तुझी भिरभिरणारी नजर...

तुझी भिरभिरणारी नजर माझ्यावर येउन खिळलेली
पापणीही न लवता माझ्याच नजरेत मिसळलेली
डोळ्याच्या वाटेने हळूच मनापर्यंत पोहचलेली
मनाचं दार उघडून अंतरंगात विसावलेली.

अचानक सगळ्या कोड्याची उत्तरं गवसलेली
रणरणत्या उन्हात देखील चांदण्यात न्हाऊन निघालेली
सुखद मोरपिशी स्पर्शाने शहारलेली
अन मी वेडी त्या एका नजरेतच
माझं अस्तित्व गमावून बसलेली.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

शाळा-कॉलेजमध्ये आमची भिरभिरणारी नजर अनेकींवर खिळायची. पण कोणाला असलं मोरपिशी वगैरे वाटलं असेल असं वाटत नाही. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर फालतूपणाबद्दल क्षमस्व, पण

"तुझी भिरभिरणारी नजर" या कवितेचा पुढचा चरण "और निरमा सुपर" असेल असं उगाचच वाटून गेलं.

----

कविता आवडलीच. ढेर्‍यांशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वामनाच्या यमक मनिं, गमक त्याचे जनात वामनाच्या |
राही जनिं वा वनिं साचा, लहरिं चलोत बहुता वा मनाच्या ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं