बस्स! .... जास्त मागणं नव्हतं.

"Harvest Moon: A Wisconsin Outdoor Anthology" या पुस्तकातील - "What we should have done" या ललीत लेखाचा स्वैर अनुवाद -
.
१९३० ची बात आहे ... मी तेव्हा ९ पूर्ण करुन मला १० वं लागलं होतं. बापाचा अन माझा सुटीचा एकच दिनक्रम असे तो म्हणजे बाप पुढे अन मी मागे उड्या मारत दोघे जंगल, ओढे, ओहळ, दलदल्,हिरवळ तर कुठे नदी नाले तुडवत जात असू. बाप पुढे अन मी मागे, बाप त्याच्या आवडत्या गँगबरोबर अन मागे मी बापाबरोबर फरफटत. वाटेत विस्कॉन्सिनच्या बर्फाळ थंडीने कधी कान लाल होत तर कधी पाय सोलवटून निघत, कपडे भीजत तर कधी अंग काट्याकुट्यांनी ओरबाडून निघे. पण बाप काही केल्या थांबत नसे, जशी जशी गँग पुढे जाई तसतसा बाप त्यांच्या मागून वणवण करे अन मी त्याच्या ही मागे. अन हे सर्व सहन करताना, त्या कोवळ्या वयात मला हे जाणवे की गँगमधले बाकी शिकारी, धाडसी rugged पुरुष अन आपल्यात, आपल्या बापात फरक आहे. आम्ही दोघे outsiders आहोत. शिकार-मासेमारी हा आपला प्रांत नव्हे, त्या लोकांची अन आमची बरोबरीच होऊ शकत नाही.
.
पण बाप कुठचा ऐकायला?
.
आईने तर या गँगचे नाव रागाने "The Mosquito Gang" ठेवलेले होते याचे कारण यातील सर्वांच्या अंगावर काट्याने ओरबाडल्याच्या, डासांनी चावे घेतल्याच्या खूणा असत. आईला म्हातार्‍याने त्या कंपूबरोबर फिरलेले अजिबात आवडत नसे अन मला त्या कंपूत घेऊन जाणे याला तर तिचा सख्त विरोध होता."काय तर म्हणे शिकार करतायत. सगळे देवाने निर्माण केलेले प्राणी ही यांच्या बापाचीच जहागीरी ना ....अस्वच्छ, धुडगुशे, नुसतं उंडारायच, काम-पैशाच्या नावाने बोंब. " अशी सुरुवात करुन ती जी तोंडपट्टा चालू करे त्यात बापाला बोलायला जागाच नसे. अन तरीही बाप क्वचित हे सांगण्याचा केवीलवाणा प्रयत्न करे की जसे आपण मासे-कोंबड्या-डुक्कर खातो तसेच आम्ही हरीणे, खार, पक्षी मारतो. त्यातले आम्ही म्हणजे गँगमधले तरबेज शिकारी हे तो लपवून ठेवे कारण त्याला शिकारीचे कौशल्य अजिबातच नव्हते ना जिगर होती.
.
आईने एकदा बापावर चिडून त्याच्यापुढचं ताटच ओढून भिरकावलं तो दिवस मी विसरु शकत नाही कारण म्हातार्‍याच्या डोळ्यात पाणी आल अन तो पुटपुटला होता , "मी काय माझ्याकरत करतो होय? या पोराला मर्द बनवायला मी धडपडतो. I want to make a man out of him" त्याचं ते केवीलवाणं मूक रडणं अन ते शब्द माझं काळीज चिरत गेलेले. मला हे कळलं नाही की "मला मर्द बनवायला" म्हणजे काय पण आपल्यासाठी बाप काहीतरी झटतोय हे जाणवले.
.
एके दिवशी बापाने पक्षी मारायचा नेहमीप्रमाणेच असफल प्रयत्न केला अन तो च पक्षी गँगमधील, आगाऊ अन उर्मट Gopher Ryan ने एका गोळीत मारुन दाखवला. याच Gopher Ryan ने बाबांना पक्ष्याचे एक पीस देऊ केले. अन म्हणतो कसा - "घे ना....ऐष कर." अन त्याचा भाऊ Al बापाला खिजवून हसत म्हणाला "हा घे हां, रडू नको." मला खूप राग आला. बापाचा नेम नेहमीच चुकत असे अन त्यांचे हसे नेहमीच होइ, यात नवे असे काहीच नव्हते. पण मला राग या गोष्टीचा येइ की बापाचे रक्त उकळत कसे नाही का बाप हा अपमान सहन करतो का त्या Gopher ला AL ला अपमानास्पद लागेल असं बोलत नाही. पण नाही बाप नेहमीच कसनुसा हसे अन इतरांचे अपमान हसण्यावारी नेई. Gopher ने मला पेरु दिला अन म्हणाला "बापाला शिकार धड येत नाही अन आणतोय पोराला. ए घे पेरु खा, तू पण ऐष कर." मी रागाने मान हलवून नाही म्हटलो तर बाप म्हणतो कसा "घे तो पेरु."
.
