तुझी सोबत.......

तुझी सोबत.......
भुरभुरणाऱ्या पावसाच्या श्रावण सरीसारखी
क्षणात सोबत तर क्षणात कुठतरी गुडूप होणारी , हुरहूर लावणारी ,
हिरमुसले गेले कि अचानक बरसणारी ,
माझ्या मनी अन अंगणी ताल धरणारी पावसाची सरच ती ,
सर जुनं विसरून नव्याने जगायला शिकवणारी , कोवळ्या फुटलेल्या पालवी सारखी,

तुझी सोबत…....
आठवण पक्षांचा नाच बनून राहिलेली , दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .
माझ्या ओंजळभर स्वप्नाचं चांदणं बनून राहिलेली,
आठवणीतच गुंतलेली अन आठवणीतच उसवलेली

तुझी सोबत ……
भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी ,
आभाळभर साठून हि बरसणं विसरलेली सर जशी.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

दूरवर कुठंतरी आभाळात रांगोळी सांडलेली .

फार फार गोड!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कवितेच्या शीर्षकात किंवा कवितेत शब्दामागे Ellipses(टिंबे) वाढवल्यावर भावना, उसासे तीव्र किंवा अतिउत्कट होतातच असे नाही. ती टिम्बे उगाचच वाढली की अजुन एक जालीय कविता असे म्हणून मी मुर्दाडपणे पुढे जातो.
योग्य जागी दिलेले स्वल्पविराम, न्यू लाईन, पूर्णविराम सुद्धा माझ्या कवितावाचनावर परिणाम करतात.
बाकी लिहीत रहा इतकेच म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुझी सोबत...
भावनांचा हीशोब मांडणारी शब्दहीन कवितेची ओळ जशी...

आवडलेली ओळ... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

शब्दहीन कविता काहीतरी रोचक असणार एवढेच जाणावले पण संकल्पना कळली नाही. कदाचित दीदार-ए-यार, नजर-भेटीतील गुफ्तगु यांना शब्दहीन कविता म्हणावे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0