निळा पक्षी

हा लेखदेखील पूर्वी लिहीलेला होता. इथे पहील्यांदा टाकते आहे.
___________________________

साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत
पण अजूनही निळा मखमली पक्षी दिसायचं नाव नव्हतं. परंतु त्या पक्षाची आस, त्याचं तिच्या मनावरचं गारुड तसूभरही कमी झालं नव्हतं. लहानपणी निळ्या मखमली पक्षाला भेटण्याचं जितकं वेड होतं त्याहीपेक्षा जास्त वेड आता तिला लागलं होतं. या पक्षाचं गुपित नक्की केव्हा तिने ऐकलं तिलाही सांगता येणार नाही कारण ते तसं कोणी सांगीतलच नव्हतं तिला. ते तिला मनोमन आकळलं होतं. तिला जोपर्यंत आठवत होतं तोपर्यंत तिला त्याला भेटण्याच्या ध्यासानी झापटलेलं होतं हेच आठवतं होतं. लहानपणी वाटलं तरुणपणी भेटेल, तरुणपणी वाटलं आता भेटेल - मग भेटेल असं करता करता आता बरच वय झालं होतं. ती मात्र त्याच निष्ठेने वाट पहात होती.
आतापर्यंतच्या आयुष्यात तिने बरच काही पचवलं होतं. भलेबुरे अनुभव घेतले होते. खूप चांगल्या लोकांनाही ती भेटली होती. त्यातलीच एक जी प्रत्यक्ष निळ्या मखमली पक्षाला भेटून आलेली. तिला हिनी विचारलं होतं "कसा असतो तो पक्षी दिसायला?" आणि उत्तर मिळालं होतं -
"खूप, अतिशय, अतोनात सुंदर, अद्भुत!
त्याची निळाई पहाताना असं वाटतं शरीराला हजारो डोळे फुटावे आणि त्याचं लावण्य उपभोगावं
त्याचं मान वेळावणं, पिसांत चोच खुपसणं, परत लाडीक कटाक्ष टाकणं, अंग फुलवणं सारं मनात साठवून घेण्यास एक जन्म अपुरा पडतो.
त्याची आर्त शीळ मनात अनामिक हळव्या आठवणींच्या लाटा घेऊन येते ज्या की शब्दांत व्यक्त करता येत नाही.
फार अल्प काळ तो दर्शन देतो मात्र त्याच्या अस्तित्वाचे मोहक पडसाद कायमचे हृदयात उमटवून जातो."
मग हिनी विचारलं "कशावरून तो तोच पक्षी आहे हे ओळखायचं?"
उत्तर मिळालं " त्याच्या अस्तित्वाइतकेच, त्याच्या दर्शनाचे पडसाद त्याची ओळख आहेत. तो उडून गेल्यानंतर प्रत्येक दिवशी तुमचं हृदय त्याच्या स्मृतीकिरणांनी जणू कोमल कमळ बनून हळूहळू उमलतं. तुमच्या आत्म्याला त्याचा मंजूळ कलरव वेढून रहातो आणि आत्मा अधिक प्रकाशमान होतो. मनात येणारी अनाठायी विचारवादळं स्तब्ध होऊ लागतात. शीतल शांती मिळू लागते."
तिला नीटसं कळलं नाही नक्की काय आणि का होतं ते पण तिची उत्कंठा अधिकच वाढली. आणि जरी पाय दुखत असले, हाडे कुरकुरत असली , सांधे मी मी म्हणत असले तरी ती परत वाट पाहू लागली, त्याच तन्मयतेनी. तिला एक दिवस तो पक्षी नक्की भेटणार होता.

field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

प्रतिक्रिया

कथेवर (अनुवादित) इंग्लिश कथा-शैलीचा परिणाम जाणवतो, म्हणजे इंग्लिश पण अनुवादित पुस्तकात ही शैली अनुभवली आहे. पण बाज वेगळा वाटला म्हणून आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विंदांची निळा पक्षी ही कविता आठवली. 'काही केल्या काही केल्या निळा पक्षी जात नाही'

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मतकरींची एक अशा स्वरूपाची कथा आठवली आणि

त्याची नीळाई पहाताना असं वाटतं शरीराला हजारो डोळे फुटावे आणि त्याचं लावण्य उपभोगावं

ह्यावरून जीए आठवले!
मस्त मांडलंय. +१
एक कुरकुर - तेवढं नीळाचं निळा झालं तर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदल केलेला आहे. धन्यवाद Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंटरेस्टींग!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडली, मस्त कथा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

छान! सारिका, तुम्ही ललित अधिकाधिक लिहावं असं सुचवेन. शब्दयोजना आणि एकूणच लेखनाचा बाज युनिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला वाटलं निळोंबांवर काहीतरी लेख असेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

वॉव.
waiting for Godot ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

वेडेपणा जनरली वयाप्रमाणे जातो. टिकला तर त्यावर गोष्ट लिहायलाच हवी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वेडेपणा जनरली वयाप्रमाणे जातो.

आमच्या पिताश्रींचे एक आवडते वाक्य आठवले- 'वय वाढेल तशी हाडं ठिसूळ आणि मतं कठीण होतात'. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निळा पिरॅमीड दिसला का पण
खूण तयाची एकच साधी
निळा पिरॅमीड दिसतो ज्याला
तोच पिरॅमीड होतो आधी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वा! क्या बात है!!! किती सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आवडला. लेखही व लिहायची स्टाईलही.

त्याच्या अस्तित्वाइतकेच, त्याच्या दर्शनाचे पडसाद त्याची ओळख आहेत. तो उडून गेल्यानंतर प्रत्येक दिवशी तुमचं हृदय त्याच्या स्मृतीकिरणांनी जणू कोमल कमळ बनून हळूहळू उमलतं. तुमच्या आत्म्याला त्याचा मंजूळ कलरव वेढून रहातो आणि आत्मा अधिक प्रकाशमान होतो. मनात येणारी अनाठायी विचारवादळं स्तब्ध होऊ लागतात. शीतल शांती मिळू लागते."

एखादा सश्रद्ध माणूस, हे परमेश्वराचे वर्णन आहे असेही म्हणेल.

एखादा संघीय, हे मोदींचे वर्णन आहे असे म्हणेल.

एखादा काँगी, हे ने. गां. परिवाराचे वर्णन आहे असे म्हणेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राघांनी अतिशय मौल्यवान सूचना केल्या. त्या सूचनांचा उपयोग मला व अन्य सर्वांनाच कोणताही लेख लिहीताना होऊ शकतो. तो व्हावा या हेतूने त्यांनी लिहीलेली खरड इथे शेअर करते आहे. आय होप ही डझन्ट माईन्ड. -

निळा पक्षी लेख फारच थोडक्यात आटपल्यासारखा वाटला. निळ्या पक्षाचं आकर्षण, वाट बघणं आणि त्याबद्दलची खात्री यांचे उल्लेखच आलेले आहेत. त्यामुळे केवळ एकरेषीय कथा होते. मला वाटतं यात खूपच इतर पदर आलेले शोभून दिसतील. उदाहरणार्थ, तिला जी आस आहे, ती न घेता जगणारे तिने पाहिले आहेत का? त्यांचं काय वाईट झालं, मलाच का हा शाप, असे प्रश्न ती स्वतःला विचारते का? त्यांच्यापैकी तिला कोणी त्या पक्ष्याच्या मागे धावून आयुष्य कसं बरबाद होतं हे सांगितलं आहे का? तिचे आईवडील आजोबा वगैरे कोणा जीवलगांपैकी तिला त्या पक्ष्याबद्दल काय सांगितलेलं आहे? निळा पक्षी दिसूनही न हेलावलेले लोक असतात का?
फॅंड्रीमध्ये जब्या त्या चिमणीच्या मागे असतो. ती हुलकावण्या देते. इथे हा पक्षी हुलकावण्या देतो का? अमुक ठिकाणी काहीतरी निळसर दिसलं म्हणून ती कधी धावली आहे का? निदान निळी फडफड तरी तिच्या कानी पडली आहे का? जब्याला ती चिमणी काही उपयोगासाठी हवी होती. हिला तसं काही आहे का?...
अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांतून या जर्मची एक चांगली कथा होऊ शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाईव्ह प्रश्न: कलरव म्हणजे गाणे का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कलरव म्ह. पक्ष्यांचा आवाज इतकं नक्की. त्यातही बहुधा हंसाचा आवाज असावासे वाटते, उदा. रघुनाथपंडित.

'कलकल कलहंसे फार केला सुटाया
फडफड निजपक्षी दाविले की उडाया
नृपतिस मणिबंधी टोचितां होय चंचू
धरि सुदृढ जया तो, काय सोडीत पंचू' ||

'त्यातील एक कलहंस तटी निजेला', इ.इ.

कारण मोराच्या आवाजाला केकारव असेही म्हटल्याचे वाचल्यागत आठवते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रव म्हणजे आवाज. कलरव बहुतेक पक्षाचा कलकल आवाज असावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्स, एग्जॅक्टलि. तेच ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेख वाचतना वाचकाला पण त्या भावविश्वात घेउन जाण्याची लेखनाची शैली आवडली.
तरी लेख अधुरा अधुरा वाटतो......!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Smile मान्य आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
नक्की सुधारणा करेन. वरती राघांनी अतिशय मौलिक मार्गदर्शन केलेल आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

व्यक्तिगत मत : मला लेख अजिबात अपूर्ण किंवा त्रोटक वाटला नाही ….
लेख वाचताना प्रत्येकाला आपल्या मनातले असे निळे पक्षी आठवतात हेच ह्या लेखाचे यश !! जर जास्ती details दिले असते तर कदाचित प्रत्येकजण relate करू शकला असताच असे नाही !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

धन्यवाद सिद्धी. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0