Skip to main content

वीणेच्या मनीचे गुजगुपित

2 minutes

खरं सांगू प्र. तु केलिस नं मागणी ती चुक नाहि वाटलि मला.
तू थट्टेच्या (कोण रे तो "थत्तेच्या" असं वाचतोय ?) सुरात बोललास तेहि बरच.
पण ...
पण माझ्या कुंद धुंद भावना * समजून * न घेता तू त्यांची कशि रे थट्टा करतोस.
अरे आपल्या फुलपाखरी सोबतिच्या आठवणींनीच तर माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या चिळकांड्या उडाल्यात.
.
.
आता आहे प्रॉमिसडे. पडू ना मझ्या अलवार तरल प्रेमाचे तुझ्यावर सडे.
का रे कर्तोस तु असे? आपले जीवन जणु तरल मासे.
तुला हवय ते आहे माझ्याकडे. पण मला हवाय तुझा विश्वास (तुझा दारुडा विश्वास साठे नै बरं का)
मी चिंब चिंब बघ भिजले तुझ्या पारिजातकाच्या सड्यात.
वास येतो मला तुझा परसात, दारात आणि अगदि त्या तिथे....
.
.
तिथे त्या....
.
.
त्या मंदिरातही मला तुझाच वास येतो रे.
वेडि होइन रे मि.
.
.
भेटशिल न रे पुन्हा
.
.
हे मि माझ्या मनातलं लिहितेय. अगदि खर्र खर्र लिहितेय ;पेनाचा खर्र खर्र आवाज करत.
येशिल ना रे तु. जग्या मग्या नि टग्या नंतर तूच रे तू माझा.
.
.
मला माहितिये तुला सतार आवडते. पण कधीतरी वीणाही वाजवून बघ.
सुरेल झंकार येतील तुझ्या आयुश्यात वीणेने.
आपल्या नात्याची ही घट्ट वीण..तीच मी...वीणा.
.
.
आणि हो :-
वीणेच्या "मनीचे" असलं लिहिलं असलं तरी मी कै "तस्लि" नै.
माझी तशी कै "मनी" नै कोणी. तुच रे माझा बंड्या.
(तसा तुझ्याकडूनही मला बराचसा "मनी" हवाय, पण तो "हवा " आहे; "हवी" नाहिये. )
.
.
.
अवांतर
सदर लेखकाचा टवाळगिरी वगैरेचा पहिलाच जाणीवपूर्वक "प्र"यत्न आहे.
ओळींदरम्यानचे दोन-चार टिंब टिंब पाहून आपण केलेला तर्क योग्य आहे.

Node read time
2 minutes

ॲमी Fri, 13/02/2015 - 10:09

In reply to by ऋषिकेश

"वीणेचे मन" अधिक प्रस(द?)वणीय लिहू शकते याची खात्री आहे. > +१.
पण बाकीच्यांनी प्र आणि वीणांच्या कबाबमधे हड्डी बनू नये असे वाटते. त्या दोघांनाच मज्जा करूदेत ;-).

पी. डी. वीणा Thu, 12/02/2015 - 13:36

In reply to by मेघना भुस्कुटे

मी आहे हो इथेच मेघना ताई.... काय करु हो... आधीच प्र चा क्लेशदायी विरह आणि त्यात हे नवीन... नाही...नाही...नाही...नाही हो सहन होत आता या कोवळ्या जीवाला!!!

भीडस्त Thu, 12/02/2015 - 12:52

In reply to by अनु राव

वीणेची तार (की तारा असतात??आम्ही अंमळ फिलिष्टाईनच)
सोन्याची असणार नक्कीच.
वर्धनीयता आणि तन्यता चांगलीच आहे.

पी. डी. वीणा Thu, 12/02/2015 - 13:33

हे बघा, मझ्या आणि फक्त मझ्या "प्र" च्या निर्मळ प्रेमाची जीवघेणी थट्टा करणार्यानो तुम्हाला काय कळणार इथे मला काय होत असेल! इवलंसं काळीज दु:खानं तळमळ्तंय माझं!!! थांबाव हो हे सारं.......

adam Thu, 12/02/2015 - 13:42

In reply to by पी. डी. वीणा

ही नाही थट्टा.
स्वतःच्या मनाचा आवाज ऐक.
इथे काळीज पिळवटून निघत असताना अशी का मनाचा आवाज दाबतेस ?
ओघळून वाहू दे आज मनातलं सारं.
नाहीतर पी डी, लवकरच गाठशील ओ.पी.डी.

बॅटमॅन Thu, 12/02/2015 - 13:43

In reply to by adam

नाहीतर पी डी, लवकरच गाठशील ओ.पी.डी.

नाहीतर पीडी, होईल तुझा के एल पी डी.

शहराजाद Thu, 12/02/2015 - 16:31

In reply to by बॅटमॅन

पण... पण.. वीणेचा केएल्पीडी कसा होणार?

पी. डी. वीणा Thu, 12/02/2015 - 13:48

मनाच्या अवतीभोवती अशी काळीकुट्ट वटवाघुळं पिन्गा घालत असतांना मनाचा नाजुक अलवार आवाज दाबला जाणारच ना.......

गवि Thu, 12/02/2015 - 14:01

In reply to by पी. डी. वीणा

आर्त सादेला असे बेफिकिर प्रतिसाद पाहून आक्रंदून उठत असेल ना हळिवाच्या रोपासारखं हळवं मन..?

पहाटेच्या वेळी अजून साखरझोपेत असलेल्या गवताच्या पोपटी पात्यावरच्या दहिवरात वीणेचा कढत अश्रू मिसळल्यावर तो थेंब थरथरत असेल का वीणेच्या तारेसारखा ? की हलत असेल दुपट्यात लपेटलेल्या लहान बाळाने झोपेत अंग काढल्यासारखा?

ऋषिकेश Thu, 12/02/2015 - 15:12

वीणेच्या मनाला जो तो हात लाऊ लागलाय असे दिसते. पण वीणेचे मन 'प्र'साठी एकनिष्ठ आहे.
वीणेचे मन आणि प्र यांची जोडी प्र-बळ आहे!

हा निष्कर्ष चुकीचा आहे काय?

वृन्दा Thu, 12/02/2015 - 16:46

वीणेची आई - आमचं रत्न पहील्यापासूनच भारी. वयात काय आली दर ६ महीन्यांनी नव्या कोणीतरी पछाडलेलं असतं. हाताबाहेर गेलीय कार्टी. लवकर उजवावं म्हणते तर शिक्षण अडतय. काय करावं तेच कळत नाही. कधी जग्या कधी मग्या आता तर तो नाक्यावरचा "प्र". गेंडा आहे नुसता. (जीभ चावत) गेंड नको म्हणायला कोणी सांगावं जावई बनून मीरे वाटायचा डोक्यावर.
कितीदा सांगीतलं पुरषाच्या रुपाला काय चाटायचय, कर्तुत्व बघ, कुळ बघ, अन मुख्य पैसा बघ पण हीच्या डोक्यात शिरेल तर ना :( हिंदी सिनेमे पाहून पाहून पार वाट लागलीये. आरशासमोर तासन तास पाहून मुरडणं, कपडे , कानातले बदलणं यातच आख्खा दिवस जातोय मग ग्रेडस ची बोंब.
त्या "प्र" चं नाव निघाल्यावर गुदगुल्या झाल्यासारखी हसते काय. लवकर उजवावी म्हणते या भवानीला.

बॅटमॅन Thu, 12/02/2015 - 19:02

In reply to by अनु राव

नुस्ते उजवणे म्हणजे लग्न करून टाकणे असा अर्थ आहे तर कूस उजवणे म्हणजे मूल होणे हा अर्थ आहे. यापलीकडे माहिती नाही.

आदूबाळ Thu, 12/02/2015 - 19:14

In reply to by बॅटमॅन

उजवण-णी-णूक—स्त्री. ऊर्जितदशा (भूमि, वस्त्र, मनुष्य, इ॰ कांस). (संदर्भः दाते-कर्वे कोश)

म्हo

मुलगी उजवणे = लग्न करून देऊन तिचे कोटकल्याण करणे
कूस उजवणे = संतती जन्माला येऊन आयुष्याची परिपूर्ती होणे

ओह दोज प्रतिगामीज...

वृन्दा Thu, 12/02/2015 - 19:16

तू थट्टेच्या (कोण रे तो "थत्तेच्या" असं वाचतोय ?) सुरात बोललास तेहि बरच.

=)) हाहाहा मस्त कोटी.