एका डेटिंगची गोष्ट – भाग पहिला

समोर किमान पाच हजार तरुण-तरुणी. अक्ख्या तरुणाईला वेड लावणारा गायक आणि त्याच्या सोबतचे अजून चार जण. गेले तीन तास त्यांच्या गाण्यांच्या बोलावर आणि गिटार, ड्रमच्या तालावर तरुणाई डोलत होती. कार्यक्रम शेवटाकडे यायला लागला. अक्ख्या वातावरणात संगीत पसरून गेलं होतं. शेवटचं गाणं सुरु होणार इतक्यात त्या ‘celebrity’ गायकाने त्याला बोलावलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवला. चीत्कारणाऱ्या ‘crowd’ कडे बघत गायक म्हणाला ” Thanks Bro, This event was possible only because of you”. क्षणार्धात अक्ख्या गर्दीतून त्याच्या नावाच्या आरोळ्या निघाल्या. तो निवांत हसला आणि गर्दीकडे पाहत त्याने एक फ्लाइंग किस दिला. गायकाने हातात माईक घेतला आणि सूर छेडले, “तुम हो तो गाता है दिल.…”
तो backstage ला आला. त्याच्यासमोर त्याची अक्खी टीम उभी होती जी त्याच्यासोबत गेले महिनाभर दिवसरात्र राबत होती. त्या सगळ्यांच्याच चेहऱ्यावर समाधान होतं. त्याने सगळ्यांना सूचना दिल्या, जबाबदाऱ्या वाटून दिल्या तसंही कार्यक्रम संपल्यात जमा होता. पुढचं काम आपली टीम नीट करेल याची त्याला खात्री होती. तो बाहेर आला. त्याने सिगारेट शिलगावली. घड्याळात पाहिलं, दीड तास उशीर. “Shit , Man!!! थांबली असेल का ती?? असेल थांबली असेल. आज खरंतर इतका महत्त्वाचा कार्यक्रम तरीही आपण तिला भेटायला तयार झालो. निघता आलं असतं खरंतर, पण जबाबदारी पडते मुख्य माणूस म्हणून. तिला दिलेली वेळ आणि आपलं काम यात आजपण कामाने बाजी मारली. ठीक आहे दीड तास उशीर झालाय, पण थांबली असेल ती. विचारांच्या गणगणीत त्याने मोबाईलकडे सुद्धा पाहिलं नाही. सिगरेट विझवली, बाइकला किक मारली आणि निघालासुद्धा. निघता निघता इतकंच पुटपुटला. “ती नाही जाणार आजची ‘डेट’ सोडून.”
चेहऱ्यावर भलं मोठ्ठ हसू घेऊन ती तितक्याच मोठ्ठ्या बेडरूम मध्ये शिरली. आत गेल्या गेल्या ती मोठ्ठ्या आरशासमोर उभी राहिली. स्वतःशीच हसून तिने स्वतःलाच पाच वेगवेगळ्या पोझेस मध्ये पाहिलं. प्रत्येकवेळी आपण तितक्याच सुंदर दिसतोय याची खात्री झाल्यानंतर ती आरशावर बेहद खुश झाली. तिने हातात मोबाईल घेतला. तीन दिवसांपूर्वी त्याने सांगितलेलं “आपण चार दिवसांनी भेटूया. मला असं वाटतंय आपल्याला दोघांनाही एकमेकांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचंय.” तिने ते एक वाक्य पुन्हा पाचवेळा वाचलं. कसं कळतं न त्याला मनातलं सगळं!!! असा एक उनाड विचार तिच्या मनात डोकावला आणि त्यासरशी तिचे दोन्ही गाल हलके गुलाबी झाले. चार दिवसातले तीन तर गेले म्हणजे उद्याच संध्याकाळी जायचंय त्याला भेटायला. तिने कपाटातले सगळे टॉप बाहेर काढले. अक्खा बेड बघता बघता रंगीत झाला. त्याकडे बघता बघता ती स्वतःशीच बोलायला लागली, “त्याला आवडणारे एकूण रंग तीन. त्यातले दोन रंग मलाही खुलून दिसतात. (म्हणजे मला कुठलेही रंग खुलून दिसतात म्हणा!!) बरं . तर त्या दोन रंगांच्या सहा छटांचे एकूण दहा टॉप आहेत. त्यातला एक निवडायला हवा.” तब्बल तीन तासांनी ती बेडरूम मधून बाहेर पडली. उद्याच्या संध्याकाळचा सगळा ‘लूक’ फायनल करून.
आज उशीर करायला नको. हे डोक्यात ठेवून तिने वेळेत आटोपलं अगदी काल ठरवलेल्या ‘लूक ‘ नुसार जसच्या तसं. आपण तर निघतोय वेळेवर.. त्यानेही वेळेत यायला हवं. कसलातरी इवेन्ट आहे म्हणत होता, हा मनुष्य एक अक्खा दिवस देऊ शकत नाही संध्याकाळ मागितली फक्त, तर ती सुद्धा इवेंट manage करून येतो असं म्हणालाय. नाही करणार आज उशीर. आजची ‘डेट’ मिस नाही करणार तो. विचारांच्या चक्रात बुडालेली असतानाच तिने कारचा दरवाजा उघडला आणि ती आत बसली. आरशामध्ये तिने पुन्हा स्वतःला पाहिलं आणि स्वतःवर निहायत खुश झाली. आजच्या ‘डेट’साठी ती परफेक्ट दिसत होती.
(क्रमशः)
– अभिषेक राऊत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्त सुरुवात झालीये. फेब्रुवारी वाटायला लागलाय Smile मध्ये मध्ये गाण्यांचे शब्द पेरा ना ;).
वेडी झालेय. त्या टॉपचं वर्णन करायचत ना - लेसी अतिमंद लव्हेंडर होता की फ्रिलवाला अगदी सॉफ्ट बेबी पिंक होता.
बरं निदान तिने काजळ अन टिकली लावली होती का अन तिच्या पर्सला झोके देत ती बाहेर पडली का. बर मग लिपस्टिक तरी नक्की कॉपर hue चच असणार, कारण तेच तिला मस्त दिसत असणार.

.
वे-डी झालेय. जाऊ देत.
___
पण Abhishek Raut याला जबाबदार तुमचेच लेख आहेत. अपेक्षा खूप वाढल्यात हो Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धन्यवाद. तुमच्या अपेक्शाना न्याय देन्याचा प्रयत्न करीन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत

Smile लेखक म्हणून, अत्यंत सुंदर रंग भरा. Take your own time. तुमची शैली खूप आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

होय. मे नक्कीच प्रयत्न करेन. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिषेक राऊत

On second thought, सगळ्ळं उकलून सांगू नका, वाचकाला स्वतःला त्या व्यक्तीरेखेत पहाण्याचे जे स्वातंत्र्य तुम्ही आत्ता ठेवले आहेत ते तसेच ठेवा. नाहीतर मजा निघून जाईल.

Oh my God! Cannot wait for part 2 : )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...