Skip to main content

शान (कविता)

☀☀☀शान☀☀☀
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
तुझ्या नावासाठी तयार
आम्ही कापण्या मान
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
माणूस म्हणून नव्हती किंमत
ठरलो होतो तुच्छ शेन
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
फिरत होतो रानोरान
नव्हते आम्हा कसलेचभान
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
केली मनुने दानादान
नव्हती दुःखाला आमच्या वान
भिमा तुच वाढविजन्म
आम्हा दलितांची शान
आले लाखो कोटी जन्मा
कुणी ना पाहीली आमची दयना

भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
तुच घेतले जवळ आम्हा
तुच दिले आम्हा जिवदान
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
दिले हाती पुस्तक पेन
यानेच वाढविले आमचे ग्यान

भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
भिमा तुच वाढविली
आम्हा दलितांची शान
:-( प्रा.दिपक म्हस्के दुसरबीड.)

धनंजय Thu, 02/04/2015 - 18:49

पुढील लखनाकरिता प्रोत्साहन.
-------------------------
एक तांत्रिक सुचवणी :
या रचनेत "-आन" हे यमक वापरले आहे, आणि अधूनमधून वेगळे अंत्ययमक वापरलेले आहे. हे तंत्र चांगले आहे. परंतु ही वेगळी यमके त्यातल्या त्यात एकमेकांपासून थोडी जवळ असली, तर अधिक परिणामकारक ठरतील.

उदाहरणार्थ (परिणामकारक) म्हणजे "जन्मा/दयना/आम्हा". (-अनुनासिक जोडाक्षर+आ हे यमक, "दयना"चा उच्चार "दय्ना" असल्यामुळे योग्यच)

"शेन" आणि "पेन" यांचे यमक परिणामकारक होऊ शकले असते. परंतु या ओळी एकमेकांपासून फार लांब असल्यामुळे ध्वनीचा पडसाद जाणवत नाही.