हुश्श.........!!!

"कह दो इन सब फूलों को, युनिफॉर्म में आये।
पतंगो को भी कह दो, साथ में दप्तर लाये ।...
मनचाहे ढंगसे मछलियों को नही तैरना है ।
स्विमिंगपूल के सब नियमोंका पालन करना है ।...
इन झरनो को समझाओ बहे एकदम सीधे ।
कोयल को भी कह दो, भरी दोपहर में न गायें ।..."

--- हमारी शिक्षणपध्दती - श्रीकृष्ण दवे - (विमुक्त शिक्षा - जानेवारी२००१)

माझ्या लेकीला (तेव्हा ती आठवीत होती) ह्या ओळी वाचून दाखवल्या आणि म्हटलं, ‘हे कशाविषयी लिहिलेलं आहे?’
तिने झटक्यात उत्तर दिलं, ‘शाळा! असला वेडपटपणा शाळेतच चालतो!’
मी पुढे विचारलं, ‘तुला शाळा आवडत नाही का?’
तेव्हा म्हणाली, ‘शाळेतला अभ्यास सोडून बाकी सर्वकाही मला आवडतं!’

तिची शाळा संपली अन आम्ही सुटकेचा नि:श्वास टाकला!!!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

एकदम सुरेख कविता!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.
बाकी व्यावसायिक जीवनातल्या नियमांचा/शिस्तीचा सराव म्हणून शाळेत असे नियम असतात अन्यथा काही कारण नाही; त्यामुळे आम्ही हुश्श रिटायरमेंटनंतरच म्हणणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाहीतरी 'मी आणि माझे शिक्षण यांच्यामध्ये माझी शाळा आली' असे कुणीसे म्हटले आहेच...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

मस्तच!
यावर लेकीच्या दृष्टीकोनातूनही अधिक विस्ताराने वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लहानपणी आम्ही शाळेला जायचो हाच शाळेवर उपकार असे. ८ वी ते १० वी पर्यंत फक्त एका विषयाचा - इतिहासाचा - गृहपाठ करावा लागला होता. तो मी इतक्या बद्धडपणे करत असे कि सर म्हणायचे - तुला ६० पैकी फार तर फार ५८ मार्क मिळतील. त्यावर मी 'हा गृहपाठ करायचा नसेल तर मला ३० देखिल चालतील' असे म्हणालेलो नि ते जाम चिडलेले.
११ वी,१२, इंजि, एम बी ए ला मिनिमम अटेंड्न्स मीट करणे इतकाच हेतू असे. त्यातही प्रचंड प्रोक्सीज लावलेल्या. आज जे शिकलो ते तरी का शिकलो असे वाटते. नोकरी चालू तेव्हा बंधनाच्या जाचाचा प्रचंड त्रास झाला. आजही ती भावना गेलेली नाही.

परवाच मुलाचे शाळेत हॉलिडे होमवर्क प्रदर्शन झाले. ते मॉडेल, चित्रे बनवण्यात त्याला काहीच रस नव्हता. आईच सगळं करत होती. तो अगदी जवळ देखिल बसला नाही. ७ ला उठणे, ७.३० ला व्हॅनमधे, ३.४५ ला घरी, मग ७ पैकी किमान २-३ विषयांचे १-२ तास तरी होमवर्क, टीवी, मोबाईल, टॅब, .... प्रांगणात जायला, कोणासोबत खेळायला वेळ न के बराबर. ती जाडजूड बॅग. मला तरी बघवत नाही.

शाळेनंतर, नाहीतर मग कॉलेजनंतर, नाहीतर मग रिटायरमेंटनंतर हुश्श म्हणायला मिळणे हा केवळ कल्पनाविलास आहे. एक दिवस रजा टाकली तरी सकाळी सकाळी किमान मेसेज लिहावा लागतो. अलिकडे आयुष्य जगण्यासाठीची कामं इतकी बंधनकारक झाली आहेत नि इतकी वाढली आहेत कि मरणापूर्वीचा एक तास "हुश्श्य अवर" म्हणून पाळायची प्रथा चालू होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

नाहीतर मग रिटायरमेंटनंतर हुश्श म्हणायला मिळणे हा केवळ कल्पनाविलास आहे

+१.
रिटायरमेन्ट एक मृगजळच वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निसर्गाला शीस्त लावण्याचे धाडस करणारी कविता …….
कविता वाचून मला कोल्हापूर मधील डॉ. लीला पाटील यांची सृजन आनंद शाळा आठवली.
क्रमिक पुस्तकातील अभ्यासाबरोबर सभोवतालच्या जगाचे भान देणारी,त्यामधूनच नकळत जीवन मुल्ये शिकवणारी आणि प्रत्येक मुलातील वेगळेपण जोपासणारी……!!
कोणतेही जाचक नियम नसलेली शिस्तबद्ध शाळा.
माझी लेक या शाळेत शिकली आहे.
शाळेच्या वार्षिक परीक्षेच्या निकालादिवशी डॉ. लीला पाटील मुलांशी बोलतांना सांगत ……
" आज माझ्या शाळेतील प्रत्येक मुलाचा पहिला नंबर आला आहे …… कोणी अभ्यासात,कोणी खेळात, कोणी गाण्यात,कोणी चित्रकलेत,कोणी गोष्टी सांगण्यात,कोणी दंगा करण्यातसुद्धा…….!"
हे ऐकल्यावर त्या बालमनात द्वेष,स्पर्धा ,इर्षा का निर्माण होईल आणि स्वतः बद्दल गंड हि !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

" आज माझ्या शाळेतील प्रत्येक मुलाचा पहिला नंबर आला आहे …… कोणी अभ्यासात,कोणी खेळात, कोणी गाण्यात,कोणी चित्रकलेत,कोणी गोष्टी सांगण्यात,कोणी दंगा करण्यातसुद्धा…….!"
हे ऐकल्यावर त्या बालमनात द्वेष,स्पर्धा ,इर्षा का निर्माण होईल आणि स्वतः बद्दल गंड हि !

मस्त!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0