Diwali

दिवाळी म्हटलं की आजही आठवतं.... कुडकुड थंडीत केलेलं झुंजूमुंजू स्नान ! तेल , उटण, नारळाच दुध असं सारं अंगाला भरघोस चोपडून ...
तीन तांबे गार पाणी ...तीन तांबे गरम पाणी करत उरकलेली आंघोळ .....
ही अशी दिवाळी आता नाही ....!!!

आजही रांगोळीन सजलेल्या पाटावर तसचं अभ्यंगस्नान होतं...पण तरीही भूतकाळ खुणावतो कारण दिवाळीचा निर्लेस आणि निर्लेभ आनंद तिथे सापडतो .....
आपली अंघोळ , आपले फटाके, माझ्या साठीच्या चकल्या याची जागा सामजस्य आणि वयाचा समजूतदारपणा याने घेतलेली " दिवाळी ".... अवखळ अल्लड आनंदाला दूरस्थ पाहते ...

आंघोळी नंतर " कारटे " उजव्या पायाच्या अंगठ्याने फोडून , त्यातली छोटीशी बी कपाळाला लाऊन घरात जायचे , तर आईचं फराळाचे ताट वाट पहायचे .... फराळ उरकून शेजारी पाजार्यांचे फराळ सपुर्द केला की आपली कामगिरी संपली बुवाचा feel डोळ्यात मिरवत , दुपारी दूरदर्शन ची खास भेट चित्रपट पाहत निवांत दिवस घालवला जायचा .

आज सगळंच जास्त happening आहे , दिवाळी पहाट चे संगीत नादमय सुरवात करते दिवसाची , सुग्रास जेवण्याच्या तयारीत थोडीफार मदत ही होते ,सुट्टी आहे म्हणून हुंदडायचं planning ही होतं.... आणि असं बरंच काही गतिमान घडत राहतं !

दिवाळी " साजिरी " साजरी होत राहते .घरचे कंदील .... रोषणाई... झगमगते... आयुष्यावर दिव्यांची उधळण होते ,माझं कावर बावर मन परतत या ' सालात ' या काळात ... मायेन सारवलेलं अंगण पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत राहतं !

काटामोड पाण्याची आंघोळ ... आणि पदारालाच फुसलेले केस टप टप ठिपकत , औदार्य आणि शक्ती सर्वांसाठीच मागत राहतात !

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

झुंजूमुंजू स्नान

आजवर इतक्या दिवाळ्यांत अभ्यंग का कसलेसे स्नान केले, मात्र ते करताना शरीराच्या कुठल्याही भागातून वरीलप्रमाणे आवाज आला नाही.

निर्लेस आणि निर्लेभ आनंद

बुटाला नाड्या नसतील किंवा हरवल्या असतील आणि त्याचा आनंद जाहला असेल तर निर्लेस आनंद समजू शकतो. पण निर्लेभ आनंद म्हणजे काय? नवा निर्लेपचा तवा घेतल्याचा आनंद?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

निव्वळ राकट आणि पुरुषी प्रतिसाद. निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राका = कमळ.

त्यामुळे राकट म्हणजे कमळट म्हणजे कोमल ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कमळ.. आता यात राजकारन आनू नगा बर्का.. इशय काय अन तुम्ही काय बोलायलाय राव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला. स्मरणात गफलत जाहली. राका = चांदतारा. चक्क अँटिथेसिसच की हो!

हम्म, आता मात्र प्रतिक्रिया पुरुषी अन राकट आहे खरी. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कोणीतरी या प्रतिक्रियांना अवांतर अशी श्रेणी देऊन एकूण श्रेणीपद्धतीच्या अस्तित्वाविषयी आणि उपयुक्ततेविषयी सकारात्मक आणि आश्वासक वातावरण निर्माण केले आहे. कर्तव्यदक्ष श्रेणीदात्यांचे आभार.

मूळ लेखिकेकडे अवांतराबद्दल दिलगिरी व्यक्त करुन पुढील लेखनाला शुभेच्छा देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेणीदात्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर भलताच रोचक आणि तितकाच उद्बोधक व गंमतीशीरही आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐला सगळे अवांतर आता रोचक मार्मिक आणि माहितीपूर्ण जाहले.. काय चिमित्कार म्हणायचा हा ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ब्यालन्सचा प्रत्यय आला किनै!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राका = कमळ

चुकून राकाँ = कमळ, असे वाचले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवीन सदस्याचे स्वागत. असेच लिहिते राहिल्याने आत्मविश्वास वाढेल, आणि लेखनही नेटके होऊ लागेल.

(आणखी काही प्रतिसाद येऊन नवीन सदस्यांचा हुरूप वाढेस्तोवर वरील प्रतिसादशृंखलेला ऋण श्रेणी दिलेली आहे. त्यातील काही प्रतिसाद विनोदी आहेत अधून-मधून नव्या सदस्याकरिता सुज्ञ सल्लाही आहे. सन्मान्य सदस्यांचाही गैरसमज नसावा. कोणीतरी मुद्दामून "अवांतर"चे मार्मिक करत आहे, त्यांनी विचार करावा, आणि आपल्या विवेकानुसार श्रेणी द्यावी, हे ठीकच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवर स्वागत. स्मरणरंजनात्मक लिखाणाला लोकांच्या मनाला हात घालायची शक्ती असते. आठवणी नेटक्या आणि विस्तृतपणे लिहिल्या तर ते प्रचंड प्रभावी होऊ शकतं. सगळं आहे पण काहीतरी हरवलं आहे ही 'आहे मनोहर तरी गमते उदास'ची भावना नेमक्या शब्दांत पकडणं कठीण असतं.

