Skip to main content

क्षितीज चांदणी......

फिरुनी उगवली पुन्हा लाजरी
चांदणी ती क्षितीजावरी …
डोळे तिचे भिरभिर अवघे
शोधी साजणा दूर नभी ….

सैरभैर निळ्या नयनी तिच्या
तो येण्याचे भास खेळती ….
क्षणात हसरी क्षणात बावरी
तिच्या चेहर्याचे रंग बदलती ….

हळूच लपलेला ढगा आडूनी
चांद हासला खट्याळ परी ….
लपंडाव प्रीतीचा अबोल
आभास गोड अंतरंगी ….

चंद्राच्या चांदण्यात मग
अवघी रात्र न्हाऊन निघाली ….
थरथरनाऱ्या ओठांपरी
चांदणीही शहारून गेली ….

प्रेमात आकंठ बुडुनी रात्र मग
अवघा रंग निळा झाला ….
चंदेरी झालर स्वप्नांची लेऊन
गंध श्वासात मिसळूनी गेला ….

- सोनालीका.

वामा१००-वाचनमा… Mon, 22/09/2014 - 21:36

In reply to by सोनालीका

घाबरु नका. जास्तीत जास्त लोक नाक मुरडतील अन टीका करतील. ती फाट्यावर मारायची. व आपलं सत्य (युअर ट्रुथ) ठासून सांगायचं ;), बागडायचं.

मन Mon, 15/09/2014 - 18:10

कवितेतलं नेमकं काही समजत नाही. ह्या विभागात फारसा मी डोकावत नाही.
मात्र तरीही वरील कवितेत एक गेयता जाणवली.

सोनालीका Fri, 31/10/2014 - 11:52

In reply to by सुशेगाद

खरतर खुपच घाबरत add केलेली पहिलीच कविता होती.
आपण लिहिलेलं आवडावं असा आग्रह नसलाच तरी त्यामागच्या खऱ्या भावना पोहचाव्यात एवढीच अपेक्षा असते लिहिताना.

खूप खूप धन्यवाद प्रतिक्रियेसाठी.