अतर्क्य

अतर्क्य

बहुतेक मी तुला सांगू शकतो माझ्या मनात जे काही आहे ते
तुलाच काय दुसर्या कुठल्याही
माणसाला एक माणूस म्हणून
आपल्यचं स्पेसीजचा/जातीचा(?)एक प्राणी म्हणून
आपण सगळ शेअर करतो जगण एकत्र
कधी तू माझ्या वर्तुळात तर
कधी मी तुझ्या वर्तुळात अडकतो
गोल गोल फिरत राहतो
या गोल फिरण्याला काय कारण असत माहिती नाही
हे वर्तुळ गणिताच्या प्रमेयांना मानत नाही
फिरून फिरून मी पुन्हा त्याच ठिकाणी येत नाही
तू दरवेळेस कुठल्या तरी दुसर्या ठिकाणी दिसतोस
माझ्या एक एक अनु रेणूची शपथ घेऊन सांगतो
मला माहिती नाही का अशी रसायन तयार होतात माझ्या मेंदूत?
सिग्नल पोचवतात मला
वर्तुळात फिरून तुझ्या आणि माझ्या मी थकत देखील नाही
जर तू नसतास तर मेंदूने काय केल असत ?
हे माझ्या मना
तुझ्याभोवती वर्तुळा काढणार्या माझ्या मेंदूला मी काय संदेश देऊ
लवकर सांग मला
मी तुझ्या इतका अथांग आणि खोल नाही आहे
मी फक्त एक मेसेंजर आहे

(वेळ काळ-मागच्या वर्षी ६ मार्च)
पी.एस.- मेसेंजर म्हणजे न्युरोट्रान्समीटर (किंवा तसाच काहीस) याचा मेसेंजर ऑफ God सोबत काही संबंध नाही.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ग्रिंडेलवाल ने तरुणपणी हॉग्वर्ड्सच्या भावी हेडमास्तरास लिहलेले पत्र असे या कवितेचे एकंदर स्वरुप वाटत आहे. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विषेशतः

कधी तू माझ्या वर्तुळात तर
कधी मी तुझ्या वर्तुळात अडकतो

हे वाचुन तर जवळपास खात्रीच वाटु लागली Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

आsssssss ROFL Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ग्रिंडेलवाल ने

मी चुकून 'केजरीवाल' वाचलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कधी "खुल्ली", कधी प्रमाणभाषा तर अचानक दाताखाली खडा यावा तसा कुठेही येणारा इंग्रजी शब्द.
या सगळ्यामुळे कवितेचा गाभा चांगला असूनही आस्वाद घेता आला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तो "खुल्ला" शब्द मलाही खटकला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...