चालू नको अशी तू
पाषाणभेद
चालू नको अशी तू
चालू नको अशी तू तोर्यात ग तोर्यात
केस उडतात भुरूभुरू वार्यात
केस तुझे मखमली आले गाली
ओठांवर तिळ शोभे गाली खळी
नको तिरक्या नजरेनं पाहू
मीच दिसे तुझ्या डोळ्यात
खट्याळ वारा तुझा उडवी पदर
उगाच माझी त्यावर गेली नजर
पाहून तुझं रूप झाली हुरहुर
सावरून घे पदराला हातात
सांग तू असा का करते नखरा
बघून तुला मी मारतो चकरा
जीवाला लावून नको जावू घोर
कसं सांगू मी तूला प्रेमात
- पाभे