सत्तरीचे गणितज्ञ

------------------------
गणितज्ञ सत्तरीचे
नव्हते पूर्वी सासष्टीचे.
मिळून प्रवास करते झाले,
एकदा तीस वाडीत गेले.
सारे पोचले, नाही हरवले,
बारा जण मुक्कामी आले.
गणितज्ञ सत्तरीचे
नंतर झाले सासष्टीचे.
------------------------
(सत्तरी, सासष्टी/साष्टी, तीसवाडी/तिसवाडी, बाराजण ही गोव्यातील जागांची नावे आहेत.)

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

हॅ हॅ हॅ. मस्त. 'बाराजण' हे नाव माहिती नव्हते. बाकीची नावे परिचयाची होती.

'वीसजण पोहायला गेले तेवीसजण परत आले' ची आठवण आली एकदम. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किंवा हे वीस अन तेवीस किती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डुप्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'वीसजण पोहायला गेले तेवीसजण परत आले' ची आठवण आली एकदम.

कोंकणात यामधेच वीसजण.. "पोहायला गेले ते बावीस .. परत आले ते वीस." असा विहिरीला पात्रयोजनेत अ‍ॅडवून पाठभेद होता.

शिवाय 'रत्नागिरी"ची पळून" गेली भागाबाई' वगैरे चीप अन शुद्धाशुद्ध न मानणारेही काहीतरी प्रकरण होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"एकोनाविंशतिः स्त्रीणां स्नानार्थं सरयूं गता । विंशति: पुनरायाता एको व्याघ्रेण भक्षितः||' हा श्लोक आठवला. तसाच काही अर्थ ह्या कवितेचा आहे काय? उलगडून सांगावा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे सर्व संख्यावाचके जागांची नावे आहेत. अर्थात जागांची नावे होण्याकरिता संख्या सार्थक होत्या, पण आता ती फक्त जागांची नावे आहेत.

म्हणजे सत्तरी, सासष्टी, तीसवाडी येथे अनुक्रमे ७०, ६६, ३० मोजण्यालायक गावे असतीलही. बारा जण ("पंचा"यतीसारखी ग्रामसभा) जिथे भेटत त्या ठिकाणाचे नाव बाराजण झाले, ते पूर्वी.

अशा रीतीने धाग्यातील वाक्यांचा अर्थ लागू शकतो. कुठल्याही वाक्यात दोन संख्यावाचकांपैकी एक किंवा दोन्ही शब्द भौगोलिक आहेत, असे ठरवल्यास वदतोव्याघात नाहिसा होतो. पैकी एकच भौगोलिक करायचे ठरवले, तर कुठले, याबाबत स्वातंत्र्य आहे : ७० वर्षांचे गणितज्ञ आता सासष्टी तालुक्यात राहायला आले, किंवा सत्तरी तालुक्यातले गणितज्ञ आता ६६ वर्षांचे झाले, वा सत्तरी तालुक्यातले गणितज्ञ आता सासष्टी तालुक्यात राहायला आले, असे अर्थाचे तीनही पर्याय चालू शकतील.

तीसवाडी तालुका, बाराजण गावी मुक्काम; ३० वाडीत जाऊन बाराजण गावी मुक्काम, तीसवाडी तालुक्यात १२ जण मुक्कामी पोचले, असे अर्थाचे तीनही पर्याय चालतात.

---
एक-उणे-दशसंख्या अशी संख्यांची नावे बहुधा फक्त संस्कृत आणि तद्भव भाषांत असावीत! रोमन चिन्हांत एक-उणे-संख्या IV IX असल्या तरी त्यांची नावे तशी नाहीत.
----
"एकोनाविंशति: स्त्रीणाम्" चा उलगडा : (एको ना विंशति: स्त्रीणाम् = एक पुरुष आणि स्त्रियांची वीस-समूह) गमतीदार आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्लोकाची उकल सांगितल्याबद्दल धन्यवाद! मस्त उकल आहे. Smile श्लोकही आज पहिल्यांदाच ऐकला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पण "गता"चे वचन चुकते अशी शंका येते. (एकवचनाऐवजी द्वि- किंवा बहुवचन असायला हवे होते का? असे वाटते.)
परंतु अशा परिस्थितीत "गता" हे एकवचन खपवून घेता येईल.

