माझ्या मनाचे मानसशास्त्र
तुषार
1 minute
तुझ्या डोळ्यातील खगोलशास्र तू कधी पाहू दिले नाही,
तुझ्या आयुष्याचे गणिती कोडे मला कधी सुटले नाही,
तुझ्या विज्ञांनी विचारापासून मी कायम अज्ञानी राहिलो,
तुझ्या अर्थशास्रापासून तर मी कोसो दूर होतो,
तुझा खरा-खोटा इतिहास कळत राहिला,
पण तुझ्या भाषेचा स्वर माझ्याबाबतीत काही चांगला नव्हता,
म्हणून मी फक्त तुझ्या कमनीय शरीराचा भूगोल पाहत आलो
आणि माझ्या मनाचे मानसशास्र बिघडवून टाकले…
Node read time
1 minute
(No subject)
:)