पोकळी

वेगळी नाहीस तू, का कोण जाणे, वाटले
सावली माझीच तू, का कोण जाणे, वाटले

व्हायचो कित्येकदा भवती तुझ्या मी कवडसे
एकदा बघशील तू का कोण जाणे वाटले

जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले

कोरडाच्या कोरडा पाऊस आला एकटा
वाटले येशील तू..का कोण जाणे..वाटले

पोकळी माझ्यातली का दरवळाया लागली?
(श्वासभर फुललीस तू का कोण जाणे वाटले)

शेवटी आलाच ऐकू हुंदका अस्पष्टसा
शेवटी चुकलीस तू! का कोण जाणे, वाटले

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

एक नंबर जमलय!!

जाग आली चांदण्यांच्या मल्मली दुलईमधे
पांघरुन गेलीस तू का कोण जाणे वाटले

या ओळी खासचं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आहा. मस्त.

काथ्याकूटमरुस्थलीमधुनिही, दिस्तो नजारा असा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मरुस्थलावरून ह्या ओळी आठवल्या

যেথা তুচ্ছ আচারের মরুবালুরাশি
বিচারের স্রোতঃপথ ফেলে নাই গ্রাসি

(जेथॉ तुच्छो आचारेर मोरुबालुराशि
बिचारेर स्रोतोपथ फेले नाय ग्राशी)
चूभूद्याघा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१.

ट्रान्सलिटरेषन परफेक्ट आहे. फक्त ते 'थॉ' ऐवजी था पाहिजे. ऑ आणि अ‍ॅ दाखवायची शेप्रेट सोय बांग्ला लिपीत नाय.

अन रेफ्रन्सही चपखल हेवेसांनल! सहीच. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खास 'चक्रपाणि टच' असणारी गझल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

खास. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्यातली लय "मोकलाया दाहि दिशा "ला होती.
(म्हणजे मोकलाया जर धड लिहिलं गेलं असतं तर जसं बनलं असतं तसं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आवडली!!! फार टचिंग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0