरेसं कारण असल्यास कितीतरी शास्त्रं मरून जातील. मुळात ताऱ्यांचंच निरीक्षण का करावं? हा प्रश्न आहेच. ते निरीक्षणच मूर्खपणाचं म्हणून टाळलंं असतं, तर ज्योतिषशास्त्राचा शोध लागला असता का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघा,

तुम्हाला मी एक वेगळा दृष्टान्त देतो. तो तुम्हाला भावेल असा अंदाज आहे. समजा एखादा गिर्यारोहक एखाद्या पर्वतात रात्रीच्या मुक्कामासाठी आसरा शोधायचा प्रयत्न करतोय. पण त्याला काही सापडत नाही. हळुहळु संध्याकाळ होऊन काळॉख पडतो. पलिकडच्या डोंगरावर त्याला एक शेकोटी पेटलेली दिसते. पण तिथे जायचे म्हणजे दरी पार करायला हवी. पण काळोखामुळे ते शक्य नाही.

आता शेकोटी पेटलेली दिसली म्हणजे तिथे कुणाचा तरी वावर असावा.

मला आता सांगा या शोधाचा त्या गिर्यारोहकाला उपयोग काय किवा त्यात "स्वतःविषयीचं चित्र बदलायला लावण्याइतकं शक्तिमान" काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथे हा दृष्टांत लागू पडत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते कसं काय बुवा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डोंगर ओलांडणे ही आजची-आत्ताची गरज आहे तशी जीवसृष्टी शोधणे ही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डोंगरापलिकडेही आपल्यासारखीच माणसं आहेत हे नवीन, क्रांतीकारक ज्ञान नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो तुम्ही डोंगरावरच्या शेकोटीचा काय विचार करताय? दुसर्‍या जीवसृष्टीच्या पृथ्वीच्या उपग्रहांचा त्यांच्यावर आणि इथल्या लोकांवर काय परिणाम होतो, याच्यावर विचार करायची वेळ आली आहे आता. मग त्याच्यासाठी तरी दुसरी जीवसृष्टी शोधायला नको का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा उद्योग नुसता निरर्थकच नव्हे तर मूर्खपणाचाही आहे असे मला वाटते.
कार्ल सगान आणि फ्रँक ड्रेक यांनी मांडलेल्या मिड्योक्रसी हायपोथिसिस नुसार पृथ्वी हा एक सर्वसामान्य ग्रह आहे आणि सूर्य हा एक सर्वसामान्य तारा आहे आणि आपल्या आकाशगंगेसारख्या कोट्यवधी आकाशगंगा असलेल्या या विश्वात आपल्या पृथ्वीसारख्या अब्जावधी पृथ्वी असतील असे त्यांचे म्हणणे होते.
ड्रेक यांनी तयार केलेल्या समीकरणावरून आपल्या 'मिल्की वे'मध्येच दशलक्षावधी प्रगत जीवांच्या संस्कृती असायला हव्यात असा अंदाज निघतो.
त्यावर एन्रिको फर्मीने विचारलेला प्रश्न मार्मिक आहे आणि Fermi's Paradox म्हणून प्रसिद्ध आहे.
नुकताच पीटर वार्ड आणि डोनाल्ड ब्राऊनली या दोन शास्त्रज्ञांनी मिळून मिड्योक्रसी हायपोथिसिसच्या विरोधात जाणारा रेअर अर्थ हायपोथिसिस मांडला. त्यांच्या मते पृथ्वीसारखे ग्रह असामान्य नसले तरी पृथ्वीवर आणि सूर्यमालेत जी स्थिती निर्माण झाली आहे ती अतिशय दुर्मिळ आहे आणि म्हणूनच जीवाणू-विषाणूंच्या पातळीवरचे जीवन विश्वात सर्वसामान्य असले तरी बुद्धिमान जीवन इतरत्र असणे ही अत्यंत कमी शक्यता असलेली गोष्ट आहे.
पण माणसाच्या आशेला आणि मूर्खपणाला सीमा नाही म्हणतात. पृथ्वीवर माणसाच्या "संस्कृती"मुळे माणसाच्याच अस्तित्वाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती आलेली आहे. आण्विक अस्त्रांची रेलचेल व हवामान बदल आणि संसाधन टंचाईमुळे त्या अण्वस्त्रांवर पेटती काडी पडण्याची वाढती शक्यता यामुळे काही थोर्थोर मंडळींना दुसरे घर शोधायचे डोहाळे लागले आहेत.
"The Brave New World" नावाच्या एका डॉक्युमेंटरीत श्रीमान स्टीवनबाबा हॉकिन्स म्हणतात "I hope we will find a planet which we can finally call home!". WTF?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ड्रेक यांनी तयार केलेल्या समीकरणावरून

समीकरण वाचले. चार महिन्यांपूर्वी 'हरवलेले' मलेशियाचे विमान कुठे गेले याबद्दलही असेच समीकरण बनवता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

to each his own तेव्हा तुम्हाला हा शोध निरर्थक वाटतो, हे ठीकच.
मूर्खपणा? हे judgemental होतंय तेव्हा त्यावर काहीच टिपण्णी करत नाही.

पण नकीच असहमत, मुख्यत्वे ३ मुद्द्यांवरून -
अ) एवढ्या वेगळ्या प्रकारच्या शोधासाठी लागणारी सामग्री, सिद्धांत इ. खूपच वेगळे असतील आणि त्यातून खूप काही नवीन "ज्ञान" मिळू शकेल, कदाचित आतापावेतो मिळालंही आहे. तेव्हा "ज्ञानसंपादन" इतका शुद्ध हेतू जरी ग्राह्य धरला तरी बाह्यजीवसृष्टीचा शोध (exobiology) निरर्थक नक्कीच ठरत नाही.

ब) बहुतेक वेळा pure science मध्ये मिळालेल्या माहितीचा applied sciences मध्ये उपयोग होतोच. अवकाश संशोधन हे त्याला अपवाद नक्कीच नाहीये. तेव्हा उपयुक्तता ह्या निकषावरही असे संशोधन निरर्थक ठरत नाही.

क) तुम्ही म्हणता आहात तो बाह्य जगाचा शोध exoplanetsचं अस्तित्व आणि त्यावर जीवसृष्टीची शक्याशक्यता ह्यापुरता मर्यादित आहे. पुन्हा त्याचा आणि पृथ्वीच्या सद्यस्थितीचा काहीही संबंध नाही. अण्वस्त्रांमुळे पृथ्वीचा नाश होत असेल तरी आपण angry birds खेळतोच- ह्या दोन गोष्टींतलं correlation शून्य आहे, तसंच अण्वस्त्रं आणि बाह्यजीव संशोधन ह्यातलंसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूर्खपणा? हे judgemental होतंय तेव्हा त्यावर काहीच टिपण्णी करत नाही.

धन्यवाद. हे माझं मत आहे; तसंच सगळ्यांना वाटायला हवं असा माझा हट्ट नाही. मुळात एखाद्या गोष्टीला शहाणपणा म्हणणे हेही जजमेंटल आहे आणि तसे करणार्‍यांचाही असा हट्ट नसावा अशी अपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नगरीनिरंजन म्हणतात की पृथ्वीचा विनाश झाल्यावर अन्य ग्रहावर वस्ती करायला जाणे हा एक हेतू असू शकतो. त्यांचा आक्षेप या हेतूच्या नैतिकतेविषयी आहे, असे वाटते. त्यांच्या सहज शब्दांत "अनैतिक" ऐवजी "मूर्खपणा" शब्द वापरला आहे, परंतु तो अलंकारिक असावा. हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थच्छटांनी वापरण्यात काही व्यवहार्य फायदे आहेत. परंतु "मूर्खपणा" शब्दाचा आणखी एक प्रचलित अलंकारिक उपयोग "हेतूकरिता निरुपयोगी, निरर्थक" असा होऊ शकतो. त्या दोन अलंकारिक उपयोगांची सरमिसळ होऊन "सहमत!" असे लिहिले गेले असावे.

उलट तर्कतीर्थ म्हणतात की असा कुठला वसाहतवादी हेतू नाही. (कोलंबसाचा हेतू साध्य झाला, असे उदाहरण ते देतात, आणि तसे येथे नाही असे त्यांचे मत सांगतात.)

त्यामुळे निगरीनिरंजन यांच्या प्रतिसादाच्या शीर्षकावरून सहमती असल्यासारखे वाटले, तरी टोकाची असहमती असावी, असे दिसते.

तपशिलांत गेल्यास :
तर्कतीर्थ म्हणतात की "अंतराळातील जीवसृष्टी आपल्यापेक्षा फार वेगळी असेल असं नाही फक्त तेथील वातावरणानुसार काही जीवांचे प्राबल्य असेल"
नगरीनिरंजन काही दाखला देऊन म्हणतात की "तरी बुद्धिमान जीवन इतरत्र असणे ही अत्यंत कमी शक्यता असलेली गोष्ट आहे"
वगैरे, वगैरे, असहमतीचे मुद्दे सापडतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पृथ्वी सोडून दुसरा ग्रह शोधणे हे अनैतिक आहे म्हणून मूर्खपणा हा शब्द वापरला असे नाही.
सगळं तपशीलवार लिहायचं म्हणजे मेगाबायटी प्रतिक्रिया होते आणि लेखाच्या अंगापेक्षा प्रतिक्रियांचा बोंगा जास्त होतो म्हणून बरचसं वाचणार्‍यावर सोडावं लागतं.
माझी सहमती फक्त हा उद्योग निरर्थक असण्याला आहे; कारणे वेगळी असली तरी.
ततींनी कोलंबसाचे उदाहरण दिले आहे ते वापरले तरी युरोपियनांनी अमेरिकेचा शोध लावल्यावर नेटिव्हांचे जे हाल झाले तसे काही होणार नाही असे समजणे किंवा त्याबद्दल विचार न करणे हे निव्वळ अनैतिक नसून मूर्खपणाचे आहे.
कदाचित ततींचे असे गृहीतक आहे की अशी जीवसृष्टी अगदी आपल्यासारखीच असून कॉन्टॅक्ट झाल्यावर निव्वळ व्हॉट्सअ‍ॅपवर मारतो तशा गप्पांवरच हा कॉन्टॅक्ट सीमित राहील व नवीन काही ज्ञान वा भौतिक फायदा पदरात पडणार नाही.
मी मूर्खपणा हा शब्द वापरला कारण प्रगत जीवसृष्टी असोत किंवा पृथ्वीसारखा ग्रह असो दोन्हीही सापडल्यास होणार्‍या परिणामांचा कोणताही विचार न करता त्यावर ऊर्जा व वेळ वाया घालवणे हा सामान्यतः ज्याला आपण मूर्खपणा म्हणतो तोच आहे.
शिवाय पृथ्वीवरची परिस्थिती बदलायचे प्रयत्न न करता दुसरा ग्रह शोधणे व त्या ग्रहावर गेल्यावर इतिहासाची पुनरावृत्ती होणार नाही असे समजणे हे (असल्यास) फक्त अनैतिक नसून मूर्खपणाचेच आहे.
तिसरे म्हणजे एक होस्ट नष्ट होऊ लागल्यावर किंवा त्यापूर्वीच दुसरा होस्ट शोधणे व त्यावर पसरणे हा विषाणूंचा गुणधर्म आहे; पण माणसाची तुलना विषाणू वा कॅन्सरशी केलेली (बर्‍याच) माणसांना चालत नाही. हाही एक मूर्खपणाच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि

"कदाचित ततींचे असे गृहीतक आहे की अशी जीवसृष्टी अगदी आपल्यासारखीच असून कॉन्टॅक्ट झाल्यावर निव्वळ व्हॉट्सअ‍ॅपवर मारतो तशा गप्पांवरच हा कॉन्टॅक्ट सीमित राहील व नवीन काही ज्ञान वा भौतिक फायदा पदरात पडणार नाही."

