आज बाप्पा जाणार

आज बाप्पा जाणार. १० दिवस कसे निघुन गेले कळलेही नाही. सकाळी लवकर आटपुन जवळचा मंडळांचे बाप्पा पाहण्यासाठी मी निघालो. ३-४ वर्षापासुन मी नेमका शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचा दर्शनाला जात असे. शेवटचा दिवशी गर्दी नसे दर्शनाला त्यामुळे बाप्पाला मनसोक्त डोळे भरुन पाहता येई. त्याच्या डोळ्यातळे भाव, मुर्तीकारा ची मेहनत ध्यानात येई. प्रत्येक मंडळातल्या बाप्पाला निरोप देताना वाटे की आपले मित्रच आपल्याला सोडुन जात आहेत. काही बसलेले, काही उभे असलेले, काही उंच तर काही जाडू. दुपार होईपर्यंत वेगवेगळ्या मंडळांचे बाप्पा पाहील्यावर मी घरी निघलो. प्रत्येक मंडळात बाप्पाचा निरोपाची तयारी सुरु केली होती. माहीत नाही पण एक वेगळीच उदासीनता होती वातावरणात. जेवण झाल्यावर नेहमी प्रमाणे आम्ही टीव्ही चालू करुन बाप्पाचा निरोपाचे क्रार्यक्रम पाहु लागलो. मुंबईचा वेगवेगळया मंडळांचे बाप्पा निघाले होते. किती वेगवेगळी ती रुपे, किती वेगवेगळे ते भाव. माझा सारखा वर्षातुन जेमतेम २-३ वेळाच देवाचा पाया पडणारा, कधीही स्वतःहुन एकटा मंदिरात न जाणारा, त्या दिवशी येवढा दुखी का होत हे कळत नव्हतं. ती वेगवेगळी रुपे पाहात असतांना, बाप्पाचा वेगवेगळया गोष्टी ऐकतांना कधी वेळ निघुन गेला कळलेच नाही. ७:३०-८ वाजले होते. आमचा मंडळाचे बाप्पा ही निघाले होते. मीही बाप्पा चा दर्शनाला गेलो. दरवषी प्रमाणे हात जोडुन बाप्पा चे ते रुप डोळ्यात साठवू लागलो. नेहमी प्रमाणे स्वतः साठी काहीच मागीतले नव्हते. फक्त एकच मागने होते बाप्पा कडे की "मी कदाचीत नसेन तुझ्या इतर भक्ता सारखा दररोज तुझी पुजा करणारा, दररोज तुझी आठवण काढणारा ,नसेन तुझ्यासाठी उपवास करणारा पण जमले तर थांब, जाऊ नकोस लगेच. मी आग्रह नाही करणार पण तुझी मायेची सावली सतत सगळ्यांवर ठेव" जेव्हा डोळे उघडळे तेव्हा बाप्पा बराच पुढे गेला होता, पण पुढचा वर्षी लवकर येण्याचा विश्वास देउन...गणपती बाप्पा मोरया...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

लेखातील भावना मस्त आहेत!
पण शुद्धलेखनाचे खडे बोचले. तेवढं जरा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ अगदी हेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ऐसीवर स्वागत!

बाकी मत अस्वल यांच्या प्रमाणेच
सुरूवातीला अधिक वेळ घेऊन आपलेच लेखन पुन्हा वाचून व त्यातल्या मुद्द्यांना आकार देऊन लेखन केले तर जरा अधिक खुलावे

