अफूची गोळी

तो दरवर्षी येतो. न चुकता. ठरलेल्या वेळेला , ठरलेल्या दिवसांसाठी. आजकाल DJ च्या आवाजात त्याच्या नावाची ललकारी नीट ऐकूही येत नाही. सोन्या-चांदीच्या अलंकारांत त्याचं लंबोदर कधी झाकलं जातं कळत नाही. मैलभर पसरलेल्या रांगांमधून VIP पास असल्याशिवाय त्याचं दर्शनही होत नाही, उंचच उंच मूर्त्यांच्या स्पर्धेतून याच्या भक्तांचं खुजेपण समोर येतं. पण तरीही तो येतो. मला आश्चर्य वाटतं दरवर्षी इतक्या स्थितप्रज्ञतेने येणं जाणं कसं काय जमतं याला? कदाचित म्हणूनच याला देव म्हणत असावेत.

शेवटी परवा त्याला गाठलंच म्हटलं, "बस जरासा , थोडं बोलायचंय." जगन्नियंता तो, माझ्या मनातली घालमेल ओळखली असणारच, बसला बाजूला म्हणाला, "विचार, काय विचारायचं ते." का येतोस रे म्हटलं तू ? काय ठेवलाय आम्ही इथे तुझ्यासाठी? कानठळ्या बसवणारे आवाज, खड्ड्यात बुडालेले रस्ते, मंडपातच जुगार खेळणारे "युवक कार्यकर्ते", तुझ्या निर्जीव मूर्तीवर किलोकिलोने सोने चढवणारे तुझे भक्त, तुझ्या उत्सवाचा 'इव्हेण्ट' करून त्याला 'प्राईम टाईम ' वर विकणारे नेते यातलं नक्की काय आहे जे तुला इकडे खेचून आणत दरवर्षी?

बरं तू येतोस थेट एका वर्षाने. त्यात बरंच काही घडलेलं असतं. निसर्गाचा प्रकोप, दंगलींचा उद्रेक, पैशांचे घोटाळे, निवडणुकांचे निकाल आणि सामान्यांची परवड . दरवर्षी तसंच, तेच मागील पानावरून पुढे सुरु. तुझ्या येण्याने ना काही थांबतं ना काही सुरु होतं. मग का येतोस तू?

तो हसला. गजमुख हलवलं आणि म्हणाला,"माझ्या येण्याने आजूबाजूचा माहोल बदलायला मी काही पंतप्रधान नाही. सगळं तसंच असतं, पण मी येतो म्हणून तुम्ही ते विसरता. रोजच्या जगण्यातली दुःक्ख माझ्या येण्याने दूर होत नाहीतच फक्त ती विसरली जातात. दहा दिवस माझ्या असण्याचा असर तुमच्यावर असतो."

मी विचारात पडलो म्हणजे तू दुखहर्ता नाहीस तर केवळ दुःक्ख विसरायला लावणारा आहेस. ते ही क्षणिक. पण मग हे काम तर 'अफूची गोळी' सुद्धा करते. आणि क्षणार्धात मला कार्ल मार्क्स आठवला तो तर फार पूर्वीच म्हणून गेला होता "धर्म ही अफूची गोळी आहे!!!". मी चमकून त्याच्याकडे पाहिलं. तो अर्थपूर्ण हसला माझ्या मनातलं ओळख्ल्यासारखा. मी त्याच्या हातातला मोदक घेतला, घशाखाली ढकलला, मला तरतरी आली आणि बेंबीच्या देठापासून मी ओरडलो , "गणपती बाप्पा मोरया , मंगलमूर्ती मोरया !!!!"

-अभिषेक राऊत

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

अभिषेक तुम्ही माझे डु आय डी आहात का? कारण मी देखील मिपावरती मला गणपती भेटतो अर्थाचे ललित टाकले होते Smile
ओह माय गॉड!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

असे लेख पहिले लेख फक्त भाद्रपदाच्या गणेशोत्सवात यायचे. आता चक्क माघी गणेशोत्सवात पण ? एकंदरीत जनता बरीच भाविक होत चाललीय म्हणायची.
एनीवे, आमच्या गावात वेलकम !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावेळेस मजा नाही आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...