वैदिक काळातील वीरांगना

ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही ठाऊक नाही. तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच.

वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण करण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला. सैन्य ही युद्धघोष तिच्या मागे निघाले. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिथे लक्ष न देता केवळ शत्रूचा पराभव, हाच उद्देश्य ध्यानात ठेऊन तिने रणांगणावर वर रथ चौफेर उधळला. एका रथी प्रमाणे युद्ध करून तिने हजारो शत्रू सैनिकांचा पाडाव केला. युद्धात जय मिळवून दिला. गौ धन ही पुन्हा परत मिळाले. मुद्‌गलानीच्या नेतृत्व आणि पराक्रमा मुळे विजय मिळाला, सर्वांनी तिचे कौतुक केले. त्या वेळच्या इतिहासकार अर्थात मंत्रदृष्टा ऋषीनीं वीरांगना मुद्‌गलानीच्या पराक्रमाची नोंद घेतली. तिच्या पराक्रमाची गाथा ऋग्वेदात ऋचाच्यां रुपात आज ही जिवंत आहे.

उत् स्म॒ वातो वहति वासो अस्या अधिरथं यदजयत् सहस्रम् ।
रथीरभून् मुद्गलानी गविष्टौ भरे॑कृतं व्यचेदिन्द्रसेना ॥ २ ॥


(ऋग्वेद १०/१०२)

प्रख्यात योद्धा मुद्‍गल याची पत्नी मुद्‌गलानी ही त्याच्या जवळच रथांत बसली. वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिने तिथे लक्ष दिले नाही. इंद्रसेनेत रथी हो‍ऊन तिने हजारो शत्रू सैनिकांचा पराभव केला आणि गायींना प्राप्त केले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिने तिथे लक्ष दिले नाही

अतिशय कठीण ओळ आहे...

बाकी तिच्या पराक्रमाला मनापासुन सलाम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिने तिथे लक्ष दिले नाही

शत्रु सैनिकांनी त्या उडणार्‍या पदराकडेच लक्ष दिल्यामुळे त्यांची हार झाली असावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या काळात स्त्रीयांवर पाशवी अत्याचार व्हायचे. काय घेऊन बसलाय वैदिक कालीन वीरांगना? ते परत आणलेलं गोधन लगेच सगळ्या पुरुषांनी हडपलं असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खूब चुकीची समजूत आहे. अत्याचार हे आजच्या काळाचे सत्य आहे.

ऋग्वेदीक कळात जीवन अवघड असल्यामुळे भेदभाव असला तरी फारच कमी असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>> वार्याने तिचा पदर उडत होता, तरी ही तिथे लक्ष न देता केवळ शत्रूचा पराभव, हाच उद्देश्य ध्यानात ठेऊन तिने रणांगणावर वर रथ चौफेर उधळला. <<

ह्यावरून हे आठवलं -

तात्पर्य : पुष्ट, पदर वगैरे शब्द गंभीर लेखनात अंमळ जपून शिंपडावेत.
(मूळ ऋग्वेदातच तसले शब्द असले, तर उपदेश ऋग्वेदाच्या लेखकाला उद्देशून आहे. तुम्ही केवळ भाषांतरकार असाल, तर फार मनावर घेऊ नये.)
(सांगायला लागू नये, पण ह. घ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

या सुक्तात १२ ऋचा आहेत. संपूर्णपणे वाचल्यास गैरसमाज होणार नाही. एक ऋचा फक्त उदाहरण म्हणून दिली कारण या ऋच्यात जवळपास संपूर्ण कथा येते. 'बाकी आपण सुज्ञ आहातच' :bigsmile: .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही मुत्सद्दी किंवा वीरा (किंवा कथेनुसार कुत्री) होती.

सरमेने गुरे परत आणण्याकरिता केलेली मुत्सद्देगिरीचा संवाद एका सूक्तात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विश्पला नामक अजून एक वीरांगनेचा उल्लेख ऋग्वेदात मिळतो.

http://en.wikipedia.org/wiki/Vishpala

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धाग्याचा विषय हा 'वैदिक काळातील वीरांगना' याऐवजी 'वैदिक काळातील वारांगना' असा असता, तर कदाचित धाग्यास प्रतिसाद अधिक भरभरून मिळाला असता काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ ऋचा आणि त्यावरचे सायणभाष्य पाहिले. मुळामध्ये 'रथारूढ झालेल्या आणि सारथ्य करणार्‍या मुद्गलानीने एक सहस्र गाई जिंकून मिळवल्या. त्यावेळी तिचे वस्त्र वार्‍यावर उडत होते' इतकेच text आहे. त्याव्यतिरिक्त अन्य सर्व वर्णन धागाकर्त्याने कल्पनेने पुरविले आहे. अर्थात ह्यात आक्षेपार्ह काही नाही. ह्या चार शब्दांमागची गोष्ट धागाकर्त्याने कविचक्षूंनी पाहून येथे वर्णिली आहे आणि तशी ती घडली असेल असे मानण्यात काहीच अडचण नाही.

