... ऊर्फ सुगरणीचा सल्ला: व्यायामशाळा आणि कॅलर्‍या - १

वैधानिक इशारा: वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा माणूस दिसला रे दिसला, की काही लोक विनोदाच्या अपेक्षेनं आधीच खुळचटासारखे खिदळायला लागतात. हा लेख वाचणार्‍यांत असे नग असतील, तर त्यांनी माझा नमस्कार स्वीकारून ओसरीवरूनच तातडीनं निघण्याचं करावं. 'किलो आणि कॅलर्‍या' या लेखमालेत तुम्हांला विनोद सापडणार नाही, करुणरसपरिपोष आणि कटोविकटीचा संताप तेवढा सापडेल.

ट्रॅफिकजॅममधून रखडत-पेंगत मी अंधार-उजेडाच्या सीमेवर कशीबशी ऑफीसातून घरी पोचले आहे. जिमला जाण्याचा जामानिमा घाईघाईत उरकून उपाशीपोटी जिम गाठलंय. वॉर्मअप, उड्या-धावपळ, आणि मग स्ट्रेचेस असा पुरेसा त्रास देहाला दिला आहे. धन्य धन्य वाटतंय. त्याच आनंदाच्या लाटेवर तरंगत मी अन्नविषयक सल्लागाराला भेटले आहे. हा आमचा संवाद.

सल्लागारः काय काय खाता तुम्ही रोज?

(मी आधी प्रचंड खजील होते. आपण दिवसभरातून किती वेळा चहा-कॉफ्या ढोसतो आणि काय काय चरबीयुक्त गोष्टी ओरपतो याचा हिशोब या माणसाला प्रामाणिकपणे द्यायचा या कल्पनेनं सटपटायला होतं. पण आता आलोच आहे तर होऊन जाऊ द्या, म्हणून सगळा पाढा वाचते. काय वाटेल ते वाटेल साल्याला. गेला उडत.)

सल्लागारः बरं. (बरंच काय काय कागदावर लिहितो. वेळा-बिळा घालून. वाचून स्वतःच खूश होतो.) आता आपण रोज संध्याकाळी प्रोटीनचं एक ड्रिंक घ्यायचं आहे.

('आपण' घ्यायचंय म्हणजे? मी काय 'बघा ना, अजुनी रोज रडते हो' गटातलं शिशुवर्गातलं मूल आहे का? नीट मोठ्या माणसासारखं बोलायला काय धाड भरलीय या माणसाला?)

मी: का?

सल्लागारः प्रोटीन इन्टेक कमी पडतोय आपल्याला. (पुन्हा तेच. तुझ्या दंडाच्या बेटकुळ्या लपता लपू नयेत असा टंच टीशर्ट घातलाएस बैला. आणि 'आपल्याला प्रोटीन इन्टेक कमी पडतोय काय, आँ?) म्हणून थकवा येतो.

('तू येऊन बघ एकदा पवईहून संध्याकाळी ७ वाजता ठाण्याला आणि मग येऊन नाच वेड लागल्यासारखा त्या मिलवर. मग बघू आपण कुणाला थकवा येतो ते. प्रोटीन इन्टेक कमी पडतोय म्हणे. असो. संताप आवरला पाहिजे. स्पष्टवक्तेपणा. हं, स्पष्टवक्तेपणा.)

मी: नाही, मी बाहेरून कोणतंही टॉनिक घेण्याच्या साफ विरोधात आहे. तेवढं सोडून बोला.

सल्लागारः बरं, मग तुम्ही संध्याकाळी एग इमल्शन घेत जा.

मी: एग इमल्शन म्हणजे?

सल्लागारः कच्चं अंडं घुसळायचं. त्यात दूध घालायचं. मिरपूड. मीठ. हवं तर चाटमसाला घालू आपण. आणि प्यायचं.

मी: जमणार नाही.

सल्लागारः अं?

मी: जमणार नाही.

सल्लागारः का?

मी: मला कच्चं अंडं खाऊन डचमळतं.

(वास्तविक इथे 'डचमळतं' या शब्दाहून वेगळा, पॉलिटिकली करेक्ट-सौम्य पर्याय वापरणं शक्य आहे. पण मी ठरवून तोच वापरते. ऐक साल्या.)

सल्लागारः ....

मी: .....

सल्लागारः ओके, मग आल्यावर आपण मशरूम सूप घेऊ या.

(मला 'आपण'ची सवय व्हायला लागलीय? छे छे, हे होता नये. याला वेळीच ठेचला पाहिजे.)

मी: तुम्ही 'आपण-आपण' काय म्हणताय सारखं? तुम्ही येणार आहात का माझ्या घरी रोज खायला?

(सल्लागार बावचळून माझ्याकडे बघत राहतो. आधीच व्यायामशाळेतले इन्स्ट्रक्टर्स, तिथल्या सेक्रेटरीछाप बायका, ट्रेनर्स आणि अन्नविषयक सल्लागार यांच्या चेहर्‍यावर मठ्ठपणाची एक पेश्शल छटा असते. दोन वर्षं सत्ता भोगलेला भूतपूर्व शिवसैनिक नगरसेवक किंवा ब्यूटीपार्लरमध्ये अखंड निरर्थक गॉसिपीय बडबड करणारी बाई यांच्याशीच तिची तुलना होऊ शकेल. त्यात आणि हे बावचळलेले वगैरे भाव. होपलेस.)

