नको ..
मागे नको वळू कारण पुढे ठेच लागेल
मग निघेल जिभाळी अन जिव्हारी लागेल..
मागे नको वळू कारण मन वेडझवं
मागे वळून म्हणेल त्याला पुन्हा सगळं हवं..
मागे नको वळू कारण खोळंबत राहशील
सुकलेल्या पळांशी उगा झळंबत राहशील..
मागे नको वळू कारण मागे रस्ते नसतील
मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..
...
मागे नको वळू कारण पुढे ठेच लागेल
मागे वळू१ लागला तर पुढे पळता भुई थोडी होईल, नि मग त्या घाईत पाय हमखास कशालातरी ठेचकाळेल. सबब, मागे वळू असणे इष्ट नाही ("मागे नको वळू").
साध्या सोप्या शब्दांत किती गहन अर्थ व्यक्त केलेला आहे! मान गये.
.....................................................,...
१ अनक्याष्ट्रेटेड मेल बोव्हाइन.
नवा अर्थ
कविता वाचून एक अर्थ मनाशी लावत होतो. तेवढ्यांत मागून हा 'वळु' आला.
मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..
वळु शी नजरानजर झाली तर तो आणखीनच पिसाळतो म्हणे!
आता संपूर्ण कविताच एका वळु ने म्हटली आहे असा भास होत आहे.
.... जाऊं द्या हो गवि, तुमची कविता छान आहे.
आवडली
आवडली.
मुक्तसुनीत यांच्यासारखाच "झंबाळणे" माझ्याकरिता नवीन होता. त्यांनी सांगितलेला अर्थ ("झोंबाझोंबी") ठीक वाटतो, पण कवीकडून अनुमोदन मिळाल्यास उत्तम!
(माझ्या वैयक्तिक/कौटुंबिक वापरात "जिभाळी" आणि "जिव्हारी" दोन्हींच्या ठिकाणी "जिव्हारी" असाच शब्द आहे. हे दोन वेगळे शब्द आहेत, आणि त्यांचे निर्देश वेगवेगळे आहेत ("नखाखालचा नाजुक भाग", "दुखरे मर्म"), हे शब्दकोशात बघावे लागले. नवीन शब्द शिकल्याचा आनंद मिळाला.)
कविता
कविता आवडली. "झळंबणे" हे क्रियापद मला नवे आहे. बहुदा "झगडणे" "झोंबाझोंबी करणे" अशा अर्थी असावं.