पृथ्वी - एक अनुभव

मध्यमवर्गीय मराठी घरात वाढलेला असल्याने साहित्य, नाटक, कला यांची आवड असतेच. कळत्या नकळत्या वयात खांडेकर, फडके ते पार शिवाजी सावंत असं सर्व काही वाचलेलं असतं.
पुढे जाउन गुलजार , बच्चन , महाश्वेता देवी , टागोर भेटलेले असतात. हिंदी थिएटर आणि ड्रामा यांबद्दल वाचलेल असताना बर्याचदा पृथ्वीचं नाव ऐकलेल असतं. पृथ्वी मागची 'Concept ' ; शशी आणि संजना कपूर ची मेहनत , "फिरता रंगमंच" ते "पृथ्वी अड्डा"पर्यंतचा प्रवास, सिने, नाट्य कलावंताची तिथली उठबस , पृथ्वी कॅफे मधली "आयरिश कॉफी " , "कटिंग चहा " हे सगळ काही वाचलेल असत, ऐकलेलं असत आणि एखाद्या पावसाळी संध्याकाळी आपण स्वतःच जाउन पृथ्वीच्या समोर उभे राहतो.

पाऊल टाकल्या टाकल्या आपल्याला जाणवतं, इथला महोलच वेगळा आहे.नाटक , ड्रामा ,प्ले , स्क्रिप्ट , डायलोग्स , बेक्स्टेज , नेपथ्य , संवाद , रंगमंच , रंगभूषा , व्यक्तिचित्रण , कला , अभिनय या साऱ्या शब्दांनी पृथ्वीचा आसमंत नेहमीच व्यापलेला असतो नाट्यवेडाचा गंध इथल्या प्रत्येक वस्तूला आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं 'passion ' आहे ड्रामा. म्हणूनच एखादी षोडशवर्षीय कन्या "मन्तो की कहानियां " वाचत असते तेव्हा चकित व्हायला होत नाही. बुकशॉप चालवणारा युवक फावल्या वेळात नाटकातली स्वगतं भूमिकेच्या गाभ्यात शिरून म्हणत असतो तेव्हा डोळे विस्फारत नाहीत.

इथल्या कॅफेने अनेक व्यक्तिरेखांना जन्म दिला , अनेक नवीन 'फॉर्म्स ' आणि पटकथा इथल्या कॉफीच्या गंधाने घडत गेल्या. आजही इथे परवलीचा प्रश्न असतो "so , what's new ?". नावीन्याची ही आस पृथ्वीने अजूनही जपली आहे. आजही इथल्या टेबलांवर नाटकांना आकार मिळतो , भूमिकांना व्यक्ती मिळतात , धडपडणार्यांना व्यासपीठ मिळतं आणि रंगभूमीला नवीन विचार मिळतात .

नाविन्य आणि वेविध्य हे पृथ्वीचं वेशिष्टय. एखाद्या संध्याकाळी तुम्हाला नाटकांच्या चार्चेसोबत बासरीचे सूर ऐकू येतील , मधूनच एखाद्या गिटारच्या तारांनी छेडलेली जिंगल तुमची संध्याकाळ प्रसन्न करेल.
पृथ्वीच्या "aura" बाहेर पडताना विचार येतो , पृथ्वी नक्की काय आहे ? एक चळवळ , एक विचार , एक व्यासपीठ , कि फक्त एक थिएटर? पृथ्वी या सगळ्याच्या पलिकडे आहे. त्याला एकाच 'form' मध्ये बांधताच येत नाही … येणार नाही. प्रत्येकाला जसं आवडेल जसं भावेल तसं ते असतं आणि त्याच्या तशा असण्यातच त्याचं 'पृथ्वी'पण सामावलेलं आहे
-अभिषेक राऊत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

आवडले. आणखी विस्तार करून मोठा लेख लिहिल्यास जास्त आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथल्या कॅफेने अनेक व्यक्तिरेखांना जन्म दिला , अनेक नवीन 'फॉर्म्स ' आणि पटकथा इथल्या कॉफीच्या गंधाने घडत गेल्या.

एखाद्या संध्याकाळी तुम्हाला नाटकांच्या चार्चेसोबत बासरीचे सूर ऐकू येतील , मधूनच एखाद्या गिटारच्या तारांनी छेडलेली जिंगल तुमची संध्याकाळ प्रसन्न करेल.

अशा सारख्या वाक्यांनी लेखाला अतिशय फ्रेश गेटप आला आहे. वरती शहराजाद यांनी म्हटल्याप्रमाणे - विस्तार करावा ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

Smile छान! पृथ्वीबद्दल अजून काही टाका..
फोटोज् असतील तर नक्कीच टाका. मस्त वाटेल एकत्र बघून

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0