एवढ्यावरच थांबले नाही, त्याच दिवशी आम्ही एका खुराड्याजवळून जात असताना, Gopher ने बापाला परत उचकावले, "मारुन दाखव ते कोंबडं" अन त्याला नकार देण्याऐवजी माझ्या मूक अन लाचार बापाने परत बंदूक चढवली अन नेम धरुन त्या कलकलाट करणार्‍या कोंबडीवर झाडली. अर्र! परत नेम चुकलाच....नेहमीप्रमाणे. यावेळेला Gopher अन AL दोघांनी ढुंकुनही न पहाता त्यांच्यातील बोलणे सुरुच ठेवले अन बापाने ओशाळत मला डोळा मारला. त्याचं ते लाचार ओशाळलेपण त्या वयातही माझ्या अंगावर आलं.
.
हां Shadow! मला त्या गँगमध्ये सर्वात कोण आवडायचं तर तो होता - Shadow. एकदम चुस्त अन स्वाभिमानी माणूस. कणखर, कोणाचा ब्र नाही ऐकून घेणार. Mink Ranch होतं त्याचं स्वतःचं अन ते सुखवस्तूपण त्याच्या अंगावर, चेहेर्‍यावर दिसायचच. एक तेज होतं त्याच्या डोळ्यात अन करारीपणा नाहीतर माझा बाप! थूत तेजायला, या गँगमध्ये सामावून जाण्यासाठी मेलेली बेडकीही खाल्ली असती म्हातार्‍यानं.
.
हां तर काय सांगत होतो, Mosquito Gang नेहमी, शनिवार-रवीवार किंवा सुटीच्या दिवशी, एका पड्क्या केबिनवजा खानावळीत जमायची, तिथे त्यांचे शिकारीचे प्लॅन आखले जायचे, जोकस व्हायचे. बहुतेक लोक बापासारखेच, कामगार होते, बापासारखेच फॅक्टरीत काम करत होते.काही जण उत्तम नागरीक होते तर काहीजण लुख्खे, पडीक अन काहीशा गुन्हेगारी वृत्तीचे, सर्व रंगाचे, प्रकृतीचे rugged लोक जमत अन गप्पा, गफ्फा हाणत. त्यात माझा बाप लै विसंगत दिसे. ना कोणी त्याला बोलावे ना हाकले, त्याचे अस्तित्वच कोणालाही दखल घेण्याजोगे वाटत नसे. इतरांच्या शिकारीच्या कहाण्या डोळे विस्फारुन ऐकणार्‍या त्याच्याकडे स्वतःच्या शिकारीची, मासेमारीची अशी एकही कहाणी नव्हती. तो टेबलापाशी घुटमळे, अन कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही तरी एखाद्या कोपर्‍यात बसून जाइ, नुसता ऐकत राही. मध्येच एक्साईट झाला तर पुटपुटे, "माझ्या पोराला मर्द बनवाया मी आणतो त्याला हिते." मला ते सर्व विचित्र अन निरुद्देशी वाटे.
.
याच गँगमधील एकाने मला शिकारविषयक मासिकाचे जुने अंक दिले होते. ते अंक बापाला आवडले व त्याने ते मासिकच subscribe केले होते. मग दर महीन्याला आम्ही दोघांनी ते वाचलं की बाप मागच्या जाहीराती बघून काय काय पॉश वस्तू मागवायचा - दुर्बिण, मोठे बूट, सिकारीची हॅट, गळ तर कधी महागाची बंदूक, गॉगल्स यंव न त्यंव. खिशात पैसा नसतानाही तो अशा वस्तूंवर खर्च करतो हे आईला आवडत नसे, ती त्रागा करे. पण बाप बाह्यरुपाला महत्त्व देई त्याला वाटे त्याच्या शिकारीचे अकौशल्य कदाचित या वस्तूंनी भरुन निघेल. पण होई उलटच, असा सर्व जामनिमा करुन आम्ही बाहेर पडलो की गँगमधले लोक आम्हाला हसत. म्हणत "शिकार तर येत नाही, थाटच बघून घ्यावा." पण माझ्या बापाला त्याची खंत नसे.
.
माझी स्वप्ने काही वेगळीच होती. मला एखाद्या Outdoor मासिकाचा Editor बनायचे होते. माझे मन शब्दात रमे, शब्द, भाषा मला वेडी करे, मोहवे. मी लेख लिहीण्याचा प्रयत्न करे. माझा बाप १९४० मध्ये ४० वर्षाचा झाला अन मी "Field & Stream" मासिकात एक पत्र लिहीले ज्याचा मतीतार्थ हा होता की मी त्या मासिकातला अस्वलमारीचा एक लेख किती एन्जॉय केला, मला तो किती आवडला. अन कोणतीही आशा नसताना तो लेख चक्क छापून आला. पहीलं माझ्या बापाने काय करावं तर ते कात्रण घेऊन तडक तो त्या गँगकडे गेली जिथे Al अन Gopher बर्फात भोक पाडून बर्फातली मासेमारी करत बसले होते. बाप आल्याकडे त्यांनी ढुंकुनही पाहीले नाही. तरी बापाने आपले घोडे दामटलेच अन तो ते कात्रण त्यांना दाखवू लागला. यावर Al खेकसला "Hey watch out! तुझ्या आवाजाने आमचे मासे पळतील. मग ये कसे?" यावर बाप बरं म्हणून निघाला वाटेत मला म्हणाला "They don't know what they miss."
.

