ही बातमी समजली का? - ५७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं.

अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १०० च्या वर प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा/जाईल.

===========

सुधिंद्र कुलकर्णींचा लेख - The Preamble matters

Modi’s uncomfortable silence on secularism will derail his developmental agenda.

०) दोघांपैकी नेमके महत्वाचे काय आहे - अ) सेक्युलरिझम, ब) डेव्हलपमेंट (आता लगेच - हे दोन्ही एकमेकांविरोधी नाहीत अशी मखलाशी केली जाईल.)

१) डेव्हलपमेंट अजेंडा डिरेल करण्याची क्षमता मोदींच्या अनसेकुलरिझम मधे आहे ?? खरंच ??

२) सेक्युलर अजेंडा डिरेल करण्याची क्षमता डेव्हलपमेंट मधे आहे ??

३) सेक्युलर अजेंडा व डेव्हलपमेंट अजेंडा दोन्ही डिरेल करण्याची क्षमता कशात आहे ??

४) संपूर्ण लेखात टेररिझम (दहशतवाद) चा उल्लेख सुद्धा नाही. म्हंजे डेव्हलपमेंट अजेंडा ला डिरेल करणारा मुद्दा फक्त सेक्युलरिझम किंवा त्याचा अभाव ??? दहशतवाद नाही ???

.
.
.
.

field_vote: 
0
No votes yet

याच विषयावरील लोकसत्ता मधिल लेख. नानी पालखीवाला यांच्या वुई द पीपल या पुस्तकातील हा लेख आहे.

मुळात 'तो' बदलच निरर्थक

पालखीवाला हेही संघी, हिंदुत्ववादी असल्याचे आरोपही होतील आता. Wink

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पालखीवाला हेही संघी, हिंदुत्ववादी असल्याचे आरोपही होतील आता.

हे करणे फारसे अवघड नाही.

भाजपा हा शेटजी भटजींचा पक्ष आहे असा प्रचार होताच की. पालखीवाला हे शेटजी नाहीत असे म्हणता येणे कठिण आहे.

प्रीअ‍ॅम्बल बदलणे हे घटना दुरुस्तीने करणे चूकच आहे.

पालखीवाला हे त्याही काळी फ्री मार्केटचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे सोशालिस्ट शब्द घालण्यावर त्यांचा आक्षेप असणे साहजिक आहे. सेक्युलर शब्दावर पालखीवाला यांचा आक्षेप असण्याचे कारण दिसत नाही. पण वर म्हटल्याप्रमाणे घटना दुरुस्तीने प्रीअ‍ॅम्बल बदलण्यावर इन प्रिन्सिपल आक्षेप असेल.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Constituent Assembly debate on Article 1

प्रा. के. टी. शाह यांनी आर्टिकल १ मध्ये जी दुरुस्ती सुचवली होती ती अशी:

Prof. K. T. Shah (Bihar: General): Sir, I beg to move:

"That in clause (1) of article 1, after the words`shall be a' the words `Secular, Federal Socialist' be inserted."and the amended article or clause will read as follows:

"India shall be a Secular, Federal, Socialist Union of States."

त्याला डॉ. आंबेडकरांनी दिलेले उत्तर:

The Honourable Dr. B. R. Ambedkar (Bombay: General):Mr. Vice-President, Sir, I regret that I cannot accept the amendment of Prof. K. T. Shah. My objections, stated briefly are two. In the first place the Constitution, as I stated in my opening speech in support of the motion I made before the House, is merely a mechanism for the purpose of regulating the work of the various organs of the State. It is not a mechanism where by particular members or particular parties are installed in office. What should be the policy of the State, how the Society should be organised in its social and economic side are matters which must be decided by the people themselves according to time and circumstances. It cannot be laid down in the Constitution itself, because that is destroying democracy altogether. If you state in the Constitution that the social organisation of the State shall take a particular form, you are, in my judgment, taking away the liberty of the people to decide what should be the social organisation in which they wish to live. It is perfectly possible today, for the majority people to hold that the socialist organisation of society is better than the capitalist organisation of society. But it would be perfectly possible for thinking people to devise some other form of social organisation which might be better than the socialist organisation of today or of tomorrow. I do not see therefore why the Constitution should tie down the people to live in a particular form and not leave it to the people themselves to decide it for themselves. This is one reason why the amendment should be opposed.

The second reason is that the amendment is purely superfluous. My Honourable friend, Prof. Shah, does not seem to have taken into account the fact that apart from the Fundamental Rights, which we have embodied in the Constitution, we have also introduced other sections which deal with directive principles of state policy. If my honourable friend were to read the Articles contained in Part IV, he will find that both the Legislature as well as the Executive have been placed by this Constitution under certain definite obligations as to the form of their policy.Now, to read only Article 31, which deals with this matter:It says:

"The State shall, in particular, direct its policy towards securing -

(i) that the citizens, men and women equally,have the right to an adequate means of livelihood;

(ii) that the ownership and control of the material resources of the community are so distributed as best to subserve the common good;

(iii) that the operation of the economic system does not result in the concentration of wealth and means of production to the common detriment;

(iv) that there is equal pay for equal work for both men and women;...."

There are some other items more or less in the same strain.What I would like to ask Professor Shah is this: If these directive principles to which I have drawn attention are not socialistic in their direction and in their content, I fail to understand what more socialism can be.

Therefore my submission is that these socialist principles are already embodied in our Constitution and it is unnecessary to accept this amendment.

Jayanthi Natarajan summoned up the courage to go public about decisions she was ordered to take as Minister of Environment by her former ‘high command’

तवलीन मॅडम नी हल्लाबोल केलेला आहे....

Since Jayanthi has admitted that she was forced to close Vedanta’s project in Orissa’s Niyamgiri hills on the orders of Rahul Gandhi, I want to repeat the story of what would have happened if the project had gone ahead. Anil Agarwal’s idea of building an aluminium refinery close to a source of excellent bauxite reserves could have reduced the international price of aluminium by half. Aluminium is hugely important for the environment because it replaces wood, and Orissa may have become the world’s most important centre for its production. This made international producers nervous so an ageing socialite was recruited to help stop the project after the refinery was built at a cost of more than Rs 11,000 crore. This lady, almost famous long ago for marrying a rock star, was taken to Rahul Gandhi by a Delhi socialite, once very famous for her devotion to the Dynasty.

Rahul was easily persuaded. So off he trotted to the Niyamgiri hills to tell a gathering of tribal boys and girls, wearing very modern hairclips and ribbons, that he would be their ‘sipahi’ in Delhi. He thought it was their land that was being taken away but his Environment Minister closed the project for alleged violations of forest laws. Later in this newspaper’s Idea Exchange, N C Saxena (who headed a committee set up to look into the Vedanta proposal) admitted that Vedanta had brought prosperity to this primitive region and he would not have closed the project if 500 more jobs had been created.

थिअरीज कॅन बी बिल्ट अराउंड एव्हरी पास्ट डिसिजन....

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेख वाचला नाही मात्र या प्रश्नाने जनेरिक असे उत्तर द्यावेसे वाटले:

३) सेक्युलर अजेंडा व डेव्हलपमेंट अजेंडा दोन्ही डिरेल करण्याची क्षमता कशात आहे ??

माझ्या मते व्यक्तीस्वातंत्र्याची आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी बर्‍यापैकी काळ होत राहिल्यास या दोन्हीची गळचेपी होऊ शकेल.