सल्लागारः हॅहॅहॅ...

मी: ....

सल्लागारः मग तुम्ही मशरूम सूप नाहीतर रशियन चिकन सॅलड घ्या.

मी: मी ऑफिसातून संध्याकाळी साडेसात वाजता घरी येते. त्याच्यापुढे मशरूम सूप किंवा रशियन चिकन सॅलड करायचं, तर मला ते रात्री ९ वाजता मिळेल.

सल्लागारः कुणी करून नाही का देणार?

मी: नाही.

(माझी आई 'माझी' आई आहे. श्यामची नाही. तिच्यापुढे मशरूम सूप किंवा रशियन चिकन सॅलडचा विषय जरी निघाला, तरी ती मला गेल्या साडेतीन व्यायामशाळांना वाहिलेल्या पैशांचा उद्धार करेल. पाठोपाठ पाळी माझ्या जागरणांची, माझ्या हॉटेलिंगची आणि माझ्या एकूणच आरोग्यविषयक लडिवाळ सवयींची. ती मला सूप नाहीतर सॅलड करून द्यायला बसलीय. असो. असो.)

सल्लागारः आपण उद्या भेटू या का याच वेळी?

मी: हं.

(दुसर्‍या दिवशी माझा इन्स्ट्रक्टरशी प्रेममय संवाद होतो. मी आर्मी ट्रेनिंग घेत नसून, मला जमेल तसतसा स्ट्यामिना वाढवण्याचा माझा विचार आहे हे त्याला नीट समजावून सांगूनही त्याच्या मेंदूला ते झेपत नाही. परिणामी मी जिमला रामराम ठोकते. जिममधल्या सेक्रेटरीछाप माणसाचा जवळजवळ एक दिवसाआड फोन येतो. आठव्या फोनला माझा संयम संपतो. मी भर मीटिंगमधे फोन उचलून त्याच्याशी गप्पा मारते.)

मी: 'कसंय ना, मी माझे पैसे भरून तुमच्याकडे आले होते. तुम्ही नाही. गेले पैसे वाया, तर माझे जातायत. मला यायचं असेल तेव्हा, असलं तर मी येईन. तोवर मला फोन करून परत त्रास दिलात, तर मी तुमच्या जिमवर केस करीन. कळलं?

आजतागायत तिथून परत फोन आलेला नाही. मी रोज त्या जिमच्या दारावरून फिरायला जाते. तिथला एखादा मठ्ठ बाप्या दिसला, तर त्याला गोड स्माइलही देते. एग इमल्शन, रशियन चिकन सॅलड, मशरूम सूप आणि प्रोटीन इन्टेकशिवायही माझं व्यवस्थित चाललं आहे.

field_vote: 
3.77778
Your rating: None Average: 3.8 (9 votes)

प्रतिक्रिया

हॅहॅहॅ. चांगल लिहिलय. मश्रूम हा प्रकार हाय-प्रोटीन असतो हे माहित नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

Edible mushroom
Edible mushrooms are the fleshy and edible fruit bodies of several species of macrofungi. They can appear either below ground or above ground where they may be picked by hand. Wikipedia
Nutrition Facts
Chanterelle mushroom
Amount Per 1 cup (54 g)
Calories 21
% Daily Value*
Total Fat 0.3 g 0%
Sodium 5 mg 0%
Potassium 273 mg 7%
Total Carbohydrate 3.7 g 1%
Dietary fiber 2.1 g 8%
Sugar 0.6 g
Protein 0.8 g 1%
Vitamin A 0% Vitamin C 0%
Calcium 0% Iron 10%
Vitamin D 28% Vitamin B-6 0%
Vitamin B-12 0% Magnesium 1%
*Percent Daily Values are based on a 2,000 calorie diet. Your daily values may be higher or lower depending on your calorie needs.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म त्या हीरोनी नायकानी प्रोटीन शेक/ कच्ची अंडी यांना पर्याय म्हणून मश्रूम का सुचवल?

मेघना हे विचारशील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जिमच्या बाहेर कुठे भेटला, तर विचारीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जिमबाहेर भेटीगाठी चालू झाल्यात वाट्टं..

उत्तम उत्तम.. शुभेच्छा..

अपडेट्स देणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मौनं सर्वार्थ साधनम्!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

:O ऑ!!! जुळुन येती रेशीमगाठी

... त्यात पण तुझ्यासारखीच एक साळसूद मेघना आहे बर्का Wink
.
.
.
लेखन आवडलं ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एका फडतूस मराठी टीव्हीसिरियलमधल्या पात्राशी माझी तुलना? सिफर, येह तुम ने क्या कह दिया? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

असले संवाद ऐकून अदितीनं राँग नम्बरवरून आलेल्या कॉलवर गप्पा मारल्याचा वृत्तांत टाकला होता.
त्याची आठवण झाली.
.
रसभंग करणारा पण कळकळीचा सल्ला :-
आजतागायत तिथून परत फोन आलेला नाही. मी रोज त्या जिमच्या दारावरून फिरायला जाते. तिथला एखादा मठ्ठ बाप्या दिसला, तर त्याला गोड स्माइलही देते. एग इमल्शन, रशियन चिकन सॅलड, मशरूम सूप आणि प्रोटीन इन्टेकशिवायही माझं व्यवस्थित चाललं आहे.
असं प्लीझ म्हणू नका.
व्यवस्थित तब्येतीची गरज जेव्हा तीव्रतेने जाणवते तेव्हा वेळ हातातून गेलेली असते.
योग्य वेळीच तब्य्तेतीची कालजी घेणे उत्तम.
(म्हणजे लागलिच बेटकुळ्या किंवा सिक्स पॅक अ‍ॅब्ज असले पायजेल असं नाही, पण जरा फिट राहिलेलं बरं--
आप्ल्यासाथी आणि आपल्या लोकांसाठीही.)