हे थोडेसे कथेकर्‍याच्या कीर्तनासारखे आहे. भागवतपुराणातला, ज्ञानेश्वरीतला वा तुकारांमाचा एखादा श्लोक, ओवी व अभंग निवडून आणि ते फुलवून चांगला कथेकरी श्रोत्यांना तासभर कथेमध्ये गुंगवून ठेवतो त्यामागे हीच कला असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळ निरूपणः

तिने हजारो शत्रू सैनिकांचा पाडाव केला.

वरील प्रतिसादः

मुद्गलानीने एक सहस्र गाई जिंकून मिळवल्या

आभार. सहस्त्र हे गाईंची संख्या आहे - किती सैनिकांशी लढली ते नाही - हे मलाही वाटत होते. पण संस्कृत शिकून कित्येक वर्षे उलटली असल्याने यावेळी अज्ञान पाजळायचे टाळले. Smile

अर्थात रथी होऊन हजार गाई जिंकून मिळवणे हे तत्कालीन वीरकृत्य आहे याबद्दल वाद नाहीच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

म्हणजे वार्‍याने उडणारा पदर पटाईत काकाकृत आहे तर.
इसकू बोलते है अ‍ॅडिशन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शंका नं.१: दस्यू ही काय भानगड आहे? हे लोक नेमके कोण होते? खूप वेळा ऐकलयं म्हणून एक कुतुहल आहे...
शंका नं.२: कितीही पुष्ट बैल असला तरी रथाला बांधल्यावर तो घोड्याइतक्या वेगाने भरधाव कसा धावेल? आणि ते जर खरं असेल तर जुन्या काळी पागा बाळगणारे राजे, सेनापती, सरदार, शिलेदार सगळे मूर्खच होते काय? उगीच आपले घोड्यांना खरारा करत बसले!!!

मत एकमेवः वार्‍याने उडणारा पदर पहात सगळे शत्रूसैनिक खिळून गेले यात काहीही आश्चर्य नाही. 'पदरके पिछे क्या है?' हे जाणून घेण्यातच तर समस्त पुरूषवंशाचा मोक्ष आहे!

आमेन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितीही पुष्ट बैल असला तरी रथाला बांधल्यावर तो घोड्याइतक्या वेगाने भरधाव कसा धावेल?

त्याकाळी भारतात घोडे नव्हते (पण विमाने मात्र होती).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हडप्पा काळातील घोड्याचे अवशेष मिळाल्याच्या संशोधनाची लिंक पाहिली होती मध्येच. बहुदा मिपावर वल्ली यांनी शेअर केली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मग ती वीरांगना पुष्ट बैलाला घेऊन का गेली?

बहुधा बैलाला पाहून गाई आपोआप परततील, हे कारण असेल काय? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ती बैलांना का घेऊन गेली ते तुम्ही शोधा. ( गाईंना अ‍ॅट्रॅक्ट करायला हे एक कारण असू शकेल ;-))
वरील ऋचा वैदिक आहे असं धागाकर्ते म्हणतात. सो तुम्ही वैदिक = भारतीय असं म्हणताय का सुनील राव. आम्हाला तर वैदिक म्हणजे परके एवढच माहित्ये.
पण हडप्पा काळात सिंधू संस्कृतीमध्ये घोडे नव्हते हे ठामपणे सांगता येत नाही असं वाचलं आहे ते सांगितलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गुजरातेतील सुरकोटडा या हडप्पा संस्कृतीच्या अंडर येणार्‍या ठिकाणी इ.स.पू. १७०० या सालचा घोड्याचा एक अवशेष सापडलाय खरा. पण तो वगळता अजून अवशेष कुठल्याच हडप्पन साईटवरती कुठेच सापडलेले नाहीत, आणि हडप्पा संस्कृतीतल्या खेळण्यांमध्येही कधी घोडा दिसलेला नाहीये. प्रत्यक्ष अवशेष नाहीत त्याला अजून काही पर्यावरणीय कारणे जबाबदार असतील असे मानले तरी जी खेळणी अथवा प्राण्यांच्या मूर्त्या आहेत त्यांमध्येही घोडा कधी दिसत नाही, सबब त्या संस्कृतीला घोडा तुलनेने अज्ञात होता असेच म्हटले पाहिजे.

पण एक मोठा डिस्क्लेमर देणे आवश्यक आहे. हडप्पा संस्कृती या बॅनरखाली भारत व पाकिस्तानात अनुक्रमे ८०० व ४०० उत्खननस्थळे येतात. पैकी ९७ ठिकाणीच उत्खनने झालेली आहेत. अनेक ठिकाणांचा प्रायमरी सर्व्हे केल्यानंतर मोहेंजोदडोइतका साईझ असल्याचेही निष्पन्न झालेय, पण या ना त्या कारणामुळे त्यांचे उत्खनन करता येत नाही, उदा. गनेरीवाला. हे ठिकाण भारत-पाक सीमारेषेच्या अतिशय जवळ आहे आणि जवळपास मोहेंजोदडोइतकेच मोठे आहे. कायम मिल्ट्रीच्या धोक्यामुळे तिथे कसलेही उत्खनन सुरू करणे केवळ अशक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

शंका नं. १: ऋग्वेदात वैदिक आर्य लोक हे 'इतरांचे' दोन विभाग मानत - दास व दस्यू.

बाकी वार्‍याने पदर इ.इ. बद्दल एक रिलेटेड घटना वाचली होती ती सांगतो. काळ आहे इ.स.१०००-१२००, ठिकाण महाराष्ट्र अथवा कर्नाटक. बहुधा यादव विरुद्ध होयसळ अशी म्याच ऐन रंगात आलेली होती. एका साईडने (नक्की कुठली ते आठवत नाही) समोरच्या साईडचे लक्ष विचलित करण्यासाठी एक नामी शक्कल योजिली- एक सुंदर स्त्री रणांगणात सोडली. तिची 'चांपेगौर अंगांगे' पाहून तिच्या शरीराचे घाट चढताउतरताना सैनिकांचे डोळे शिणून गेले आणि त्यांनी युद्ध थांबवले / विचलित झाले असे तत्कालीन एका ग्रंथात वर्णन आहे. नक्की संदर्भ पाहून सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐला.... म्हणजे आपल्या हिंदी पिच्चरमध्ये क्लायमॅक्सला हिरविण क्याब्रे करते तसं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हाहा, अगदी अगदी!

क्याब्रे म्हणजे हे अचानक "काय बरे" असे विचारलेल्या प्रश्नाचा संक्षेप आहे. ही कला मूळची इथलीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज्यांचे लक्ष विचलीत झाले असेल ते खरे मर्द म्हटले पायजेत Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ऋग्वेदात वैदिक आर्य लोक हे 'इतरांचे' दोन विभाग मानत - दास व दस्यू.

थॅन्क्स, त्यातलं दास म्हणजे काय हे समजतं पण 'दस्यू' म्हणजे कोण/काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याबद्दल काही विवेचन इथे पाहता येईल.

http://en.wikipedia.org/wiki/Dasa

शत्रूंना (काही केसेसमध्ये वैदिक असले तरीही) दस्यू असेही म्हणत असे दिसते. नक्की दास व दस्यूमध्ये फरक काय हे माहिती नाही. पाहिले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नक्की दास व दस्यूमध्ये फरक काय हे माहिती नाही. पाहिले पाहिजे.

साक्षात बट्टमणांना विचारात पाडण्यासारखा प्रश्न उपस्थित केल्याबद्दल हा पिवळा डांबिस स्वतःचेच हार्दिक अभिनंदन करून घेत आहे! आज आमच्या आय्डीच्या जन्माचे सार्थक झाले!!!
(इथे स्वतःचीच पाठ थोपटत असलेली स्मायली कल्पावी!!!)
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बहुतेक लुटारू समजल्या गेलेल्या टोळी-जमातीला(एक / अनेक) दस्यु म्हणत असावेत. दस्यूंनी गाई पळवणे वगैरे उल्लेख आढळतात.
शिवाय अलिकडच्या इंद्रजाल कॉमिक्स या संदर्भग्रंथांमध्ये वेताळाच्या कथांमधून जल'दस्यू' येत असतात. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते खरं, पण नक्की माहिती पायजेल हाय!
नायतर उद्या दस्यूंना आरक्षण मिळायचं आणि आम्हाला आम्ही दस्यू असल्याचं म्हायतीच नसल्याने त्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा राहून जायचं! तसं व्ह्यायला नको!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बैल बैलाच्या वेगाने भरधाव धाऊ शकतो. बाकी सुरवातीला गौ. पालन सुरु झाल्यामळे बैलच वापरल्या जात असेल. आज ही बैलांची दौड होतेच. या वरून एकच कळते, आर्य नावाची जमात मध्य आशियातून भारतात नाही आली. नाहीतर अश्वांचा उल्लेख असता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी हे लक्षात घ्यायला हवे की मूळ सूक्तात वर्णिलेले शत्रु हे 'दस्यु' अशा वर्णनाचे नसून 'दास' अशा वर्णनाचे आहेत. 'दस्यु' शब्दाचा वापर धागाकर्त्याच्या नजरचुकीतून झालेला दिसतो. सूत्रातील गायचोर शत्रु दास आणि आर्य अशा दोन्ही प्रकारचे आहेत. (आर्यांच्या एका गटाने दुसर्‍या गटाचे गोधन चोरणे ह्यात अविश्वसनीय काही नाही.)

'असुर' हा असाच वादग्रस्त आणि गोंधळात टाकणारा शब्द आहे. अतिपूर्व काळात हा शब्द चांगल्या अर्थाने वापरला गेला आहे. केव्हातरी नंतर अहुर मझ्दाचे अनुयायी फुटून निघाल्यावर त्यांचा नेता अहुर - असुर हा शत्रुपक्षामध्ये गेला अणि असुरांहून भिन्न असे 'सुर' हे चांगले आणि असुर म्हणजे दुष्ट हे समीकरण नव्याने तयार झाले. हेहि अर्थात एक मत आहे आणि त्याचेहि विरोधक आहेतच. ह्यावर अधिक वाचायचे असेल तर येथे पहा.

आता पुढचा प्रश्न म्हणजे 'दास'आणि 'दस्यु' ह्यांमध्ये फरक काय? ह्या प्रश्नाला सर्वमान्य असे उत्तर नाही आणि विद्वानंमध्येच ह्या शब्दांच्या अर्थांबद्दल मतमतान्तरे आहे. ह्या मतभेदांची थोडी चुणूक ह्या विकिपानामध्ये दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<आर्य नावाची जमात मध्य आशियातून भारतात नाही आली. नाहीतर अश्वांचा उल्लेख असता.>

येथे घोडे का बैल ह्या वादात शिरण्याची आवश्यकता दिसत नाही. (भल्याभल्यांचे हात ह्या वादात पोळलेले आहेत!)

पुढे ह्याच सूक्तामध्ये रथाला बैल जोडला, तोहि 'मुष्कभार' (अंडील बैल) असा स्पष्ट उल्लेख आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(भल्याभल्यांचे हात ह्या वादात पोळलेले आहेत!)

इंडीड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रथाला बैल जोडला याबद्दल आक्षेप नाही. त्या बैलाच्या शारीरिक (वा मुष्कजन्य) क्षमतेविषयीही संशय नाही.
मुळात जर भरधाव जायचं असेल (वेग हा क्रायटेरिया असेल) तर रथाला घोड्याऐवजी बैल का जोडला? अशी शंका होती.
पण वर कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे तोवर घोडा हा प्राणी आर्यांना इंट्रोड्यूस झालेला नसावा, ही शक्यता पटण्यासारखी आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही आणि अशा बाकीच्या कथा बर्याच (र्या पुढे अनेक विसर्ग) वर्षांपूर्वी 'वेदकालीन स्त्रीया' या (लेखक कुणी अक्षिकर म्हणून होते बहुतेक) वाचल्या होत्या. त्यात तिचं नाव मुद्गला असं वाचल्याचं आठवतं. बाकी जबला, गार्गी, मैत्रेयी इ. वर लेख होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिचा वार्‍याने उडणारा पदर पाहून शत्रू सैन्याला कदाचित "किसी शायर की गज़ल, 'मुद्'गल" असे गाणे सुचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतात दास प्रथा नव्हती, जाती प्रथेमुळे याची गरज पडली नाही. राज दरबारांत सर्व पगारी नौकर राहायचे. सत्ता बदलली तरी त्यांचे स्थान दरबारातच राहायचे. ही प्रथा विदेशी आक्रमणकार्यांनी ही मोडली नाही. अमीर खुसरो चक्क ९ बादशाहांच्या दरबारी कवी होता. बहुतेक एक दुसर्याला मारून गादीवर बसले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0