(सध्या या स्वातंत्र्याला काँग्रेससरकारहून अधिकचा असा मोठा धक्का बसलेला नाही किंवा याबाबतीत काँग्रेसपेक्षा चांगलेही मोठे काही केलेले नाही, मात्र धक्का देणार्‍यांना/देऊ पाहणार्‍यांना रोखण्याची कृती जाऊदे (ती झाल्यास तर माझे या सरकारबद्दलचे मत बदलेलही - पण ती अपेक्षा नाही) वक्तव्यही सरकारकडून येऊ नयेत याचे वैषम्य व खेद वाटतो.)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोखण्याची कृती कोणी करावी?राज्य सरकारांनी कि केंद्र सरकारने?

कोणत्या प्रकारे गदा येतेय त्यावर अवलंबून आहे.
उदा. समलैंगिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर येणारी गदा हटवण्याचे काम केंद्रसरकार करू शकते. एखाद्या चित्रकाराच्या प्रदर्शनावर हल्ला झाल्यास त्याला प्रतिकार करण्याचे काम राज्य सरकारच्या अखत्यारितील पोलिस दल करू शकतात - जर ते(राज्य सरकार) तसे करत नाहीयेत असे दिसले तर केंद्रसरकार आपल्या अधिकारात पुढिल कृती करू शकते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पुर्वार्धाशी सहमत. केंद्र सरकारलाच दुरुस्ती कायदा आणावा लागेल.
उत्तरार्धाशी असहमत. माझ्या माहितीप्रमाणे कुठलीही केंद्रीय अन्वेषण यंत्रणा एखाद्या मामल्यात तपास करू इच्छित असेल तर तशी परवानगी राज्य सरकारकडून लागते किंवा राज्य सरकार शिफारस करू शकते. राज्य सरकार काही करत नाही म्हणून केंद्राला लगेच तिथे जाण्याचा अधिकार मिळतो असे वाटत नाही. कायदा आणि सुव्यवस्था हे राज्याच्या अखत्यारीतील विषय आहेत. ते concurrent list वर सुद्धा नाहीत कि त्यात केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा.

बरोबर आहे. सहमती.

कोणत्याही सरकारने तसे करावे पण व्यक्तीस्वातंत्र्य व अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजुने उभे रहाण्याला पर्याय नसावा.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली पुरोगाम्यांच्या भावना दुखवू नयेत इतकेच.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हाहा, नेमके. 'होली काउ' झालेत हे पुरोगामी.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली पुरोगाम्यांच्या भावना दुखवू नयेत इतकेच. <<

भारतात बंदी असलेल्या पुस्तकांची यादी इथे बघता येईल. पुरोगाम्यांच्या भावना दुखवल्या म्हणून किती पुस्तकांवर बंदी आली आहे ह्याचा अभ्यास करून अरुण जोशींनी इथल्या वाचकांना ज्ञानार्जन करावे. धन्यवाद.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला तरी लिस्ट मधे पुरोगाम्यांच्या भावना दुखावणारी बरीच पुस्तके दिसली.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> मला तरी लिस्ट मधे पुरोगाम्यांच्या भावना दुखावणारी बरीच पुस्तके दिसली. <<

उदाहरणार्थ?

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गांधींजीवर ३ उदाहरणे आहेत. नेहरूंवर १ आहे. बरीचशी धार्मिकच आहेत असे म्हणता येत नाही.
============
योग्यायोग्यता दूर राहिली.
==========
मुसलमानांच्या लांगुनचालनासाठी काँग्रेसने ही यादी अजूनच लांब केलीय. सॅटॅनिक वर्सेसवर जगात भारतात "सगळ्यात आधी" बंदी का यावी? वोटबँक?

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>> गांधींजीवर ३ उदाहरणे आहेत. नेहरूंवर १ आहे. बरीचशी धार्मिकच आहेत असे म्हणता येत नाही. <<

>> मुसलमानांच्या लांगुनचालनासाठी काँग्रेसने ही यादी अजूनच लांब केलीय. सॅटॅनिक वर्सेसवर जगात भारतात "सगळ्यात आधी" बंदी का यावी? वोटबँक? <<

  • तुम्ही वर उल्लेख केलेल्या कोणत्याही पुस्तकावरच्या बंदीला माझा पाठिंबा नाही.
  • त्यातल्या कोणत्याही पुस्तकानं माझ्या भावना दुखावल्या नाहीत.

आता दोन शक्यता विचारात घेता याव्यात :

  1. मी पुरोगामी नाही.
  2. ह्या पुस्तकांवरच्या बंदीचं कारण 'पुरोगाम्यांच्या भावना दुखावल्या' हे नव्हतं.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्या ज्या सरकारचा अधिकार आहे त्या त्या सरकारने अभिव्यक्तीस्वातंत्र्य जपावे. प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकारला जबाबदार धरण्यात काही अर्थ आहे असे वाटत नाही.
त्या केस मध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य फक्त एकाच ग्रुप चे जपून चालणार नाही. सगळ्याच ग्रुपचे विचार ऐकून, समजून घ्यावे लागतील. अगदी विरोधी मते सुद्धा!

घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्य डावललं जाणारे एकापेक्षा अधिक गट आहेत नी ते परस्पर विरोधी मागणी करत आहेत असे उदाहरण द्याल काय? (मला अशी काही उदाहरणे माहित आहेत, मात्र ती तुम्हाला अभिप्रेत नसावीत असा कयास आहे म्हणून तुमच्या मुद्द्याला अधिक समजून घेण्यासाठी उदाहरणे विचारतो आहे - पुरावा द्या अशा भावनेतून हा प्रश्न नाही)

साधारणतः एक गट अभिव्यक्ती स्वांतंत्र्य द्या असे म्हणणारा असतो आणि दुसरे त्यांच्या स्वातंत्र्यामुळे आमच्या भावना वगैरेंची गळवे फुटतात म्हणणारा. अशावेळी केंद्र असो वा राज्य सरकार त्यांनी त्या भावनांपेक्षा घटनादत्त स्वातंत्र्याला प्राथमिकता देऊन अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला येणार नाही अशी कृती करावी असे मला वाटते.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भावनांपेक्षा घटनादत्त स्वातंत्र्याला प्राथमिकता

ऋषिकेश, तुमच्या प्रतिक्रियेवरुन असे वाटतय ( जे बर्‍याच वेळेला वाटते ) की घटना वगैरे अगदी देवदत्तच आहे. ( जरी तुम्हाला देव वगैरे मान्य नसले तरी तुमचा ह्या बाबतीतला अभिनवेश भोळ्या भक्ताला साजेसा असाच आहे ).
जगभरात असल्या घटना लिहील्या जातात आणि पुसल्या जातात. त्यांचे काय इतके विषेश?

ज्या गोष्टीला स्वताच्या अस्तित्वालाच टीकवता येणार नाही ती गोष्ट दुसर्‍यांना कसला अभिव्यक्तीचा अधिकार वगैरे देणार?

भारतात सरकारचं अस्तित्त्वच (नी वैधत्त्वसुद्धा!) घटनादत्त आहे , तेव्हा विविध सरकारांकडून जनतेच्या अपेक्षा काय आहेत याची मिमांसा त्याच चौकटीत करावी असे माझे मत आहे.

घटनेवर माझी श्रद्धा वगैरे नाही. घटनेतील काही कलमे (उदा. ३७७) आहेत त्या स्वरूपात मला मंजूर नाहीत. त्याविरोधात माझी मते मी त्याच घटनेचा आधार घेऊन मांडत असतो (घटनेनेच मला ते स्वातंत्र्य दिले आहे). शक्य होईल तिथे लढतही असतो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारतात सरकारचं अस्तित्त्वच (नी वैधत्त्वसुद्धा!) घटनादत्त आहे

म्हणजे घटना नसती तर सरकार नसते असे का? अगदी सनातन्यांच्या तोडीची ग्रंथनिष्ठा आहे बरे ही!

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अगदी सनातन्यांच्या तोडीची ग्रंथनिष्ठा आहे बरे ही!

अगदी. त्यांना अनिस कडेच जायची गरज आहे. Smile

सद्य घटना नसती तर सद्य व्य्वस्थाच वैध नसती. (दुसरी सिस्टिम असुही शकली असती पण ही आहे ही सिस्टिम नसती)
सद्य सरकार काय राष्ट्रपती काय किंवा न्यायव्यवस्था काय किंवा इतरही प्रशासन काय सगळी पदे, व्यवस्था, कायदे घटनेने वैध ठरवलेली पदे/व्यवस्था/कायदे आहेत.

यात मी इतकं कठीण किंवा आश्चर्य वाटण्यासारखं काय बोलतोय? यात निष्ठा कुठे आली? हे फक्त सत्य आहे!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

घटनेने सांगितल्यामुळे यांचे अस्तित्व नाहीये. कैक पदांचे या ना त्या स्वरूपात अस्तित्व अगोदरपासून होते. त्याला व्हॅलिडिटी देण्याचे काम केले इतकेच. काही नवी पदे बनवली असतीलही, पण सगळंच कै घटनेमुळे आहे असं नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरं. असो.

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लोक कसं वागताहेत ते लिहिलेलं पुस्तक म्हणजे घटना. लोक कसे वागावेत ते लिहिलेलं नाही.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लोक कसं वागताहेत ते लिहिलेलं पुस्तक म्हणजे घटना. लोक कसे वागावेत ते लिहिलेलं नाही.

हे काहीही कळले नाही. घटना म्हणजे एखादी बखर आहे की काय? का देशाची डायरी आहे?

घटना हे एक पुस्तक असे म्हणता येणार नाही. सगळे कायदे, नियम, अधिनियम, संकेत हे देखिल घटेनेपासून आलेले आहेत. त्यांच्यात प्रचंड प्रमाणात बदल होत असतो. ज्या घडीला जे आवश्यक आहे ती प्रोसीजर राबवली जाते. दिवसाला लाखो नियम बनतात ते एक प्रकारे देशाची डायरीच आहेत.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

घटनेनेच मला ते स्वातंत्र्य दिले आहे).

तुमच्या मुळे घटना आहे घटने मुळे तुम्ही नाहीत.
तुम्हाला ३७७ मंजुर नसेल तर तुम्ही ते बदलण्यासाठी प्रयत्न करु शकता. तितकी शक्ती जमवलीत तर नविन घटनाच लिहू शकता.

तुम्हाला ३७७ मंजुर नसेल तर तुम्ही ते बदलण्यासाठी प्रयत्न करु शकता

हे एखादी तरतुद बदलण्यासाठी प्रयत्न करणेही घटनेनेच मंजूर केलेले आहे.

तितकी शक्ती जमवलीत तर नविन घटनाच लिहू शकता.

कोणत्याही "घटनात्मक मार्गाने" हे शक्य नाही! यावर बरेच मंथन, कारणे, तर्क ऐसीवर आले आहे. तेव्हा या अंगाने चर्चा माझ्याकडून मी थांबवतो

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हे एखादी तरतुद बदलण्यासाठी प्रयत्न करणेही घटनेनेच मंजूर केलेले आहे.

अहो तसले प्रयत्न नाहीत हो. मी म्हणत होते, आर्मीत जनरल वगैरे व्हा, बंड वगैरे करा. मग तुम्हाला काय वाटेल ती घटना लिहा.

कींवा जसे लाखो लोक करतात तसे, जे आपल्याला मान्य नाही त्याचा विचार वगैरे करु नका. जे तुम्हाला मान्य आहे तेच करा. एका अर्थानी असे वागणे म्हणजे तुम्ही तुमच्या साठी नविन घटनाच लिहीणे आहे.

भारतातल्या आमदार, खासदार, गुंठामंत्री ह्यांनी नाही का त्यांच्या स्वता साठी स्वताची वेगळी घटना लिहीली आहे.

तुमच्या मुळे घटना आहे घटने मुळे तुम्ही नाहीत.

एकदम नेमके अन मार्मिक.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समलैंगिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर येणारी गदा हटवण्याचे काम केंद्रसरकार करू शकते.

(असंच तुम्हाला म्हणायचं आहे असंच नाही) पण बहुसंख्य धार्मिकांच्या संवेदना अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली दुखावल्या जातात (पीके रिलिज करून म्हणा) तेव्हा देखिल केंद्र सरकार काम करू शकते.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गाण्यातून बाँबे शब्द वगळा - सेन्सर बोर्ड!!

परदेशी पत्रकारांना मदत करण्याच्या निमित्ताने मुंबई आणि माणसं पाहणाऱ्या पत्रकाराची नोंद -
असेही एक फिक्सिंग!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यूपीए-२ च्या काळात विकासदर 'वाटतो तितका' घटला नव्हता म्हणे! मोजणीच्या नवीन पद्धतीनुसार काँग्रेसच्या दुसऱ्या टर्ममध्ये चांगला विकासदर राहिला होता असे दिसते. असो.

http://www.business-standard.com/article/economy-policy/new-gdp-numbers-...

असो. अच्छे दिन संदर्भातील बातमीः कोअर सेक्टरमधील ग्रोथ २.४ टक्क्यापर्यंत खाली आली म्हणे. अदानी-अंबानी यांची कामे कोअर सेक्टरमध्ये नाहीत काय?

http://www.business-standard.com/article/news-ians/core-sector-growth-sl...

Facebook begins censoring images of prophet Muhammad

Only two weeks after Facebook CEO Mark Zuckerberg released a strongly worded statement on the importance of free speech, Facebook has agreed to censor images of the prophet Muhammad in Turkey — including the very type of image that precipitated the Charlie Hebdo attack.

It’s an illustration, perhaps, of how extremely complicated and nuanced issues of online speech really are. It’s also conclusive proof of what many tech critics said of Zuckerberg’s free-speech declaration at the time: Sweeping promises are all well and good, but Facebook’s record doesn’t entirely back it up.

-----

झुकरबर्ग चे मूळ स्टेटमेंट

'सध्या काय वाचताय'मधे टाकावं की इथे लिहावं याबद्दल थोडा संभ्रम होता, पण ते ठीक. माध्यमांबद्दल तटस्थपणे आणि धारदारपणे लिहिणार्‍या 'एक रेघ'वरचं नवं पोस्ट.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

औषधे बाजारात आणण्याची परवानगी देण्यापूर्वी सरकार त्या औषधांच्या किंमतींबाबत घासाघीस करणार .....

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नै तर काय !!!

-------

हे घ्या आणखी

सरकार जर जनरीक ड्रग उत्पादकांकडुन विकत घेउन त्यावर एक पैसा सुद्धा सबसीडी न देता ( आणि सर्व खर्च कव्हर करुन )जर विकत असेल तर त्याला समाजवाद म्हणता येणार नाही.