मराठीत पुढील उदाहरणात कुठले ठीक वाटते? (मराठीतला आपला विचार संस्कृतास लागू होईलच, असे नाही म्हणा.)

> एक रेडा आणि म्हशींचा शेकडा चरायला गेला?गेले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्यापासून 'एको ना विंशति: स्त्रीणां'असे लिहून मग त्याला योग्य असे द्वि/बहुवचन क्रियापदात दिले तर श्लोकातील 'हेला' उरतच नाही. ह्याउलट 'एकोनाविंशति:स्त्रीणां' ह्यातून श्लोकामधील ती 'हेला' निर्माण होते आणि एकवचनातील 'गता' हेहि जुळते. पण तसे करण्यासाठी 'एकोनविंशति: ह्या व्याकरणशुद्ध शब्दाऐवजी 'एकोनाविंशति:' हे अशुद्ध पत्करावे लागते. हे 'कवीचे स्वातन्त्र्य असे म्हणावे लागेल. ’निरङ्कुशा: कवय:’ असे म्हणायचे आणि सोडून द्यायचे!

मराठीच्या प्रश्नाला माझे उत्तर - 'एक रेडा आणि म्हशींचा शेकडा चरायला गेले' पण 'म्हशींचा शेकडा चरायला गेला'.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रैट्ट.

तदुपरि मराठीत गेले हे ठीक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आमच्या "चाळीसगाव" ला रेप्रेसेंत केले नाही राव! Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चाळीसगाव गोव्यात कधीपासून गेले?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संख्यावाचक गावांची नावे आली म्हणून म्हटले…

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

महाराष्ट्रातील गावे घेऊनही असे काही रचायला पाहिजे. (मी नव्हे, पण कोणीतरी...)

चाळीसगाव, बृहन्मुंबई-सासष्टी माहीत आहेत. पाचगणी आहे. मराठवाड्यात तिसगाव/तीसगाव आहे. "आष्टी" वापरणे तसे कठिणच. पण सातपुडा आहे. विदर्भात चारगाव आहे.

आणखी नावे सुचवता येतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी गावे ठाऊक नाहीत, पण गावांमध्ये संख्यावाचक जागा पण बऱ्याच आहेत. धुळ्यामध्ये "बाराफत्तर" आणि "पाचकंदील" अशा दोन जागा ठाऊक आहेत. त्यापैकी "बाराफत्तर" ही तुमच्या श्लोकातल्या "बाराजण" सारखी भानगड असावी बहुतेक… या जागांना हि संख्यावाचक नावे का पडली याबद्दल माझे आजोबा गोष्टी सांगत असत… पण मला आता काहीच आठवत नाही. महाराष्ट्र / किंवा बाहेर अशी संख्यावाचक नावे का पडली याबाबत कुणी काही सांगू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साडेसतरा नळी
विसापूर
दोना पावला (हे अलाऊड आहे का?)
बावनखणी (घाशीराम फेम)
सातपूर (नाशिकजवळचा औद्योगिक भाग)
एकलासपूर
आटपाडी
नवेगाव बांध

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नवेगाव हे संख्यावाचक आहे असं वाटत नाही.

तदुपरि 'सांगली' सुद्धा चालून जावे. सहा+गल्ली = सागल्ली = सांगली अशी व्युत्पत्ती ऐकली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मग सातारादेखिल चालून जावे!

सातारा = सात आर्‍या (बोले तो आळ्या) Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थातच. सातारा हे नाव सात दरा वरून पडले असे ऐकले होते. सातार्‍याच्या जवळच्या ७ किल्ल्यांची यादी दिली होती त्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयला. डोळे झाकून फटका लगवावा आणि सिक्सर जावी, असा पर्कार झाला!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कर्नाटकात अशी गावे आहेत
(आकड़ा-कन्नड़ उच्चार-गावाचे नाव)
१ वंदू वन्नूर
२ एरडू यडडूर
३ मुरु मुन्नूर
४ नालकु नांगनुर
५ ऎदु ऐनुरू
६ आरु ?
७ येळू एळूर
८ एंटू ?
९ वंबत्तू ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक! यड्डूर ऊर्फ यडूर माहिती होते. नांगनूरही माहिती होते, पण त्यांची व्युत्पत्ती आजच कळाली. बाकी गावे माहिती नव्हती. धन्यवाद!