माझा बाप माझ्याकरता संमिश्र गुणावगुणाण्चे गाठोडे होता. तो लाचार होता, भ्याड अन ओशाळा होता पण माझा बाप होता. मला शेवटी बाप म्हणून त्याच्याबद्दल प्रेम वाटेच.

आम्ही दोघेच जेव्हा भटकू तेव्हा जी मजा येई ती गँगसोबत कुठून यायला? गँगबरोबर बाप नेहमी ताणात अन self conscious खरं तर न्यूनगंड घेऊन वावरे याउलट आम्ही दोघेच असताना तो सैल असे. आम्ही रात्री तळ्याच्या कडेकडेने चालत असू, चंद्रप्रकाशात तळं किती सुंदर दिसे अन शिवाय शिकार करण्याची performance anxiety देखील नसे. नीरव शांततेत आकाशातील तारे मोजणे, काजवे मोजणे, रातकीड्यांचा आवाज ऐकत ऐकत मनातील विचार बोलून दाखविणे, फार मजा मजा येत असे.ते दिवस खरच सुंदर होते पण फार कमी मिळाले.
.
आता विचार करतेवेळी मला हेच वाटते की जर बापाने गँगमागे, माझी व स्वतःची फरफट केली नसती, अपमान लाचारीला थारा दिला नसता तर कदाचित मी बापाचा अधिक आदर करु शकलो असतो. खरं तर मर्द बनण्यासाठी, मला फक्त बाबांच्या एका बक्षीसाची , पाठीवर शाबासकीच्या थापेची गरज होती. बस्स! .... जास्त मागणं नव्हतं.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखकाला डॅडी इश्यु आहे. नक्किच.

डॅडी इशु बाप जिवंत असुनही, अथवा पुरुषालाही असु शकतो, ज्यांचा बाप मुलाला काय हवयं हे ओळखु शकत नाही आणी त्या परिस्थीतीत तो स्वतःला आय हवयं ते मुलावर लादतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

ह्म्म्म ...! वडील अत्यंत बोटचेपे अन दुर्बळ रंगवलेत त्या कथेत. अन अपत्यांना सहसा आई दुर्बळ असली तरी ठीक असतं पण बाप दुर्बळ असेल तर कोणाकडे पहावं असं होत असावं. कथेतील मुलगा हा "shadow" नामक व्यक्तीरेखेकडे म्हणूनच आकर्षित होतो.
वडलांची त्या कथेतील स्वतःची स्वतः करुन घेतलेली ससेहोलपट वाचवत नाही.
त्या गँग ला खूष करण्यासाठी स्वत्व गमावलेला माणूस!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

स्वतःला लहानपणी जे मिळालं नाही ते माणूस मुलांना द्यायला जातो. त्या वडिलांचे वडील कसे असतील अशी उत्सुकता दाटते मनात.

बाकी हे फारच आवडलं! ५ तारे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद ननि Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

सिंपली पुट डॅडी इश्यु अशा मुलींना प्रकर्षाने असतो ज्यांच्या बापाला मुलगा हवा असतो. आणी त्यामुळे मुलींना अपेक्षीत प्रेम तो देउ शकत नाही, म्हणुन अशा मुली मग इतरात बाप/ पित्रुतुल्य वात्सल्य/मेंटरशिप हुडकायचा प्रयत्न करतात. ओवरऑल डॅडी इश्यु अशा कोणत्याही बालकामधे निर्माण होउ शकतो ज्याचा बाप कोणत्याही कारणामुळे आपल्या अपत्याशी "नाळ" जुळवण्यास असमर्थ ठरतो. आणी इथे मुलगा shadow कडे याच कारणानी आकर्षीत झालेला आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

actions not reactions..!...!