गमतीचा भाग असा आहे- आपल्या सृष्टीचे मानवेतर सभासद आहेत त्यांचे आपापसातले व्यवहार कसे आहेत हे आपण फारसे डिकोड करू शकलो आहोत असे वाटत नाही. उदा दोन माकडे एकमेकांशी काय संवाद साधतात हे आपल्याला समजत नाही तिथे परकीय जीवांशी कसला डोंबलाचा संवाद साधणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज नै पण काही शे/हजार वर्षांनी तंत्रज्ञान आजच्यापेक्षा प्रगत झालेले असू शकते (जर कै युद्धबिद्ध होऊन पुन्हा ब्याकवर्ड इ. नै झालो तर). त्या केसमध्ये ग्रहोपग्रहांवर मानवी वसाहती वसवता येतील, अन्य ग्रहांना आपल्या अंकित करून अजून दरारा गाजवता येईल. त्यामुळे हे अगदीच औटॉफ प्लेस आहे असेही नाही.माणसाच्या मनातील परमप्रिय आणि बहुत प्राचीन अशा प्रेरणेशी हे सुसंगतच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्हणुनच मला अंतराळातील जीवसृष्टीचा शोध एक निरर्थक उद्योग वाटतो...

असहमत.
१. ज्यांना वेळ आहे, पैसा आहे, ज्यांचेकडे बुद्धी आहे, तंत्रज्ञान आहे त्यांनी काय उद्योग करावेत हे कसे ठरवावे? असेच निकष बघायचे म्हटले तर नक्की काय काय निरर्थक आहे याची यादी फारच लांबेल. त्यामुळे निरर्थक म्हणताना नक्की काय म्हणायचे आहे विस्तृतपणे सांगावे लागेल.
२. कदाचित इतर सृष्टीचा शोध हे केवळ "तुम्ही आहात का?" चे उत्तर "होय" म्हणून परत धाडणे इतका सोपा नि स्वस्त असेल.
३. स्रोतांसाठी स्पर्धा हे "ब्रह्मांडाच्या पातळीवर" केवळ एक मिथक आहे. स्रोत जवळजवळ अनंतच आहेत. समजा असेही नसले तरी केवळ पृथ्वीवरच मिळतो नि सर्वच सृष्टींना पाहिजे असा कोणता आयटम ब्रह्मांडात असणे अशक्य आहे. ज्या संस्कृती अतिप्रगतीमान असतील त्यांनी ब्रह्मांडातील सर्व मूलभूत कण, तरंग, बले, काल, अवकाश, (जीव), इ इ यांचे सारेच काही जाणले असेल नि त्यांच्या फॅक्टर्‍या टाकल्या असतील. म्हणून कोणी येऊन आपले बरेवाईट करेल असा विचार फारसा सपोर्ट करवत नाही. त्यामानाने टाईमपास मात्र कमी आहेत. नवी सृष्टी मिळाली तर दोन्ही सृष्टींना टाईमपास करायला जास्त मुद्दे मिळतील.
४. मानवी बुद्धीजन्य संस्था नीट कशा चालवाव्यात नि सर्वांनी सुखाने कसे राहावे हे परग्रहवासीयांकडून मानवांना मिळणार असणारी संभाव्यता परमोच्च भेट असू शकते. हे मानवांनी आपल्याआपण शिकणे असंभव वाटते.
५. असेही असू शकते कि मानव, बिग बँग, इ इ एका दुसर्‍या स्पेसिजची डिझाईन इ इ आहे. ते स्वत: मात्र खर्‍याखुर्‍या अल्ट्रामेगा बँगचे नि खर्‍या इवोल्यूशन्चे रँडम प्रॉडक्ट आहेत. मग आपण इथून पुढे कसे असावेत याबद्दल बार्गेन, विनंत्या, इ इ करू शकतो.
६. मानवाला पृथ्वीवर अस्तित्वात असायला विशेष प्रयत्न करावे लागतात हे देखिल एक मिथक आहे. म्हणजे आता संस्था काँप्लिकेटेड झाल्या आहेत खर्‍या, पण एका विशिष्ट लेवलवर केवळ आत्ताच्याच प्रगतीने मानव सुखाने राहू शकतो. पण जास्त जागा, जास्त स्रोत हे कधीही वाईट नाही. बॅकप असायला काय हरकत?
७. मानवजातीची सस्टेनॅबिलिटी (अ‍ॅज म्यूटेटेड) हा नि:संशयपणे आपल्या जिव्हाळ्याचा विषय असावा. आताचा १००-२०० वर्षाचा काळ आपल्या ३.६ (कोणांच्या मते ४.६) बिलियन वर्षांच्या अस्तित्वापुढे मोठा आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पेट बट कव्हर आणि लू रीड सारखे निरर्थक शोधही लावलेले आहेतच ना...मग त्या परग्रहावरल्या जिवसृष्टिनेच काय घोडं मारलय..? 'येन केन प्रकारेण कंडूशमनम भवेत' हे खर तर माणसाच्या जिवंतपणाचेच लक्षण नाहि काय..?

तदुपरी माझे डोळे कायमचे मिटायच्या आधी दुसर्‍या ग्रहावरिल जिवसृष्टि चा शोध लागलेला असावा अशी माझी तीव्र ईच्छा आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पेट बट कव्हर हा क्रूरपणा आहे. बाकी चालूद्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्रूरपणा..? का हो? निरर्थक नक्कीच आहे पण क्रूरपणा...? 'ते' काही तिथे चिकटवलेलं नाहिये...

पेट्सला डायपर्स घातलेले पण पाहिलेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग ठीके. फटूवरून तसा संशय येतो मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय मलाही तोच संशय आला. काइच्या काइ आहे राव. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिकॉज इट इज देअर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

हे बरंय
लोक शास्त्रीय संगीत शिकतात, नृत्य करतात, गणित शिकतात, व्याकरण शिकतात, शब्दकोश व विश्वकोशाची निर्मिती करतात, त्यात असलेल्या नसलेल्या पूर्वजांच्या माहितीवरून भांडतात सुद्धा, ते सगळे अर्थपूर्ण असते नी हाच प्रयत्न बरा निरर्थक. Blum 3 (ह. घेणे)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हा मुद्दा एकदम मार्मिक असल्याने इथे '(ह. घेणे)' हा ढुश्लेमर टाकणे 'मला निरर्थक वाटते'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हे असले धागे काढण्याइतका निरर्थक उद्योग दुसरा कोणता आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तसे बरेच असतात. सध्या आपण या एकाच उद्द्योगाविषयी बोलु या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूणच मानवी अस्तित्वाबद्दल विचार करताना आपल्याला सामान्यपणे खालील प्रश्नं विचारावेसे वाटतात.