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मेघनाको गुस्सा क्यों आता है?बिच्चारा सल्लागार!

बाकी जिमला जाऊन थकलेली असताना (पैसे भरले आहेत, आठवड्यातून दोन-तीन वेळा तरी गेले पाहिजे या गिल्टपायी) व्यायाम करून कुठेतरी लिगामेंट दुखावून घेतले आहेत. थंड वारे लागले की अजूनही ते स्नायू हुळहुळे होतात

एकदोन वेळा सहन होणार नाही असे दुखल्यावर आॅर्थोपेडिक कडे जाऊन पैसे देऊन ट्रिटमेंट बरोबर बोलणी खाऊन आले आहे.

त्यामुळे भावना समजू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सुरू होतंय ना होतंय, खळाळून हसु येतंय ना येतंच तोच थांबलाय लेख!
प्रत्यक्षातील प्रसंग अधिक लडिवाळ व/वा दीर्घ नसला तरी ललित लेखनात ती सुट न घेतल्याबद्दल निषेध!

बाकी लिहिलंय ते (तितकस्सं) आवडलं Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजूनही किस्से आहेत व्यायामशालेय. पण माझी मॅनेजर माझ्याशी बोलायला आली, मग नाईलाज झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मॅनेजरने तुझ्याच क्युबिकलमध्ये डेरा जमवला नसेल अशी आशा (+सदिच्छा) व्यक्त करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि या आहारसल्लागार जर सुंदर पोरी असल्या तर मग काय बोलावे.

रोज वजनाचा आकडा त्यांच्यासमोर उभे राहून मोठ्ठ्याने सांगावा लागतो. जकातनाक्याजवळच्या "धरमकांटा"वर लॉरी चढल्यावरचा आकडा पाहिल्यासारखा चेहरा करुन त्या तो लिहून घेतात आणि लगेच आहार बदलतात, म्हणजे जिणे आणखी कष्टप्रद करतात.

स्वतः कश्या सडपातळ राहतात कोण जाणे मेल्या..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्या प्रकारच्या लेखनानंतर, आपण* या संस्थळावर सदस्यत्व घेतल्यापासुनची अनेक वर्षे वाया घालवली आहेत असं वाटत नाही का? (रिड : म्हणजे लेखन मस्त झाले आहे, आवडले वगैरे. अजुन लिहित जा वगैरे.)

*आपण हा शब्द मला शाळेपासुन परिचीत, म्हणजे प्राचार्यांनी बोलावल्यावर 'आपण' असं म्हंटल्यावर मी चित झालो आहे हे मला कळुन चुकायचे.

तपशिलातला सैतान(उसना शब्द) - आणि पवई ते ठाणे हा प्रवास, पवई ते मुलुंड एसि बस आणि नंतर रिक्शा असा सुखाने होऊ शकतो त्यामुळे उगाच बांद्रा ते ठाणेचं फिलिंग त्यात येत नाही, अर्थात पवई ते भांडुप हा प्रवास ही एखाद्यासाठी (उदा. जाड व्यक्ती) थकवणारा असु शकतो हे मान्य वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण हाशब्द फक्त बहुवचन(तू व मी एकत्र अशाअर्थाने) म्हणूनच न वापरता, हिन्दी "आप" या अादरार्थी संबोधनाचे निर्बुद्ध मराठी भाषांतर म्हणून सर्रास वापरला जातो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

"जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे..." ह्या उक्तीनुसार तुम्ही आपण जे म्हणत आहात ते एकाच वेळेस चूक आणि बरोबर ठरते, असा योग दुर्मिळ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅ हॅ हॅ हॅ ... आपल्याला आवडलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हा हा हा हा ROFL

आवडल्या गेले आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुझं बरं चाललंय, त्यांच्या धंद्याचं काय गं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अशानं उद्या तू मला पार्लरमधे जायला सांगशील. असला वायझेड धंदा उघडून बसायच्या आधी विचार करायचा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तू ते जिम आणि पार्लरचे पैसे मलाच का देत नाहीस? मी तुझे केस कापून देईन आणि हवंतर तुझ्या वाटचा व्यायामही करेन. आहारचे सल्ले तर देणार नाहीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतात ये. डन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तिला देण्यापेक्षा मलाच दे.
मी भारतातच आहे.
मीहे तुझ्या वाटचा व्यायाम करेन, फुकटचे सल्लेही देणार नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

ROFL मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लेखन.

आपण आता असं करू की, रोज संध्याकाळी थोडं थोडं ललित लिखाण करत जाऊ. म्हणजे काय होईल नं, की ऐसीवर ललित लिखाणाला फार प्रतिसाद मिळत नाही वगैरे गैरसमज राहणार नाहीत, ओक्के?

दुसर्‍या दिवशी माझा इन्स्ट्रक्टरशी प्रेममय संवाद होतो.

या विषयावर आपल्याला पुढचा लेख लिहिता येईल, नैका?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) मला 'रोज थोडथोडा' गृहपाठ देण्याआधी आपण काढून ठेवलेले लेखन कार्यशाळेचे पाट पुरे करावेत अशी 'णम्र सूचणा मी या ठिकानी या माध्यमातूण गुर्जींणा' करत आहे.

२) 'ऐसी'वर ललिताला प्रतिसाद मिळत नाही, असं विधान मी नक्की कुठे केलं आहे त्याचा एक थोडा विदा - लई नै मागणं - साक्षात विदासम्राटांकडून मिळावा अशीही माझी 'णम्र वैगरे विणंती' 'ऐसी'च्या व्यवस्थापनानं नोंदून घ्यावी.

बाकी निवाडा करण्यास जनताजनार्दन समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

'ऐसी'वर ललिताला प्रतिसाद मिळत नाही, असं विधान तुम्ही केल्याचं मी नक्की कुठे म्हटलं आहे त्याचा एक थोडा विदा - लई नै मागणं - मेघनातैंनी द्यावा अशीही माझी 'णम्र वैगरे विणंती' नोंदून घ्यावी.

बाकी निवाडा करण्यास जनताजनार्दन समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ||

आणि हो, ते लेखन कार्यशाळेचं काम पुढे करायचं आहे. शाळा काढायची म्हणजे जिल्हा परिषदेचं सर्टिफिकेट, शिक्षकांच्या नेमणुका (त्यांच्या पगाराची सोय व्हायलाच पायजे असं नाही, तरीही.), बिल्डिंगीसाठी लॅंड अॅक्विझिशन... एक ना दोन सतराशे साठ भांजगडी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अवांतर : तुमचा जिम ट्रेनर तुम्हाला नक्की काय बनवायला चालला होता? इथेसुद्धा प्रोटीन्सचा उल्लेख वाचला, म्हणून प्रश्न पडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कुणास ठाऊक. त्याला फाट्यावर मारलं मी यशस्वीपणे. चिंता इल्ले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

डुप्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त आवडलं, बेचार्या ट्रेनरचा एक प्रोटीनचा डब्बा विकल्या नाही गेला. शिवाय जेवढे जास्ती जिम तेवढाच आर्थोपेडीक आणि फिजिओथेरपिस्ट धंधा वाढणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिमबाहेर भेटीगाठी चालू झाल्यात वाट्टं..
उत्तम उत्तम.. शुभेच्छा..
अपडेट्स देणे.

ROFL
.
.
अवांतर : तुमचा जिम ट्रेनर तुम्हाला नक्की काय बनवायला चालला होता? इथेसुद्धा प्रोटीन्सचा उल्लेख वाचला, म्हणून प्रश्न पडला.

ROFL

----/\----

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बर्याचशा भा. पो!
त्यावरून आठवलं - "जिमला जातोय" असं ऐटीत सांगणारे अनेक नमुने बघितले आहेत.
नमुना एक : टणाट्ण उडणारे स्नायू वगैरे- ज्याला खास भाषेत मटण की दुकान असं संबोधतात- दाखवून मग किती रिपिट्स मारले, आपला शोल्डर कसा स्ट्राँग झालाय, कार्ब्स्,व्हे प्रोटीन, बेंच प्रेस्,इ.इ. बद्दल न विचारताही सांगणारे लोक. सॉल्लिड कमनशिबी असलात तर अशा दोन मित्रांच्या चर्चेत तुम्ही अडकता.
नमुना दोन : नुकतेच जिमणारे ह-उ-शी लोक. ते बूट वगैरे नवे कोरे घेउन, ट्रॅकपँटचं लेबल तर राहिलं नाही ते चेक करून एक नर्वस स्मित फेकून आत येतात. आणि मग यंत्रांपाशी घुटमळत -हे करावं की नको?- अशा विवंचनेनंतर कोणी नाही असं बघून हळूच त्या यंत्राचा वापर करतात.

पण प्रोफेशनल लोकांकडून सल्ला घ्यायची वेळ आली नाही. आली तर ह्या लेखाचा उपयोग नक्कीच केला जाईल Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते बूट वगैरे नवे कोरे घेउन, ट्रॅकपँटचं लेबल तर राहिलं नाही ते चेक करून एक नर्वस स्मित फेकून आत येतात. आणि मग यंत्रांपाशी घुटमळत -हे करावं की नको?- अशा विवंचनेनंतर कोणी नाही असं बघून हळूच त्या यंत्राचा वापर करतात.

ROFL

अगदी अगदी! माझ्या डोळ्यांसमोर मीच आले एकदम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख आवडला.

(सल्लागार बावचळून माझ्याकडे बघत राहतो. आधीच व्यायामशाळेतले इन्स्ट्रक्टर्स, तिथल्या सेक्रेटरीछाप बायका, ट्रेनर्स आणि अन्नविषयक सल्लागार यांच्या चेहर्‍यावर मठ्ठपणाची एक पेश्शल छटा असते. दोन वर्षं सत्ता भोगलेला भूतपूर्व शिवसैनिक नगरसेवक किंवा ब्यूटीपार्लरमध्ये अखंड निरर्थक गॉसिपीय बडबड करणारी बाई यांच्याशीच तिची तुलना होऊ शकेल.)

खी: खी: खी:

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जीममध्ये जाणार्‍यांकरता आमच्याकडून हे प्रोत्साहनपर गीत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लेख आवडला. अजून मोठा चालला असता. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख खूप आवडला. अनेक असफल जिम मेंबरशिप ची आठवण देऊन गेला.