हं मी कधी नोट केलेले नाही पण वाचून वाईट वाटले Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

भाषांतर छान झाले आहे. मुलाचे मनोगत आवडले. ह्याच्यावरुन माझी गोष्ट आठवली.
अगदी तरुणपणी, कधी गिर्यारोहण करायला योग्य ग्रुप मिळाला नाही. पुढे नोकरीच्या ठिकाणी, एक ग्रुप दर शनि-रवि ट्रेकिंगला जातो असे कळले. त्यांच्यात शिरायचा मी प्रयत्न केला. सुरवातीला विरोध होताच, कारण देहावरुन मी नक्कीच ट्रेकर वाटत नव्हतो. कसेबसे एका ट्रीपला न्यायचे त्यांनी कबूल केले. राजगडावर जाताना त्यांच्या बरोबरीने गेलो. पण मग असे काही गुडघे धरले की खाली येताना मी एक ब्याद ठरलो. सगळ्यांनी शिव्या घातल्या. कंपनीत बदनामी झाली. त्याने एक चांगले झाले. माझ्यातली जिद्द जागृत झाली. काही दिवसांनी मी पुन्हा त्यांच्याबरोबर गेलो. यावेळेस काहीच झाले नाही. पुढे त्यांच्याबरोबर सह्याद्रीचे अनेक गड पालथे घातले.एकदा भीड चेपल्यावर मग दोनदा हिमालयातही ट्रेकिंग करुन आलो.
तुमच्या गोष्टीत त्या म्हातार्‍याच्या जागी , मी मला बघितले. मी कधीही एक्सपर्ट ट्रेकर झालो नाही, पण निसर्गांत मनमुराद भटकण्याचा आनंद नक्कीच लुटता आला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

लेख वाचून वाईट वाटलं त्या मुलासाठी. मस्त झालंय भाषांतर, अगदी प्रवाही, त्याचाच परिणाम! कुठल्या कुठल्या समाजमान्य व्याख्यांमधे स्वतःला बसवायचा प्रयत्न करतो आपण सगळे, आणि किती केविलवाणे होतो उगीचच, असं वाटून वाईट वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर लेखन आहे. अनुवादही बर्‍यापैकी सहज झालाय. मस्त!
---

बापाला दुबळे असे जग खिजवत असतानाही ते दुबळेपण मुलापर्यंत पोचु नये म्हणून बापाचा त्याच्यापरिने चाललेला आटापिटा हृद्य आहे! आपण दुबळे आहोत हे स्वीकारून मुलाला त्याहून वेगळे काहि बघता यावे, देता यावे म्हणून अपमान सहन करूनही पोराला शिकारीवर घेऊन जाणारा बाप बरेच दिवस मनात रुतून राहिल हे खास!
--

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दुबळे असे जग

??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाप दुबळा आहे असे जग हिणविते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापाला दुबळे असे जग खिजवत असतानाही ते दुबळेपण मुलापर्यंत पोचु नये म्हणून बापाचा त्याच्यापरिने चाललेला आटापिटा हृद्य आहे! आपण दुबळे आहोत हे स्वीकारून मुलाला त्याहून वेगळे काहि बघता यावे, देता यावे म्हणून अपमान सहन करूनही पोराला शिकारीवर घेऊन जाणारा बाप बरेच दिवस मनात रुतून राहिल हे खास!

मला म्हणायचं होतं ते ऋषिकेशने नेमक्या शब्दांत मांडलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भाषांतर छान झालेय. त्या पुस्तकाबद्दल तू आधीही लिहिले होतेस, त्यातल्या अजून इतरही कथांचा / लेखांचा अनुवाद कर ना.
शिकार, मासेमारी करणार्या गटांत आपली मर्दानगी सिद्ध करण्याची, त्या नैपुण्यांच्या आधारे स्वतःला श्रेष्ठ ठरविण्याची जी सूप्त चढाओढ असते ती मला फार रोचक वाटते. आर्थिक सुबत्ता, पांढरपेशा व्यवसायतले यश वगैरे अशा ठिकाणी कःपदार्थ असते, जवळची साधने-उपकरणे यालाही काही महत्व नसते. इंस्टींक्ट, चपळता आणि कौशल्य ज्याच्याकडे जास्त तो भारी, बाकीचे शून्य.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रुचि मला तीन गोष्टी फार आवड्ल्या. २ गोष्टींचे हे भाषांतर. पण तीसरी भाषांतरास, अवघड आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

छान झालाय अनुवाद. आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व प्रतिसादकर्त्यांचे व वाचकांचे आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down