तदुपरि आरेकेरे असे गाव मला वाटते विजापूरजवळही आहे आणि बेंगलोरमधला एक भागही आहे बहुधा.

खंडोबाच्या घोषणेत 'येळकोट' असा शब्दही येतोच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बावन्न्खणी हे गावाचे कीवा प्रदेशावे नाव नसून बावन्न खण असलेल्या कोठीचे नाव होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बावनसौन्दत्ती असे गावाचे नाव ऐकले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉना आणि पॅव्हलो किंवा पावला अशी ती जोडगोळी आहे. यात संख्यावाचक असे काहीही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पावला बोले तो 'पॉल'ची स्त्रीलिंगी पोर्तुगीज आवृत्ती. (चूभूद्याघ्या. पुरुषी आवृत्ती बहुधा 'पावलो' असावी.) आणि दोना बोले तो 'लेडी'सारखी काही उपाधी. (याचे मराठीकरण 'देवी' असे करावे काय?

थोडक्यात 'देवी पावला'. (खरे तर मराठीत काय किंवा बहुधा कोंकणीतसुद्धा काय, 'देवी पावली' हेच बरोबर पाहिजे. पण शेवटी फिरंग्यांची व्याकरणाची चूक म्हणून ते सोडून द्यायचे झाले. पण दोन - दोनाला 'देवी' म्हटल्यावर याला 'देव' म्हणायला हरकत नसावी - हं तर दोन म्हटल्यावर 'पावलो' बरा बरोब्बर सुचतो शिंच्यांना!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉन = पोर्च्यूगीजमधे सन्माननीय व्यक्ती (पुरुष)

त्याचे आकारान्त स्त्रीलिंग

डोना, डॉना, उच्चारी दोना = सन्माननीय व्यक्ती (स्त्री)

पाउला आकारान्त स्त्रीलिंगी नाव.

यात दोन व्यक्ती नसून एकाच स्त्रीचा सन्माननीय उपाधीसकट उल्लेख आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते डॉना पॉला-पाउला च आहे. एकच स्त्री.
चुकलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या समजुतीप्रमाणे don आणि dona ह्यांचा पोर्तुगीज उच्चार दों (सानुनासिक) आणि दोना असा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेच बहुधा पोर्तुगिजात.
(कोंकणीत लिखित रूप "दोना पावला" असेच असावे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते 'एको व्याघ्रेण भक्षितः' असे नसून 'एका व्याघ्रेण भक्षिता' असे असावे. कारण जर एक पुरुष वाघाकडून खाला गेला असे श्लोकातच उघड झाले तर एकोनाविंशति मध्ये एक पुरुष होता हे सरळसरळ कळून येऊन त्यातला कोड्याचा भाग नष्ट होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला हे पटत नाही. 'विंशति: पुनरायाता एका व्याघ्रेण भक्षिता' ह्याचा अर्थ मुळात २१ स्त्रिया स्नानाला जायला हव्यात पण पहिल्या ओळीची कशीहि ओढाताण केली तरी २१ ही संख्या बाहेर पडत नाही.

सुभाषितरत्नभाण्डागारामध्ये हा श्लोक पृ. १८७, क्र. १९ येथे आहे आणि त्याच्यावर 'एकोना इति विंशतेर्विशेषणेन विरोध: एको ना नर: इति पदच्छेदेन परिहार:' अशी टिप्पणीहि आहे. कृष्णशास्त्री भाटवडेकरसंग्रहित (१८८८) सुभाषितरत्नाकरामध्ये हाच श्लोक १८१/३० येथे आणि असाच दिला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विंशति: ही परत आलेल्यांची संख्या असावी. म्हणजे एकोणीस स्त्रिया आणि एक पुरुष. जाताना वीस स्त्रिया आणि एक पुरुष असे एकवीस होते, येताना एका स्त्रीस वाघाने खाल्ले म्हणून एकोणीस स्त्रिया आणि एक पुरुष मिळून विंशति परत आले. घोटून केलेल्या पाठांतरानुसार 'एका व्याघ्रेण भक्षिता' असेच आठवते आहे. विसर्गलोप होऊन पुनरायाता: चे पुनरायाता असे रूप होऊ शकत असावे.
आपण संदर्भ दिला आहे म्हणजे अर्थ स्पष्ट झालाच आहे पण पाठभेद असू शकेल असे वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं ओतूरजवळ ११ नंबर नावाचं एक गाव आहे. वाकड-पिंपळे सौदागर परिसरातही एक नंबरवाचक काहीतरी स्थान आहे पण ते विसरलो. जेव्हा डांगेचौकापासून औंधपर्यंत सहा सीटरना परवानगी होती तेव्हा त्यातील काही प्रवासी या नंबरजवळ उतरत असत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकेत मी जिथे रहाते तिथे - a1st avenue, 2nd avenue सारखा 71/2 avenue आहे
एका घराचाही नंबर 1025 & 1/4 आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

Smile

बॉस्टन आणि कॅनडामध्ये क्युबेक प्रांतांत अश्या प्रकारचे घरनंबर असल्याचे ऐकले/पाहिले आहे. त्याचे कारणही कोठेतरी वाचले होते, पण ते आता आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

कोठल्याशा (चुकून पाहिलेल्या) हरीपुत्तरमध्ये साडेदहा क्रमांकाच्या फलाटावरून सुटलेली कोठलीशी गाडी होती ना म्हणे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरीकेत मी जिथे रहाते तिथे - a1st avenue, 2nd avenue सारखा 71/2 avenue आहे

बादवे, सातबार्‍याचे लफडेही आहे का तिकडे? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सोळा नंबर' बसस्टॉप म्हणताय का? वाकड-पिंपळेसौदागरात नाही तो; काळेवाडी फाटा ते डांगे चौकदरम्यान आहे. पण ते फक्त बसस्टॉपचे नाव आहे. तसे कुठलेही स्थान नाही. मनपाकडून निघाल्यास येणारा सोळावा स्टॉप म्हणून त्याचे तसे नाव पडले ही ऐकीव माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गमतीदार काव्य आहे. उकल वाचायच्या अगोदर (आणि नंतरही) संस्कृतातल्या अशा प्रकारच्या काव्यांची आठवण आली. अर्थात, असलेला बदल काव्याच्या सिमीत ज्ञानामुळे समजला नसण्याची शक्यता खूप आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मावळामध्ये तळेगाव-चाकण परिसरामध्ये नवलाख उंबरे नावाचे गाव आहे. ह्या ऐतिहासिक गावाचा उल्लेख १५व्या शतकातील रशियन प्रवासी अफानासी निकीतिनच्य प्रवासवर्णनामध्ये आहे. चौल बंदरात उतरून जुन्नरच्या वाटेवर ह्या गावामध्ये तो आला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आले पाव्हणे वीस, गेले बावीस, जेवले तेवीस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पर्वती-पाचगाव, पाचपाखाडी,सातपाटी, सातपूर,बारामती, एकसर,चौवीस परगणा,पाचगणी, नवघर, चार बंगला, सात बंगला, विसापूर्, चौकूळ, नौपाडा, आटगाव(?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे जन्मगाव तेरखेडा आहे. त्याच्या भोवती गोल तेरा खेडी आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गोव्याच्या सीमेवर एक तेरेखोल नावाचे गाव आहे.
शिवाय हज़ारी बाग, चतु:शृंगी, सप्तशृंगी, (देवींची नावे, पण त्या त्या स्थानांचीही तीच ओळख आहे.) पचमढी, पंजाब, पंचकुला, दुआब, चरोतर,(?) पंजशिर, पीर-पांजाल(?), चार रस्ता, फाइव गार्डन, छत्तीस गढ, वगैरे.
सोलापूर?
शेगाव?
बारामूला, लखनौ ही फसवी नावे. मूळ नावे वराहमूल, लक्ष्मणपुर.
बार्बेडोस हेही नाव कसे वाटते? इंडियन आहेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाव्व.
बार्बेडोस मधे भारतीय काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वेस्ट इंडियन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने