शर्थीचे प्रयत्न
ते काही नाही,
मी पूर्ण इच्छाशक्तीनिशी
तुझ्याकडे दुर्लक्ष करणार आहे
.
मग भले माझे डोळे ओलावेना,
मी सैरभैर का होईना,
रात्री उशी ओली होईना,
अगदी अश्रूप्रपात का येईना
.
मात्र पूर्ण ताकदीनिशी
मी दुर्लक्ष करेन
.
तू मात्र अज्ञानात रहा
तुझ्या जगात,
तुझ्या मस्तीत,
तुझ्या वर्तुळात
अन तुझ्या नादात
.
मीही दुर्लक्ष करेन
ना दखल घेइन,
ना लक्ष देइन,
ना बोलीन,
ना पाहीन तुझ्याकडे
.
मग माझं जग अस्ताव्यस्त का होइना,
माझ्या जगात प्रलय का येइना,
ते अंधारात का बुडेना,
.
काय म्हणालास- इतक्या अट्टाहासानंतर मी काय साधेन?
समाधान!
तुझ्यापासून माझी व्याकुळता लपविण्याच,
माझी तडफड तुला कळू न देण्याचं
माझ्या उरल्यासुरल्या प्रतिष्ठेचा
तम्तू जपण्याचं
.
काय म्हणतोस - तसं साधून काय मिळेल?
.
खरच काय मिळेल
इतक्या अट्टाहासानंतर
जर तुला कळणारच नसतील,
माझे शर्थीचे प्रयत्न!
सहज कळणारी, खूपच सुंदर आणि
सहज कळणारी, खूपच सुंदर आणि प्रेमाच्या नात्याची एक (भग्न) अवस्था अतिशय समर्पकपणे टिपणारी कविता.
----------------------------
नकारानंतर किंवा नातं संपल्यानंतर त्याचे काही अवशेष मनात बराच काळ राहतात. पण ताटातुटीनंतर लागलीच तर हे बंध खूपच सबल असतात. खासकरून हा बंध एकतर्फी असेल तर माणूस आपल्याच मनात प्रियकराची एक प्रतिकात्मक मूर्ती बनवून तिच्याशी धूसफूशीने वागतो. मग भावना ओसरल्या कि लक्षात येतं कि ज्याला रिअॅक्शनच नाही तो फोर्स कसचा?
नकारानंतर किंवा नातं

टाळ्या!
--
अजो, बरेच दिवसात काही ललित लिहिलं नाहीस. लिहि ना काहितरी!
छानच! संवादात्मक शैलीही
छानच! संवादात्मक शैलीही खासच!
ऐसीवर स्वागत!