padawa

काही आठवणी गतिमान आयुष्याचा पाठपुरावा करतात .... तेह्या असं, आता असं असा उद्वेग नसतो त्यामागे,पण miss करत असते ते सार हे नक्की...
नऊ धान्याची लांबी... आंब्याच्या पानात गुंडाळून झेंडूच फुल रुबाबात गुंफून “ नवं “ बनवायचं , जात्या पासून जोता पर्यंत सर्वाला मनोभावे पुजून ‘ नवं ‘ बांधायचं...
त्यामागेही सकाळी उठायचं पूजेच्या तयारीला , सगळी शस्त्र ( म्हणजे विळी, कोयता , हातोडी , कुदळ,फावडे ) धुवून पुसून स्वच्छ करायचे त्यात धुवता धुवता विळीवर हात बोट कापायचे तर आईचा “ नकटीच्या लग्नाला “ वाला हमखास शेरा ऐकायचा ...नवधान्य कमी पडली तर पुन्हा पायपीट करून सगळं जमवण... चीड चीड, त्रागा व्हायचा.. कधी कधी राडा सुध्धा. ‘एवढी धावपळ करण खरच गरजेच आहे का आई’ यावर आईचं ‘ सणासुदीला पडतच थोड जास्तीच काम ,ते त्या दिवशी नाही करायचं तर कधी ?’ अस सडेतोड उत्तर मला नेहमीच ‘ गार’ करायचे.
अश्या कितीतरी आठवणी ...आज सभोवती घेर मांडतात ,सकाळी अकरा पर्यंत झोप काढली तरी तो freshness नसतो जो सकाळी चार लाच उठून आंब्याच्या डहाळया बांधताना यायचा!
आपली मागची पिढी सारच तर घेऊन उभी आहे आपल्यासाठी , रीतीभाती – संस्कृती ,परिश्रम ,जिद्द...
नवे पणाचे सारेच कोंब... पण आपण काय देणार पुढच्या पिढीला “..नवी technology..’’ ? भारताच्या उन्नत संस्कृतीला नाही replace करू शकत ती , तस तर आपल्या पुढच्या पिढीने ती पाळण्यातच आत्मसात केलेय.पण ही TECHNOLOGY ज्ञानासाठी वृद्धीसाठी कशी वापरायची त्याचे संस्कार त्यांच्यात रुजवायला हवे आहेत.
दसऱ्याच्या निमित्ताने आपट्याचे झाड शोधाव लागावं असे दिवस घेवून उभे आहोत आपण ...
मोठाले रावण उभारून ५/५ लिटर पेट्रोल टाकून dj वर रावण दहन करण्याच्या पद्धतीला ऊत आलाय ... पण सदा सर्वदा या परंपरानमागचे अर्थ sms करण्यापुरते राहणार का?
आज पहिल्यांदा प्रचंड अस्वस्थ होऊन लिहितेय ...मला फारच हादरायला झालंय..
पुढच्या पिढीसाठी माझ्या हातात हक्काचं असं काही दिसेना...
माझ्या देत्या हाताची ओजंळ ओतप्रोत भरूदे माते
एवढा मोठा आशिष हवाय !

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

नवे पणाचे सारेच कोंब... पण आपण काय देणार पुढच्या पिढीला “..नवी technology..’’ ? भारताच्या उन्नत संस्कृतीला नाही replace करू शकत ती , तस तर आपल्या पुढच्या पिढीने ती पाळण्यातच आत्मसात केलेय.पण ही TECHNOLOGY ज्ञानासाठी वृद्धीसाठी कशी वापरायची त्याचे संस्कार त्यांच्यात रुजवायला हवे आहेत.

भारताच्या उन्नत संस्कृतीबद्दल लिहिताना आंग्ल भाषेतील शब्द???? अरे अरे अरे, हेच संस्कार केले की काय मागच्या पिढीने! हर हर हर, शिव शिव शिव..(डाव बदलला)

दसऱ्याच्या निमित्ताने आपट्याचे झाड शोधाव लागावं असे दिवस घेवून उभे आहोत आपण ...

बिचारा आपट्या-कशाला त्याच्या झाडावर डल्ला मारायचा तो?

माझ्या देत्या हाताची ओजंळ ओतप्रोत भरूदे माते
एवढा मोठा आशिष हवाय !

आशिषचे वजन तितके नक्कीच भरो, अशी प्रार्थना करावयास हरकत नसावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे अरे अरे, हेच संस्कार केले की काय मागच्या पिढीने! हर हर हर, शिव शिव शिव..(डाव बदलला)

इथेच तर मार खातो ना आपण.. सदैव नकारात्मक ..

पहा ना, या ऐवजी..

जिंक जिंक जिंक शिव शिव..

किंवा

जिंक जिंक महादेव..

अशा पॉझिटिव्ह घोषणा कधीच ऐकू येत नाहीत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो ते हर हर हर समोरच्याला उद्देशून असतं. अन समोरच्याच्या हरण्याला सपोर्ट म्हणून त्याच्यापुढे महादेवाला आळवलेलं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठीकै.. घे एक "माहितीपूर्ण" मेल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आहाहाहा...बाष्पगद्गदित जाहलो. धन्य होऊन संपती जेव्हा वाद म्हणिजे तयासी धन्यवाद! _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी लिखाण जरी डावललं तरी प्रतिसादांवरनं एकदा तरी चक्कर मारून जातो. काय गंमत वाचायला मिळेल सांगता येत नाहि Smile असो. आता लवकरच swarupa पाचवा लेख/कविता टाकेल......त्यावर परत बॅटमॅन आणि गविच्या फुलबाज्या .... मजा आहे आज!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

अरे बापरे !
मला वाटत कि तुम्ही लिखाण ही वचायला हवे ....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचनाच्या 'मुक्तपीठ' स्कूल ऑफ थॉटप्रमाणे फक्त प्रतिसाद वाचले तरी पुरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0