आयुष्य : एक मृगचक्र!

आयुष्य हे मृगजळाचे चक्रव्यूह (मृगचक्र) असते असे मला वाटते म्हणजे नेमके काय?

जे आयुष्य आपल्याला मिळते ते असते एक आभासी तात्पुरते जग...
त्यात आपण फ़क्त काही काळासाठी आलेलो असतो...
आज आपण जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय अशी स्थिती अनेक क्षेत्रात आहे. जगण्यासाठी आपण पैसा कमावातोय की पैसा कमावण्यासाठी जगतोय तेच समजत नाही.
आज जगच असे बनले आहे की आपण या आभासी कर्माच्या चक्रव्युहातून मरेपर्यंत सुटत नाही...

जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे जग आहे आणि आपण नाही तेव्हा जगही नाही.
निदान आपण जगातून गेल्यानंतर आपल्यासाठी तरी ते जग अस्तित्वात नसतं.
किंवा मग जगासाठी आपण अस्तित्वात नसतो!

यापैकी जे खरे असेल ते असो, पण आपण या जगात अस्तित्वात असेपर्यंत इतरांनी आखून दिलेल्या किंवा नियतीने आखलेल्या त्या चक्रव्यूहात गुरफटत जातो...
सतत हे चालू असते. चोवीस तास, सातही दिवस!
तुम्ही म्हणाल अर्धा दिवसा तर आपण झोपतो...

पण आपण का झोपतो?
अहो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा चक्रव्यूहाचा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी विश्रांती मिळावी म्हणून..

काही जण तर झोपेचे तास सुद्धा कमी करतात या चक्रव्युहा साठी!!!

आणि ते सुद्धा अशा गोष्टींच्या मागे धावण्यासाठी की ज्या आपल्याला या जगाताच सोडून जाव्या लागणार आहेत हे आधीपासून माहीत असते...

तरीही त्या आपण मिळवण्यासाठी धडपड करतो..
नाही केली तरी हे जग आणि त्यातले लोक आणि त्यांचे नियम हे सगळे आपल्याला तसे करायला भाग पाडते...
म्हणजे मृगजळा च्या मागे धावायला भाग पाडते...
त्या चक्रव्यूहात गुरफ़टायला भाग पाडते...

काही जण चक्रव्युहाच्या ध्येयापर्यंत म्हणजे मृगजळापर्यंत पोहोचातात...
काही वाटेतच हार मानतात...
काही तेथे योग्य वा अयोग्य मार्गानी पोहोचतात...
तर काहीजण चक्रव्युहाची रचनाच बदलायला निघतात...
यातून सुरु होतो जीवघेणा प्रवास, जीवघेणी स्पर्धा..एकमेकांचा छळ किंवा वापर....!!!

मग ते एकमेकांचे मित्र, ऑफिस मधले सहकारी, बॉस असोत की मंत्री, कार्यकर्ता, सामान्य जनता असो की मग पती पत्नी, बहिण भाऊ, मुलगा सून जावई सासू सासरे असो...

सगळेच धावत आहेत त्या आपापल्या मृगजळा च्या मागे!!

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आयुष्य हे मृगजळाचे चक्रव्यूह (मृगचक्र) असते असे मला वाटते
म्हणजे नेमके काय?..

आयुष्य हे मृगजळ आहे की चक्रव्यूह ते ठरवा आधी.......उगाच मृगचक्र वगैरे शब्दांचा शोध लावू नका......आम्ही पण अडकू आणि तुम्ही पण अडकाल..

कृ. ह. घ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुहास

झाले गेले गंगेला मिळाले,
आता उदय नव्या रामाचा.
नमो नमो

शब्दप्रयोग बरोबर आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या-निमिश्किल
https://nimishexpress.blogspot.com/