उदरभरण नोहे : हल्ली घरी शेवटचे कधी आणि काय खाल्ले ?
आपण रोजच मेसमधे, कँटीनमधे किंवा हॉटेलात (किंवा घराबाहेर म्हणा) एका दिवसात किमान एक वेळेस किंवा त्यापेक्षा जास्त वेळाही जेवतोच. घरुन डबा आणायला विसरलो की सहकार्यांच्या डब्यातले थोडे थोडे खातो. यापैकी काहीच शक्य नाही झाले तर कुणाचा लग्नसमारंभ असेल, वाढदिवसाची पार्टी असेल तर तिथेही जेवतो. हा धागा आपण घरी किंवा घरचे शेवटचे कधी जेवलो ? काय जेवलो ? जेवण स्वादिष्ट होते काय ? जेवण बनविताना बायकोचा (इन रेअर केस स्वयंपाक बनविणार्या नवर्याचा) मुड कसा होता ? तो पदार्थ तुम्हाला आवडला काय ? आवडला नसेल तर बायकोला तसे स्पष्ट सांगण्याची तुमची हिंमत झाली काय ? किंवा तो पदार्थ न आवडल्यामुळे तुम्ही तो तुमच्या सहकार्याला / मित्राला खाऊ घातला आणि रोज रोज मेसमधे जेवणार्या तुमच्या सहकार्याला / मित्राला ते जेवण दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने रुचकर लागला काय ? भाजीत आज केस निघाला काय ? चपात्या (पोळ्या) तोडल्यामुळे तुमच्या दातांचा व्यायाम झाला काय ? नवविवाहित दांपत्यापैकी स्वयंपाक बनविणार्या भिडूने आज चपात्यांमधे कोणत्या देशाचा नकाशा बनविला होता ते तुम्हाला अचूक ओळखता आले काय ? यावर दळण दळण्यासाठी हा धागा आहे.
अर्थात हे खाण्याबद्दलच नाही तर पिण्याबद्द्लही आहे.
आधी या प्रकारचा रुचकर विषय ऐसीवर न आढळल्याने हा नवीन धागा सुरु करत आहोत.