उदाहरण म्हणून मस्त कलंदर यांचा 'सरलं दळण' हा लेख आठवतो. काय हरवलं त्याचा गोडवा खूप विस्तृतपणे त्यात सांगितला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखद्या लेखाला अस् भरघोस मार्गदर्शन मिलाल कि आनन्दच वट्तो
....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्वरुपा जी
अहो घासकडवी जी फार संवेदनशील कवि मनाचे आहेत त्यांचे प्रोत्साहन विशेषतः
नव कवयित्रींना आणी त्यातही दिवाळीत फार च सुंदर येतात.
मागच्याच दिवाळीत त्यांनी दिलेला असाच एक सुंदर संवेदनशील प्रतिसाद बघा
तुमच्याच सारख्या एका नवकवयत्रिं ना त्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता
इथे वाचा
शिकार या शब्दाचा एक नवा संवेदनशील अर्थ तुम्हाला त्यात गवसेल.
http://www.aisiakshare.com/node/44
शिवाय फार धार्मीक आहेत ते ध्यान व पुजे वरील त्यांचे लेख म्हणजे कमाल च आहेत.
मात्र त्यांच सर्वोत्क्रुष्ठ लेखन ट्रोल वरील आहे ते नका मिस करु तुम्ही.
आणि जमल्यास त्यांच्या लेखन शाळे त ही अ‍ॅडमिशन घ्या
ते सगळ जाउद्या भेजा फ्राय हा चित्रपट बघितला आहे का तुम्ही ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वीरुची "स्तुती" मौसीकडे करणारा जय आठवला.. दोस्ती हो तो ऐसी..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या नव्या इनपुट language सोबत अजून familiar नाहीये so sorry for mistakes

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेंदी भरले पाऊल घेऊन
पहाट अवतरली..
अलगद नाजूक, धरतीवरती
चाहूल थरथरली..

जागी झाली सृष्टी सारी
ऐकून भूपाळी
निळेजांभळे क्षितिज तेव्हा
झाले सोनसळी

क्षितिजावरती डोकावुनीया
हळूच तो हसला
आळसावल्या चराचराला
सूरही गवसला

लगबग झाली दहादिशांतुन
तया पाहण्याला
ओलेत्याने सज्ज जाहल्या
जणू स्वागताला

धरतीवरती शिंपण झाले
सडा रांगोळ्यांचे
मनी मानसी दीप उजळले
नविन आशांचे

काळोखाची संपून जाईल
मुजोर बळजोरी
आकांक्षांची किरणे येतील
हसून सामोरी

नविन आशा आकांक्षांनी
भरु दे ही झोळी
मांगल्याचे औक्षण करूनी
हसेल दिवाळी..

- प्राजु

वरील कवितेत व्यक्त झालेल्या निरागस भावना मला तुमच्या लेखा तील भावनेशी मिळत्या जुळत्या वाटल्या

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातल्या आठवणी छान आहेत. यात थोडी भर घालतो.

-फटाके (सुतळी वा लक्ष्मीतोटा) लावण्याच्या विविध जागा. बॅरल, डबे, करवंटी या वस्तूंखाली, वाळूचा ढीग उकरुन त्यात, कासवछापच्या मधे वात बांधून टाईम बाम्ब वगैरे.
- किल्ल्यावरची मेथी.
-किल्ल्यासमोर कारंजे
-किल्ल्यात एकतरी "गुप्त भुयार"
-किल्ल्याच्या निम्मी उंची असलेले उत्तुंग मावळे.
-किल्ल्याच्या माथ्यावर फक्त शिवरायांच्या सिंहासनापुरताच चौथरा.
-शेवटी किल्ला bomb ने उध्वस्त.
-फटाक्याला उदबत्ती लावून लगेच पळून जाण्याची स्प्रिंगलोडेड ॲक्षन.
-सुतळी bomb ने फुटताना छातीच्या डायफ्रामवर केलेला ड्रमबीट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा.
किल्यांवर चंद्रकांतावाला कृरसिंग ठेवल्याचही आठवतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आमच्या लहानपणी घरी गिझर नव्हता एक जुना बंब होता. सिलींडर उभ्या सिलींडर च्या आकाराचा. त्यात मध्ये एक गोल पोकळी असायची त्यात लाकड टाकायचो आणि ती जाळायचो. पाणी फार छान कडक उकळत असे. त्या पाण्यात एक कोळशाचा जळकया लाकडाचा वास मिक्स होउन जायचा. त्या पाण्याने केलेल्या आंघोळीची मजा काही औरच होती. आई अगदी सकाळी केव्हा कोण जाणे सकाळीच अंधारात उठायची त्यात लाकड घालुन जाळ करुन सुरु करुन द्यायची. मग एकेक जण उठायचा तो पर्यंत पाणी छान उकळुन जायच. मी सर्वात शेवटी आंघोळ करायचो त्यामुळे माझ्या वाटेला तुम्ही म्हणता तस्स्च अगदी काटामोड इतकच पाणी यायच. थंडीचा गोड गुलाबी काटा शहारा मोडेल इतकाच काटा त्यात असायचा.
तुमच्या लेखामुळे त्या सर्व हरवलेल्या दिवसांची एक फिल्म डोळ्यांपुढुन वेगाने सरकली.
आणि अंगावर काटा आला मात्र तो मोडायला आता काटामोड पाणी कुठे राहीलय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0