ती

दुपार टळून चालली होती , सुर्य मावळतीकडे झुकत होता. खरेतर ऑफिसमधून बसून ह्या गोष्टी
कधीच दिसत नव्हत्या, पण त्यावेळी माणसाचे आयुष्य चालते ते घड्याळाच्या काट्याकडे बघत…………
कंटाळा आला होता, त्याला रोजच्या ह्या धावपळीचा…………!!!!
त्यामुळे आज कामात सुद्धा लक्ष लागत नव्हते, समोरच्या कॉम्पुटर कडे नुसता शून्यात बघत होता,
कसला तरी विचार त्याला आज सतावत होता, मन पुन्हा - पुन्हा त्याला भूतकाळात घेऊन जात
होते….
अचानक त्याच्या मनात आले तडक उठावे, बाहेर जावे आणि एक सिगारेट सुलगावी आणि त्या सिगारेटच्या धुरासारखे
हलके हलके होऊन जावे…… पण त्याला आज तेही शक्य नव्हते…?????
तो वाट पाहत होता ऑफिस सुटण्याची आज कुठेतरी शांत ठिकाणी जावे जिथे फक्त असेल आपले मन
अन थकलेले हे शरीर
पण शरीरापेक्षा ही आज जास्त मन थकले असे भासत होते, खरेतर त्याला आज एक आठवण सतावत होती
भूतकाळातल्या गोष्टी आज त्याच्या वर्तमानाच्या पटलावर आल्या होत्या, अन त्यातही तिची
आठवण ती ……………
……………. अन क्षणात त्याच्या ओठावर हसू झळकले अन तत्क्षणी डोळ्यात आसू………
खरेतर अशा संमिश्र भावनाचा ज्यावेळी मनात कल्लोळ उठतो ना त्यावेळी मनाची अशी विलक्षण अवस्था होऊन जाते कि
सुख आणि दुख एका क्षणासाठी एकच भासू लागते ……
पण तेवढ्यात कोणाच्या तरी आवाजाने भानावर आला…
त्याचा मित्र त्याला आवाज देत होता, कदाचित तो बराच वेळ त्याच्या कडे बघत असावा म्हणून त्याने विचारले
"कसला विचार करत आहेस…. ?"
तो बोलला काही नाही रे असेच कामाबद्दल …
पण त्याला ते खरे वाटले नाही, आणि वाटणार तरी कसे कॉलेजपासून ते मित्र होते आणि आताही, एकाच ऑफिसमध्ये…
मित्र बोलला,
"……. ना तू कामाचा विचार करत आहे ना दामाचा….???"
त्याने ओळखले होते पण नाही म्हणत समजावले आणि वेळ मारून नेली आणि तो जाईपर्यंत कामात लक्ष घालू लागला
आता थोड्याच वेळात ऑफिस सुटणार होते,
…तसे रोज ते दोघेजण बरोबर जात असत, पण आज त्याला खोलीवर जाण्याची मुळीच इच्छा नव्हती
म्हणून तो आज त्याच्या आधीच ऑफिसवरुण निघाला…
ऑफिस वरून निघाला खरा पण काय करायचे? कुठे जायचे काहीच माहित नाही?
"… फक्त डोळ्यासमोर एकच दिसत होते इथून बाहेर पडायचे…. "
पण थकलेले मनाने विचार केला कि चल नेहमीच्या जागी जावे निदान एक चहा आणि सिगारेट मारावी आणि सिगारेट
मारता-मारता ठरवूया…… ?
…. वाटले होते थकलेले मन ह्या सिगारेट बरोबर विझून राख होईल शांत होईल पण ह्यातले काहीच झाले नाही
पुन्हा सिगारेट आणि चहा मारला थोडीशी मरगळ गेली पण डोक्यातील विचारचक्र मात्र आता अधिक
वेगाने फिरू लागली. पुन्हा मन भूतकाळात जाऊ लागले
विसरायचे होते सारे काही, मनाशी निश्चय सुद्धा तसा केला होता पण आज मात्र तिची आठवण……
" … नाही…नाही …???? "
तिचा विचार नाही करायचा आणि त्याच तंद्रीत चालू लागला खरेतर पायात इतके बळ हि नव्हते कि
खूप दुरवर जावे पण इथून आता उठावे नाहीतर आणखी एका सिगरेटची राख होईल…. म्हणून उठला
खरेतर आज शांत ठिकाण हवे होते पण बाहेरच्या गोंगाटा पेक्षा मनातला गोंगाट खूप वाटू लागला
बाहेरची दुनिया तर आपल्याच तंद्रीत होती… जवळपास अंधार पडू लागला होता सगळ्याची घरी जाण्यासाठी
धडपड आणि आपण मात्र ह्यापासून का दूर जातोय हेच कळत नव्हते …?
