घालीन लोटांगण

घालीन लोटांगण
घालीन लोटांगण वंदीनं चरण,

डोळ्यांनी पाहिन रूप तुझे,

प्रेमे आलिंगन आनंदे पूजन,

भावे ओवाळीन म्हणे नामा

ही आरती गणपतीच्या दिवसात नेहमीच ऐकली जाते, म्हटली जाते किंवा गायली जाते. ही आरती बर्याच जणांची आवडती आरती आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. इतर आरत्यांपेक्षा ही आरती जरा वेगळी आहे म्हणून काहींना आवडते तर काहींना या आरतीची चाल गतिमान आहे म्हणूनदेखील ही आरती आवडते. (तसंच या आरतीला वाजवल्या जाणार्या टाळ्यांमध्येदेखील एक विशिष्ट गती आहे). काहींना तर ही सर्वात शेवटची आरती आहे म्हणूनदेखील आवडते (चला संपलं एकदाचं हा भाव त्यामागे असतो). थोडक्यात काय तर या आरतीचा आपल्याला वर्षातून किमान २-३ दिवस तरी अनुभव येतो. मग तो अनुभव म्हणण्याचा असो वा ऐकण्याचा.

या आरतीच्या पहिल्या चार ओळी खूप महत्त्वाच्या आहेत. थोडक्यात या चार ओळींचा अर्थ सांगायचा झाला तर तो असा सांगता येईलः

घालीन लोटांगण ः साष्टांग नमस्कार.

वंदीनं चरण ः पाया पडणं किंवा वाकून/गुडघे टेकून चरणस्पर्श करणं.

डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ः अंतर्मनाने तुझं अंतररूप पहाणं.

प्रेमे आलिंगन ः प्रेमाने आलिंगन देणं किंवा मिठी मारणं.

आनंदे पूजन भावे ओवाळीन ः भाव ओवाळून टाकणं किंवा शरण जाणं किंवा स्वाधीन होणं किंवा पूर्णपणे विसंबून/अवलंबून राहणं/काही प्रमाणात भावनिकदृष्ट्या परावलंबी होणं.

म्हणे नामा ः संत नामदेव म्हणतात.

आता सविस्तर लिहायचंच झालं तर यांपैकी तीन महत्त्वाच्या कृतिंबद्दल लिहावं लागेल. एक म्हणजे साष्टांग नमस्कार, दुसरं म्हणजे पाया पडणं आणि तिसरं म्हणजे आलिंगन देणं. बहुदा आपल्या अवतीभवती या तिन्ही कृतिंचा संबंध हा ‘आदर’ (शक्यतो वयोमर्यादा लक्षात ठेवून), रीती-रिवाज-पद्धती आणि संस्कृतीशी जोडला जातो. कधी कधी याचा धर्माशी आणि जातिंशीदेखील संबंध जोडला जातो. खरंच असं आहे का? नक्की काय बरं असतो या सगळ्या कृतिंचा आपल्या थेट दैनंदिन जीवनाशी संबंध? यांना आपल्या नात्यांमध्ये नक्की किती आणि काय महत्त्व असतं? असे अनेक प्रश्न आणि अशाच अनेक प्रश्न-उत्तरांचा वेध आणि शोध.

घालीन लोटांगण हा मुळात नामदेवांचा अभंग आहे. त्याला चाल लावून तो अभंग (आरतीरूपात) म्हटला जातो किंवा गायला जातो. पण यामध्ये खूप काही दडलं आहे. एखाद्याला आपण साष्टांग नमस्कार करतो किंवा एखाद्याच्या आपण पाया पडतो किंवा एखाद्याला आपण आलिंगन देतो म्हणजेच आपण सर्वस्वी एखाद्याला शरण जातो किंवा आपण पूर्णपणे एखाद्याला सर्वस्व अर्पण करतो. भाव ओवाळून टाकणं किंवा जीव ओवाळून टाकणं असंदेखील आपण यास म्हणू शकतो. एखाद्याला पूर्णपणे स्वाधीन होणं किंवा एखाद्यावर अवलंबून राहणं किंवा विसंबून राहणं हा देखील त्यामागचा अर्थ आहे.

उदाहरण द्यायचं झालं तर लहान मुलगा किंवा मुलगी हे पूर्णपणे स्वतःच्या आईवडिलांवर अवलंबून असतात. आईवडील हेच त्याच्यासाठी मार्गदर्शक आणि एक आदर्श व्यक्तिमत्त्व असतं. एकप्रकारे लहान मूल स्वतःच्या आईवडिलांना पूर्णपणे शरण गेलेलं असतं कारण त्याचे आईवडील आणि त्यांच्या अवतीभवतीचं वातावरण हेच त्याच्या दृष्टीने त्याचं जग असतं. म्हणूनच लहान मुलं नेहमी आईवडिलांच्या पाया पडतात किंवा साष्टांग नमस्कार घालतात किंवा प्रेमाने आलिंगन देतात. पण ज्यावेळेस मुलं मोठी होतात (ती स्वतःच्या पायावर उभी राहतात) तेव्हा ती मुलं सर्वस्वी आईवडिलांवर अवलंबून नसतात, म्हणूनच जे हात लहानपणी आईवडिलांचे चरणस्पर्श करत असतात तेच हात मोठे झाल्यावर आईवडिलांच्या खांद्यावर आधारासाठी ठेवले जातात. कारण त्यावेळेस परिस्थिती नेमकी उलटी असते. म्हणजेच मुलं मोठी होतात तेव्हा आईवडिलांचं जग हे स्वतःच्या मुलांभोवती बर्याच प्रमाणात मर्यादित झालेलं असतं.

पण मग वय वाढल्यावर मुलांनी मोठ्यांच्या पाया पडू नये का? मोठं झाल्यावर किंवा आपण म्हणू की स्वावलंबी झाल्यावर मुलांनी/मुलींनी पाया पडण्याऐवजी हात जोडून नमस्कार करावा. (अर्थात असं करणं अनिवार्य नाही तर हा एक केवळ पर्याय आहे). म्हणजेच दैनंदिन जीवनात कुणी भेटल्यावर कसे आपण हात जोडून नमस्कार करतो ना अगदी तसंच. मुळात आपण हात जोडून का नमस्कार करतो कारण आपण उष्णकटिबंधात राहतो म्हणून. जर आपण थंड प्रदेशात किंवा वातावरणात राहत असतो तर आपण समोरच्याशी हात मिळवले असते कारण वातावरण थंड असल्याकारणाने जर आपण हात मिळवले तर ऊर्जा निर्मिती किंवा ऊब निर्माण होते. पण जर आपण उष्ण कटिबंधात राहत असू तर अधिकच्या उष्णतेची गरज नसल्यामुळे आपण आपलेच हात जोडून नमस्कार करतो. आता इथेही खूप गैरसमज आहेतच. थंड प्रदेश हे प्रगत देश ओळखले जात असल्यामुळे त्यांच्याकडील सार्वजनिक पातळीवरच्या चालीरीती (मिठी मारणं, हात मिळवणं) या प्रगतीच्या वाटेवरची लक्षणं आहेत असा गोड गैरसमज उष्ण कटिबंधातील लोकांमध्ये आहे. त्यालाच इंग्रजीत फॉर्वर्ड असणं असंदेखील संबोधतात. आजूबाजूचं वातावरण, नैसर्गिक स्थिती जशी असेल तशा आपल्या कृती निर्मित किंवा निर्माण झाल्या आहेत. पण अज्ञानामुळे गैरसमज वाढत जातात आणि त्यांचं रूपांतर रीती-रिवाज-पद्धतींमध्ये होतं.

आता या अभंगावरून स्पष्ट होतं की, पाया पडणं, आलिंगन देणं आणि साष्टांग नमस्कार करणं या सगळ्या कृतिंमध्ये आदर, प्रेम किंवा प्रेमाची ऊब अशा अनेक भावनांचा समावेश असला तरी या कृतिंचा थेट संबंध वयाशी मुळीच नसतो. एखाद्यावर अवलंबून रहायचं असेल किंवा एखाद्याला शरण जायचं असेल किंवा स्वतःला स्वाधीन करायचं असेल किंवा एखाद्याला सर्वस्व अर्पण करायचं असेल तर त्या दोन्ही व्यक्तिंनी एकमेकांना ओळखणं गरजेचं आहे. माणूस हा नेहमीच प्रगल्भ होत असतो. त्यामुळे कुठल्याच माणसाला कोणीही पूर्णपणे ओळखू शकत नाही, हे जरी खरं असलं तरी एखाद्याच्या पाया पडण्यासाठी किंवा एखाद्याला आलिंगन देण्यासाठी त्या व्यक्तिला जास्तीत जास्त ओळखणं गरजेचं आहे किंवा व्यवस्थित ओळखणं गरजेचं आहे आणि एकमेकांना ओळखण्यासाठी किमान काही काळ तरी एकमेकांवर वेळ खर्च करावाच लागतो. काहीजण वैज्ञानिक दृष्टिकोनातून असंही बोलतात की एखाद्या माणसाच्या पायांना जर स्पर्श केला आणि त्या व्यक्तिने आपल्या डोक्याला स्पर्श केला की उर्जांची देवाणघेवाण होते. हे जरी खरं मानलं तरी सकारात्मक उर्जांची देवाणघेवाण होण्यासाठी त्या दोन्ही व्यक्तिंचं एकमेकांना व्यवस्थित ओळखणं गरजेचं नाही का? कारण ऊर्जा नकारात्मक पातळीवरचीसुद्धा असू शकते ना.

पाया पडणं, आलिंगन देणं आणि साष्टांग नमस्कार यांचा थेट संबंध हा संस्कार, वयाचा मान, रीती-रिवाज-पद्धतीशी जोडला गेल्यामुळे खरा मतितार्थ दूरच सारला गेला. उदाहरण द्यायचं झालं तर एक प्रसंग आहे जो आपण वारंवार बघतो किंवा कधी कधी अनुभवतोदेखील. मला हा प्रसंग खूप गमतीदार वाटतो. हा प्रसंग असतो मुलगी बघण्याचा कार्यक्रम. मुलगी चहा आणि कांदे-पोहे घेऊन येते. ती सगळ्यांना म्हणजेच मुलाला आणि त्याच्या आईवडिलांना त्याचं वाटप करते. मग मुलीचे वडील मुलीची ओळख करून देतात, ही माझी ज्येष्ठ/कनिष्ठ कन्या/कन्यारत्न. मग लगेच मुलगी तिला बघायला आलेल्या मुलाच्या आईवडिलांच्या पाया पडते. आता पाया पडण्याचा खरा अर्थ किंवा इतिहास हा आपण संत नामदेवांच्या अभंगात वर पाहिला.

ज्याचं मुखदर्शन पहिल्यांदा त्या मुलीला होत आहे. म्हणजेच काही काळापूर्वी त्या मुलीने ज्यांना कधी पाहिलंदेखील नव्हतं, त्याच्याच ती पाया पडते म्हणजेच शरण जाते, स्वाधीन होते, सर्वस्व अर्पण करते, त्यांच्यावर अवलंबून राहण्यास तयार होते हे सगळं किती हास्यास्पद आहे. पण मग प्रश्न असा आहे की, हे असं का घडतं? याचं उत्तर म्हणजे पाया पडणं या कृतिचा समावेश संस्कार, ‘आदर’, ‘मोठ्यांचा मान’ यासारख्या संज्ञेखाली केला गेल्यामुळे.

ज्यावेळेस ती मुलगी पाया पडते तेव्हा ती ज्यांच्या पाया पडते त्यांना काही क्षणात दृष्टांत होतो की मुलगी संस्कारी आहे (म्हणजेच या मुलीवर चांगले संस्कार झाले आहेत) आणि याची आपल्याला जाण आहे म्हणजेच आपणदेखील संस्कारी आहोत. मुलीच्या आईवडिलांनादेखील साक्षात्कार होतो की आपण मुलीवर किती चांगले संस्कार केले आहेत. म्हणजेच आपणदेखील संस्कारी आहोत. थोडक्यात काय तर एका व्यक्तिच्या पाया पडण्याने तिथलं सारं वातावरण संस्कारमय होतं. आपण सगळे किती स्वतःला फसवण्यात तरबेज असतो ना? याला म्हणतात स्वतःचाच चांगुलपणा स्वतःमध्येच शोधणं आणि त्यासाठी बुद्धी बाजूला सारून, रूढी-परंपरेचा आधार घेऊन, अज्ञानात सुखी राहणं.

आपला चांगुलपणा आपल्यात शोधू नये, तर तो आपल्यांमध्ये (आपल्या माणसांत) शोधावा. याची सुरुवात कधी झाली हे समजण्यासाठी आपण एक दैनंदिन जीवनात घडणारा प्रसंग घेऊया. एक लहान मूल ज्याचा वाढदिवस आहे किंवा अन्य काही कारणास्तव घरी एक उत्सव साजरा केला जात आहे असं म्हणूया. अशावेळी ते लहान मूल अगदी मनोभावे आपल्या आईवडिलांच्या पाया पडतं. आईवडिलांपर्यंत त्याच्या भावना पोहोचतात. पण आईवडिलांना थोडं अवघडल्यासारखं वाटतं. कारण ते जे मूल आहे त्याचे दोन्ही आजीआजोबा तिथे उपस्थित असतात. त्यामुळे त्यांच्यामते हे बरं नाही दिसत (किंवा अन्य काही कारणं). मग आईवडील आपल्या मुलाला निर्देश करतात की आजीआजोबांच्या पाया पड. पण त्याचवेळी ते जे लहान मूल आहे त्याच्या आजीआजोबांचे भाऊबहीणदेखील तिथे उपस्थित असतात. मग त्या मुलाला त्यांच्याही पाया पडावं लागतं आणि हा प्रकार असा वाढतच जातो. मग तिथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर आपल्या घरातदेखील त्याची पुनरावृत्ती करतात. कारण त्यांना असं वाटतं की हे सगळं असंच करायचं असतं. कारण पाया पडणं म्हणजेच मोठ्यांना मान देणं होय किंवा मोठ्यांचा आदर करणं होय आणि हे असं पिढ्यान्पिढ्या चालू राहिलं की पाया पडण्याच्या अशा या कृतिला रूढी-परंपरा-पद्धती-संस्कार या वेष्टनाखाली ठेवून त्याचा यथेच्छ उपभोग घेतला जातो. चुकीच्या रूढी-परंपरेचं हे एक उत्तम उदाहरण आहे असं आपण म्हणू शकतो.

थोडक्यात सांगायचं तर आपण दैनंदिन जीवनात जे काही करतो त्याची योग्य चिकित्सा केली (आपापल्या कुवतीनुसार) तर त्याचा फायदा पिढ्यान्पिढ्या होऊ शकतो. अनेक पिढ्या घडवण्यात आपला हातभार लागू शकतो. संत नामदेवांनी कित्येक वर्षांपूर्वी जो अर्थ सांगितला आहे तो समजून घेण्याऐवजी त्याचा केवळ रूढी-परंपरेच्या नावावर आरती ओवाळण्यात किंवा गणपतीचं विसर्जन होईपर्यंत कर्तव्य पार पाडण्याकरता किंवा आरती म्हणायचे सोपस्कार पूर्ण करण्यापर्यंतच मर्यादित राहू नये. पाया पडणं, साष्टांग नमस्कार घालणं आणि आलिंगन देणं या कृतिंमागे एक ठरावीक अर्थ आहे तो आपण माणसं बहुतांशी आपापल्या सोयीनुसार सोईस्कररित्या त्याचा वापर करतो आणि पिढ्यान्पिढ्या तोच अर्थ रेटत राहतो किंवा तसा रेटत रहावा म्हणून हट्ट धरतो.

पाया पडणं, साष्टांग नमस्कार घालणं आणि आलिंगन देणं म्हणजे मनोभावे शरण जाणं, स्वाधीन होणं, सर्वस्व अर्पण करणं, विसंबून किंवा अवलंबून राहणं होय. म्हणजेच सांगण्याचा हेतू असा की जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तिच्या पाया पडते, साष्टांग नमस्कार घालते किंवा आलिंगन देते तेव्हा त्या दोन्ही व्यक्तिंना त्याचा अर्थ समजून त्याचं महत्त्व जपणं अनिवार्य असतं.

शिरीष फडकेकलमनामा – ३१/०८/२०१४ – लेख १ - घालीन लोटांगण

field_vote: 
2.25
Your rating: None Average: 2.3 (4 votes)

प्रतिक्रिया

लेखातील विचार आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखाची मांडणी चांगली झालेली आहे. मात्र सगळेच विचार पटले नाहीत.

मुळात आपण हात जोडून का नमस्कार करतो कारण आपण उष्णकटिबंधात राहतो म्हणून. जर आपण थंड प्रदेशात किंवा वातावरणात राहत असतो तर आपण समोरच्याशी हात मिळवले असते कारण वातावरण थंड असल्याकारणाने जर आपण हात मिळवले तर ऊर्जा निर्मिती किंवा ऊब निर्माण होते.

तुम्हाला उष्णता ऊर्जैविषयीच म्हणायचं असेल तर हे विधान बरोबर नाही. कारण दुसऱ्याच्या हाताला हात लावून जी ऊर्जेची देवाणघेवाण होते तीच नमस्कारातून होते. फरक इतकाच की दुसऱ्याचा हात थंड असेल तर आपली ऊर्जा कमी होते आणि दुसऱ्याला ती मिळते. म्हणजे एकाला उबदार, बरं वाटतं तर दुसऱ्याला थंड, त्रासदायक वाटतं.

काहीजण वैज्ञानिक दृष्टिकोनातून असंही बोलतात की एखाद्या माणसाच्या पायांना जर स्पर्श केला आणि त्या व्यक्तिने आपल्या डोक्याला स्पर्श केला की उर्जांची देवाणघेवाण होते.

हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून वगैरे सत्य नाही. जवळीक साधल्याने, मनोभावे नमस्कार केल्यामुळे, मान दिल्या-घेतल्यामुळे एक आपलेपणा वाढतो असं निश्चित म्हणता येईल.

मला वाटतं नमस्कार करणं, हस्तांदोलन करणं, मिठी मारणं, पायाला स्पर्श करणं - हे सगळे समाजात प्रस्थापित झालेले वेगवेगळ्या पातळीवर जवळीक साधण्याचे मार्ग आहेत. एका अर्थाने ती सकारात्मक कर्मकांडं आहेत. त्यामुळे हे चांगलं किंवा ते वाईट असं म्हणणं कठीण आहे. प्रस्थापित कर्मकांडं असल्यामुळे अनेक वेळा ती उरकून टाकली जाणार, करवून घेतली जाणार हेही येतंच. कर्मकांडांचा एक गुणधर्म असा की ती करताना फार विचार करू नये, एक पद्धत म्हणून करावी हेही होतंच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवादातून नेमकी कोठली ऊर्जेची/उष्णतेची देवाणघेवाण होते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मध्ये वाद आहे. आणि वादे वादे जायते कण्ठशोषः अशी उक्ती सुप्रसिद्ध आहेच. कण्ठशोष होणे म्हणजे ध्वनी ऊर्जेत रूपांतरण केल्यामुळे गळ्यातील 'जलज' ऊर्जा कमी होणे. हीच ती देवाणघेवाण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(विथ ऑल द वार्म्थ इन्हेरण्ट देअरइन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या आरतीचे एक विडंबनही ऐकले आहे. लहानपणी आम्ही रहात होतो त्या कॉलनीत एक देऊळ होते. तिथे रोज संध्याकाळी आरतीला आम्ही सर्व मुले हजर असायचो. त्यावेळेस, ही आरती चालू असताना, काही पोरे वेगळेच शब्द उच्चारत आहेत असा आम्हाला शोध लागला. जास्त खोलांत गेल्यावर त्या दिव्य काव्याचा परिचय झाला.
लहानपणातलेच संस्कार(?) ते! आताही कोणी ही आरती म्हणायला लागले की माझ्या कानांत तेच शब्द ऐकू येतात. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0