सल्लागारः कुणी करून नाही का देणार?

मी: नाही.

(माझी आई 'माझी' आई आहे. श्यामची नाही. तिच्यापुढे मशरूम सूप किंवा रशियन चिकन सॅलडचा विषय जरी निघाला, तरी ती मला गेल्या साडेतीन व्यायामशाळांना वाहिलेल्या पैशांचा उद्धार करेल. पाठोपाठ पाळी माझ्या जागरणांची, माझ्या हॉटेलिंगची आणि माझ्या एकूणच आरोग्यविषयक लडिवाळ सवयींची. ती मला सूप नाहीतर सॅलड करून द्यायला बसलीय. असो. असो.)

सल्लागारः आपण उद्या भेटू या का याच वेळी?

मी: हं.

एकदम क्लास! Smile

हे वाचून अदिती डोळे वटारेल, पण हे "रशियन सॅलड" आणि "मशरूम सूप इमल्शन" वगैरे प्रकारामुळेच मला रुजुता दिवेकर आवडते. जे काय तुमच्या संस्कृतीत, परिसरात पारंपारिक खात आले आहात, तेच कमी-जास्त प्रमाणात खा, एक्झॉटिक खाद्यपदार्थांवर भर दिला तर डायेट फार दिवस चालणार नाही हे बजावून सांगते. दिवसात ३० मिनिटं व्यायाम करा, भरपूर पाणी प्या, झोपायच्या किमान दोन तास आधी जेवा, सकाळी जास्त आणि संध्याकाळी कमी, असा कॉमन सेन्स सल्ला देते. प्रोटीन शेक वगैरे मधून मधून तिच्याही पुस्तकात येतं खरं, आणि तिच्या लेखनशैलीची मला खूप चिडचिड होते.

पण एकूण सर्व काही खा, पण कमी प्रमाणात, आणि कुठला ही व्यायाम करा पण नियमित. जगभर जिमवाल्यांना खूप पैसे दिल्यावर तिचा रुटीन मला बर्‍यापैकी आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला पण रुजुता दिवेकर बरी वाटते. अदिती, वटार डोळे! वाटल्यास 'झपाटलेला' श्टाइलने "डोळे बघ..डोळे बघ!" असे म्हटले तरी चालेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

'झपाटलेला' श्टाइलने "डोळे बघ..डोळे बघ!"

हे चूक आहे. तो डायलॉग पछाडलेला मधला आहे. दिलीप प्रभावळकरचा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

साॅरी बॅास, गलतीसे मिस्टेक हो गया।

पण तरीही महेश कोठारेच्याच पिक्चरचे नाव घेतलेय हे कमी आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

डॅम इट्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

का "डॅम इट" म्हणालास? Smile गिरे तो गिरे फिर भी टांग उपर म्हणून की काय? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋजुता दिवेकर पारंपरिक पदार्थ मिळतील म्हणून जास्त खा असं सांगत नाही. घरात डाळ शिजते तर डाळ खा असं सांगण्याजागी ती उगाच सूडोसायन्सची बाबागिरी करत सुटते. काय तर म्हणे, गुणसूत्रांमूळे हे असं खाणं पचवता, जिरवता येतं. आणि काय तर दारू पिऊन इस्ट्रोजेन वाढतं. काय कुठलं माहित नाही त्याबद्दल बोलायला लागली की डोळे वटारलेच पाहिजेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अल्कोहोल आणि इस्ट्रोजेन आणि एक संशोधन ही पण बाबागिरी काय गं? हे दुवे पाहून अंतःकरण जड झालं आणि दु:ख प्याल्यात बुडवावसं वाटलं पण बाबागिरी वाटली नाही. शिवाय जरहे खरं असेल तर पारंपरिक पदार्थ गुणसूत्रांतील बदलांमुळे पचवता, जिरवता येतील हा कयासही काही फार (म्हणजे बाबागिरी म्हणण्याइतका) ताणलेला वाटत नाही.

डिस्क्लेमरः कु.दिवेकर यांच्या कोणत्याही विधानांची जबाबदारी घेत नाही. कु.दिवेकर यांची पुस्तके (खरंतर आरोग्यविषयक भानगडींची कोणतीच पुस्तके) वाचण्याऐवजी मस्तपैकी ब्री आणि बगेतचे तु़कडे लाल वारूणीच्या घोटाबरोबर खावेत नाहीतर पुरणपोळीवर किंवा मोदकांवर पळीभर तूप ओतून मग सावकाशीने त्याचा आस्वाद घ्यावा असे मानणार्यांपैकी मी एक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे, छे. हे तुम्ही फार सखोल आणि प्रयोगान्ती काढलेले निष्कर्ष वगैरे सांगताय.

दिवेकर मावशी म्हणतात की अल्कोहोल घेतला की सगळ्यांचं इस्ट्रोजेन वाढतं आणि म्हणून पुरुषसुद्धा बायकांसारखे भावनिक होतात. दारू प्यायल्यामुळे लोक भावनिक का होतात याचं इतकं भंपक स्पष्टीकरण वाचायला आहारतज्ज्ञ कशाला हव्ये, सनातन प्रभातच्या संस्थळावरही सापडेल ते!

पारंपरिक पदार्थ गुणसूत्रांतील बदलांमुळे पचवता, जिरवता येतील हा कयासही काही फार (म्हणजे बाबागिरी म्हणण्याइतका) ताणलेला वाटत नाही.

महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जातींच्या, भौगोलिक स्थानांच्या लोकांच्या आहारामध्ये बऱ्यापैकी वैविध्य आहे. मराठी लोकांची गुणसूत्रं एवढी वेगवेगळी आहेत का, याचा अभ्यास कोणी केलाय? इरावतीबाईंच्या कवट्यांच्या संशोधनातून असे बदल त्यांना दिसले नाहीत. चीनी-जपानी लोकांना दूध पचवता येत नाही-आपल्याकडे भरपूर दूध प्यायलं जातं आणि कोकणस्थ ब्राह्मण - प. महाराष्ट्रातल्या शहाण्णव कुळी लोकांच्या आहारात फरक असतो हे दोन्ही फरक गुणसूत्रांवरून स्पष्ट करणार का? ज्या गोष्टी सामाजिक (किंवा इतर काही) कारणांमुळे स्पष्ट करता येतात तिथे नसलेला वैज्ञानिक संबंध जोडण्याला बाबागिरी सोडून काय म्हणणार?

मस्तपैकी ब्री आणि बगेतचे तु़कडे लाल वारूणीच्या घोटाबरोबर खावेत नाहीतर पुरणपोळीवर किंवा मोदकांवर पळीभर तूप ओतून मग सावकाशीने त्याचा आस्वाद घ्यावा असे मानणार्यांपैकी मी एक.

दे टाळी!
मी ते भंपक पुस्तक (चिवड्याचे बकाणे भरत) अर्ध्याधिक वाचलं आहे. त्यामुळे ही बाई बाबागिरी करते हे माझं मत कायम आहे. ही भोंदू बाई सांगते म्हणून ब्री-बागेत-वारूणी आणि पुरणपोळी-तूप मी काही सोडणार नाही. (पुरणपोळी बनवायचा आळस म्हणून पुरण-पोळी खाईन, पण तुपाशीच.) झाले आणखी थोडी जाडी तरी हरकत नाही. (प्रश्न तत्त्वाचा आहे वगैरे वगैरे वगैरे!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरंय, मलापण आवडते दिवेकरीण. 'दर दोन तासांनी खा' हे (आणि हेच) सगळ्यांत भारी आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

म्हंजे मधले चक्क दोन तास कैच खायच नै???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हो ना रे. Sad
पण आता वजन कमी करायचं म्हणजे सोपं का आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

जाड असण्याबद्दल Unapologetic आणि shameless कसे असावे याचे कोणी classes कोणी सुरु केले तर ते कुठल्याही gym पेक्षा जास्त चालतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

लेख वाचताना प्रसंग डोळ्यासमोर जिवंत उभा राहिला आणि त्या बिचार्या मठ्ठ इन्स्ट्रक्टरबद्द्ल अनुकंपा वाटायला लागली. तुझ्यासारखी आणखी चार गिर्हाईके आली तर बिचारा कंटाळून पळून जाईल.

ब्यूटीपार्लरमध्ये अखंड निरर्थक गॉसिपीय बडबड करणारी बाई

ROFL यासाठी टाळ्या! बरं ही जमात जगात सर्वत्र सारखीच त्रासदायक असते असं दिसतंय. केस कापायला गेलं की कानाला हेडफोन्स लावायची नामी युक्ती मला फार त्रासदायक प्रसंगातून शिकायला लागली.

ती मला गेल्या साडेतीन व्यायामशाळांना वाहिलेल्या पैशांचा उद्धार करेल

हेपण भारीच. अशा व्यायामशाळांना वाहिलेल्या पैशांचा उद्धार घराघरातून होत असल्याने पाहिल्याने वाक्य मनाला फारच भिडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझ्यासारखी आणखी चार गिर्हाईके आली तर बिचारा कंटाळून पळून जाईल.

काही महिन्यांनी माझी बहीण गेली होती तिकडे. तर फॉर्मवर आडनाव लिहिताना त्यानं दचकून वर पाहिलं म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

च्यामारी हे साले जिम ट्रेनर वैताग देतात तसेच वजन घटवण्याचे सल्ले देणारे तथाकथित डाएटिशिअनही. या 'आपण' च्या ऑब्जर्वेशनबद्दल मेघना एक लिंबू-सरबत माझ्याकडून (अदिती तुझा पत्ता कट, प्लिज नोट.) साले हे लेकाचे आमचे बापजादे असल्यासारखे पेट्रनायजिंग भाषेत का बोलतात कोण जाणे. एक थोतरित ठेवून द्यावीशी वाटते. एक तर चार स्टँडर्ड सजेशन पलिकडे काही घंटा माहित नसलेले असतात. तेच तेच सल्ले सगळ्यांना देत असतात. माझ्या अ‍ॅन्युअल मेडिकल चेकअप च्या वेळी ती डाएटिशिअन बया तेच तेच सांगत असते. या वेळी मी मुद्दाम गंमत केली. म्हटलं बये मी रोज दहा किमी सायकल चालवतो, पाचशे क्यालरीज रोज जाळतो. हे खातो, ते खात नाही, रोज अमुक इतके पाणी पितो... बिचारीला नवा काही मुद्दा सापडला नाही. शेवटी नाईलाजाने 'वा: वा: तुम्ही आधीच सारी काळजी घेता तर.' 'मग माझ्या एकुण फीसमधला डाएटिशिअन कन्सल्टंटची फीस परत करा' असं आमचं अस्सल पुणेरी वाक्य ऐकवायची इच्छा झाली होती. पण तेवढ्यात पोस्ट ब्रेकफास्ट शुगर देण्यासाठी आधी तुमच्यासाठी आणलेला ब्रेकफास्ट उरकून घ्या असं सांगत आमची आरोग्यसुंदरी उगवली नि खाण्याचे नाव ऐकून आमची वादाची खुमखुमी जिरलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

'जिम'मधलं लिंबूसरबत देणार का हो ररा, 'जिम'च्या धाग्यावर कबूल केलंय तर? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

शुद्ध सात्त्विक नि पाचक असे अस्सल देशी लिंबाचे सरबत. उगाच भलत्या अपेक्षा नकोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

मला "बर्फमिश्रित लिंबाचे वायाळ सरबत" आठवले.

पण हे कोणी कुठे कधी का लिहिलेय हे आठवेना.

पुलं की चिंवि नॉट शुअर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आई शप्पत. कसलं मस्त लिहीलयस Smile ROFL आत्ता वाचलं. सु-प-र्ब!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कसंय ना, मी माझे पैसे भरून तुमच्याकडे आले होते. तुम्ही नाही. गेले पैसे वाया, तर माझे जातायत. मला यायचं असेल तेव्हा, असलं तर मी येईन. तोवर मला फोन करून परत त्रास दिलात, तर मी तुमच्या जिमवर केस करीन. कळलं?

तुम्हाला फोन करण्यामागे जीमवाल्यांच काही स्वार्थं असेल असं वाटत नाही. अनियमित येणार्या मेंबरांनी नियमित यावे हा त्यामागचा कळवळा असु शकेल. लेगेच त्यांना अस तोडुन (कुत्सित??) बोलायला नको होतं.

आजतागायत तिथून परत फोन आलेला नाही. मी रोज त्या जिमच्या दारावरून फिरायला जाते. तिथला एखादा मठ्ठ बाप्या दिसला, तर त्याला गोड स्माइलही देते.
कदाचित मठ्ठ बाप्या पण हेच म्हनत असेल...पैसे भरुन ही नियमित न येता वर मुजोरीपणा दाखवणारी आळशी मठ्ठ बाई चालली आहे...आणि म्हणुन तो तुमच्याकडे बघुन गोड स्माइल देत असेल.

नाही, मी बाहेरून कोणतंही टॉनिक घेण्याच्या साफ विरोधात आहे. तेवढं सोडून बोला.
ह्या वर मी काही सांगण्यापेक्शा तुम्ही एका चांगल्या आहार तज्ञाची मदत घ्या. माफक प्रमाणात घेतलेले सप्प्लिमेंत्स कधिच घातक नसतात. उलट ते न घेता तुम्ही व्यायाम केला आणि शरिराल योग्य प्रमाणात nutrients नाही मिळाले कि पुढे जाउन वेगळेच complications निर्माण होउ शकतात.

मला वयाच्या २८ व्या वर्षी टायफोइड, लेप्टोस्पायरोसिस आणि काविळ हे सगळ एकदम झाले. २ महिने hospital मधे अ‍ॅडमिट होतो. ह्या कारणानी माझी career मधली खूप मोठी सुवर्णसंधी हुकली. तेंव्हा पासुन ६ वर्ष मी नियमीत पणे जीम ला जात आहे. योग्य व्यायाम केल्या मुळे शारिरिकच नाही तर मानसिक पातळी वर ही खूप फायदा होतो.
त्यामुळे हा अहं भाव सोडा पण जीम सोडु नका.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमची कळकळ पोचली. त्याबद्दल मनापासून आभार. तुमचा सल्ला अंमलात आणण्याचा मी प्रयत्न करीन. Smile

आता थोडा सल्ला मी देते. Wink

अहो, हे ललित लेखन आहे. यांत लिहिलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घडल्या असतीलच असं नव्हे. ही लेखकाची कल्पनाही असू शकते, कल्पना आणि सत्याचं मिश्रण असू शकतं, दिवास्वप्न असू शकतं... या शक्यता आणि लेखकाचं स्वातंत्र्य वाचताना कायम लक्षात ठेवावं, म्हणजे अनवस्था प्रसंग ओढवत नाही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

<कोण ते ओळखा मोड>
प्रोटीनचं एक ड्रिंक आणी मशरूम खायला सांगितलं तर काय चुकलं? बकरी वा बैल कापायला सांगीतला नाहीये. शाकाहारी व्यक्ति जास्त दयाळू असते हे तुम्हाला माहीत नाही का?
----------------------------------------------------------------------------
स्त्रियांना आदराने "आपण" का म्हणू नये? स्वातंत्र, समता हे आदर्श स्थितीचे पहिले निकष आहेत. आदर आणि प्रेम हे त्यानंतरचे दोन आहेत.
----------------------------------------------------------------------------
जिमबाबत आस्था ठेवणारे लोक विकृत असतात काय? (सॉरी: असतातच)
<मोड समाप्त>

थोडं गंभीरपणे:
>>तुम्हांला विनोद सापडणार नाही, करुणरसपरिपोष आणि कटोविकटीचा संताप तेवढा सापडेल.
जिममधील लोक, डाएटिशीयन, डॉक्टर हे आपल्या भल्यासाठीच सांगत आहेत, असे "समजायला" तरी हरकत नसावी. त्यांना काहीच अक्कल नाही, असे किमान समजू नका. भले त्यांचा सल्ला मानू नका, पण ऐकून तरी घ्या.

शेवटपर्यंत स्वतःचे वजन स्वतःलाच उचलायचे असते. भले कोणी सडपातळ असेल किंवा गुटगुटीत असेल, पण सुदृढ असणे महत्वाचे. रोज थोडा व्यायाम किंवा चालणे, समतोल आहार, भरपूर पाणी पिणे आणि वर्षातून एकदातरी चेकअप गरजेचे आहे. तरुणपणी हे समजत नाही कारण तेव्हा आळस किंवा माज असतो. जेव्हा परिणाम जाणवतात, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. (स्वानुभव)

>>'कसंय ना, मी माझे पैसे भरून तुमच्याकडे आले होते. तुम्ही नाही. गेले पैसे वाया, तर माझे जातायत. मला यायचं असेल तेव्हा, असलं तर मी येईन. तोवर मला फोन करून परत त्रास दिलात, तर मी तुमच्या जिमवर केस करीन. कळलं?
प्रचंड अ‍ॅटिट्यूड प्रॉब्लेम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा गंमतीचा हाफव्हॉली मी काहीच प्रतिक्रिया न देता सोडून देते आहे. जाओ, मुआफ कर दिया! Wink

आता गंभीरपणे:

१. हे ललित लेखन आहे. यांत लिहिलेल्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा घडल्या असतीलच असं नव्हे. ही लेखकाची कल्पनाही असू शकते, कल्पना आणि सत्याचं मिश्रण असू शकतं, दिवास्वप्न असू शकतं... या शक्यता आणि लेखकाचं स्वातंत्र्य वाचताना कायम "समजून" घ्यावं, लेखक अगदीच बेअक्कल आहे असं मानून चालू नये, म्हणजे अनवस्था प्रसंग ओढवत नाही!
२. खरंय. अगदी खरंय. पण पुन्हा एकदा - मुद्दा क्रमांक १ वाचा बरं!
३. सॉरी, पण परत एकदा - मुद्दा क्रमांक १ वाचा. तो घटवून घेणं महत्त्वाचं आहे. तो पक्का झाला की आपण कुणाकुणाला अ‍ॅटिट्यूड प्रॉब्लेम आहे, त्याचा शहानिशा करू. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

ऑ, म्हणजे ललित लिखाणावर प्रतिक्रयापण तशीच पाहिजे काय? गंभीरपणे लिहिलेलं काहीच चालत नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घ्या! न चालायला काय झालं? मी त्यावर माझी प्रतिक्रिया लिहिली हो फक्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

A Wise Chinese Doctor.

Q: Doctor, I’ve heard that cardiovascular exercise can prolong life. Is this true?
A: Your heart only good for so many beats, and that it…don’t waste on exercise. Everything wear out eventually. Speeding up heart not make you live longer; it like saying you extend life of car by driving faster. Want to live longer? Take nap.

Q: Should I cut down on meat and eat more fruits and vegetables?
A: You must grasp logistical efficiency. What does cow eat? Hay and corn. And what are these? Vegetables. So steak is nothing more than efficient mechanism of delivering vegetables to your system. Need grain? Eat chicken. Beef also good source of field grass (green leafy vegetable). And pork chop can give you 100% of recommended daily allowance of vegetable product.

Q: Should I reduce my alcohol intake?
A: No, not at all. Wine made from fruit. Brandy is distilled wine, that mean they take water out of fruity bit so you get even more of goodness that way. Beer also made of grain. Bottom up!

Q: How can I calculate my body/fat ratio?
A: Well, if you have body and you have fat, your ratio one to one. If you have two bodies, your ratio two to one, etc.

Q: What are some of the advantages of participating in a regular exercise program?
A: Can’t think of single one, sorry. My philosophy is: No pain…good!

Q: Aren’t fried foods bad for you?
A: YOU NOT LISTENING! Food are fried these day in vegetable oil. In fact, they permeated by it. How could getting more vegetable be bad for you?!?

Q: Will sit-ups help prevent me from getting a little soft around the middle?
A: Definitely not! When you exercise muscle, it get bigger. You should only be doing sit-up if you want bigger stomach.

Q: Is chocolate bad for me?
A: Are you crazy?!? HEL-LO-O!! Cocoa bean! Another vegetable! It best feel-good food around!

Q: Is swimming good for your figure?
A: If swimming good for your figure, explain whale to me..

Q: Is getting in shape important for my lifestyle?
A: Hey! ‘Round’ a shape!

Well, I hope this has cleared up any misconceptions you may have had about food and diets.

And remember:
Life should NOT be a journey to the grave with the intention of arriving safely in an attractive and well-preserved body, but rather to skid in sideways – Chardonnay in one hand – chocolate in the other – body thoroughly used up, totally worn out and screaming “WOO-HOO, what a ride!!”
.
.
.

ह्या व्यतिरिक्त, एका टी शर्टवर लिहिलेला एक सुविचार आठवला :-
eat right, stay fit and--
DIE ANYWAYS

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कितीदा तेचतेच सांगाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न वी बाजूंनी दखल घेइपर्यंत सांगत रहायचे ठरवले होते. आता थांबायला मोकळा. थ्यांक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars