Skip to main content

पाठ फिरता बोलती तो पोर आहे

***********************************************

लागला माझ्या जिवाला घोर आहे
भेटतो जो जो इथे तो चोर आहे

रंगला ना सावळ्याचा रास येथे
कंस इथल्या गोकुळी शिरजोर आहे

विठ्ठला सोडा कटीचे हात आता
का 'बळी'च्या गर्दनी तो दोर आहे

सांगतो रस्ता मला थांबू नको तू
अडथळ्यांचा मात्र थोडा जोर आहे

भेटल्यावर सुज्ञ ते म्हणती मलाही
पाठ फिरता बोलती तो पोर आहे

बोल का हो लावता त्या सावल्यांना?
दाटला अंधार हा घनघोर आहे

हो विशाला आज थोडा बोलका तू
सोड आता मौन..., ते कमजोर आहे !

***********************************************

विशाल कुलकर्णी

गब्बर सिंग Tue, 30/12/2014 - 05:08

कविता आवडली ओ.

(
पाठ फिरता बोलती तो पोर आहे

एकदम आवडले व पटले. आपल्याकडे दुसर्‍याचे पटले नाही की त्याला बालिश म्हणण्याची महान परंपरा आहे. अ‍ॅड होमिनिझम चे च अपत्य आहे हे.

एकीकडे - बालादपि सुभाषितम ग्राह्यम - असे मिरवायचे पण दुसरीकडे ...
)

बॅटमॅन Thu, 08/01/2015 - 20:50

In reply to by गब्बर सिंग

असल्या वेडझव्या परंपरा पाळणार्‍यांना तोंडावर उत्तर दिले की लय मज्या येते.

वामा१००-वाचनमा… Fri, 09/01/2015 - 05:57

In reply to by बॅटमॅन

मला जाम त्रास होतो. ना तोंडावर उत्तर देता येतं, ना दुर्लक्ष करता येतं. लोक इतके मॅनरलेस अन कॅलस असतात ना. :(

इंग्रजी शब्दांबद्दल क्षमस्व पण भाषांतर करण्यापेक्षा, राग असाच व्यक्त करावासा वाटला.

गवि Fri, 09/01/2015 - 12:29

तुझे भारीच आहे पण.. अ‍ॅडिशन ;)

तोंडावरि ते म्हणती तिला गुणी पोरगी
पाठ फिरता बोलती ती चटोर आहे

भेटल्यावर नमस्कार ते करती मलाही
पाठ फिरता बोलती ते त्याचे पोर आहे

-(कोंकणभोचक) गवि

विवेक पटाईत Thu, 09/04/2015 - 20:10

हो विशाला आज थोडा बोलका तू
सोड आता मौन..., ते कमजोर आहे !

कविता आवडली. मौन म्हणजे कमालीची अस्वीकृती. प्रतिकार न करण्याची लाचारी.