Comfort Zone

मनाला सुदृढ ठेवणं म्हणजे काय? मनाची काळजी घेणं!

मनाची काळजी घेणं म्हणजे नक्की काय? मला जाणवलेला याचा अर्थ आहे --- आपल्या Comfort Zone मधून बाहेर पडणं. स्त्री-पुरूष हे दोघांनाही लागू होतं. आपण जेव्हा गप्पा मारतो, ग्रुप कोणताही असो, नातलग-मित्रपरिवार, तेव्हा आपण सहजपणे म्हणतो, ‘रूटीन व्यवस्थित सुरू आहे गं / रे, पण -- !’ ह्या ‘पण’पाशी आपण थांबतो. ‘पण’ च्या नंतर जे म्हणणार असतो, ते सोडून देतो, त्याकडे दुर्लक्ष करतो. हे काही मुद्दाम करत नाही. कारण बरेचदा आपण हे विसरलेलो असतो, किंवा ‘साईडींगला’ टाकतो, किंवा ‘दडपून’ टाकतो. असं का होतं?
‘आहे मनोहर तरि, गमते उदास!’ हा ‘उदास’पणा कशामुळे असतो?

काय बरं विसरलेलो असतो आपण? आपल्या ‘मी’ला आपण विसरलेलो असतो. जगतानाचे आपले प्राधान्यक्रम बदललेले असतात आणि आपल्या आतील ‘मी’च्या बाबत आपण उदासीन असतो. ह्या ‘मी’ला काय हवंय, काय आवडतंय हे ठाऊक असूनही आपण ते करत नाही आणि मग मनाच्या कोपर्‍यात शिल्लक असलेला ’मी’ आपल्याकडून वदवून घेतो --- ‘रूटीन व्यवस्थित सुरू आहे गं / रे, पण -- !’
तर, ह्या ‘मी’ला भिडणं म्हणजे Comfort Zone मधून बाहेर पडणं.
आपल्यातील ‘मी’ला भेटणं ---
‘मला वाचनाची आवड आहे’ हे मी कालौघात विसरून गेले होते. मुद्दाम नव्हे, परंतु प्राधान्यक्रम बदलले गेले होते. शिक्षण-नोकरी-छोकरी-संसार-इ. पण जेव्हा संधी मिळाली, घरपोच वाचनालयाची सोय झाली तेव्हा मला आठवलं की मला वाचनाची आवड आहे. पुस्तकं समोर येत गेली, वाचलेल्या पुस्तकाविषयी मैत्रीणींना सांगायचंय ह्यातून मला लिहिता येतं हे समजलं. अन मग माझा जीवनक्रमच जणू बदलून गेला. माझ्यातील ठाऊक नसणारी ‘मी’ मला सापडत राहिली, आजतागायत!
तर असं स्वत:तील ‘मी’ला सापडणं म्हणजेच आपल्या Comfort Zone मधून बाहेर पडणं आहे. ह्यात कष्ट आहेत, परिश्रम आहेत.

Comfort Zone मधून बाहेर पडता येण्यासाठी एक समजून घेतलं पाहिजे की, आपल्यात सगळे गुणावगुण असतात. आपण हुशारही असतो, मूर्खही असतो. आपण उद्योगी असतो, आपण आळशीही असतो. आपण चतुर-कल्पक असतो, आपण बुद्दूही असतो. इत्यादी...
त्यामुळे आपल्यातील कुठले गुण वाढवले पाहिजेत अन कुठले अवगुण कमी केले पाहिजेत ह्याचा अभ्यास केला, ज्याला SWOT Anaysis म्हणतात, तो केला तर आपल्यातील ‘मी’ सापडणं अन ह्या ‘मी’मधे आपल्या आवडीनुसार बदल करता येणं शक्य असतं. ते केलं पाहिजे, कारण ‘स्वभावाला औषध असतं’! ही एक प्रक्रिया आहे, अव्याहत सुरू राहणारी. एकदा का ह्या प्रक्रियेत शिरलो की त्यातून सुटका नाही.

कोषातील सुरवंटाला कोषातून बाहेर पडणासाठी स्वत:च कष्ट घ्यायचे असतात. अन तेव्हाच सुरवंटाचं फुलपाखरू बनतं...

आपल्यातील सुरवंटाला जागं करू या.

चित्रा.... ०८.०३.२०१४

field_vote: 
2.333335
Your rating: None Average: 2.3 (3 votes)

प्रतिक्रिया

चटके बसणार नाही अशा जागी स्वत:ला कोंडणे हे टाळून बाहेर पडणे ,निगरगट्ट होणे ?कोषातून बाहेरच्या जगात झोकणे ?मी बाहेर आऽलो सांगायला गेलो तर "हो का ?आम्ही अशा कोषात कधी नव्हतोच. कासवाच्या पिलांसारखे जाड पाठ घेऊनच फिरतो आहोत. कधी कधी पडतो उताणे काय करणार ?आकाशाकडे पाहत राहायचं "

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लाऊड थिंकिंग - संस्थळावरती फक्त लेख न टाकता, अन्य लोकांच्या लेखांना कमेंट देणे हे कोशात असल्याचे लक्षण की कोशातून बाहेर पडल्याचे लक्षण असावे? Wink ह. घे.
___
चित्रा तुला उद्देश्यून जरी ही कमेंट असली तरी अन्य काही लेखकांनाही ती लागू पडते. तू काही काळ माझ्या फेसबुकवर असल्याने अधिक अ‍ॅक्सेसिबल वाटतेस अन मुख्य म्हणजे तू येथे अधिक वावरावे व कमेंटसही लिहाव्यात असे मनापासून वाटते म्हणून आज अखेरीस ही कमेंट टाकण्याचे धाडस केले. खव/व्यनितू भावना पोचवत्या आल्या असत्याच पण ... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमच्यासारख्या किंचिंत लेखकांना मोठे लेख झेपत नाहीत आणि संस्थळांवरच्या सुंदर पुळणीवर(वाळूचा किनारा)दुसऱ्याच्या कलाकृतीच्याशेजारी रेघोटया ओढल्याशिवाय चैन पडत नाही.बिचारे चालवून घेतात.

कोश /कोष {सुरवंटाचा ,भाषेचा}कोणता शब्द बरोबर? संपादन करून टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0