सरकारने व्यापारात पडावच कशाला पण?

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सरकारने व्यापारात पडावच कशाला पण?

हे ही बरोबर च आहे. त्या पेक्षा ब्रँडेड औषधांना बंदी घालावी, कमीत कमी जीवनावश्यक आणि अँटीबायो सारख्या.

का पडू नये? जर सरकार स्वतःला काही विशेष सवलती देत नसेल तर यात काय गैर आहे?
जर त्यामुळे जनतेला स्वस्त औषधे (किंवा काहीही) मिळत असेल आणि सरकारलाही फायदा होत असेल तर खुशाल सरकारनेही व्यवसायात उभे रहावे, चांगले पाय रोवून!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सरकार जर जनरीक ड्रग उत्पादकांकडुन विकत घेउन त्यावर एक पैसा सुद्धा सबसीडी न देता ( आणि सर्व खर्च कव्हर करुन )जर विकत असेल तर त्याला समाजवाद म्हणता येणार नाही

Every time the govt. attempts to supplant the price system/price mechanism, it can be a case of socialism (however limited it may be in its scope).

एक रोचक व्यंगचित्र पाहण्यात आले. Wink हर हर मोदी.

व्यवस्थापक: सर्व न्याहाळकांवर चित्र दिसावे म्हणून width="" height="" हे टॅग हटवले आहेत

ह्या सुटावरून मोदींना narcissist म्हणून खूप हिणवलं गेलंय सोशल मिडीयावर. सुटावर यांचं नाव विणायची किंमत फक्त ९,३०,००० रुपये होती कापड २,५०,००० रुपयांचं. हा बंदगळा सूट लंडनच्या हॉलंड अँड शेरी या नामांकित शिंप्याने शिवला होता. मोठया लोकांच्या मोठया गोष्टी. माझा एक प्रश्न आहे (अगदी प्रामाणिक.कुठलाही उपहास न करण्याच्या हेतूने. ) प्रधानमंत्र्यांच्या कपडयांचे पैशे ते स्वतः खर्च करतात कि तो सरकारी खर्च असतो. त्याल काही मर्यादा (नियमाप्रमाणे) असतात का?

किंमत फक्त ९,३०,००० रुपये होती कापड २,५०,००० रुपयांचं.

आर यू सीरियस ?

अगदी एकदाच सर्वोच्च पातळीच्या राष्ट्रीय समारंभात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसमोर घालायचा म्हणून जरा रोजच्यापेक्षा खास ड्रेस असणं समजण्यासारखं आहे पण बारातेरा लाख म्हणजे फारच अतिरिक्त खर्च आहे हा.

इथं वाचलं. ख. खो. दे. जा.

हा सूट गुजरातेतील एकाने शिवल्याचं वाचलं होतं बॉ. पण आयदर वे, खर्च जरा जास्तीच होतोय याशी सहमत.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा सरकारी खर्च असेल तर तत्काळ बंद झाला पाहिजे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उघडपणे सर्कारी नक्कीच नसावा!

नेहरुंचे कपडे लंडन हुन शिवुन यायचे असे ऐकले होते. कोणाला काही माहीती?

राजीव गाधींचा कार्तीए चा गॉगल त्याकाळी १ लाख रुपयांचा होता म्हणे.

शिवायचं ठाऊक नाही पण धुवायला प्यारिसला जायचे असं ऐकलं होतं.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यग्झाक्टलि. जे ऐकलं होतं ते धुण्याबद्दल, शिवण्याबद्दल नाही.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

थत्तेचाचा आणी बॅट्मॅन यांना __/\__

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बघा धुवायला जात होते तरी कोणी ६५ वर्षात तोंडातुन ब्र काढला नाही, आता एकदम वाचा फुटली.
( कदाचित खरे अभिव्यक्तीस्वातंत्र्य अलिकडेच मिळाले असावे. )

गेल्या ६५ वर्षांत कुणाला तरी वाचा फुटल्याशिवाय ही माहिती तुम्हाला कशी कळाली?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणी ६५ वर्षात तोंडातुन ब्र काढला नाही

कुजबुजायला तोंडातून 'ब्र' कशाला काढायला लागतोय? Wink

नेहरूंच्या कपड्यांचे शिवण-धुवण बाजूला ठेवले तरी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हिंदुस्तानातल्या राजेरजवाड्यांमध्ये योरपला जाउन प्रचंड खरेदी करण्याची टूम होती. गायत्रीदेवी यांच्या आत्मवृत्तात या विषयी अनेक नवलकथा आहेत. खुद्द त्यांच्या विवाहाच्या खरेदीचे वर्णन भन्नाट आहे. योरपातल्या उच्च दर्जाच्या दुकानांची अद्ययावत माहिती असणे ही गोष्ट राजस्त्रियांच्या 'एलीट' असण्यासाठी एक प्रमुख पात्रता होती. लंडन, पॅरिस आणि विएन्ना ही प्रमुख खरेदीस्थळे होती. लेस तर फक्त फ्रेंचच असे.

एकुणातच लेसला इतके महत्त्व का असे? लेस म्हणजे ब्लाउज, गाऊन किंवा टोप्या वगैरेच्या शेवटी जी फित असे तीच ना?

हा प्रश्न पडायचे कारण जेन ऑस्टीनच्याही अनेक कादंबर्‍यांत बायकांना लेस वर रसभरित चर्चा करताना रंगवले आहे.
प्राइट अँड प्रेज्युडिसमध्ये तर लिझीच्या आईने लेस आख्यान सुरू केल्यावर तिचे वडिल आता ती लेसवर बोलु लागली तर थांबायची नाही अश्या अविर्भावात "नो लेस! फॉर गॉड सेक" असे ऑलमोस्ट किंचाळतात.

एकुणच तेव्हा लेस इज नॉट-सो-लेस प्रकरण होतं तर!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेस हे जाळीजाळीचे बनलेले नाजुक आणि तलम कापड असे. हे विणायला कठिण असे. त्यामुळे ते अत्यंत महाग असे. उच्चभ्रू स्त्रियांचे कपडे म्हणजे गाउन, रजनीवस्त्रे, अंतर्वस्त्रे ही लेसची असत आणि ती एक फुशारकीने सांगण्याजोगी गोष्ट होती. काही थोड्या बायका तलम धागा आणि अतिबारीक सुई घेऊन विणकाम करीत. शाली, स्टोल्स वगैरे बनवीत. तीही मोठी कौतुकाची आणि हेव्याची गोष्ट असे. शँतिलि लेस ही या प्रकारात अग्रगण्य होती

ओह तरीच!
मला वाटायचे एवढ्याश्या फितीत/रिबिनीत अशी काय कलात्मकता होती की ज्यावर नवर्‍याचे डोके किटेपर्यंत चर्चा चाले ;)! आता उलगडा झाला.
अनेक आभार!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋषिकेश - ऐसी वरचा थोडा वेळ कमी करुन तेव्हडा वेळ बायकोशी बोला ..... Wink

Smile
ऐसी वरचा वेळ कमी करून?
अहो! तुम्ही बोलत असाल हाफिसातून नवर्‍याशी तर माहित नाही, पण आम्ही हाफिसातून बायकोशी बोलत नाही. Blum 3

==

बादवे बायकोला, आईला, वडिलांना, काकांना, काकुंबा, एका आजोबाना, आजीला, शेजार्यांना, मित्रांना, मैत्रिणींनाही याबद्दल विचारले आहे. त्यांनाही कल्पना नव्हती. Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो! तुम्ही बोलत असाल हाफिसातून नवर्‍याशी तर माहित नाही, पण आम्ही हाफिसातून बायकोशी बोलत नाही. (जीभ दाखवत)

अगदी. तेवढाच शांततेचा आठएक तासाचा काळ मिळतो. बॉस सुखी भव!

प्रतिसाद आवडला. व्हिक्टोरियन अभिजात कल्पनांना साजेशीच गोष्ट आहे.

अवांतर - प्रतिसादाचे शीर्षक या कवितेतून.
Who strive—you don’t know how the others strive
To paint a little thing like that you smeared
Carelessly passing with your robes afloat,— 75
Yet do much less, so much less, Someone says,
(I know his name, no matter)—so much less!
Well, less is more, Lucrezia: I am judged.

और यह और एक चौका..टाळ्या!

अवांतर :-
विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हिंदुस्तानातल्या राजेरजवाड्यांमध्ये योरपला जाउन प्रचंड खरेदी करण्याची टूम होती.
आणि युरोपातील कित्येक गोर्‍या मॅडम ललनांमध्ये असे श्रीमंत "ब्राउन प्रिन्स" -- धनाढ्य राजेरजवाडे पटकावयची इच्छा/प्रयत्न असे.
(ह्यातून क्वचित भारतातील अॅण्टिक वस्तूंची स्मगलिंग किंवा हस्तांतरणही होत होते.)

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

नेहरुंचे कपडे प्यारिसला धुवायला जात असत असेच ऐकले होते. मात्र नेहरुंचे घराणे श्रीमंत असल्याने तसे शक्य असेल असे वाटून गेले. (वास्तविक लेबर कॉस्ट जमेस धरता प्यारिसवाल्यांनी भारतात कपडे धुवायला टाकणे जास्त सुसंगत वाटते.)

मात्र गरीब चहावाल्याच्या मुलाला ९ लाखांचा सूट कसा काय परवडतो याचे आश्चर्य वाटते. (आमचा लग्नाचा ड्रेसही ९ हजारापेक्षा कमी किमतीचा होता. )

>>वास्तविक लेबर कॉस्ट जमेस धरता प्यारिसवाल्यांनी भारतात कपडे धुवायला टाकणे जास्त सुसंगत वाटते.)

इनफॅक्ट प्यारिसला कपडे धुवायला नेऊन परत आणण्यापेक्षा कपडे एकदा वापरून टाकून देणेसुद्धा परवडले असते. Wink

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

इनफॅक्ट प्यारिसला कपडे धुवायला नेऊन परत आणण्यापेक्षा कपडे एकदा वापरून टाकून देणेसुद्धा परवडले असते.

लोळ..येक नंबर (थत्तेचाचांच्या कमेंटांचा फ्यॅन)

लाँडरींग हा शब्द दुसर्‍या बाबतित पण वापरला जातो ना.

'पॅरिसला धुण्यासाठी कपडे' जात असे ऐकिवात आहे खरे पण ते स्वातन्त्र्योत्तर काळातील नेहरूंचे नाहीत तर त्यांचे वडील मोतीलाल अलाहाबादेतील एक ख्यातनाम वकील असतांनाचे. हेहि बहुधा अतिशयोक्त असावे कारण पॅरिसला कपडे धुण्यास पाठविणे हे तसे गैरसोयीचेच आहे, विशेषत: इथल्या इथेच कपडे उत्तम धुवून इस्त्री करून घेणे सहज उपलब्ध असतांना. मोतीलाल नेहरूंच्या श्रीमन्तीबद्दल निर्माण झालेली ही एक urban legend असण्याची शक्यता दृष्टिआड करता येत नाही. जवाहरलाल नेहरूंचे अवमूल्यन करण्याची जी फॅशन सध्या रूढ आहे त्यातून ह्या urban legend चा प्रसार होत राहतो आणि तिचे खापर जवाहरलाल नेहरूंच्यावर फोडले जाते.

मला वाटतं इथे "कपडे" म्हणजे दुर्गुणांना उद्देशून म्हणत असतील. मनातले वाईट अमंगळ विचार, दुरित चित्तदशा वगैरे स्वच्छ करणे अशा अर्थाने ते रोज पॅरिसला एखाद्या अध्यात्मिक गुरुंशी संपर्क करुन मन शुद्ध करत असतील.

"श्याम पावलांना माती लागू नये म्हणून जपतोस तसा मनाला माती लागू नये म्हणूनही जप हो" असं म्हटलं आहेच.

पण रोज पॅरिसला संपर्क कसा करणार? टेलिफोन भारतात कधीपासून आहे? जर टेलिफोन नसेल तर रोज काय तार पाठवायचे का? की सूक्ष्मदेह वगैरे? पण सूक्ष्मदेह म्हटले तर लंडन-प्यारिस काय आणि चेन्नै-कोलंबो काय एकच. म्हणून तो ऑप्षन नसावा. की तेव्हाच्या पॅरिसमध्ये असे काही सूक्ष्म व्हाईब्स होते?

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

महिन्या दीड महिन्याचे कपडे गोळा करून एक शिप्मेंट पाठवली तरी चालत असणार या धनिक लोकांना. ते कपडे परत येईपर्यंत दुसरी कन्साइन्मेंट तयार असे. शिपने कपडे पाठवायचे तर ते थोडेच एक आणि दोन सेट्स असे असणार?

हो बरोबरे. पण ते गुरूंशी संपर्क वगैरेंबद्दल म्हणत होतो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय, गल्ली चुकली हे प्रतिसाद टंकताना कळले होते पण म्हटले जाऊं दे. आता इतक्या दिवसांनी कोण प्राणी हा मधलाच प्रतिसाद वाचायला येणार!
पण पूर्वप्रतिसाद हा श्री बॅट्मॅन ह्यांचा होता आणि ते अहोरात्र कधीही तीक्ष्ण नजरेने पाहू शकतात हे जरा हुकलेच. (कृ. हल. घ्या.)

नेहरूंबद्दल ऐकलेलं अजून एक अर्बन लेजंड(?). ते जेव्हा केंब्रिजमध्ये शिकायला होते तेव्हा तेव्हा केंब्रिजच्या प्रत्येक दारात त्यांना घ्यायला एक गाडी उभी असे, म्हणजे ते कोणत्याही दाराने बाहेर पडले तरी गाडी तयार! (उरलेल्या तीन गाड्यांतील चालकांना कसे कळायचे ते चौथीने घरी गेले कोणास ठावूक!)

-Nile

मोतीलाल नेहरूंच्या काळी ड्राय क्लीनींग्ची सोय भारतात होती का? भारतीय पारंपारिक पद्धतीत रेशमी आणि लोकरीचे उंची कपडे स्वच्छ करताना एक तर ते कमी वेळा धुणे आणि धुताना रिट्याचा फेस इ ने साफ करणे एवढेच असे. कदाचित भारी कपडे कधी काळी परदेशातून ड्राय क्लीन करवून घेतले असतील. (किंवा नुसती अफवा असेलही.)

नेहरू घराणे अतिशयच धनवान होते आणि त्यानुसार त्यांची राहाणी खर्चिक होती. तेव्हा त्यांचे कपडे पॅरिसला जात असत. पण ही गोष्ट झाली या घराण्याने स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेण्याआधीची. गांधीजींचे अनुयायी झाल्यानंतर या कुटुंबातल्या सर्वांनी श्रीमंती राहाणीचा त्याग केला. परदेशी कपड्यांची होळी केली. खादी वापरू लागले, स्वतः सूत कातू लागून त्या सुताचे कपडे वापरू लागले.

अच्छा ... असं आहे होय? मला वाटलं होतं की पंतप्रधान असतानाची ही गोष्ट आहे.

अवांतर१ : नेहरूच काय, कोणीही (इन्क्लूडिंग गांधी) स्वत: कातलेल्या सुताचे कपडे घालण्याइतके सूत कातू शकत असेल का?

अवांतर२ : स्वत: सूत कातणे म्हणजे सूत कातणार्‍यांची बेकारी नाही का?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

'स्वतःच कातलेल्या सुताचेच कपडे' असे नसून 'स्वतः जे काही सूत कातले, त्याचे कापड बनवून ते वापरीत असत' असे लिहायला हवे होते.
सूत कातणारे बेकार झाले होते ते इंग्लंडमधल्या गिरण्यांतून भारतात आयात होत असलेल्या कापडाच्या भडिमारामुळे. तसेच भारतीय गिरण्यांमुळेही. घरगुती सूतकताईला उत्तेजन मिळावे, कोष्टी-विणकरांना रोजगार मिळावा हे तर गांधीजींचे ग्रामोदयाचे धोरणच होते. हातमागावर तयार होणारी वस्त्रे या देशातल्या प्रचंड लोकसंख्येसाठी कधीच पुरेशी नव्हती. एकतर उत्पादन मर्यदित होते आणि त्यामुळे किंमती त्या काळाच्या मानाने जास्त होत्या शिवाय लोकांकडे क्रयशक्ती नव्हती. त्यामुळे प्रत्येकाने जमेल तसे, जमेल तेव्हढे सूत कातले तरी फारसे बिघडण्यासारखे नव्हते. शिवाय सूतकताई ही मिठाच्या सत्याग्रहाप्रमाणे प्रतीकात्मकही होती. या छोट्याश्या गोष्टीमुळे कोट्यवधी लोकांना राष्ट्रकार्याशी जोडले जाण्याचे समाधान मिळाले.
ता.क. हे सूत बहुतांशी जाडेभरडे असे आणि त्यापासून बनवलेला कपडा खूप टिके. सालामागे दोन पंचे पुरत. इंदिरा गांधींनी आपल्या लग्नात जी घरगुती सूतकताईतून विणलेली साडी परिधान केली होती तीच साडी त्यांनी सोनियांना त्यांच्या लग्नात भेट म्हणून दिली आणि सोनिया ती साडी नेसल्या असे वाचनात आले आहे. ही साडी नेहरू कुटुंबातल्याच कोणीतरी, बहुधा पं. नेहरूंनीच कुठल्यातरी कारागृहात असताना कातलेल्या सुतापासून विणली होती असेही वाचल्याचे आठवते आहे.

त्यापासून बनवलेला कपडा खूप टिके.

सुताचा पीळ गिरणीच्या कापडाएवढा घट्ट आणि एकसमान नसे. त्यामुळे जाड असले तरी कापड ताणाच्या ठिकाणी लवकर विरत असे.

सालामागे दोन पंचे पुरत

पंचा नुस्ताच अंग पुसायला किंवा गुंडाळायला वापरत म्हणून जास्त टिकत असेल. पण सदरे, इजारी, पोलकी लवकर झिजत. विशेषतः कष्टकरी लोकांमध्ये.

९३०००० म्हणजे फार काही जास्त रक्कम नाही. पाउंडात बोलायचे तर १०००० पाउंड. ओबामांचा सुट पण नक्कीच त्या कीमतीचा असावा.
मधे हाँगकाँग मधे एका बाईने ६ कोटीचा ( १ मिलीयन डॉलर ) चा ड्रेस घातल्याचे टीव्ही वर बघितले होते.

>>९३०००० म्हणजे फार काही जास्त रक्कम नाही. पाउंडात बोलायचे तर १०००० पाउंड. ओबामांचा सुट पण नक्कीच त्या कीमतीचा असावा.

उदाहरणार्थ भारतातल्या खासदारांचे पगार + भत्ते याबाबत असा उदार दृष्टीकोन बाळगला जात नाही..... तिथे "अमेरिकेशी काय बरोबरी करायची?" वगैरे पाइंट येतात.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मागच्या महिन्यात मी पुण्यात सुटांच्या किमतींची चौकशी केली. थोडे भारी कापड घेतल्यास किंमत ३०-४० हजारापर्यंत गेली - शिवणावळ अमेरिकन शिंप्यापेक्षा कमी असली, तरी कपड्याची किंमतच इतकी होती की अमेरिकेत साधारण त्या दर्जाच्या सुटाच्या किमतीशी चढाओढ करू लागली होती. दुकानदाराला उत्तेजन दिले असते, तर त्याने मला दुप्पट-तिप्पट किमतीचे सूटसुद्धा दाखवले असते, असे मला वाटते.

दुकानातील गर्दीला बघून माझा कयास आहे, ती बहुधा मध्यम आणि उच्च मध्यमबर्गाचे दुकान होते (बाजीराव-लक्ष्मी रस्त्यांपाशी तीन मजली दुकानांपैकी एक).

खुद्द भारतात काही लाख रुपयांपर्यंत किंमत जाईल असे सूट शिवून मिळत असावेत याबाबत आश्चर्य वाटत नाही. (म्हणजे उच्च मध्यवर्गीयांच्या कपड्यांपेक्षा श्रीमंत लोकांचे कपडे सहज दहापट असू शकतील, असा माझा ठोकताळा.)

तरी एक वाटते.
ही जागा भारताचे कर्तृत्व मिरवण्याची आहे. समारंभाकरिता तरी भारतीय तलम/उंची कापड (कापूस/लोकर/पश्मीना काय वाटेल ते, आणि भारतीय गिरणी किंवा हातमाग काय वाटेल ते) आणि भारतातील शिंप्याची शिलाई (किती का महागडी असेना) वापरावी. (बाकी ठिकाणी देशीच कापड वापरले पाहिजे, असे माझे वाटणे नाही.) आणि मग मुद्दामून पेज ३ वगैरे, किंवा वर्तमानपत्रांच्या पुरवण्यांत ही "स्टाईल/संस्कृती" बातमी छापवून देशाची जाहिरात करवून घ्यावी.

(काही वर्षांपूर्वी या घटनेबद्दल संबंधिताकडून ऐकले. न्यू यॉर्क येथे राज्यस्तरीय निवडणूक. उमेदवारीच्या प्रीतिभोजनात कॅलिफोर्नियाची वाईन ठेवली. हे लोकांना खुपले. राज्याची प्रगती करायची, म्हणजे राज्यातील शेतकरी/उद्योजकांना आधार देणार, याचे चिन्ह म्हणून जिथे जिथे स्रोत दिसू शकेल, तिथे तिथे न्यू यॉर्क राज्यातील गोष्टी उमेदवाराने ठेवायला हव्या होत्या. खजील कँपेन मॅनेजरकडून - आपली चूक ओळखत - मला ही कथा समजली.)

तुमचा मुद्दा पटण्यासारखा आहे. एखाद्याला उंची कपडे परिधान करायची हौस असेल तर ते करण्यात काहीच गैर नाही. मात्र निवडणुकीपूर्वी मोदींचे लहानसे घर, साधी राहणी, गरीब आई, चहावाले वडील, रुढ अर्थाने मोदींना कुटुंब नसल्याने भ्रष्टाचाराची 'गरज' नसणे या जाहिरातबाजीच्या पार्श्वभूमीवर अशा वागण्यावर टीका होणे साहजिकच आहे.

बाकी परिधानमंत्री हा मोदींचे नवे पद असल्याचा (काँग्रेसचा) टोला आवडला.

width="" height="" हे ट्याग बाय डिफॉल्ट हटवूनच का टाकले जात नाहीत? ज्यांना उंची-लांबी कमी जास्त करायची आहे ते ट्याग टाकू शकतातच की.

हा उपाय बरा सुचवला. फोटो फारच मोठे दिसायला लागले तर विड्थचा पर्याय देता येईल.
(बदल केला आहे.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पर्याय चांगला आहे पण फोनवर पाहणार्‍यांना गैरसोयीचे होईल का ? चित्र फोनवर अवतरायला लागणारा वेळ वगैरे पाहता ?
मागे एकदा, प्रतिसाद बाय डिफॉल्ट् १००० का दिसू नयेत, यावर चर्चा झाली होती तेव्हा फोनचे कारण दिले गेले होते. अर्थात, प्रयोग करून पाहणे कधीही चांगलेच.

>>(बदल केला आहे.)<<

ऐसीचे संचालक फाशिस्ट आहेत. मला पामर एचटीएमएल निरक्षराला फोटोंची लांबी-रुंदी कंट्रोल करायची आहे, पण ह्या कंट्रोल फ्रीकीपणामुळे ते करता येणार नाही. निषेध! निषेध!! निषेध!!!

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हर हर व्हॅलेंटाईन

Interestingly, Bajrang Dal, another Hindu outfit known to take a similar stand on February 14 festivities, has decided to take a break this year. Bajrang Dal leader Ajju Chauhan who was in news when Agra's Queen Victoria statues were vandalized, said the group "will not do anything on Valentine's Day" this year. "We have our Hindu Sammelan on February 15 and we are busy with that. Hence, no plans for V-day this year," Chauhan crisply added.

यावेळी बजरंगदलाच्या ब्यानरखाली दंगा करण्याऐवजी (तेच लोक; पण) दुसर्‍या ब्यानरखाली दंगा करणार असतील.

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कदाचित आता 'आपलं सरकार' असल्यामुळे न्यूईसंस कमी ठेवण्यासाठी वरुन भागवती दट्ट्या आला असू शकतो. ज्या फेसबुकी प्रजेमुळे सत्ता मिळाली आहे त्या प्रजेत वॅलेंटाईन डे तितकासा धिक्कारला जात नाही. त्यात आता नऊ महिन्यानंतरही भरवशीच्या म्हशाला टोणगाही न झाल्याने आणखी व्हॉट्सअॅपी टीकाकार कशाला वाढवून घ्या असेही एक धोरण असू शकते

ऐसी अक्षरे चे सदस्य अर्थ हे या व्हिडिओ मधे प्रचलित पाकिस्तानी विरुद्ध भारतीय राज्यव्यवस्था (व धर्मव्यवस्थेचा राजकीय व्यवस्थेवरील प्रभाव) या विषयाबद्दल आपले म्हणणे लंडन मधील एका फोरम मधे मांडत आहेत.

-

.
.
.

पाकिस्तानी बाजूच्यांचे म्हणणे हे आहे की भारत सेक्युलर असूनही राईट विंग च्या लोकांना निवडून देतो. व पाकिस्तान मधे एकदाही राईट विंग चे लोक ५% पेक्षा जास्त मते मिळावू शकलेले नाहीत. त्यावर अर्थ सायबांचे चोख प्रत्युत्तर.

.
.
.

अरे एकच नंबर. अर्थ साहेबांचा व्हिडो म्हणजे पाहणारच.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यांनी रेफरन्स पॉईंट चा मुद्दा जो मांडलाय तो विशद करणे गरजेचे आहे. रेफरन्स पॉईंट हा एवढया साठी की - पाकिस्तानातील लेफ्ट-ऑफ्-सेंटर ही सुद्धा भारतातील राईट विंग च्या पेक्षा जास्त राईट विंग असेल.

१. पाकिस्तानात निवडणुका हीच कधी काळी घडणारी गोष्ट आहे.
२. पाकिस्तानात सरकारच धर्माधारित असताना आणखी राइटविंगच्या लोकांना वेगळी काय मतं द्यायची?

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भारतातल्या सुशिक्षित सभ्य सर्कलांत पाकिस्तानबद्दल प्रचंड आकस असलेला दिसतो. पाकिस्ताने पुरोगामी मूल्ये पाळायला प्रयत्नशील असलेली जी काही मायनॉरिटी आहे तिला भारतीयांचे असले वागणे प्रचंड डिमोटीवेट करत असावे.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणजे पाकिस्तानातल्या एका मायनॉरिटीच्या भावनेखातर दुसर्‍या मायनॉरिटी/मेजॉरिटीच्या वागण्याकडे भारतीयांनी दुर्लक्ष करावे असेच ना? आयला ही तर सरळसरळ धमकीच झाली की. अगदी सिकुलरांसारखेच बोललात की हो.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजोंना (पाकिस्तानातील का होईना) पुरोगाम्यांचा पुळका!
ही तर हेडलाइन असणार उद्या डॉनमध्ये Blum 3

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

काय कि ब्वॉ. मला चीन आणि पाकिस्तानबद्दल भारतापेक्षा जास्त सिंपथी आहे. समहाऊ मला त्यांच्या राजकीय भूमिका जास्त रास्त वाटतात.
----------
अर्थातच प्रामाणिकपणे विचार करताना असं होतं. पण मी माझे विचार माझ्या नागरी कर्तव्यांच्या आड येऊ देत नाही. (प्रेरणा - बोले तैसा ...पाउले. माय फूट)

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Couples out on V-Day will be married off: Hindu Mahasabha

पुढच्या शनिवारी कोण-कोण डेटला जाणार? मला हव्ये डेट. (एकापेक्षा अधिक पर्याय असतील तर मुलाखती होतील.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मीपण!

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हाहाहा... आगीभोवती फेर्‍या मारणे, एकमेकांना हार घालणे, लॉकेटं घालणे ही एक हटके अ‍ॅक्टिव्हिटी होईल डिनरच्या आधी पार्टीगेम्स असतात तशी.
सर्व रेस्तरांनी/हॉटेलांनी अग्निकुंड, हार वगैरेंची आणि सुहागरातीचीही व्यवस्था केली पाहिजे.
बादवे, मी असेन भारतात बहुतेक १४ ला. येणार का डेटवर?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ROFL उऊ: उऊ:

लवकरच बुधवार पेठेत भटांसाठी अरेबियन श्टाईल इन्स्टंट मॅरेज (निकाह-अल-मिस्यार) मार्केट ओपन होणारसं दिसतंय. तसंही वेश्यांना 'नगरवधू' असे एक निर्लज्ज नाव आहेच.
अशा विवाहाला काय नाव द्यावं बरं?
सुदिनविवाह (सुदिन=अच्छे दिन) की सुलभविवाह की आणखी काही?

सुलभविवाह! संस्कृती आणि अच्छे दिन गेले गंदी नालीमध्ये!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुलभ अशी एकच गोष्ट असते. बाकी प्रतिशब्द हुडका.

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

व्हॉट इफ द कपल इज विथ डिफरंट ओरिएण्टेशन? त्यांचेही लग्न लावून देणार का विहिंप?

वर कुठल्यातरी प्रतिसादात मी म्हटल्यानुसार यंदाचा दंगा बजरंगदलाऐवजी विहिंपच्या ब्यानरखाली....

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे पण वाचलं -
Posted ‘I love you’ on Facebook? Get married!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ज्या प्रेमी युगलांच्या घरचे लोक त्यांच्या लग्नाला तयार नाहीत त्यांनी जाणून बुजून वॅलेंटाईन साजरा करावा अगदी दिखावा इस्टाईलात. म्हणजे मग हे 'अच्छे दिन' वाले त्यांचा विवाह लावून देतील - ह्यावर घरच्यांची बोलायची काय हिंमत मग - सुसंस्कृत सरकारचं ऐकून घ्यावच लागेलच ना Wink तर बाळांनो ह्याला शिक्षा समजू नका, सरकार तुमची मदतच करतय - आहेत की नाही अच्छे दीन ....अहाहा - "आली दिवाळी... आली दिवाळी" असं बॅकग्राऊंड ला का ऐकू येतय मला?...
(अगदीच त्रास झाला आणि इच्छा नसतांना लग्न लावलंच तर दुसर्‍या म्हणजे विरोधी पक्षाची धाव घ्यायची... हे लग्न लावताय तर ते घटस्पोटही करून देतील मिनीटात .. ते ही अगदी 'म्यूच्युअल' पद्धतीचा..ह.का.ना.का.)

Scientific knowledge is believed to be the wellspring of innovation. Historically, firms have also invested in research to fuel innovation and growth. In this paper, we document a shift away from scientific research by large corporations between 1980 and 2007. We find that publications by company scientists have declined over time in a range of industries. We also find that the value attributable to scientific research has dropped, whereas the value attributable to technical knowledge (as measured by patents) has remained stable. These effects appear to be associated with globalization and narrower firm scope, rather than changes in publication practices or a decline in the usefulness of science as an input into innovation. Large firms appear to value the golden eggs of science (as reflected in patents) but not the golden goose itself (the scientific capabilities). These findings have important implications for both public policy and management.

संपूर्ण पेपर इथे आहे. लेखक - Ashish Arora, Sharon Belenzon, and Andrea Patacconi

Israel's defence minister to visit India

मला हे समजत नैय्ये की इस्रायल मधे संसदीय निवडणुका १७ मार्च ला असूनही ही व्हिजिट .....

नेतानयाहूंना पुन्हा निवडून येण्याची एकदम १००% खात्री आहे की काय !!!

की ... पुन्हा निवडून न येण्याची खात्री असल्याने ... घाईघाईत ....

निवडून येणे किंवा न येणे या दोन्हीपैकी एक गोष्ट नक्कीच होऊ शकते असे वाटते. तुमच्याशी सहमत होण्याचा एक अपूर्व प्रसंग आला आहे.

वा वा वा

मस्त पार्टी करूया. चिकन बिर्याणी + टेकिला ??

फक्त चिकन कोशर असावं म्हणजे इस्रायललाही खूष ठेवता येईल. Wink

आधे इस तरफ., आधे उस तरफ., बाकी मेरे पीछे आओ. Biggrin

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

http://www.mirror.co.uk/news/weird-news/mummified-200-year-old-monk-not-...

Mummified 200-year-old monk 'NOT dead' but in 'very deep meditation'

नेहमी ब्राह्मणांना मिळणारा पुरस्कार ब्राह्मणवाद्यांचं सरकार आलं असताना अब्राह्मनांना मिळाले आहे. जगात कशाचा काही भरोसा राहिला नाही!
----------------------
पुरस्कारविजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तैवानमधे ट्रान्सएशिया कंपनीचं एटीआर विमान टेकऑफनंतर लगेचच पडल्याचा व्हिडीओ सर्वत्र फिरतोय तो पाहिला असेलच.

या क्रॅशमधे "मे डे इंजिन्स फ्लेम्ड् आउट" असा शेवटचा संदेश पायलटने दिला होता. विमानाच्या उड्डाणमार्गाचा अभ्यास करता आणि कोसळतानाचा अ‍ॅंगल पाहता असं दिसतंय की पायलटने बिल्डिंग्ज वाचवण्यासाठी पूर्ण शक्तिनिशी विमान वळवून वेडंवाकडं नेलं आणि शेवटी नदीतच नेमकं पडावं, जमिनीवर पडू नये म्हणून पूर्ण उभा बँकिंग अँगल घेऊन (स्किड करुन) कमी अंतरात पाण्यात पाडलं. तसं केलं नसतं तर इतक्या पटकन खाली आलं नसतं आणि नदी हुकली असती. नेम धरुन तिथे क्रॅश केलं.

अश्या प्रसंगीही जमिनीवरच्या लोकांना वाचवण्याचा विचार त्याच्या मनात होता ते बघून गहिवरायला होतं. दोन्ही पायलट विमानाची कंट्रोल स्टिक घट्ट पकडलेल्या अवस्थेतच मृत सापडले.

अश्या प्रसंगीही जमिनीवरच्या लोकांना वाचवण्याचा विचार त्याच्या मनात होता ते बघून गहिवरायला होतं.

उच्च श्रेणीच्या मानवतेच्या दर्शनासमोर नतमस्तक व्हायला होतं.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विशेष म्हणजे तो प्रकार पाण्यावर सरळ रेषेत येऊन इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी नव्हता. उंच इमारतीवर न धडकता नदीच्या दिशेने खड्या अँगलमधे विमान घेऊन आले. (नोटः लँडिंग गियर आत घेतलेले आहेत. टेकऑफनंतर इतक्या कमी उंचीवर लँडिंग गियर आत जात नाहीत. म्हणजे मुळात नदीत बेली लँडिंग करण्याच्या आशेने ते आत घेतलेले असू शकतात)
पण आपण नदीत स्ट्रेट लाईन अप्रोच करुन बेली लँडिंग करु शकत नाही हे लक्षात आल्यावर कोणीही सीदन्ति मम गात्राणि म्हणून निवृत्त झाला असता आणि ओरडत रडत कंट्रोल सोडून दिले असते. पण इतक्या कमी अंतरात विमान पाण्यापर्यंत पोचणार नाही आणि पुढे ग्लाईड होत पलीकडे जाईल हे लक्षात येऊन नेम धरुन हवेत उभे करुन पाडले असं दिसतं.

अत्यंत सहमत आहे.

सहमत. असे काही पाहिले की घशात आवंढा येतो.

+१ खरय. कौतुक वाटते धीराचे, माणुसकीचे, सामाजिक भानाचे.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

भारतातील धार्मिक उन्मादामुळे गांधींना धक्का बसला असता असे ओबामांचे म्हणणे. 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान...' ही म्हण आठवली. गेली दहा वर्षे अफगाणिस्तान, इराक, सीरिया, लेबॅनॉन वगैरे ठिकाणी जे काही चाललंय त्यामुळे गांधींना काय वाटले असते बरे?

यानिमित्ताने चांगला लेख वाचनात आला.
http://www.dnaindia.com/analysis/standpoint-no-president-obama-gandhi-wo...

This comment has been moved here.

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.