रामायण - कथा - सीता ???

(लेखाचा उद्देश्य कुणाची ही भावना दुखविण्याचा नाही. माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे, एवढेच. बाकी ‘हरी अनंत हरी कथा अनंता’.)

रामायणात सीते भोवती एक गूढ वलय आहे. सीता पृथ्वीतून प्रगट आणि पुन्हा पृथ्वीच्या कुशीत समावली. आता ही सीता आहे तरी कोण? वाल्मिकी रामायणानुसार -


सीता अथ मे कृषतः क्षेत्रं लाङ्गपलादुत्थिता ततः
क्षेत्रं शोधयता लब्धा नाम्ना सीतेति विश्रुता ।

(वाल्मिकीनी रामायणातल्या बालकांडातल्या ६६व्या सर्गात म्हंटले आहे, एकदा मिथिला नरेश राजा सीरध्वज (जनक) यज्ञासाठी भूमि शोधन करते समयी शेतात नांगर चालविताना नांगराच्या अग्रभागाने नांगरलेला भूमितून एक कन्या प्रकट झाली. सीता, नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा, हिच्यापासून उत्पन्न झाल्याकारणाने तिचे नाव सीता ठेवले गेले. भूतलांतून प्रकट होऊन दिवसेंदिवस वाढणार्‍या राजा जनकच्या कन्येला अर्थात सीतेला, कित्येक राजांनी येथे येऊन मागणी घातली. जनकाने, जो व्यक्ती परशुरामाने दिलेले शिवधनुष्यावर प्रत्यंचा चढवेल, त्याला आपली कन्या देण्याचा निश्चय केला. श्रीरामाने ते शिवधनुष्य भंग केले आणि सीतेला प्राप्त केले.)

शेत नांगरताना सीता जमिनीतून प्रगट झाली. आता शेतातून प्रगट झालेली ही सीता कोण, हा प्रश्न डोळ्यांसमोर उभा राहिला. ऋग्वेदात सीता ह्या शब्दाचा उल्लेख आहे.

ऋग्वेद - मण्डल ४ सूक्त ५७ (कृषि सूक्त)
ऋषी - वामदेव गौतम : देवता - सीता छन्द - त्रिष्टुप्


अर्वाची सुऽभगे भव सीते वंदामहे त्वा ।
यथा नः सुऽभगा अससि यथा नः सुऽफला अससि

भाग्यशालिनी सीते, इकडे आगमन कर, तुला आम्ही वंदन करतो. कारण तेणेंकरून तूं आम्हाला भाग्यधात्री होतेस; आम्हाला सफलार्थ करणारी होतेस. ॥ ६ ॥

इंद्रः सीतां नि गृह्णातु तां पूषा अनु यच्छतु ।
सा नः पयस्वती दुहां उत्तरांऽउत्तरां समां ॥

सीतेचा स्वीकार इंद्र करो; तो आमच्याकरितां वर्षानुवर्षे दुग्धानें परिप्लुत होऊन आम्हांस धनधान्यरूप दुग्ध देवो. ॥ ७ ॥

सीतेचे आगमन झाल्याने शेतकरी समृद्ध होतो. वैदिक काळात लोक देवराज इंद्राला बलिभाग अर्पित करायचे आणि इंद्र त्यांचे रक्षण करायचा. हा अन्नरुपी कर म्हणजे सीता. राज्याची सर्व भूमी राजाचीच असते. प्राचीन काळात राजा अन्नाच्या रूपानेच कर घ्यायचा. सीताध्यज नावाचा राजकीय अधिकारी अन्नाच्या रूपाने हा कर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा.

दक्षिण समुद्रापासून गंगेच्या तटा पर्यंत लंकेच्या राजा रावणाचे साम्राज्य पसरले होते. रावणाचे अधिकारी ग्रामस्थ, वनवासी सर्व जाती आणि समुदायांकडून ‘सीता’ वसूल करायचे. न्यायानुसार प्रजेकडून वसूल केलेल्या करांचा अधिकांश भाग प्रजेच्या कल्याणासाठी वापरला पाहिजे. पण रावण भारतीय लोकांना गुलाम समजत होता. लंकेची तिजोरी भरणारे गुलाम. गुलामांचा छळ केला पाहिजे त्यांना अज्ञान आणि अशिक्षेच्या अंधारातच ठेवले पाहिजे, हीच रावणाची नीती होती. आपल्या वर अन्याय होतो आहे, हे अशिक्षित आणि अज्ञानी माणसाला बहुधा कळत नाही. आणि कळले तरी अन्याय आणि अत्याचाराचा विरोध करण्याची क्षमता ही त्याच्यात नसते. दुसर्या शब्दात म्हणायचे झाले तर रावणाने भरतभूमीच्या सीतेचे हरण केले होते. लंका सोन्याची झाली, तिथले लोक समृद्ध झाले. आपल्या दहा ही इंद्रियाने भौतिक सुखाचा उपभोग करू लागले (आजच्या अमेरिकेच्या प्रमाणे). कदाचित या साठीच रावणाला दशानन म्हंटले असावे.

ऋषी-मुनी आश्रम स्थापित करून, दंडकारण्यात शिक्षा आणि ज्ञानाचा प्रचार करत होते. साहजिकच त्यांचे हे कार्य रावणाला आवडणारे नव्हते. ऋषी-मुनीचे आश्रम नष्ट करणे, त्यांची हत्या करणे हे रावणाच्या सैनिकांचे रोजचे कार्य. लंकेचे राज्य अयोध्येच्या सीमेपर्यंत पोहचले होते, तरी ही महाराज दशरथ यांची हिम्मत, रावणा विरुद्ध युद्ध पुकारण्याची नव्हती. वाल्मिकी रामायणात ही याचा उल्लेख आहे.

स हि वीर्यवतां वीर्यं आदत्ते युधि रावणः ।
तेन चाहं न शक्नोमि संयोद्धुं तस्य वा बलैः ॥
सबलो वा मुनिश्रेष्ठ सहितो वा ममात्मजैः ।

(मुनिश्रेष्ठ! तो रावण युद्धामध्ये सामर्थ्यवानांच्या वीर्याचे (बलाचे) ही अपहरण करतो, म्हणून मी आपली सेना आणि पुत्रांसहितही त्याच्याशी आणि त्याच्या सैनिकांशी युद्ध करण्यास समर्थ नाही. ॥ बालकांड २३ १/२ ॥)

पूर्वी परशुरामाने अन्यायी क्षत्रियांचा पराभव केला होता. परशुरामाने जनकाच्या पूर्वज देवरात यांना शिवधनुष्य दिले होते. अश्या वेळी महर्षि विश्वामित्रांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामाने हेच धनुष्य उचलले आणि भरतभूमीला राक्षसी अत्याचारांपासून मुक्त करण्याचा निश्चय केला. राजा जनकाने ही प्रसन्नता पूर्वक श्रीरामाला ‘सीता’ अर्पण केली. भरतभूमीला रावणाच्या गुलामीतून मुक्त केल्या शिवाय. सीता श्रीरामाला प्राप्त होणे अशक्य होते. त्या साठी रावणाचे राज्य नष्ट करणे आवश्यक होते. रामाने दंडकारण्यात राहणाऱ्या ग्रामस्थ, निषाद, शबर, भिल्ल, वानर, आश्रमवासी आणि समस्त वनवासी समुदायाला एकत्र केले आणि लंकेवर हल्ला केला.

आता सीता वसूल करण्याचा अधिकार अयोध्येचा राजा अर्थात श्रीरामांचा जवळ आला. ‘सीता’ अयोध्येत आली. अयोध्या ही सोन्याची झाली. पण प्रजेची समस्या तीच राहिली. शेवटी एका सामान्य प्रजाजानाने राजाला अर्थात श्रीरामचंद्रांना याची जाणीव करून दिली. ‘सीतेचा’ उपयोग पुन्हा प्रजेच्या, शेतकर्यांच्या आणि वनवासी जनतेच्या कल्याणासाठी होऊ लागला. कवीच्या शब्दांत ‘सीता’ पुन्हा वनवासी झाली व जमिनीच्या कुशीत समावली. शिक्षा आणि ज्ञानाचा प्रसार संपूर्ण भरतभूमी वर पसरला. अश्या रीतीने रामराज्यात चारी वर्णाचे लोक आणि अरण्यवासी प्रजाजन सुखी झाले.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

बाम भाग शोभति अनुकूला। आदिशक्ति छबिनिधि जगमूला॥
– रा.च.मा. १-१४८-२
यही श्रीजनक महाराज के यशोवर्धन हेतु श्रीमिथिला भूमि में प्रकट होती हैं तथा श्रीसीता रूपसे श्रीरामभद्रजू के वाम भाग में विराजमान होकर जीव के भगवत्प्रातिकूल्य को निरस्त करती हैं।
_________
माहीती आवडली. सीता शब्दाचा वेगळाच अर्थ कळला. लिहीत रहा पटाईतजी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

काही खवचट निरर्थक नाहीये, प्रांजळ मत सांगतोय आज ना उद्या सिते बद्दल आपला लेख येणार याची खात्रीच होती. "माझ्या दृष्टीने सीता कोण होती, हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे" म्हटले की अभिव्यक्तीची तलवारही हवी तशी फिरवता येतेच. त्यामुळे.. असो, पुन्हा स्पष्ट करतो आपल्या लेखनाला आक्षेप नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

पुरोगामी स्त्रियांच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा! सीतेवरील निरूपण आवडले.

आजवर रामायण या काव्याचे अनेक वेगवेगळे अर्थ वाचले आहेत. हे अर्थनिर्णयन(!)ही आवडले.

(या व्यतिरिक्त राम विरुद्ध रावण ही आर्य विरूद्ध द्रविड, आदिवासी विरुद्ध राज्यकर्ते, मूलनिवासी विरुद्ध बाहेरून येणारा राजा इत्यादी अनेक अंगानी ऐकली होती)
आता हे व्हर्जनही रोचक आहे.

अजून नक्की लिहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मी सीता ही शीतलता या रुपात कथा निरुपण वाचले होते. रामाची शीतलताच्/शांतीच रावणाने हरण केली.
त्यात दशरथ = दहा इंद्रिये,
सीता= शीतलता
राम = आत्मा
असे काहीसे सुंदर निरुपण होते. घाटकोपर (पू) ग्रंथालयात ते जुने जुने फार जुने पुस्तक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

यज्ञसाठी भूमी खणताना जनकाला सीता सापडली. त्या अर्थाने ती भूमीकन्या आणि नंतर ती आपल्या कृषीजीवनाकडे परतली अश्या अर्थाची कथावास्तू असलेलं नाटक होतं असं आठवतय. कोणाला त्या बद्द्ल माहिती आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे थोडे पदार्थविज्ञानासारखे वाटले. म्हणजे एखादी गोष्ट आधी गृहीत धरायची आणि मग त्यावर सगळा सिद्ध करण्याचा डोलारा उभारायचा. पण जी मूळ गृहीत धरलेली गोष्ट असते, त्याला कसलाच पुरावा नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजो, ऐकताहात ना Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ऐकतोय. पण पाउस गेल्यावर छत्री सापडून काय फायदा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

पण पाउस गेल्यावर छत्री सापडून काय फायदा?

किमान पुढील पावसापासून तरी संरक्षण मिळण्याची हमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तिरशिंगराव प्रचंड प्रो-पुरोगामी आहेत. अचानक पदार्थविज्ञानावर कसे काय कोसळले कळत नाहिये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कालिजात पदार्थविज्ञानही शिकलोय हो, ज्यु. बी.एससी पर्यंत.
आणि हो, प्रो-पुरोगामी आहे का ते माहित नाही पण पुरण प्रचंड आवडत असल्याने प्रो-पुरणगामी नक्की आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुरणासोबतच मला तरुणपणची अर्चना पुरणसिंगीणही लै आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मला पुरणपोळी आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मला पुरण व पुरण भरलेले कडबू आवडतात. पण पुरणपोळी नाही. कारण त्या पोळीचा तुकडा मोडला रे मोडला की पुरण बाहेर सांडायला चालू होते. दुधात पोळी बुडवली की सगळ्या वाटीत अन ताटात राडीराडच होते नुसती. तशी पोळी खायला नको वाटते. त्यापेक्षा अंमळ थिक पराठास्टाईल बनवलेली पुरणपोळी आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कारण त्या पोळीचा तुकडा मोडला रे मोडला की पुरण बाहेर सांडायला चालू होते. दुधात पोळी बुडवली की सगळ्या वाटीत अन ताटात राडीराडच होते नुसती.

+१०००० ROFL
खरच रे राडा होतो. पण तूप पुरणपोळी खूप चविष्ट लागते. दूध पुरणपोळी ही मस्त लागते.
अरे विदर्भात आमरस+ पुपो खातात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

विदर्भात कशाला? पुण्यापासून ६० किमीवरच्या गावात खाल्लीय मी आमरस+पुपो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कडबू!! वाह काय आठवण काढलीत. लय दीस झाले नाही खाल्ले कडबू.
एक शंका: हा पदार्थ महाराष्ट्र, कर्नाटक गोवा या बॉर्डरवाल्या एरियातला आहे का? का इतरत्रही परंपरागतरित्या बनवला जातो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

कदाचित असेलही. विदर्भ मराठवाडा खान्देशादि भागांत काय परिस्थिती आहे?

नेटवर पाहिले असता दक्षिणेत कैक ठिकाणीही असावासे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मराठवाड्यात बनतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बर्‍याच भागात कडबु बनत असावेत.
आमच्या घरी नागपंचमीला कडबु बनतातच. इतरवेळी लहर आली की, पण नागपंचमीला नक्की

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नांगराच्या द्वारा ओढली गेलेली रेषा, हिच्यापासून उत्पन्न झाल्याकारणाने तिचे नाव सीता ठेवले गेले.

मेंदूवरच्या अशा रेषांना, भेगांना पण सीता म्हणतात, इंग्रजीत.
------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रतिसदा बाबाबत धन्यवाद.

१.मी ऋग्वेदात सीतेचा अर्थ
२. सीताध्यज नावाचा राजकीय अधिकारी अन्नाच्या रूपाने हा कर शेतकऱ्यांकडून वसूल करायचा.
या दोन आधारांवर सीतेची कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे वा! आवडली ही सीतेची कल्पना.

बाकी पुपो गुळाची असेल तर पुरण फार इकडेतिकडे सांडत नाही. कडबु मंजे पुरणाच्या करंज्या ना? नको. तेलकट असतात त्या. त्यापेक्षा दिंडं ठीक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कडबू खमंग असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

साखरेची पुपो ही पुपो नसून पुपोची भ्रष्ट नक्कल असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पुपोची भ्रष्ट नक्कल

Smile +१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

सीता म्हणजे नांगराच्या फाळाने उठलेली रेष, पर्यायाने नांगरलेली (शेत)जमीन एवढाच अर्थ आहे. सीता याचा अर्थ कर/शेतसारा असा कुठेच झालेला वाचनात आलेले नाही. सीताध्यक्ष म्हणजे शेतसारा गोळा करणारा अधिकारी.
रामायणाची अनेकोविध इंटरप्रीटेशन्स आहेत. त्यात एक शेती करणार्‍या आर्य संस्कृतीचे बिगरशेतकी पर्यायांनी उपजीविका करणार्‍या अनार्य प्रदेशाला ताब्यात घेऊन आधिपत्याखाली आणणे हेही आहे. त्या पार्श्वभूमीवर रामाने पदस्पर्शाने अहल्येचा (अहल्या = न नांगरलेली जमीन) उद्धार केला ही कथाही रोचक ठरते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अ-हल्या. खरच की तसाही अर्थ लागतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

सीता म्हणजे नांगराच्या फाळाने उठलेली रेष, पर्यायाने नांगरलेली (शेत)जमीन एवढाच अर्थ आहे..... सीताध्यक्ष म्हणजे शेतसारा गोळा करणारा अधिकारी.

अगदी हेच लिहायला आलो होतो. एका मूळ शब्दापासून अनेक इतर शब्द संभवतात. नांगराच्या फाळाने उठलेल्या रेषेपासून मिळणारं उत्पन्न जमा करणारा तो सीताध्यक्ष अशी व्युत्पत्ती सहज शक्य आहे.

जर वरच्या लेखातला अर्थ मान्य करायचा तर राम नावाच्या राजाला सीता नावाची बायको नव्हतीच, त्याने राज्य त्यागून आणि वनवास स्वीकारून रावणाने लादलेल्या कराविरुद्ध लढाई केली असं मानावं लागेल. मग सुवर्णमृगाचं काय? लक्ष्मणरेषेचं काय? सीतेच्या अग्निपरीक्षेचं काय? धोब्याच्या निरर्थक संभाषणावरून केलेल्या त्यागाचं काय? आणि लव-कुश कुठून आले? या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याच अर्थनिर्णयनाच्या चौकटीत बसवावी लागतात. ते सगळंच जर बसवलं तर ठीक. नाहीतर सोयीस्कर, मोजक्या भागांवरून कशाचाही काहीही अर्थ लावता येतो. तो एक गमतीदार उपक्रम ठरू शकेल, पण त्यापलिकडे त्याला फारसा अर्थ उरत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0