खरेतर एखाद्या बागेत जाऊन मन शांत करावे तर तेही शक्य नाही तिथे तर तिच्या आठवनीचा बाजार उठला असता
म्हणून तेही रद्द केले मग समोरच त्याला एक मंदिर दिसले लोकांची जास्त वर्दळ पण दिसली नाही म्हणून आज पहिल्यादा मंदिरात शिरला

आत मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून गेला समोर भगवान शंकराची पिंड होती खरेतर आज नास्तिक मनाला
सुद्धा माथा टेकवावा असे नाहीच वाटले तो फक्त पिंडीकडे बघत राहिला एकटक
सांगायचे होते त्याला खूप काही ?
मागायचे होते त्याला., पण नाही मागता आले ? का नाही आले कुणास ठाऊक…. ?
मग तो तसाच माघारी फिरला मन शांत तर झालेच नाही पण क्षणाक्षणाला असे भासत होते कि जणू मंदिरात देव शोधत आहे कि व्यतीत झालेले, हरवलेले मन……….
पण ज्यावेळी तो माघारी फिरण्यास वळला अन क्षणभर त्याला धक्काच बसला…
ती समोर होती……. !!!
हो तीच ती………!!!!!
जिच्यासाठी मन आता पर्यंत सैरभैर पळत होत, मनामध्ये जिच्यासाठी भावनाचा कल्लोळ उठला होता….
जणू एखादे पहाटेचे स्वप्न तर पडत नाही असा क्षणभर भास झाला पण तिच्या हाकेने तो भानावर आला
"… श्रीकांत कसा आहेस …???"
खरेच आजही त्याला तिचा आवाज तितकाच गोड, मधाळ वाटला पण एक गोष्ट मात्र सलून गेली
त्याला जुनी गोष्ट आठवली ती एक दिवस त्याला प्रेमाने बोलली. "मी तुला श्रीकांत नाही बोलणार
मी फक्त तुला श्री बोलणार माझा श्री… फक्त माझा… त्यात आपलेपणा आहे आणि प्रेम
क्षणभर असे वाटले ती किती दूर गेली आहे आपल्यापासून…
खरेतर आज त्याच्याजवळ आज त्याच्या स्वताच्या समाधानचे उत्तर आणि तसे समाधानचे कारण सुद्धा नव्हते
पण तरीही तो उत्तरला.,
"मी ठीक आहे पण तू कशी आहेस…?"
ती बोलली, तुला कशी वाटत आहे…??
तो काहीच बोलला नाही फक्त हसला,
मग तिनेच विचारले, आज मंदिरात… देवावर एवढा विश्वास कधीपासून आला…
आपण किती तरी वेळा मंदिरात गेलो तर तू नेहमी बाहेर उभा राहायचास . तू खूप बदलला आहेस
खरेतर त्याला सकाळपासूनची स्वताची अवस्था मनाची ती चलबिचल सांगविसी वाटलीहि पण परत मनात विचार
आला नको तिला सांगून तरी काय उपयोग…?
पण तेवढ्यात ती बोलली, "… इथेच पायरीवर बस मी दर्शन घेऊन आले… "
ती दर्शन घेऊन येईपर्यंत आता त्याचे विचारचक्र पुन्हा फिरू लागले तिच्या भोवती,
खरेतर आज लग्नानंतर तीन वर्षाने त्याला ती दिसली होती कि भेटली होती…?
नाही दिसलीच होती…
खरेतर तिला मिळवण्यासाठी आपल्याकडे काय होते आणि आजसुद्धा काय आहे… ?
आज तिच्या चेहऱ्यावर सुख भासत होते आणि गळ्यात मंगळसुत्रा सोबत घातलेले तिचे ते वैभव…
खरेच एवढे सारे आपण तिला देऊ शकलो असतो… ?
नाही तिला ह्या वैभवाचा कधीच लोभ नव्हता तिने घरच्या साठी आपल्या प्रेमाला तिलान्जली दिली होती
हे विचार संपंत नाही तोपर्यंत ती समोर आली
आल्या-आल्या ती बोलली, का त्रास करून घेत आहेस… ?
त्याने नुसता छे म्हण्याचा प्रयत्न केला
पण तो मूर्ख होता त्याला असे वाटत होते कि तिला आपल्या आताच्या जीवनाविषयी तिला काहीच माहित नाही
ती बोलू लागली,
सुरुवातीला मला हि खूप त्रास झाला पण ह्यांनी खूप सांभाळून घेतले खूप काळजी घेतात अगदी
तुझ्यासारखी….
खरेच सांगू जेव्हा तुझ्यापासून दूर गेले खरे…. . पण ज्यावेळी खूप दुख होते ना मग तुझी आठवण काढते
आणि दुख कुठच्या कुठे पळून जाते एखादा आसव डोळ्यामध्ये तरळून जातो तो तसाच पुसते आणि पुन्हा संसारात आनंदाने गुंतवून घेते खरे सांगू आयुष्य कुणासाठी थांबू शकत नाही पण त्याच्याशिवाय आयुष्याला अर्थ सुद्धा येत नाही.
हे तूच मला सांगितले ना अन आज तूच …. !!!!!!
खरेच किती बदलेली ती… ह्या तीन वर्षाच्या संसारात केवढी परिपक्वता येउन गेली होती तिच्यात,
आणि श्री मात्र तिच्याच विचारात हरवत चालला होता ती न मिळालेल्या दुखात बुडून जात होता खरेच तिला जगण्याचे बोल आणि मोल सांगणारा तो ह्या धुक्यात स्वताला हरवून टाकत होता.
कधी काळी लहान सहन गोष्टीवरून वाद घालणारी ती हीच आहे का असा प्रश्न श्रीला पडू लागला. किती हट्ट करायची
उशीर झाला तर रुसून बसणारी हीच का ती कळी …. ?
हातात हात घालून तासनतास बोलणारी…काहीही
पण आज …
किती वेळ ते त्या पायऱ्या वर बसून बोलत होते, किती लोक आले आणि गेले न कशाचे जाण उरली होती ना…
ना कशाचे भान……
क्षणभर त्याला वाटले त्यावेळी सुद्धा तिच्याबरोबर कसा वेळ निघून जायचा ते कळत सुद्धा नसे आणि आजही तेच झाले
अंतकरण जड झाले होते निरोप घेण्याची इच्छा नव्हती, पण ती घाई करू लागली, खूप उशीर झाला होता पूर्ण अंधार पडून आला होता पण आता तुझ्यासोबत जणू चांदणे पडले होते असेच क्षणोक्षण वाटत होते
ती जाते बोलली……… आतापर्यंत तिचे इतके बोलके वाटणारे डोळे सुद्धा पाणावले.
ती निघून गेली जाताना फक्त दोनच शब्द बोलली,
काळजी घे… !!!!
अन आतापर्यंत गोड भासणारे चांदणे कुठे दूर निघून गेले कुणास ठाऊक …?
आणि आता ती जागा घेतली भयानक अंधाराने…
ती निघून जात होती तो तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहिला जणू त्या अंधारात सुद्धा ती त्याला स्पष्ट दिसत होती
तो तसाच बसून राहिला पुन्हा विचाराचे काहूर पेटले होते पण ते क्षणभर टिकले कारण आता साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली होती असे नाही पण जगण्याला दिशा मिळाली होती हरवलेले मन परत आले होते थकलेले शरीरात आता एकाएकी ताकद
आली होती
तो मनातल्या मनात बोलू लागला…
त्यावेळी सुद्धा तिने जगायला शिकवले आणि आजसुद्धा…
आजसुद्धा तिचं डोळ्यात आलेला तो अश्रू तो त्याला खूप काही देऊन गेला, खूप सांगून गेला आणि खूप मागून गेला
आता वाऱ्याची गार झुळूक सुटली होती थोडीशी बोचरी थंडी जाणवत होती म्हणून त्याने खिशात हात घातला तर सिगारेटचे पाकीट हाताला लागले एक सिगारेट सापडली त्याने ती तशीच ओठात ठेवली तिला आग लावणार तितक्यात तिचा चेहरा
आठवला… तिचे ते हसन
आज पहिल्यादा सिगारेट जवळ असताना त्याला ती मारावीशी वाटली नाही त्याने ती तशीच जमिनीवर फेकली
अन त्याच्या खोलीवर जाऊ लागला तो चालत होता पण त्याचे चालण्याकडे मुळी लक्ष नव्हतेच
एकाच विचार त्याचा मनात येत होता
"…. तुझ्या आयुष्याच्या, संसाराच्या वर्तुळात मला कदाचित स्थान नसेल
पण तुझ्यावरच्या निस्सीम प्रेमाची, तुझ्याबरोबर व्यतीत केलेल्या प्रत्येक क्षणाची, व्यथित झालेल्या तुझ्या
आठवणीची आणि माझ्या साठी तुझ्या डोळ्यात आलेल्या त्या अश्रुची "एक स्पर्शिका" नक्कीच तुला एका बिंदुतून
स्पर्श करून गेलीली असेल हेच मला उरलेले आयुष्य जगण्यासाठी, उर्जा देण्यासाठी आणि स्फूर्ती देण्यासाठी पुरेसे असेल……. "

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

धन्यवाद....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0