  1. आपण कुठून आलो?
  2. मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?
  3. आपण या विश्वात एकटेच आहोत का?
  4. हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का ?
  5. मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का?
  6. माझ्यात जाणीव आली कुठून?
  7. माणसात 'स्वत्व' (self) असे काही असते का?
  8. मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?
  9. संगणकं आपला ताबा घेतील का?
  10. हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का?
  11. माणूस प्राणी नामशेष होणार का?
  12. आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?

यापैकी आपण या विश्वात एकटेच आहोत का? हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. याबद्दलची ही एक टिप्पणी:

निरभ्र आकाशाकडे रात्रीच्या वेळी पाहत असताना आपल्याकडेही कुणीतरी पाहत असतील असा भास होण्याची शक्यता आहे. लुकलुकणारे तारे कुणाचे तरी डोळे नसतील ना असे वाटण्याची शक्यता आहे. कदाचित त्या देदिप्यमान, विस्मयकारक ठिणग्यामधूनच - ज्याला आपण चेतना म्हणतो त्यातूनच - आपल्या अस्तित्वाला आकार मिळाला असावा.

आपले अंतर्मन मात्र या विश्वात आपण एकटे नाही असे सांगत असते. कुठल्याही इतर साधनांच्या मदतीशिवाय आपण सुमारे 2000 तारे बघू शकतो. आपल्या दीर्घिकेत सुमारे 5 कोटी (50 million) तारे असण्याचा अंदाज आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते या ब्रह्मांडात सुमारे 10000 कोटी (100 billion) दीर्घिका असावेत. त्यामुळे अंतरिक्षात भ्रमण करत असलेल्या असंख्य तारांपैकी आपलाही एक तारा असे म्हणता येईल. त्यामुळे आपल्यासारख्या सजीवांची वस्ती असलेला (व कदाचित आपल्यापेक्षा जास्त बुद्धीमान असलेल्या सजीवांचे अस्तित्व असलेला) एखादा तारा कुठेतरी अंतराळात भ्रमण करत असावा. परंतु आपण आजतरी याबद्दल निश्चितपणे काहीही सांगू शकत नाही.

फ्रँक ड्रेक या शास्त्रज्ञाने याविषयी गणितीय सूत्रस्वरूपात काही मांडणी केली होती. त्याच्या समीकरणावरून तार्‍यांची रचना, तारकापुंजाचे भाग असलेले ग्रह - उपग्रह, ग्रहावरील सजीव प्राणी, सजीव प्राण्यातील बुद्धीमत्ता व या बुद्धीमान प्राण्याची इतरांशी संवाद करण्याची क्षमता इत्यादींचा अंदाज करता येतो. या समीकरणांची आकडेमोड करण्यासाठी काही घटकांचा आपण नक्कीच अंदाज करू शकतो. उदाहरणार्थ, आकाशगंगेत दरवर्षी 20 तार्‍यांचा 'जन्म' होतो. आपण सूर्याप्रमाणे त्याच्याभोवती ग्रह - उपग्रहांच कुटुंब घेऊन फिरणार्‍या अजून 560 तार्‍यांचा वेध घेतला आहे. त्यातील 25 टक्के तार्‍यांच्या भोवती पृथ्वीएवढेच वजन असलेले ग्रह आहेत. जरी हे समीकरण जीवोत्पत्तीनंतर त्यांची तग धरून राहण्याच्या क्षमतेचा अंदाज घेण्यास उपयुक्त ठरू शकले तरी एवढ्यावरून जैविक घटकांचा अंदाज करणे शक्य होणार नाही. परंतु मुळातच तेथे जीवोत्पत्ती कशी झाली याबद्दल मौन बाळगावे लागेल.

काही तज्ञांच्या मते कुठल्याही ग्रहावर जीवोत्पत्ती होऊ शकते. परंतु इतर काहींच्या मते ग्रहावर साधे जीव असले तरी त्यांच्यात बुद्धीमत्तेचा अंश असणे फारच अपवादात्मक परिस्थितीत शक्य होईल. पॉल डेव्हिस या तज्ञाच्या मते जीवोत्पत्ती इतक्या सुलभरीतीने होणे मुळातच अत्यंत कठिण गोष्ट असून आपण अजूनही अंधारात चाचपडत आहोत.

समीकरणाचा विचार बाजूला ठेऊन याविषयी काही पुरावे आहेत का याचाही शोध घेता येईल. आपल्याच सौरमालेतील मंगळ ग्रहावरील सजीवांचे अस्तित्व याकामी आपली मदत करू शकणार नाही. कारण त्या ग्रहावरील जीवांचे आपल्या earthlingशी भरपूर साम्य यावरून आणि पृथ्वी व मंगळ ग्रहावरील वातावरणात सारखेपणा यामुळे मंगळ व पृथ्वीवरील सजीवांची केव्हातरी आदानप्रदान झालेली असावी, असे म्हणता येईल. परंतु तो काही पुरावा होऊ शकत नाही. शनी ग्रहाच्या टायटन (Titan) उपग्रहावर रासायनिक प्रक्रियेतून उद्भवलेल्या जीवोत्पत्तीचे पुरावे सापडल्याचा दावा काही तज्ञानी केला आहे. सौरमालेतील ग्रह - उपग्रहांपैकी याच उपग्रहाच्या पृष्ठभागावर कार्बनसदृश संयुक्त व गोठविलेल्या पाण्यासारख्या द्रवपदार्थाचे अंश सापडले आहेत. या उपग्रहावर खरोखरच जीव असल्यास त्या आपल्यापेक्षा भिन्न असावेत. गुरू ग्रहाच्या युरोपा या उपग्रहाच्या पृष्ठभागाच्या खाली हिममय समुद्र असून तेथेही जीव असण्याची शक्यता वर्तवली जाते.

सौरमालेत मायक्रोसदृश जीव असणे, हे या विश्वात आपण एकटेच नाही याचा पुरावा ठरू शकेल. परंतु आपल्याला बुद्धीमान सजीवाची अपेक्षा आहे. गेली 50 वर्षे रेडियो टेलिस्कोपद्वारे आपण या बुद्धीमान प्राण्याच्या शोधात आहोत. परंतु आजपर्यंत आपल्या पदरी निराशाच आली आहे. याचा अर्थ असा नव्हे की परग्रहावर जीवच नाहीत. फक्त आपण येथे आहोत हे त्यांना माहित नसावे. फार तर आपले रेडिओ लहरी किंवा आपल्या शहरातील प्रखर दिव्यांची प्रकाश किरणं त्यांच्या पर्यंत पोचत नसावीत, असे म्हणता येईल. कदाचित त्यातून त्यांना काही अर्थबोध होत नसावा. 1945च्या सुमारास सुरुवात झालेल्या SETI (Search for Extra Terristrial Intelligence ) प्रकल्पाच्या प्रयत्नातून पाठविलेले प्रखर रेडिओ ध्वनी लहरी जास्तीत जास्त 70 प्रकाशवर्षाएवढे लांब गेले असतील. आपल्या या विश्वाच्या अफाट लांबी - रुंदीच्या तुलनेने हे अंतर नगण्य ठरू शकेल. या विश्वाचा विस्तार मुंबई महानगराएवढे असल्यास या रेडिओ लहरी फार फार तर आता व्हीटी स्टेशन ते बाहेरच्या फुटपाथपर्यंत पोचले असावेत, असे म्हणता येईल. त्यामुळे आपल्या विश्वातील परग्रहवासीयांना संदेश पोचण्यासाठीच्या वा त्यांचा प्रतिसाद आपल्यापर्यंत पोचण्यासाठीच्या प्रयत्नांना अजून फार मोठा पल्ला गाठावयाचा आहे.

त्याचप्रमाणे आपल्याच दीर्घिकेत बुद्धीमान सजीव कुठल्या तरी ग्रह - उपग्रहावर असले तरी या पृथ्वीवर होमोसेपियन्स असतील याचा त्यांना पत्ता लागला नसावा, असेही निष्कर्ष काढता येईल. प्रकाश किरणांचा वेग व विश्वाचा भव्य विस्तार यामुळे बहुतेक तारे व ग्रह 'out of range' असू शकतील. किंवा एके काळी त्या ग्रहावर बुद्धीमान सजीव असावेत व त्या आता नाहीत असेही म्हणता येईल. आपल्याच पृथ्वीच्या उदाहरणावरून पृथ्वीच्या 450 कोटी वर्षाच्या अस्तित्वानंतर आपला हा बुद्धीमान प्राणी केवळ 50 - 60 हजार वर्षापूर्वीचा आहे. त्यामुळे परग्रहावरील जीवसृष्टी असण्याची शक्यता व त्यांचा आपल्याशी संपर्क याबद्दल फार आशावादी असून चालणार नाही, असे तज्ञांचे मत आहे.

समजा, भविष्यात केव्हा तरी आपण त्यांच्याशी (किंवा ते आपल्याशी) संपर्क साधल्यास आपली त्यावर काय प्रतिक्रिया असू शकेल? फार फार तर NASA सारख्या संशोधन संस्था किंवा पृथ्वीवरील काही संघटित धर्मसंस्था त्यांचा स्वीकारही करतील. परंतु या गोष्टी प्रत्यक्ष घडल्याशिवाय आपण त्यावर काही टीका टिप्पणी करू शकणार नाही. कदाचित आपल्याला परजीवसृष्टीचा शोधही लागणार नाही. त्यामुळे फक्त आपल्याच पृथ्वीवर बुद्धीमान सजीव आहेत यावर समाधान होत (परंतु मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती परजीवसृष्टी आहे असा संशय घेत) आपले अस्तित्व संपुष्टात येईल.

ही अनिश्चितता आपला सोबती म्हणून आपल्या आयुष्यभर कायमचा राहणार आहे हे मात्र निश्चित!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक प्रतिसाद.
1.आपण कुठून आलो?
---------बिग बँगेच्या कणातून
2.मुळात हे विश्व अस्तित्वात का आहे?
---------अस्तित्व या सद्यार्थाने वापरलेल्या संकल्पनेचा दृष्टा आपणच आहोत. याचे नि:संशयपणे उत्तर हो असे आहे.
3.आपण या विश्वात एकटेच आहोत का?
---------अस्तित्व ही एकच संकल्पना बायनरी आहे. बाकी सगळे स्पेक्ट्रम आहेत. म्हणजे काही सजीव जवळजवळ रेणूच असतात तसे. सध्याला आपल्या आजूबाजूचे जग प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन, फोटॉन अशा पातळीवर चालते. पण यापेक्षा सूक्ष्म वा मोठ्या पातळीवरची विश्वे असू शकतात. तेथील सजीव आपल्यासारखेच असणे गरजेचे नसावे. पण 'सजाण' आणि 'सबुद्ध' अस्तित्व इतरत्र नाकारता येत नाही. जोपर्यंत आपल्याच अस्तित्वावर बितत नाही तोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर शोधायला हरकत नसावी.
4.हे विश्व फक्त आपल्यासाठीच आहे का ?
---------असं मानायचं कारण नसावं. मानवाच्या इच्छा, गरजा नि प्रत्यक्ष उपलब्धी यांत खूप गॅप आहे नि निसर्गात चीड येईल इतकं वेस्टेज आहे. अनंत अवकाश असताना आम्हाला ५-६००० रु प्रति चौरस फूट मोजावे लागणे वा सूर्याच्या उत्सर्जनाच्या रोज ०.००...% उर्जा वापरत असताना पेट्रोल ७५ रु ला घ्यावे लागणे हे प्रकार पाहिले तर विश्व आपल्यासाठीच बनलं आहे असं का वाटावं?
5.मी होलोग्रामसदृश प्रतिमा असेन का?
---------हिग्ज बॉसॉन सापडला ना! आपण सगळे रियल आहोत.
6.माझ्यात जाणीव आली कुठून?
---------या विश्वात जी काही रियल एंटीटीज आहेत त्यांचं एक संयुग म्हणजे आपण. प्रत्येक एंटीटीच्या, संयुगाच्या प्रॉपर्टीज आहेत. अशा कोणत्या गुणधर्मांबद्दल अजून कमी चिकित्सा झाली आहे म्हणून त्याचे फार नवल वाटून घेऊ नये. '(स्वतःच्या वा कोणत्याही)अस्तित्वाला दृष्टा मिळणे' म्हणजे जाणिव. थंड व गरम पदार्थांची उर्जा देवाणघेवाण ही देखिल एक त्यांतील आपसांतील रुडीमेंटरी जाणिवच आहे. जाणिव वैगेरे केवळ रासायनिक प्रक्रिया आहेत.
7.माणसात 'स्वत्व' (self) असे काही असते का?
-----------निसर्गाचे सुनिश्चित असे नियम आहेत. काहींचे मते सांख्यिकीय नियम आहेत. काहींचे मते सांख्यिकीय नियम कदाचित अधिक ज्ञानसंपादनानंतर सुनिश्चित नियम म्हणूनही आढळले जाऊ शकतात. वैज्ञानिकांच्या अधिकृत भूमिकेनुसार स्वत्व वैगेरे प्रकार नसतो. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात मात्र आपण स्वत्व आहे असे गृहित धरून वागू इच्छितो नि वागू शकतो. संभवतः 'नियमपालन' नि 'स्वत्वपालन' हे एकत्रित कसे राहतील असेच निसर्गाचे नियम बनले असावेत. पण हून असा स्वतास काही अर्थ नसावा.
8.मी कुणाच्या तरी हुकुमाचा ताबेदार आहे का?
------------मानवी शरीराचे, (असल्यास) मनाचे कितीतरी गुणधर्म त्याच्या स्वतःच्या नियंत्रणाबाहेर आहेत. पण त्या नियमांचा ताबा कोणास असाईन करायची काय गरज आहे? शाश्वत अशा सांख्यिकीय नि असांख्यिकीय नियमांनी जग (नि आपणपण) चालले आहे असे मानल्यास असा प्रश्न न उद्भवावा.
9.संगणकं आपला ताबा घेतील का?
-----------घेतील. तितकी प्रोग्रामिंग आपण करायला पाहिजे.
10.हुबेहूब माझ्यासारखा अजून कुणीतरी कुठेतरी असेल का?
-----------समत्व शक्य आहे. पण 'सेमत्व' (इंग्रजी सेम) असंभव कल्पना वाटते.
11.माणूस प्राणी नामशेष होणार का?
-----------अर्थातच. स्पेसिस येतात नि जातात. माणूस आहेच थोड्या (७०?) लाख वर्षांपासून. जीवन ३५००० लाख वर्षांपासून आहे. पृथ्वी अजून ४०००० लाख वर्षे कोणते ना कोणते जीवन सपोर्ट करणार आहे. मानवाचा वंश कदाचित (शक्यता कमी जास्त असेल) इतका काळ तगेल पण त्यांचेकडे पाहून (सर्वार्थाने) ते आपलेपण आपल्याला त्यांचेबद्दल कदाचित वाटणारपण नाही.
12.आपल्या विश्वाच्या शेवटाची सुरुवात कशी असेल?
-----------अख्खे ब्रह्मांड तर शेवट पावणार नाही. तो लॉ ऑफ कंजर्वेशन! पण विश्व म्हणजे माणसे नि त्यांच्या आत्मीयतेच्या गोष्टी असे मानले तर --
माणसे बरेच शोध लावत जातील. एकतर त्यांना सगळेच शोध लागतील, सगळ्याच शक्ती प्राप्त होतील वा त्यांना त्यांच्या मर्यादांचे अंतिम टोक काय आहे याचा शोध लागेल. जे काय आहे त्यानुसार एकतर ते आपले अस्तित्व अनंत करतील वा शक्य तितके वाढवतील. अर्थातच इतर घटक आलेच परिणाम करायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आयला, जबरीच उत्तरे. बहुतेक सगळेच माझे विचार म्हटले तरी चालेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रना आणि अजो, जबरदस्त प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थोडक्यात पृथ्वीवर कोट्यवधीवर्षात निसर्गनियमांच्या मर्यादांनी जे घडु शकलेलं नाही ते अवकाशातील जीवसृष्टीमध्ये पण घडु शकायची शक्यता पण शून्यच वाटते. निसर्गाचे नियम तिथे पण तेच असल्याने त्याच्या मर्यादा पण त्याच असणार.

उत्क्रांती मान्य असल्यास मर्यादा वेगळ्या असु शकतील आणि अर्थात शक्यताही वेगळ्या असु शकतील, पण उत्क्रांती मान्य नसल्यास तुमची जीवसृष्टीची थेअरी काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणुनच मला अंतराळातील जीवसृष्टीचा शोध एक निरर्थक उद्योग वाटतो...>> हे वाचून मला 'आणि म्हणून मला मांजर/कुत्रा/गाय हा प्राणी फार फार आवडतो' अशा वाक्याने शेवट केलेल्या शाळेतील निबंधांची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

हा हा हा, जबर्‍याच ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फुटले ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण राहतो ते व‌िश्व कसं आहे, त्यात आपलं स्थान काय, आपल्यासारखे इतर कोणी आहेत का वगैरे प्रश्न काही लोकांना महत्त्वाचे वाटतात. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कोणी चाराठ आणे इतपत खर्च करत असेल तर त्याने काय असा मोठासा फरक पडतो? त्या चाराठ आण्यांतून बाकी तंत्रज्ञान, विज्ञानाची प्रगती होते हा चांगला परिणामही नाकारायचा का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी कोणी चाराठ आणे इतपत खर्च करत असेल तर त्याने काय असा मोठासा फरक पडतो? त्या चाराठ आण्यांतून बाकी तंत्रज्ञान, विज्ञानाची प्रगती होते हा चांगला परिणामही नाकारायचा का?

यासारखं बंडल उत्तर दुसरं नाही. माझ्यामते कोणताही तद्दन फालतू पण प्रचंड क्लिष्ट प्रश्न घ्या, त्यावर चार आठ आणे खर्चा. त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती होतेच. पण म्हणून ते तो खर्च करण्याचे कारण नसावे. जन्विन कारण देऊन जन्विन खर्च करावा.

उदा. निसर्गातल्या प्रत्येक मूलद्रव्याचे नि काही संयुगांचे प्रत्येकी १०० मुक्तसंचारी अणू/रेणू घेऊन त्यांचा १० वर्षे ट्रॅक ठेवावा. म्हणजे त्यांचे लोकेशन, द्रव/वायू इ अवस्था, रासायनिक प्रक्रिया, इ इ. हा प्रोजेक्ट तितकाच चॅलेंजिंग आहे पण आता या प्रोजेक्टमधे परग्रहावरील सृष्टीप्रमाणे जनता जनार्दनाला काही रस नसेल. पण हा प्रोजेक्ट करायचेच म्हटले नि चाराठाणे खिशातून काढलेच तर विज्ञानाच्या क्षेत्रात काही कमी प्रगती होणार नाही.

सबब जे कारण थेट समर्थनीय आहे तर ते तसेच खर्च करणारा सर्वांना वाटले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जन्विन कारण देऊन जन्विन खर्च करावा.

जन्विन आणि फर्ज़ी हे कोण ठरवणार? जे लोक त्यासाठी फंड पुरवतात ते. त्यांनी जर ठरवले की येताजाता चार लोकांना कानाखाली मारायचे आणि किती लोक किती रागाने प्रतिकार करतात याचा विदा गोळा करून काही अ‍ॅनॅलिसिस करायचा, तर ते योग्यच आहे, कारण त्यांचा पैसा जातोय. बाकीच्यांनी बोलायचं काम नाही.

सबब जे कारण थेट समर्थनीय आहे तर ते तसेच खर्च करणारा सर्वांना वाटले पाहिजे.

या 'सर्वां' मध्ये गुळाची चव न समजणारी गाढवेही असतात. त्यांचे मत प्रत्येक वेळेस विचारात घेणे हा मूर्खपणा आहे. त्यांचा पैसा जातो म्हणून त्यांना बोलायचा हक्क आहेच, सर्वांना कन्विन्स करायचाही हक्क आहे. पण बेशिकली अक्कलच नाही त्याला काय करणार? तस्मात 'वाटले पाहिजे' ला अर्थ नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जन्विन कारण देऊन जन्विन खर्च करावा.

जन्विन ग्रांट्स लिहल्याशिवाय फंडिंग मिळाल्याचे मी तरी कधी ऐकले नाही, तुम्ही देता काय त्या शिवाय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

म्हणून ते तो खर्च करण्याचे कारण नसावे. जन्विन कारण देऊन जन्विन खर्च करावा.

१. हेच तर खर्च करण्याचं कारण असतं. तुम्ही प्रपोजल्स, वैज्ञानिक रीसर्च पेपर्स वगैरे वाचत नसणार. त्यात असंच लिहीतात. "मला अमुक-तमुक करण्यात रस आहे. कारण अमुक-तमुक करून अलाणं फलाणं समजेल, हे आत्तापर्यंत कोणालाच समजलेलं नाहीये. किंवा समजलेलं आहे त्याबद्दल शंका आहेत." यात अमुक-तमुक आणि अलाणं-फलाणं कितपत चांगल्या पद्धतीने लिहीलेलं आहे यावर तुम्हाला चाराठ आणे मिळतात का नाही हे अवलंबून असतं.
१अ. यथा वाचक तथा प्रतिसाद किंवा यथा फायदा तथा प्रतिसाद. चाराठ आणे मिळवण्यासाठी लिहीला असता तर मागच्या संशोधनांतली १५-२० उद्धृतं, सध्या विज्ञानात काय सुरू आहे वगैरे वगैरे दोन-चार हजार शब्दांचं बीफ पाडलं असतं. एक-दोन श्रेणी आणि मराठी आंजावरच्या कूल पॉईंट्ससाठी एवढे कष्ट मी तरी घेत नाही.
२. खणखणीत, बंदे रुपये खर्च करायला माझा पूर्ण पाठींबा आहे. तुम्ही होताय किंवा शोधताय का भारतातले पॉल अॅलन? त्याने आख्खी एक दुर्बिण बनवली आहे, स्वतःचे पैसे खर्च करून, पृथ्वीबाहेरची जीवसृष्टी शोधण्यासाठी. मग चाराठ आणे कशाला, आख्खे बंदे रुपये खर्च करू.

तुम्ही जो प्रोजेक्ट लिहीला आहे तसे संपूर्ण आकाशाचे सर्व्हे, रेडीओ दुर्बिणी वापरून लोक सातत्याने करत आहेत. १०० अणू/रेणूंची चिरीमिरी नाही. आणि त्यातून चांगली दणकून वैज्ञानिक प्रगती झाली, होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

थोडक्यात पृथ्वीवर कोट्यवधीवर्षात निसर्गनियमांच्या मर्यादांनी जे घडु शकलेलं नाही ते अवकाशातील जीवसृष्टीमध्ये पण घडु शकायची शक्यता पण शून्यच वाटते. निसर्गाचे नियम तिथे पण तेच असल्याने त्याच्या मर्यादा पण त्याच असणार.
पण निसर्गच वेगळा असेल तर?
निसर्ग म्हणजे काय? आकाश? उष्णता? प्रकाश? सापेक्ष काल? ग्रहतार्‍यांची गती? पाणी? मूलद्रव्य? इलेक्ट्रॉन्स? फोटॉन्स? शक्तिपुंज? तरंग? स्वन? किरणोत्सार? आकाशगंगा? पृथ्वी?गुरुत्वाकर्षण?
की प्रकृती, सृष्टी? [हा शब्द म्हणजे एक त्रांगडं आहे. (कोणाकडूनतरी) सर्जित/निर्मित झालेली ती सृष्टी.] हा 'कोणीतरी' म्हणजे निसर्ग? त्याचे नियम सर्वत्र सारखे आहेत हे वाक्य धूसर, खरंतर भोंगळ नाही का वाटत? 'तो' कोणी तरी आहे किंवा 'त्या' कुणाला तरी नियम असतात यातली सत्यासत्यता बाजूला ठेवू, पण हे सर्व तर्कसुसंगत आहे का? पृथ्वीतलावर राहून, अंतराळाची कल्पना करून अथवा मापे/प्रमाणे घेऊन इथे तयार केलेले नियम/निष्कर्ष सार्वत्रिक असणार आहेत असे म्हणण्याइतपत आपली सिद्धता भक्कम आहे का?
बुद्धी म्हणजे काय? पृथ्वीवरील सजीवांमध्ये दिसणारी अंतःप्रेरणा? मेंदूसम कुठल्यातरी इंद्रिय म्हणता येण्याजोग्या ठिकाणी घडणारी रासायनिक प्रक्रिया? साय्कोसोमॅटिक प्रक्रिया?
प्रॉपगेशन साठी मैथुन आवश्यक आहे का? वेजिटेटिव प्रॉपगेशन अशक्य आहे का? पृथ्वीवरल्यापेक्षा वेगळ्या प्रकाराने इतरत्र चैतन्याचे(जीवाचे किंवा सजीवांचे म्हणत नाहीय) सातत्य टिकून राहू शकणार नाही का?
वगैरे वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Was God an Astronaut नावाचे एक पुस्तक. त्यातली थेअरी अशी आहे की जगातल्या सगळ्या धर्मात देव हा कायम आकाशातून आला आहे.सगळीकडे माशापासून जीव तयार झाला अश्याच कथा आहे.पेरू देशात प्रचंड उंच आणि मोठ्ठे असे ३ खांब आहेत की जे अंतराळातून दिसतात. थोडक्यात देव बिव कोणी नसून मानवाला पृथ्वी हा ग्रह सापडला. त्यावर तो अनेक वर्ष आकाशातून येवून जीवाची पेरणी करून त्याची वाढ कशी झाली ते बघत होता. अशी त्याने भन्नाट थेअरी मंडळी आहे. मला हे कधी कधी खरे पण वाटते. शिवाय जिथून कुठून देव लोक आले तिकडे पण हे असलेच उद्योग करत असतील. म्हणजे येत जाता मारामाऱ्या आणि आजूबाजूच्या जीवसृष्टीचा नाश. मग आपला नाश मग शोध नविन ठिकाणी. नाहीतर आत्ता तीच अवस्था आली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माणूस आकाशातून पडला आहे असे समजणे हे माणसाच्या एक्सेप्शनलिजमचे आणखी एक उदाहरण वाटते.
अजून तरी शास्त्रीयदृष्ट्या तसे काही सिद्ध झाल्याचे ऐकिवात नाही. माणूस आफ्रिकेत उत्क्रांत झाला आणि जगभर पसरला ही सध्याची बहुमान्य थियरी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणून तर कधी कधी हा शब्द प्रयोग केलाय कारण तो नुसताच एका पुस्तकातला सिद्धांत आहे. अजून कोणी प्रूव्ह केला नाहीये त्यामुळे खरा होत नाही आणि होईल असे पण वाटत नाही. फक्त ज्या पद्धतीत जगभर मारामाऱ्या चालू आहेत ते बघता नविन राहण्यालायक जग शोधणे अगदीच निरर्थक ठरणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1.chariots of God ,
2.पृथ्वीवर माणूस उपरा,
3.बर्म्युडा ट्रँगल,
4.ओशन ट्रँगल (किंवा जपानमधला डेविल्स सी),
5. नॅट जिओ वगैरेंचं ancient aliens

इतर :-
हरवून सापडलेली द्वारका सदृश नगरी,जपानजवळचे सुबक महाकाय अवशेष, इजिप्शियन पिरॅमिड , दक्षिण अमेरिकेतील अचाट/गूढ अवशेष, यास्का लाइन्स, मंगळावर एका खगोल वैज्ञानिकाला दुर्बिणीच्या घोटाळ्यामुळे चुकून दिसलेल्या कालवेसदृश रेषा, त्यातले मानवी स्वभावाला शोभतील असे त्याचे निष्कर्ष, इतर अनेकानेक अनुत्तरित गोष्टी, अगदि हजारो लाखो लोककथांचे जडजंजाळ जाळे, विचार करण्याची मानवाची मूलभूत/स्वाभाविक शैली,विश्वास्/श्रद्धा ठेवण्याची जबरदस्त प्रेरणा, (freakonomics मध्ये दाखवलेली intuitive विरुद्ध तार्किकता. कोणाचे पारडे जड?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माणूस(च फक्त) आकाशातून पडला या थिअरीला फारसा अर्थ नाही.

माणसाच्या शरीरातल्या हाडांच्या सांगाड्यातले स्ट्रक्चर आणि इतर प्राण्यांच्या हाडांचे स्ट्रक्चर मूलतः समान असते. त्यांच्या भागांचे परस्परांशी असलेले प्रमाण वेगवेगळे असते. खालच्या आकृतीतील वटवाघुळाचे पंख, उंदराचा पुढचा पाय पाहिले तर ते माणसाच्या हातापेक्षा फार वेगळे नाहीत. तेव्हा आकाशातून पडले असतील तर सगळेच पृष्ठवंशीय प्राणी पडले असतील.

सगळ्या प्राण्यांच्या शारीर क्रिया सुद्धा ऑलमोस्ट सेम आहेत. मग माणूसच अवकाशातून आला असे कसे असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आम्हीही कदाचित असेच आलो असू.

'आम्ही अंत्राळनिवासी | आलो याचि कारणासी |
बोलले जे कॉमिकविषीं | साच भावे वर्ताया |'

-बट्टमण्णाचार्य.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं