Skip to main content

२ कमळं

उमलून एकमेकांना,
घट्ट बिलगलेली,
फक्त एकमकांत,
धुंद विमटलेली
तरारुन, मोहरुन,
सुगंधाने दाटलेली
.
दोन कमळं,
संलग्न..अनाहत ..कोमल-कोमल!

अस्वल Thu, 02/10/2014 - 22:19

शेवटली लाईन जरा anticlimactic वाटली.
संलग्न शब्दाने धुंदी थोडी कमी झाली आणि कोमल-कोमल जरा जाहिरात टाईप.

तिरशिंगराव Sat, 18/06/2016 - 10:51

In reply to by मुळापासून

मन इतके पूर्वग्रहदूषित झाले आहे की फोटोतही, दोन कमळांच्या ऐवजी मोदी-शहांचे चेहेरे दिसल्याचा भास होतोय.

.शुचि. Fri, 17/06/2016 - 19:58

गेले ते दिन गेले! :)
__

https://s-media-cache-ak0.pinimg.com/564x/4c/6c/7c/4c6c7ccb92dcb10635e4b7f1ba98efee.jpg

मला माझ्या मूडस चा थांग लागत नाही,
.
तुझ्या विचारात मग्न असताना,
हृदयातून कधी बारीकशी
कळ उमटते
खलीश-चुभन-टींस
.
तर हृदय कधी -
पूर्ण उमललेले पांढरे शुभ्र
विमल, कोमल कमळ बनते.
असे कमळ ज्याचे अंतरंग फिकट गुलाबी असते.
केशरी नाचरे एलिप्टिकल परागकण त्यात डोलत असतात.
असे कण जे मधुचुख्याच्या अलवार नाजूक
पंखाच्या वरती
सहजतेने आरुढ होतील, विहरतील.
सुगंधाने मन दाटून जाते.
.
एकदा तर गंमतच झाली, -
माझे मन काळ्याभोर डोळ्यांवर लांबसडक पापण्या
असलेला शुभ्र हंस बनून
फिकट पाचूसम तळ्यावर
पूर्ण पोर्णिमेच्या रात्री जलविहार करु लागले.
.
I endlessly wonder,
पुढील जन्मी माझा
कोण बनून येशील?
सखा-मित्र-पुत्र-पिता-गुरु की परिचित?
प्रेमाची कोणती जातकुळी
आपण भोगू?