तो

(i do not know what it is about you that closes
and opens;only something in me understands
the voice of your eyes is deeper than all roses)
nobody,not even the rain,has such small hands- E. E. Cummings

खरं आहे, त्याच्या व्यक्तीमत्वातील असे काय आहे , जे कधी उमलतं, तर कधी मिटून जातं? - तिला कधीच समजलं नाही. अन ते तसं पकडीत न येणं, न समजणं, त्याचं कविता असणं हे फक्त maddening होतं, वेड लावणारं होतं. अनेक संदर्भ, उत्तरं टाळणं, अर्थ, Fill in the blanks समोरच्यावर सोडून देणं .... अगदी कवितेसारखं.

मग ती त्या गाळलेल्या जागांत रंग भरत रहायची, कधी थंडीतल्या ढगांचे जांभळे गुलाबी तर कधी फुलांचे अबोली, पेस्टल क्रीम. अन तसं चित्र रंगवण्याचे स्वातंत्र्य तिला मनस्वी आवडत असे. जिथे इतर लोक अरसिक सूर्यासारखे प्रत्येक कानाकोपरा उजळून टाकणारे, कोळीष्टके अन धूळीचाही नजारा देणारे होते तिथे तो मंद समईसारखा फक्त त्याला हवे तेवढेच दाखवे, rest left to her imagination. And oh yes, she had some imagination!

तसं तर बडबड करण्यात त्याचा हात कोणी धरला नसता, अगदी प्रचंड बडबड करायचा तो पण .... ती बडबड मुख्यत्वे काहीतरी दडवायला असलेला facade होता. तिला कळायचं ते, She knew it. तिच्या वृश्चिक राशीला सहजासहजी असं फसवता येणं शक्य नव्हतं अगदी त्याच्या deceptive, duel मीनेलाही नाही.

तिने तेही क्षण अनुभवले होते जेव्हा हा facade गळून पडायचा, unguarded तो उन्मळून आलेला होता. वेगळाच savage अन तरीही मृदू - केवढा विरोधाभास! परत तेच - What is it about you that opens & closes. तळ्यातला चंद्र जसा, ओंजळीतल्या पाण्यात येत नाही तसा तिला तो कळायचा नाही. अन तरीही चुकून (!) चंद्राचा तुकडा ओंजळीतल्या पाण्यातून, तिने प्यायला होता. तहान वाढली होती. ती तहान जड-स्थूल-शारीरीक नव्हती, abstract, विरळ etherial होती. मन, आत्मा यांच्याशी संबंधीत होती. खरं तर neptunian aura असलेली होती, शरीराच्या मर्यादा ओलांडून auric मीलन साधणारी.

काही जण चटका द्यायला आयुष्यात येतात, काहीजण सुगंधासारखे दरवळून जातात, काहीजण पापणीवर पडलेल्या हिम-कणासारखे (snowflake), काही काळ स्वच्छ दृष्टीला अडथळा निर्माण करतात. तो? लहान बाळाची naivety होती त्याच्यात, एक vulnerability, openness अन संरक्षण करण्याच्या instinct जागवणारं. संरक्षण, जगापासून नाही ..... परत .... प्रार्थनेतून मिळणारं. त्याच्यात अमर्याद क्षमाशीलता होती. एखाद्या संताची क्षमाशीलता नाही तर सहज साधलेली लहान बाळाची क्षमाशीलता. लहान बाळ - ढग - चंद्र ....

त्यांच्या नात्याला कमालीचा "नेपच्युनिअन" रंग होता. glamour, नशा, कविता, प्रार्थना, पाण्यामधील वेडेवाकडे प्रतिबिंब ........ auric merging.

अकेला था मैं एक सुरंग की तरह, पक्षी भरते उड़ान मुझ में
रात मुझे जलमग्न कर देती अपने परास्त कर देने वाले हमले से
ख़ुद को बचाने के वास्ते एक हथियार की तरह गढ़ा मैंने तुम्हें,
एक तीर की तरह मेरे धनुष में, एक पत्थर जैसे गुलेल में
गिरता है प्रतिशोध का समय लेकिन, और मैं तुझे प्यार करता हूँ - पाबलो नेरुडा

इतर लोकं निबंध, गद्य होते, तो कवितेच्या ओळी होता. अन काय फरक पडतो इतरांकरता कसा होता त्याने, तिच्याकरता कविताच होता.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

काही जण चटका द्यायला आयुष्यात येतात
often the marks people leave are scars Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझाच हा लेख परत वाचला. अन परत चटका बसला. असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0