वार्‍याने हलते रान...

हेही पूर्वप्रकाशित स्फुट आहे.

***

सहसा काम करण्यासाठी ही अशी जागा मिळणं दुरापास्त.

दोन्ही टोकांना धडधडणार्‍या शहरांच्या मधे वसलेला हा निवांत पट्टा. कसलेच गज नसलेली मोठ्ठीच्या मोठ्ठी सरकखिडकी. समोर खाडी. खाडीला समांतर जाणारे निर्लेप संन्यस्त रूळ. अद्याप माणूसपणा शाबूत असलेला शांत फलाट. खाडीचं वेळीअवेळी चमचमणारं-ओसरणारं पा़णी.

त्या पाण्यावर जगलेलं हे मोकाट रान. जिवंत, श्वास असणारं.

त्या रानाला चक्क रानाचा असा हिरवा-ओला वासही येई. त्याचा रानगट हिरवेपणा, पावसाळ्यात ओसरून जाणारं त्याचं शहरीपणाचं भान, त्याला अगदी क्वचितच होणारा चुकार माणसाचा स्पर्श आणि तिथले ते काव्यात्म गूढ बगळे. या सार्‍यावर पाऊस कोसळे, तेव्हा तिथल्या जडावलेल्या रानवट शांततेत आपणच उपरे असल्याचं निर्दय-तीक्ष्ण भान देत जात असे ते रान.

रान नजरेच्या पातळीला असतं, तरी त्याचा स्पर्श असा हाताच्या अंतरावर भासला असता. आणि मग त्याची कळे न कळेशी दहशतही वाटली असती कदाचित. पण माझ्या खिडकीनं मला निराळीच जागा बहाल केलेली. एरवी आपल्या भासमय अस्तित्वानंही धडकी भरवू शकले असते असे अनेक सळसळते स्पर्श, खसफसणारे आवाज आणि तो ओलाकंच गंध - सगळंच मला माझ्या खिडकीतून एक निराळीच मिती दिल्यासारखं दिसे.

जिवंत. पण दूरस्थ.

मी पावसाळ्यात गेले तिथे. म्हणूनच बहुधा - त्या खिडकीचं, त्या रुळांचं, त्या रानाचं आणि पावसाचं एक अनाम नातं रुजून राहिलेलं माझ्याआत. आतल्या एसीची पर्वा न करता बिनदिक्कत खिडकी उघडून पाऊस अंगावर घेतला, तेव्हाच जुळत गेली तार कुठेतरी. मग पाऊस ओसरून गवताचा रंग मालवत गेला, तरीही आमची ओळख राहिलीच. मागच्या बाजूच्या अव्याहत धडधडणार्‍या आकर्षक महारस्त्याकडे पाठ फिरवून माझं इमान रानाशीच राहिलं.

पण हे जाणवलं मात्र खूप उशिरा.

***

तेव्हा कुणाशी नीटशी ओळखही नसलेली. समोर तेवणारा कॉम्प्युटर आणि शेजारची खिडकी. इतकंच असत असे जग आठ तासांपुरतं. कितींदा तरी नकळत नजर खिडकीतून बाहेर लागून राही. कोसळत्या पावसाचा जाड धुकट पडदा, आतली बर्फगार यांत्रिक थंडी आणि बर्‍याचदा भिजून ओलेगच्च झालेले निथळणारे कपडे. तरी पावसाआडून गप्प-गंभीर रान खुणावत राही. सगळे अपमान-उपेक्षा-एकटेपणा त्याच्याकडे पाहत असताना मृदावून जात. त्या तिथून पाहताना लोकल ट्रेनही कसली तत्त्वचिंतक स्वभावाची वाटे... मला दिसे ती शहराकडे पाठ फिरवून निघालेली ट्रेन. गर्दीच्या वेळाही नसत. कुणी एखादा वारा पिऊ पाहणारा दारात लटकणारा कलंदर आणि रिकामी धडधडणारी ट्रेन. तिच्याकडे पाहताना अलिप्त शांतसे वाटत जाई. ते गप्प रान आणि तिथून जाणारी ती ट्रेन. त्या रानापाशी आसरा घेण्याची आणि ट्रेनची वाट पाहण्याची सवय कधी लागली कळलंच नाही.

आजूबाजूच्या माणसांना तर पुठ्ठ्याचे कट-आउट्सच मानत असे मी त्या काळात.

रान तेवढं मनात नकळत मूळ धरून राहिलेलं.

***

आमच्यात अंतर कधी पडत गेलं ते आता नीटसं आठवत नाही. खरे तर त्या काळातले रानाचे तपशीलच फारसे आठवत नाहीत. तेव्हा माणसं असायला लागली होती आजूबाजूला.

माझं लक्ष नसतानाच कधीतरी पाऊस ओसरत गेला... रानाचा रंग बदलत गेला. तिथली गंभीर हिरवाई वितळून उन्हाळत गेलं रान हळूहळू. त्याचा तो ओला-पोपटी वास एक दिवस नसलेलाच. त्याचं माणूसघाणेपण संपल्यासारखं. कुणी कुणी चक्क चार-दोन गुरं चारायला आणलेली रानात. पातळ मखमली पंखांची सोनपिवळी फुलपाखरंही चक्क. टायर पिटाळत त्याच्यामागे धावणारी चार कारटी आणि त्यांना उंडारायला एका पायवाटेपुरती जागा करून देणारं रान. हसर्‍या तोंडावळ्याचं. गुरं-पाखरं-पोरं-फुलपाखरं खेळवणारं. माणसाळलेलं.

त्याच्या त्या बदललेल्या चेहर्‍याची दखल जेमतेमच घेण्याइतपत फुरसत होती असावी मला. काम, माणसं आणि मैत्र्याही रुजत गेलेल्या. त्या काळात रानाशी केलेली बेईमानी आणि महारस्त्याकाठचा सज्जाच आठवतो. वाहत्या रस्त्यावरचे फर्र फर्र आवाज - त्या आवाजांना पचवून उरणारी निखालस शांतता - भणाण वारा आणि उडणारी ओढणी - गप्पांच्या साथीनं रिचवलेले असंख्य बेचव चहाचे कप. मोकाट गप्पांचे दिवस.

मानवी नेपथ्यानं जिवंत नटासाठी काही काळ निर्जीव होऊन उरावं तसं उरलं होतं तेव्हा रान. समंजस मित्रासारखं. काही न मागता अबोल साथ पुरवणारं. पण बिनबोलता नकळत बदलत जाणारं.

***

त्याच्या बदलण्याची खरी चरा उमटवणारी दखल घेतली ती तिथल्या मोकाट गवताला एके दिवशी आग लागल्यावर. रान चुपचाप बिनविरोध माघार घेत गेलेलं. आणि मोकळं होत जाणारं माळरान.

धस्स झालं होतं. आणि आपणच आपल्याशी केलेल्या बेईमानीची कडू जाळती जाणीवही.

तोवर वेळ निघून गेली होती पण. हळूहळू रान मागेच सरलं निमूट.

मग काही माणसांचे जथ्थे. काही पालं. काही फरफरणारर्‍या चुली. काही झोळ्यांचे पाळणे. अजून काही माणसं. काही ट्रक. काही घमेली आणि फावडी.

मग थेट वीटभट्ट्याच.

***

आता उरल्यासुरल्या रानावर पाऊस कोसळत असेल. रान पुन्हा एकदा असेल गप्प-गंभीर-उदास. इथेही पाऊसच...

मला आठवताहेत त्यानं दिलेले काजवे. काही चुकार फुलपाखरं. एक लखलखतं दुहेरी गोफाचं इंद्रधनुष्य.
आणि दु:खासारखी सखोल घनगंभीर साथ.

एक आवर्तन पुरं झालेलं आता. माझंही...

रानाला काय आठवत असेल? आता खिडकीत उभं राहून रानाला साथ कोण पुरवत असेल?

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (6 votes)

प्रतिक्रिया

!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे काय?!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

विशेषणे सुचेनात म्हणून फक्त चिन्ह!
आवडले.. अतिशय आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेख अतिशय आवडला. शांताबाईंच्या एका झाडाबद्दलच्या कवितेत 'वासांमधून उमटणारे जाणीवओले भास' अशी ओळ आहे, ती आठवून गेली.

थोडे अवांतरः

रुक्ष समीक्षकी भाषेत बोलायचं झालं तर आदिबंधात्मक (archetype) लेखनाचे काही संकेत रूढ झालेले असतात. त्यांचा उगम, सामायिक वारसा, त्यांत घडत गेलेले बदल हा निराळा विषय आहे. (पहा: Carl Jung, Swiss psychologist, argued that the root of an archetype is in the “collective unconscious” of mankind.)

झाडाचं वा रानाचं प्रतीक हे माणसाला अगदी जवळचं वाटावं, हे "नैसर्गिक"च. त्या निसर्गापासून दुरावल्याची खंत मर्ढेकरांसारख्या शहरी कवींच्या पहिल्या पिढीत जाणवते. (किती तरी दिवसांत...खुल्या चांदण्याची ओढ, आहे माझी ही जुनीच). या लेखातलं रान मात्र ढोबळस्मरणरंजनोत्तर आहे. (काही प्रमाणात, शेवटचे दोन परिच्छेद वगळता), शहरातल्या आयुष्याशी इन्टर्नलाईज् होऊन ते समोर येतं. लेखात म्हटल्याप्रमाणेच जिवंत, पण दूरस्थ. (किंवा "मानवी नेपथ्यानं जिवंत नटासाठी काही काळ निर्जीव होऊन उरावं तसं उरलं होतं तेव्हा रान. समंजस मित्रासारखं. काही न मागता अबोल साथ पुरवणारं. पण बिनबोलता नकळत बदलत जाणारं.")

जवळीक, दुरावा, अपराधगंड ह्या टप्प्यांनंतरच्या बदलत्या परिस्थितीतला हा बदलता, पण त्याच वेळी पहिल्या टप्प्यांचे ठसे असणारा हा आदिबंध आणि त्याच्याशी आपलं नातं - हे फार नेमकेपणाने ह्या लेखात उतरलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्लीज या प्रतिसादाला कुणीतरी रोचक/माहितीपूर्ण द्या माझ्याकडून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

अगदी नेमकी समीक्षा.

(स्वगतः इतकं नेमकं लिहायला किती पुस्तकं खावी लागतील????)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आवडलं!

मॅग्नाताईंच्या ललित लेखांची संख्या वाढल्याने त्यांनी आयडी " ललिता" असा बदलावा अशी सुचवणी करण्यात येत आहे.;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सविताचा आयडी अर्थसविता असा बदलण्यात आला होता काय? तरी सुचवणीला फाट्यावर मारण्यात आले आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आंऊ....लोलिता!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL
अवांतरः यार... स्वतःच्या धाग्यावर श्रेणी न देता येणे हा निव्वळ अन्याय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वा! मस्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान!
वाचताना मनातल्या मनात चित्रं सुध्धा काढलं मी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाह, वाह. खूपच छान लिहिले आहे. हे वाचून मन एकदम भूतकाळात गेले, पावसाळ्यातले लोणावळा आठवले. लोणावळा आणि खंडाळा या दोन्ही शहरांच्या मधे असाच निवांत पट्टा होता. अधून-मधून जाणार्‍या ट्रेन्स दिसायच्या. तेव्हा लोणावळा आत्ताइतके बकाल न्हवते. खूप झाडी होती, भाड्याने सायकल घेऊन तुंगार्लीला पावसात जायची मजा आठवली. त्या दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त!!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत