हॉस्टेल लाईफ आणि नवरस

हॉस्टेल ला राहाण हा एक श्रीमंत करणारा अनुभव असतो . हॉस्टेल लाईफ बद्दल एकदम वाईट अनुभव असणारे लोक आणि एकदम भन्नाट अनुभव असणारे लोक असे दोन गट . अधल मधल काहीच नाही . सुदैवाने मी दुसर्या गटात मोडतो . खालचे अनुभव माझे असले तरी थोड्या फार फरकाने हॉस्टेल मध्ये राहिलेल्या प्रत्येकाचेच .

हास्य रस - माझ इंग्रजी तेंव्हा यथातथाच होत . छोट्या शहरामधून आल्यामुळे mannerism चा पत्ता नव्हता . सकाळी शिक्षकांना आल्या आल्या good morning म्हणायचे असते हे नुकतेच कळले होते . एकदा रात्री रस्त्यावर फिरताना रेक्टर सर भेटले . त्याना बघितल्या बघितल्या मी 'Good Night Sir ' म्हणून मोकळा झालो . सरांनी दुसऱ्या दिवशी केबिन मध्ये बोलावून दंड ठोठावला . 'प्रश्न पैशांचा नाही . पण Good Night हे निरोप देताना म्हणायचे असते हे तुझ्या मठ्ठ डोक्यात शिरले पाहिजे . " सरांनी दंड का या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले . गरवारे कॉलेज हॉस्टेल नदी काठी आहे . अकोल्याच्या सुमित केडिया ने हि नदी गंगा नदी आहे असे सांगत आमच्याशी तासभर वाद घातला होता . नवीन पोरांचा 'इंट्रो ' घ्यायला रुबाबात आम्ही निघालो आणि त्या मोकार ज्युनियर पोरांनी आमचाच इंट्रो घेतला होता . आज ती पोर मित्र बनली आहेत पण अजूनही तो इंट्रो चा प्रसंग आठवला की हसू येत .

बीभत्स रस - हॉस्टेल लाइफ़ मध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा रस . आमच्या हॉस्टेल ची मेस लावणे सगळ्यांना सक्तीचे होते . त्यामुळे झक मारून तिथच जाव लागायचं . मेस चा मालक भाऊ च एक लाडक मांजर होत . त्याला हाड हुड कुणी केलेलं पण भाऊ ला खपायच नाही . त्यामुळ ते मांजर कुठेही फिरायचं आणि पडायचं . एकदा त्याला मी आणि माझ्या मित्राने कोबी च्या गड्ड्यावर प्रतीर्विधी उरकताना बघितलं होत . त्याच दिवशी पानात कोबी ची भाजी आली . मी आणि मित्र सटकलो काहीतरी कारण सांगून . आणि बाकीच्यांचं जेवण झाल्यावर आम्ही हे गुपित फोडलं . त्यांची प्रतिक्रिया काय होती हे इथे सांगू शकत नाही . आमच्या रूम च्या अस्वच्छतेच्या तर दंतकथा पसरल्या होत्या . रूम ला महिनो ना महिने झाडू लागत नसे . रूम मध्ये एवढा कचरा होता की त्यात एक छोटी बादली हरवली होती . ती होस्टेल सोडताना सापडली . त्या कचरा आणि दुर्गंधी युक्त रूम मध्ये आम्ही तिघ जण लोळत पडलेलं असू . एकदा माझ्या रूम पार्टनर ने ३ आठवडे कपडे सर्फ मध्ये बुडवून ठेवले होते . आमच्या संवेदना मेल्या होत्या पण त्याच वेळेस मला भेटायला चुलत भाऊ आला होता . तो अजूनही सांगतो की त्यावेळेस जो वास सर्वत्र पसरला होता तो जगताला सगळ्यात किळसवाणा वास होता . आणि तो केमिकल अभियंता आहे .

अदभुत रस - अदभुत म्हणजे आश्चर्य आणि उत्सुकता . घरात अनेक वर्ष एक सुरक्षित आयुष्य काढून हॉस्टेल ला आल्यावर पोहोता न येणाऱ्या माणसाला एखाद्या खोल विहिरीत ढकलून जस वाटत तस वाटत . हॉस्टेल हे जंगला सारख असत . survival spirit उच्च ठेवून राहावं लागत . एकदा आपल्या समानधर्मी मित्रांचा कळप जमला कि हे होतकरू नवोदित विद्यार्थी हे सुंदर जंगल explore करायला लागतो . तोंडात लोणच्याची फोड ठेवायला लागल्यावर तोंडात वेगवेगळ्या चवींचे हवेहवेसे स्फोट होतात तस हॉस्टेल मधला प्रत्येक नवा दिवस काहीतरी नवीन देऊन जातो . हॉस्टेल च्या जगात एकट्यानेच एन्ट्री केली तरी जाताना माणूस कधीच एकटा बाहेर जात नाही . सोबत असतात ते जीवाला जीव लावणारे अनेक मित्र . पाकिस्तान कसा नष्ट करता येईल , रूम मधल्या ढेकणा चा बंदोबस्त कसा करावा , भारत नेहमी विदेशी भूमी वर सामने का हरतो , पोरी कशा फिर्वाव्यात अशा अनेक विषयावर रात्र रात्र झालेल्या चर्चा , महाराष्ट्र आणि देशातल्या विविध भागातून आलेले मित्र , त्यातून झालेली वेगवेगळ्या संस्कृतींची ओळख , आणि जगाचे झालेलं नवीन आकलन . हॉस्टेल मधून बाहेर पडणारा माणूस अंतर्बाह्य बदलून बाहेर पडतो .

क्रौर्य रस - होस्टेल हि एक खूप क्रूर गोष्ट पण आहे . अर्धेंदू नावाचा एक अर्धवट डोक्याचा पोरगा होता . त्याला वागण्या बोलण्याचा फारसा पोच नव्हता . इतर पोर त्याला छळ छळ छळायची . एकदा एका मुली ने तुला कार्ड दिल आहे आणि तुला भेटायला बोलावलं आहे अस सांगून आपणच एक कार्ड त्याच्या हातात कोंबल . त्या येड्याला पण ते खर वाटलं . आणि त्या पोरी समोर जाऊन काही तरी बोलल . पोरीन त्याला थोबडावला . बिचारा अर्धेंदू होस्टेल सोडून गेला . हॉस्टेल ला काही पूर्वोत्तर राज्यातून आलेली काही मुल होती . दिसायला एकदम वेगळी आणि भाषेचा प्रश्न . ग्रामीण भागातून आलेली इरसाल पोर त्याची जाम मजा घ्यायची . पण ते कधी कधी खूप अति करत . आपण किती रेशियल लोक आहोत हे तेंव्हा मला कळल . नंतर ती पुर्वोतर राज्यातली पोर एकजात सगळी लष्करात गेली . पण देशाचा उर्वरित भाग आपल्याला 'आपल ' समजत नाही हे फिलिंग त्यांच्या डोक्यातून गेल असेल का कधी ?

भय रस आणि रौद्र रस - आमच्या हॉस्टेल ला रोज सकाळी ६ ते ६. ३० पीटी सक्तीची होती . आम्ही एखादा बकरा पकडून त्याला रूम ला बाहेरून कडी लावून घे आणि जा असे सांगून स्वतः मध्ये लोळत पडत असू . नंतर नंतर आजूबाजूच्या रूम मधले पोर पण सकाळी तिथे येउन पडायला लागले . रेक्टर सरांना याची कुणकुण लागली . एका दिवशी आम्ही असच बाहेरून कडी एकाला लावायला सांगितली आणि लोळत पडलो होतो आणि सर धाडकन दरवाजा उघडून मध्ये आले . आणि जमेल तसे हात पाय चालवायला सुरु केले . तो प्रसाद ग्रहण करत आम्ही धडपडत बाहेर आलो . नंतर २ आठवडे आम्हाला कॉलेज च्या मोठ्या मैदाना ला १५ चकरा मारण्याची शिक्षा मिळाली .

शृंगार रस - बीभत्स रस हा सर्वाधिक आढळणारा रस असेल तर शृंगार रस हा सर्वाधिक अभाव असणारा रस . अर्थात काही मोजक्या वीरांचा अपवाद वगळून . जो काही शृंगार रस असतो तो एकाच format मध्ये . ईथे जे हॉस्टेल मध्ये राहिलेले आहेत त्या लोकांना तो न सांगताच कळेल .

वीर रस - हॉस्टेल तुम्हाला शूर बनवत . घरून आलेला खाऊ इतरांपासून लपवून एकट्याने खाणे , एखाद्या खोडकर अंग्काठीने मोठ्या पोराला अंगावर घेणे , बंदी असताना रात्र भर पत्त्याचा डाव रंगवणे , खिशात शेवटचे ५० रुपये असताना महिन्याचे १५ दिवस काढणे , हॉस्टेल चे गेट ९. ३० ला बंद होत असते तरी पण रात्री पिक्चर बघायला जायचं आणि एका अवघड खांबाचा आधार घेऊन चढून जाण एक ना दोन प्रकार . खूप भितींवर मात करायला हॉस्टेल शिकवत .

शांत रस - हॉस्टेल सोडण्याचा दिवस . सगळीकडे एक विचित्र ओक्वर्ड शांतता . सगळीकडे सामानाची बांधाबांध चालू . बाहेर निरव शांतता पण डोक्यात कल्लोळ . हे हरामखोर मित्र पुन्हा कधी भेटतील ? बाहेरच जग हॉस्टेल सारखच मजेशीर आणि भन्नाट असेल का ? आता कुठ राहायचं ?दुसऱ्या मेस चा मालक आपल्या मेस मालक भाऊ सारख बाहेर जेवायला जाताना पैसे उधार देईल का ? बिपीन आणि प्रभाकर सारख फास्ट फुड दुकान दुसरीकडे असतील का ? हॉस्टेल च्या खिडकीत बसून पडणारा पाऊस आणि नदीच वाढत जाणार पाणी तासंतास बघायला कसली मजा येते आता ती गेलीच का ? आपले ऋणानुबंध फ़क़्त या हरामी मित्रांसोबत च नव्हते तर या भव्य इमारती शी पण होते हे शेवटच्या दिवशी कळत .

field_vote: 
3.333335
Your rating: None Average: 3.3 (3 votes)

प्रतिक्रिया

तोंडात लोणच्याची फोड ठेवायला लागल्यावर तोंडात वेगवेगळ्या चवींचे हवेहवेसे स्फोट होतात ....

हे जाम आवडलं!
हॉस्टेलवर रहाण्याचा अनुभव नसला तरी रूमवर रहाण्याचा आहे. तेव्हा बीभत्सरसाबद्दल बोलायला नको!
नवरसांची आयड्याही मस्त.
(खुसपट- शुद्धलेखनात मधेमधे टिंबं का हो गाळता? म्हणजे झालं आणि झाल असं दोन्ही आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॉस्टेल च्या खिडकीत बसून पडणारा पाऊस

१००००००००% खरे आहे हे.
_____

काही इंग्रजी गाणी पहील्यांदा हॉस्टेलात ऐकली अन जेव्हा ऐकली ना तासन तास ऐकली. जशी "कॅट्स इन द क्रॅडल", "समर हॉलिडे", "इट्सी बिट्सी टीनी वीनी" अन "बिली जोएलचं रिव्हर ऑफ ड्रीम्स"
____
टेरेसवर "who the fuck is Alice" गाणं (व अन्यही) जोरात लावून नाच केला.
_______
टेरेसवर मैत्रिणींबरोबर रात्र जागवली तेही कॉन्स्टलेशन्स पहात.
_____
All good things come in small packages - असा फिश्पॉन्ड मिळालेला. च्यायला आता कसलं आलय small packages ROFL
पण एकीला तर फार छान मिळाला होता -
हुजूर इस कदर भी ना इतराके चलिये,
खुले आम आंचल ना लेहेराके चलिये

मिळाला होता.
____________________
एका मुली बद्दल तीव्र जेलसी अन तितकच नॉन्सेक्श्युअल आकर्षण अनुभवलं.
____
अन काही न सांगण्याजोगे Wink ...... जानम समझा करो!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी देखील गरवारे हॉस्टेल वर खूप काळ काढला असल्याने (हॉस्टेलचा ऑफिशियल मेंबर नसूनही :P) तुम्ही लिहीलेलं सगळं काही वाचतांना डोळ्यासमोर चित्रं उभी राहिली, भूतकाळाची Smile

गरवारे सभागृहात हॉस्टेलचे कार्यक्रम असले की इतर खाण्याबरोबरच हॉस्टेलच्या अप्रतिम कॉफी ची चंगळ असायची. गरवारेचं आवार, किर्र रात्र, कडाक्याची थंडी आणि त्यात जायफळ घातलेली वाफाळती कॉफी - अहाहा, केवळ अप्रतिम.

फणस, बदाम, अननस ही आवारातली झाडं, भलंमोठं ग्राउंड, बास्केट-बॉल कोर्ट, समोरचं लेडीज-हॉस्टेल, जनता-सहकारी बँकेचा कट्टा, एस.एम.जोशी पूलावरचे कट्टे - किती किती त्या आठवणी. आणि हॉस्टेल शहराच्या मध्यवर्ती भागात असूनही एक वेगळंच विश्व होतं ते - जगाशी घेणं-देणं नसलेलं आणि आतली इतर बंधनं असूनही खूप मुक्त!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान लेख. हॉस्टेलच्या आठवणी जाग्या झाल्या.
---------------
ग्रामीण पार्श्वभूमी असल्यामुळे मी आता जे जीवन जगतो त्यातलं सगळं मी बरंच वय झाल्यावर एकेक करून शिकलो आहे. कोणत्या प्रसंगी किती प्रकारचा मूर्खपणा केला याची खूपच लांब लिस्ट होईल. यातलं बरंच लर्निंग ११-१२ ला शिक्षक, प्राध्यापकांच्या मूलांसोबत मैत्री झाल्यावर झालं, पण बरंच पुण्यात होस्टेलला आल्यावर देखिल झालं. १९९१ ते २००१ पर्यंत मी सगळ्या मित्रांमधे विनोदाचे प्रयोगपात्र राहिलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

:-D.
मी आहे अधलीमधली. अतीवाईट/भन्नाट अनुभव नसलेली. अर्थात मी भल्यामोठ्या, कॉलेज हॉस्टेलमधे राहिले नाहीय. त्यातपरत माझी सिंगलसिटर रूम होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>त्यातपरत माझी सिंगलसिटर रूम होती.

हॅ हॅ हॅ !! तुम्ही हाष्टेलात राहिलाच नाहीत असे खेदपूर्वक नमूद करावे लागत आहे.
[तुमची सिंगलरूम असूनही तुमच्या खोलीत सुमारे तीन विद्यार्थी/र्थिनी कायम असायचे असे असेल तर वरील वाक्य बाद समजावे].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थ्रीसिटरमधेपण राहिलेय आणि फ्ल्याट शेअर करूनपण राहिले आहे. पण भन्नाट अनुभव नाही ब्वॉ काही. नोकरी करणारी असल्याने असेल कदाचीत... विद्यार्थीदशेत हॉस्टेलवर राहण्याचा अनुभव मला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होस्टेलमधे 'स्वावलंबना'चे धडे मिळतात. त्यासाठी आवश्यक असणारे साहित्यही फिरत्या लायब्ररी सारखे उपलब्ध असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अय्यो रामा.. !!! तुम्ही सगळंच सांगायला लागलात की ..!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होस्टेलात जाण्यापूर्वी परावलंबी होतात कि काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लेख जरा - जरा का, चांगलाच! - विस्कळीत झाला आहे. थोडा ऑर्गनाइज़ केला असता तर खूप रंगवता आला असता. असो.

पाकिस्तान कसा नष्ट करता येईल

याकरिता आमचा उपाय: खूप सारी डुकरे गोळा करायची नि त्यांना वाळवंटातून हाकत हाकत राजस्थान-पाकिस्तान बॉर्डरपाशी जायचे. मग त्यांच्या पाठींना खूप सारे हॉट एअर बलून - किंवा गेला बाजार फुगेवाल्याकडे मिळतात तसले हैड्रोजन/हेलियमचे फुगे - बांधायचे, नि वारा 'त्या' दिशेने वाहत आहे असे पाहून सोडून द्यायचे.

एकदम सोपा नि स्वस्त उपाय. When it rains, it pours!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL डुकरे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकिस्तानावरून आठवले. कुठल्याश्या हिंदी लेखकाच्या एका कथेचे नाव 'कितने पाकिस्तान' असे होते. किमान महाराष्ट्रात तरी कैक जण बहिर्दिशेस जाऊन आल्यावर 'पाकिस्तानास जाऊन आलो' असे मजेने सांगत त्या परिप्रेक्ष्यात ती कथा सफाईसंबंधी असावी असा आम्ही ग्रह करून घेतलेला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रोफ्ल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ती कथा सफाईसंबंधी असावी

"पेट की सफ़ाई" काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

याचाच अर्थ त्या सगळयांना पोट नीट साफ न होण्याचा विकार असावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0