पुढिल लेखनासाठी शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लहानांना (वय ७ किंवा कमी) गणपती फार आवडतो. काय माहीत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कारण त्याच्याशी असोशिएटेड खादाडी बरीच असते, शिवाय तो मजेशीर देव आहे- त्याचं रूपच हिलेरियस आहे, शंकरविष्णू वगैरे कसे 'स्टिफ अपर लिप' वाले देव आहेत, पोरं जरा दूरच असतात त्यांपासून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शिवाय गणेशाच्या रुपाला सादरच असं केलं जातं की बालकांना तो आवडलाच पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या लेकाला माय फ्रेंड गणेशा पाहिल्यापासून गणपती खूप आवडत असे. एकदा त्याला तुळशीबागेतली मोठ्ठी मूर्ती दाखवली होता ता वेळी मोय्याच्या आशीर्वाद देणार्‍या हातावर हाय ५ द्यायाची त्याची फार इच्छा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि सुटलेल्या पोटामुळे एकदम रियलिष्टिक वाटतो. लहानपणी आसपास बरेचसे तुंदिलतनूच होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मनस्कोत म्हणजे कुठे ? असं वाटल. मग नीट वाचल्यावर मनसोक्त आहे हे कळलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
जमलं तर थांबा म्हणून डोळे मिटून घेतल्यावर पाव्हणा थांबणारंय व्हय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! शुद्ध लेखन सुधारल्यानंतर आता छान झालाय लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज बाप्पा जाणार. १० दिवस कसे निघुन गेले कळलेही नाही. सकाळी लवकर आटपुन जवळचा मंडळांचे बाप्पा पाहण्यासाठी मी निघालो. ३-४ वर्षापासुन मी नेमका शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचा दर्शनाला जात असे. शेवटचा दिवशी गर्दी नसे दर्शनाला त्यामुळे बाप्पाला मनसोक्त डोळे भरुन पाहता येई. त्याच्या डोळ्यातळे भाव, मुर्तीकारा ची मेहनत ध्यानात येई. प्रत्येक मंडळातल्या बाप्पाला निरोप देताना वाटे की आपले मित्रच आपल्याला सोडुन जात आहेत. काही बसलेले, काही उभे असलेले, काही उंच तर काही जाडू. दुपार होईपर्यंत वेगवेगळ्या मंडळांचे बाप्पा पाहील्यावर मी घरी निलो. प्रत्येक मंडळात बाप्पाचा निरोपाची तयारी सुरु केली होती. माहीत नाही पण एक वेगळीच उदासीनता होती वातावरणात. जेवण झाल्यावर नेहमी प्रमाणे आम्ही टीव्ही चालू करुन बाप्पाचा निरोपाचे क्रार्यक्रम पाहु लागलो. मुंबईचा वेगवेगळया मंडळांचे बाप्पा निघाले होते. किती वेगवेगळी ती रुपे, किती वेगवेगळे ते भाव. माझा सारखा वर्षातुन जेमतेम २-३ वेळाच देवाचा पाया पडणारा, कधीही स्वतःहुन एकटा मंदिरात न जाणारा, त्या दिवशी येवढा दुखी का होत हे कळत नव्हतं. ती वेगवेगळी रुपे पाहात असतांना, बाप्पाचा वेगवेगळया गोष्टी ऐकतांना कधी वेळ निघुन गेला कळलेच नाही. ७:३०-८ वाजले होते. आमचा मंडळाचे बाप्पा ही निघाले होते. मीही बाप्पा चा दर्शनाला गेलो. दरवषी प्रमाणे हात जोडुन बाप्पा चे ते रुप डोळ्यात साठवू लागलो. नेहमी प्रमाणे स्वतः साठी काहीच मागीतले नव्हते. फक्त एकच मागने होते बाप्पा कडे की "मी कदाचीत नसेन तुझ्या इतर भक्ता सारखा दररोज तुझी पुजा करणारा, दररोज तुझी आठवण काढणारा ,नसेन तुझ्यासाठी उपवास करणारा पण जमले तर थांब, जाऊ नकोस लगेच. मी आग्रह नाही करणार पण तुझी मायेची सावली सतत सगळ्यांवर ठेव" जेव्हा डोळे उघडळे तेव्हा बाप्पा बराच पुढे गेला होता, पण पुढचा वर्षी लवकर येण्याचा विश्वास देउन...गणपती बाप्पा मोरया...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

शुद्धलेखनाच्या मुद्द्यावरून सगळे जण रोहित जाधव ह्याच आयडी च्या मागे का लागले आहेत मला कळत नाही. येथे पुष्कळजण लिहितात त्याहून त्यांचे शुद्धलेखन फार वाईट आहे असे अजिबात दिसत नाही. इतरांचे खपते तर मग ह्यांचे का नाही?

काही दिवसांपूर्वी ह्या धाग्यात शुद्धलेखनाचे तर भरपूर खून केलेच होते पण त्यावर कळस म्हणून त्यामध्ये भरपूर इंग्रजी शब्दांची अनावश्यक पेरणी केली होती आणि तीहि अशुद्ध म्हणता येईल अशी. उदा. डीस्टर्ब, फ़ीलींग, थींकींग, अनकंडीशनल अनप्रीज्युडाइज्ड, शेअरींग, क्लॅरीटी, ओरीजनल. (हा केवळ एक परिच्छेद, पण वानगीदाखल पुरेसा वाटतो.)

असे लिहिणे टाळावे असा मैत्रीपूर्ण सल्ला द्यायला गेलो तर धागाकर्त्याने आमच्यासमोर किरण नगरकर, विलास सारंग आणि आणखीन कोणाकोणाच्या लेखनाची भेंडोळी उलगडून टाकली. त्यांचा संदर्भ समजला नाही पण आपले लिखाण कसे योग्य मार्गानेच झालेले आहे असे दाखविण्याचा तो प्रयत्न वाटला.

असले अक्करमासे लिखाण जर आपण खपवून घेऊ शकतो तर रोहित जाधव ह्यांनीच काय घोडे मारले आहे कळत नाही. जो काय निकष लावायचा तो सर्वांना एकच लावा. Show me the man and I will show you the rule असे नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अक्करमासे? कोल्हटकरकाका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कोल्हटकरांशी सहमत आहे. 'अक्करमासे' चा मोल्सवर्थी अर्थ देऊन प्रश्न विचारण्यात काही हशील आहे असे वाटत नाही.

अन एकूणच प्रमाणभाषा काय, शुद्धलेखन काय, जरा नवीन आयडी बुजतील असे वातावरण निर्माण करण्यात यश मिळाले आहे खरे. आता याला कुणी 'लिंग्विस्टिक अ‍ॅनार्कि' म्हटले की भरून पावलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Smile
"अरविंद कोल्हटकर " ह्या आय डी ला सदस्यनामाला असं किंचित वैतागलेल्या टोनमध्ये सुरात बोलताना पाहणं दुर्मिळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

+१
कोल्हटकरांशी सहमत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मराठि मध्ये टाईप करायची माझी ही पहिलीच वेळ होती. शुद्धलेखन करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट़ंकलेखना च्या सहाय्यासाठी http://www.aisiakshare.com/phonetic_help

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वर आलेला 'अक्करमासा' ह शब्द मोल्सवर्थने 'अकरमाशी' असा दिला असून त्याचे १) रुपया २) अकरा महिने गर्भ पोटात बाळगणारी (म्हैस), ३) अनौरस (ग्राम्य भाषेत) आणि ४) ११ महिन्याच्या पगारात बारा महिने काम करण्याचा करार असे चार अर्थ दिले आहेत. आपटे मराठी शब्दरत्नाकरामध्ये ह्यांपैकी ३ आणि ४ हे अर्थ दर्शविले आहेत.

आधार आठवत नाही पण मी वाचल्याप्रमाणे ह्यातील शिवीसारख्या वापराचा उगम १२ मासे (माष - उडीद) = १ तोळा ह्या जुन्या सोनेचांदी जोखण्याच्या कोष्टकाशी संबंधित आहे. ११ मासे म्हणजे १२ माशांच्या पूर्ण तोळ्याहून कमी. म्हणून पूर्ण शुद्ध बीजाचा नाही, अनौरस, जारकर्मातून जन्मलेला इत्यादि, तो अकरमासा/अक्करमासा अशी उत्पत्ति आहे आणि ती पटण्यासारखी वाटते.

'मुंबईचा मार्गदर्शक अर्थात मुंबईचा मित्र' असे १९२५ साली छापलेले आणि पिंपरूड (खानदेशामध्ये फैजपूरजवळ) येथे राहणार्‍या जयराम रामचंद्र चौधरी नावाच्या गृहस्थांनी लिहिलेले ९ पाने जाहिरातींसकट १४४ पानांचे पुस्तक माझ्याजवळ आहे. खानदेशातील लहानसहान गावांमधून मुंबई बघायला येणार्‍यांना मार्गदर्शक अशा हेतूने हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. अतिशय मनोरंजक अशा जुन्या माहितीने भरलेल्या ह्या पुस्तकामध्ये सोन्याचांदीचे हे कोष्टक दाखविले आहे:

(नाजूक झालेली प्रकृति म्हणजे 'तोळामासा' प्रकृति ह्या शब्दप्रयोगाच्या मुळाशी हेच कोष्टक आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून Baker's Dozen हा शब्दप्रयोग आठवला. जो माणूस वाजवीपेक्षा जास्त शुद्ध बीजाचा आहे त्याला 'तेरमासा' अशी शिवी देता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

जो माणूस वाजवीपेक्षा जास्त शुद्ध बीजाचा आहे त्याला 'तेरमासा' अशी शिवी देता येईल.

वाजवीपेक्षा जास्त शुद्ध म्हणजे? तेरमासा हे वजन चुकीचे होईल न?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाजवीपेक्षा जास्त शुद्ध म्हणजे?

उच्चभ्रू असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

येस. ब्लडी हुच्चभ्रू असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars