वाचक-मैत्रिणी....

वाचक बायका एकत्र जमल्या की काय करतात..... एक स्वानुभव!

नोव्हेंबर ’०९ महिन्याच्या ‘वाचकघर’चा विषय होता ‘माझा आवडता पुरूष लेखक’. आधीपासून ठरवूनही निम्म्याजणी काहीही तयारी न करता आल्या. पण ख्रर्‍याखुर्‍या वाचक असल्याने आपल्या स्मरणशक्तीच्या आधारे आवडत्या पुरूष लेखकाविषयी भरभरून बोलल्या.

राधिका व. पु. काळेंविषयी तर हर्षदा पु .ल. देशपांडे ह्यांच्या दोन पुस्तकांविषयी बोलली. ‘एक शून्य मी’ आणि ‘दाद’ ह्या दोन पुस्तकांच्या वाचनाने आपली मराठी भाषेची जाण समृध्द झाली हे हर्षदाने आवर्जून सांगितले.

दीपालीने ग. दि. मांच्या काव्याचा व्यवस्थित अभ्यास केल्याचे तिच्या लिखाणातून जाणवले. संत-साहित्याप्रमाणे आपल्या जगण्याचे सार ग. दि. मांनी काव्यरूपाने आपल्यापुढे किती सोपेपणाने मांडले आहे असे दीपालीला मनापासून वाटले.

मंगलाने ग. दि. मांच्याच एकंदर साहित्याविषयी लिखाण (नेहमीप्रमाणे) केले होते.

मीरा भैरप्पांविषयी बोलली. त्यांच्या निरनिराळ्या कादंबर्‍यांतील स्त्री-चित्रणाने आणि ‘वंशवृक्ष’ कादंबरी-वाचनाने आपल्याला कसे अस्वस्थ केले हे तिने सांगितले.

चित्राला आपल्याच पिढीतील मिलिंद बोकीलांचे लिखाण आवडते. ‘एकम’ ची साठी पार केलेली नायिका आणि ‘शाळा’ मधील नववीच्या वर्गातील विद्यार्थी अशा दोन टोकांच्या वयोगटांतील व्यक्तींच्या भावजीवनच्या चित्रणाने आपण भारावून गेलो असे ती म्हणाली.

रेवतीला विजय पाडळकरांचे समीक्षात्मक लिखाण आवडते. पाडळकरांनी आपल्याला आवडलेली पुस्तके आणि चित्रपट ह्यांविषयी केलेल्या लिखाणाने आपल्या वाचनविषयक जाणीवा स्पष्ट झाल्या असे ती म्हणाली.

गौरीने वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळे पुरूष लेखक का आवडत असत ते सांगितले. साने गुरूजी, प्रकाश संत हे जसे आवडतात तसेच अनिल अवचट हे आवडते पुरूष लेखक असल्याचे सांगितले. ह्यावेळी तिने बर्‍याच दिवसांनी छान लिहून आणले होते. सुरूवातीलाच `माझा आवडता पुरूष लेखक' ह्या विषयाने आपल्या मनात काही शंका उपस्थित झाल्याचे सांगितले. ती म्हणाली, `सच्च्या वाचकाची वाचनाची आवड लिंगाधारित असते का? स्त्री किंवा पुरूष असल्याने त्यांच्या लिखाणात, त्यांच्या दृष्टिकोनात काही फरक असतो का? मग मला नेमकं काय आवडतं? आपल्या प्रकृतीधर्माला साजेसं, भावविश्वाशी जुळणारं आणि अंगावर न येणारं लिखाण मला आवडतं...' असं ती म्हणाली.

सगळ्याच वाचक-मैत्रिणींचा ‘वाचन’ हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने आपल्या आवडत्या पुरूष लेखकाचे लिखाण त्यांनी किती मनापासून वाचले आहे हेच अधोरेखित झाले.

१७.११.२००९

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (3 votes)

प्रतिक्रिया

Smile यानिमित्ताने ऐसीकरांनीपण आपला आवडता लेखक/लेखिका कोण आणि का हे सांगावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गदिमा .... खरच __/\__

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातून तुमच्या कुठच्या मैत्रिणीला काय आवडलं हे कळलं. पण त्यांनी नक्की काय कारणं दिली, लेखक वा लेखिकेच्या शैलीची कुठची ठळक वैशिष्ट्यं जाणवली, वर्णन/मांडणी/व्यक्तिचित्रण/भाषा यापैकी नक्की काय भावलं याबद्दल काही शब्द लिहिता येतील का?

उदाहरणार्थ - 'पाडळकरांनी आपल्याला आवडलेली पुस्तके आणि चित्रपट ह्यांविषयी केलेल्या लिखाणाने आपल्या वाचनविषयक जाणीवा स्पष्ट झाल्या असे ती म्हणाली.' हे ठीकच. पण त्यांनी कुठच्या पुस्तक वा सिनेमाविषयी लिहिलं आहे, किंवा सामान्य वाचकाला न जाणवणारं नक्की कसं उलगडून दाखवलं आहे वगैरे तपशील आलेले आवडतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टायटल बदलून काहि होतंय का ते बघताय का? आणि गेल्या वेळेला ऋषिकेशने विचारलेला मुद्दा वरती राजेशने विचारलाय. त्याला हे वाचायला मीच सांगतो !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

मला तेव्हाही एक प्रश्न पडला होता. आता तुम्ही रिपीट टेलिकाष्ट लावलाय तर विचारून टाकतो.

"माझा आवडता पुरूष लेखक" यावर जी चर्चा झाली त्यात लेखक पुरुष असण्याचा काय संबंध?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

लेखकाचं अपील, भिन्नलिंगी असल्यावर कदाचित अनेकमितीय होत असावं. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचा प्रश्न बरोबरच आहे.
पण मागे एकदा सहज विचार करता करता आवडते लेखक गोळा करत गेले, तर त्यात फटाफट ५ बायका निघाल्या होत्या. तेव्हा मला हा प्रश्न जोरात पडला होता, की खरंच लिंगभावाचा काही संबंध असतो का इथे? आता आवडता लेखक कोण, असा विचार करतेय, तर त्यात पुरुषच आहेत. म्हणजे हे आपल्या त्या त्या वयातल्या शहाणपणावर आणि अनुभवविश्वावर अवलंबून असणार.
काय की..
मला हे इतकं साधंसरळ वाटत नाहीय पण...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अतिशय भारावून टाकणारा लेख. टाकणारं शीर्षक.
पुढील शीर्षक कधी टाकताय? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे बाप रे!
माफ करा, घोडचूकच झाली म्हणायची! याआधी हा लेख इथे दिलाय हे लक्षातच आलं नाही, आणि अनवधानाने वेगळ्या शीर्षकाखाली तो पुन्हा दिला गेला!अशी घोडचूक पुन्हा होणे नाही!
पण,
त्यानिमित्ताने ज्यांनी तो आधी वाचला नव्हता त्यांच्याकडून तो वाचला जाऊन काही चर्चात्मक मुद्दे उपस्थित केले गेले, हे एक बरेच झाले म्हणायचे!
So.. आता एक नवीनच लेख लिहावा लागणार त्या मुद्द्यांना धरून!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0