अलिप्तसा

मला असं येरझारा
घालताना पहाणं आवडतं तुला,
म्हणून मुद्दाम उशीरा येतोस.
मला तहानलेलं
पहाणंही आवडतं तुला,
म्हणून मग समुद्र होवूनही
निष्ठुरपणे दूर रहातोस
कदाचित..
मला मोहरलेलं पहाणंही
तितकच आवडतं तुला,
म्हणून मग अवचित
चांदणस्पर्शानी बरसतोस
.
किती रुपात मला नटवतोस,
किती मूड जागवतोस,
कधी बेभान, कधी अलिप्त,
कोमल तर कधी निष्ठुर,
कधी अधिकाराचा तर कधी लीन
सूत्रधार तू, प्रियकर तू
सखा तू, निर्दयीही तूच,
शृंगार, प्रीती, लज्जा
अनुराग, विश्वास, कातरता
इतकं सर्व माझ्याबरोबर भोगून,
तू परत अलिप्तसा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

तू परत अलिप्तसा. Smile Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!