मनातील छोटे मोठे प्रश्न -भाग ४४
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार व प्रश्न मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १००च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
------
फॅनखाली* झोपल्याने अंग जड का पडते?
===========================================================
*फॅन मंजे एक इलेक्ट्रिक + मेकॅनिकल + रोटेटिंग ब्लेड्स डिवाइस
Taxonomy upgrade extras
हे फीलिंग व्यक्तिसापेक्ष
हे फीलिंग व्यक्तिसापेक्ष असावं. मला तर फॅनखाली पडल्यावर पिसासारखं हलकं वाटतं. उन्हाळ्यातल्या दुपारी फुल्लस्पीड फॅनखाली पडून राहण्याने सुखाचा लाभ होतो आणि त्या सुखाच्या लाभामुळे झोप येते. झोप येण्याच्या प्रक्रियेत शरीराचे स्नायू शिथिल होतात. त्यांची हालचाल अवघड होते. या आनंददायक फीलिंगला काही हायपरअॅक्टिव्ह लोक जडपणा समजतात. ;)
अतिअवांतर
इंग्लिश लिपी ही भारतीय भाषांकरिता का अपुरी आहे हे दाखवणारे उत्तम उदाहरण.
girl: din bhar online rehte ho..chutiya hai kya? ;)
boy: tu chutiya..tera baap chutiya...tera poora khandan chutiya...aur fb tere baap ka hai kya?
girl: oy!!!! I was talking about holidays :(
boy: oooh sorry soo sorry bla bla bla
*blocked*
अतिवअवांतर
वालेंटाइन डे नंतर भारताचा सामना पाक सोबत होता त्या दिवशी हा मेसेज सगळीकडे फिरत होता "विराट'स परफॉर्मन्स टुमारो इज बेस्ड ऑन अनुश्काज परफॉरमन्स टुडे." मी ज्याला हा मेसेज फॉरवर्ड केला त्याने फार विचार न करता एका मुलीला फारवर्ड केला. नंतर मला विचारतोय अरे तिने त्या मेसेजनंतर रिप्लायच देणे बंद केलेय... मग अर्थातच सगळ्यांनी तो नोनवेझ मेसेज आहे हे सुधा फॉरवड मारण्याआधी लक्षात आलं नाही का म्हणत त्याला अजुन टेंशन दिले मग २-३ दिवसांनी पुन्हा सर्व सुरळीत झाले :)
मिसळपाव वर डॉ. सुबोध खरे
मिसळपाव वर डॉ. सुबोध खरे यान्नी दिलेले उत्तर;
VIMP प्रश्न - पंखा आणि पायांचे दुखणे याचा काय सबंध ?
अत्यंत गरमी मुळे आपल्या शरीरातून पाणी घामावाटे बाहेर पडते. पुण्यासारख्या शहरात घाम येत नाही हे खरे नाही तर पुण्यातील हवा कोरडी असल्याने घाम फार पटकन वाळतो. आणि असे शरीरातून पाणी बाहेर गेल्याने त्याबरोबर क्षारही जातात. (सोडियम आणि पोट्याशियम). हे क्षार टिकवण्यासाठी आपली मूत्रपिंडे शरीरातील कॅलशियम आणी पोट्याशियम बरोबर सोडियम ची अदलाबदली करतात. यामुळे आपल्या शरीरातील कॅलशियम कमी होते आणि यामुळे आपले स्नायू दुखतात ( अंग दुखते, उत्साह वाटत नाही). दिवसभर आपण फिरता तेंव्हा झालेली झीज भरून काढण्यासाठी रात्रीची झोप गाढ(REM SLEEP) लागणे जरूर असते. या झोपेत आपले स्नायू एकदम गलितगात्र( RELAX) होतात. ( गाढ झोपेत एकदम उठलात तर शरीरात शक्ती नसल्याचा अनुभव येतो हा यासाठी) आणी हि झोप नीट लागली नाही तर सकाळी उठल्यावर आदल्या दिव्शीचे थकलेले स्नायू आंबलेल्या अवस्थेत असतात. शरीराचा जो भाग थंड होतो तेथील रक्त पुरवठा कमी होतो.त्यामुळे पंखा लावून आपण पाय उघडे ठेवून झोपलात तर स्नायूचा रक्तपुरवठा पाहिजे तितका सुधारत नाही आणि सकाळी उठल्यावर पाय दुखण्याचा अनुभव येतो. यास्तव रात्री झोपताना पायावर पातळ चादर घेऊन झोपणे (पूर्ण उघडे ठेवण्यापेक्षा)
आता याला उपाय काय-- एकतर भरपूर पाणी पिणे. शिवाय उसाचा रस,नारळाचे पाणी, लिंबाचे किंवा कोकमाचे सरबत,पन्हे किंवा फळांचा रस हेही घेणे आवश्यक आहे कारण या सर्व रसात पोट्याशियम असते आणी त्यात घातलेल्या मिठात सोडियम असते. अशा तर्हेने आपल्या शरीरातील क्षारांचे आणी पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यानंतर आपले घर थंड कसे ठेवता येईल यावर वरती उहापोह झालेला आहेच.
फुटलेल्या आरशातील प्रतिमा.
फॅनवरच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी धन्यवाद.
================================================================================
एक ताटाच्या आकाराचा आरसा इमॅजिन करा. तो जिथे आहे तिथे त्याकडे एक विशिष्ट दिशेने पाहिल्यास एक प्रतिमा दिसते. समजा कि एका अशा आरशात एका विषिष्ट कोनातून पाहणारास एका अतिशय सौंदर्यसंपन्न स्त्रीची स्थिर प्रतिमा, अर्थातच ती स्त्री तिथे असल्यामुळे, इ इ, दिसत आहे. याचे कारण त्या स्त्रीच्या अंगावरून परावर्तित झालेले किरण आरशात जातात, मग पाहणार्याच्या डोळ्यात जातात इ इ.
आता हे सगळं अगदी तश्श्यास तस्सं ठेऊन फक्त आणि फक्त एकच बदल केला. त्या आरशाचे दोन तुकडे केले आणि पूर्वीसारखेच एकमेकांच्या बाजूला ठेवले. दोन तुकड्यांत एक नगण्य भेग आहे. आता प्रकाशकिरणांचा पॅटर्न तोच असेल तर आरशाच्या ज्या भागात पूर्वी जे दिसत होते तेच दिसले पाहिजे. पण असे होत नाही. आता दोन्ही तुकड्यांत दोन सवत्या मूळ संपूर्ण प्रतिमा दिसतात. त्यांच्यात किंचित फरक असलाच तरी मूळात जे दिसायला पाहिजे होते (एका तुकड्यात डावा चेहरा, दुसर्यात उजवा)तसं अजिबातच होत नाही. तुकडे वाढवत गेले तर प्रतिमांची संख्या वाढत जाते.
तर प्रश्न असा आहे कि आपण एकच पीस आहोत आणि आपल्याला एकच प्रतिमा उत्पन्न करायची आहे अशी बुद्धिमत्ता आरश्याच्या पृष्ठभागाला कोठून येते? सगळं तशास तसं असताना मूळ प्रतिमा एकच दिसली पाहिजे आणि अधिकची फक्त ती भेग दिसली पाहिजे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
आरश्याचा एक व्यास ओरखडला किंवा त्यावर न फोडता त्यावर पातळ काळी पट्टी लावली तरी एकच प्रतिमा दिसते कि दोन? आरशाचा व्यास १००% तोडून दोन तुकडे करण्याऐवजी ९८% तोडून दोन्हीकडे १% भाग शाबूत ठेवला तर दोन प्रतिमा दिसतील का एक?
अगदी बरोबर. सध्या अन्य
अगदी बरोबर. सध्या अन्य धाग्यावर टेलिस्कोपबाबत चर्चा चालू आहे. त्यात वेगळाले तुकडे एकत्र आणून एक प्रचंड आरसा बनवणे आणि त्यात हा इफेक्ट टाळण्यासाठी दोन तुकड्यांतला कोन अजिबात बदलू नये म्हणून ते एकत्रितपणे हलवण्याची रचना करावी लागते आहे आणि ती किचकट आहे असं म्हटलं आहे.
ओके. या ठिकाणी एकच स्थिर कोन
ओके. या ठिकाणी एकच स्थिर कोन असं न म्हणता कोनातील बदलाचा स्मूथ ग्रेडियंट टिकून राहणं महत्वाचं आहे. आरसा फुटला आणि तुकडे मोकळे असले की त्या भेगेनजीक हा ग्रेडिएंट अचानक बदलतो. हा बदल आरश्याच्या अन्य भागांच्या ग्रेडिएंटपेक्षा वेगळ्या तीव्रतेचा असतो. त्यामुळे वेगवेगळ्या कोनातून प्रतिबिंबे दिसतात. ग्रेडिएंटवाला आरसा अनियमित ग्रेडिएंट असेल तर वेडंवाकडं - लाफिंग गॅलरी टाईप- प्रतिबिंब दाखवतो (ही वेगवेगळी प्रतिबिंबं पण अॅक्सेप्टेबल लिमिटमधे एकमेकांना जोडलेली असतात). नियमित ग्रेडिएंट (परफेक्ट स्फिअर) वगैरे असेल तर प्रतिबिंब सर्व दिशांना सारख्या प्रमाणात मोठं होऊन दिसतं. वगैरे. पण तुटल्यावर हा ग्रेडिएंट अचानक बदलतो आणि डोळ्यांना पूर्ण वेगळी जाणवतील इतक्या फरकाच्या कोनातली प्रतिबिंबं दिसतात.
आर्काईव्ह.ऑर्ग इथे आहेत
आर्काईव्ह.ऑर्ग इथे आहेत जवळपास सर्वच. जरा थांबा हुडकून लिंका देतो.
इथे पहा.
https://archive.org/search.php?query=sardesai
"Marh riysata" या नावाने आहेत. खंड क्र. १ आणि ४ वगळता बाकी सर्व आहेत. डिजिटल लायब्ररी ऑफ इंड्या इथे उरलेले खंडही मिळून जावेत बहुधा. ते पाहिले पाहिजे जरा.
हॉटेल मधे रिझर्वेशन व त्यासंबंधित प्रश्न
हॉटेल मधे टेबल रिझर्वेशन व त्यासंबंधित प्रश्न
यात टिम हार्टफोर्ड यांनी विचारलेले प्रश्न रोचक आहेत. लेख थोडा लांबलचक आहे. मी दोन भाग करून वाचणार आहे.
मी असा अर्थ काढला की
आदूबाळ, reservation-selling apps राखीव जागा विकतायत बरोबर. सध्या रेस्टॉरन्ट्स मात्र नफा विभागून न घेता एक dignified अंतर ठेवतायत. तेव्हा ultimately हा बदल येतो आहे नक्की. त्या बदलाचं स्वागत कराल की तो reluctantly तुम्ही स्वीकाराल हा प्रश्न आहे.
_____
ह्म्म्म reluctantly ला, Curmudgeonly हा शब्द शोधत होते. मस्त शब्द आहे मला आवडतो.
सुब्रमण्यम स्वामी आसाराम
सुब्रमण्यम स्वामी आसाराम बापूंचे वकील
भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांची जोधपूरमधील कारागृहात भेट घेतली.
हा स्वयंघोषित शब्द मजेशीर वाटला. आपण असं म्हणतो का की राहुल गांधी हे स्वयंघोषित सर्वधर्मसमभाववादी (सेक्युलर??) आहेत ? आपण असं म्हणतो का की प्रकाश करात हे स्वयंघोषित साम्यवादी आहेत ? आपण असं म्हणतो का की मुलायमसिंग हे स्वयंघोषित समाजवादी आहेत ?
मग आसारामबापू हे स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आहेत असे का म्हणावे ??
हा शब्द self-proclaimed चं
हा शब्द self-proclaimed चं भाषांतर आहे, असं वाटतं. self-proclaimed म्हणजे बाकी लोकांच्या मान्यतेशिवाय स्वतःहूनच मी अमुक आहे असं घोषित करणं. साम्यवादी, समाजवादी, सेक्युलर या विचारधारा आहेत, त्यांच्यावर एखाद्या माणसाचा विश्वास आहे का नाही, यात लोकांची मान्यता असण्याचा संबंध नाही. पण मी गुरु आहे, असं स्वतःच म्हणायचं म्हणजे...
म्हणजे बाकी लोकांच्या
म्हणजे बाकी लोकांच्या मान्यतेशिवाय स्वतःहूनच मी अमुक आहे असं घोषित करणं. साम्यवादी, समाजवादी, सेक्युलर या विचारधारा आहेत, त्यांच्यावर एखाद्या माणसाचा विश्वास आहे का नाही, यात लोकांची मान्यता असण्याचा संबंध नाही. पण मी गुरु आहे, असं स्वतःच म्हणायचं म्हणजे...
पण आसारामबापूंचे भक्त हे कोणीही जबरदस्ती न करता स्वतःहून त्यांच्या आश्रमात दीक्षा, पूजा, कीर्तन / प्रवचन ऐकणे, विपश्य***, यासाठी जातात की. जर हजारोंच्या संख्येने ते भक्त जर voluntarily बापूंच्या आश्रमात जात असतील, बापूंच्या पायावर डोकं ठेवत असतील ... बापूंना आध्यात्मिक मार्गदर्शक मानत असतील तर ते जनमान्यच नाही का ??
मग आसारामबापू हे जनमान्य किंवा जनघोषित गुरु नाहीत का ???
जो माणूस बलात्कार (आणि कदाचित
जो माणूस बलात्कार (आणि कदाचित अन्य आरोपांखाली) तुरुंगात आहे त्याचं वर्णन करताना स्वयंघोषित हा शब्द न वापरता फक्त 'अध्यात्मिक गुरू' म्हणणं हा कदाचित ज्ञानेश्वर, तुकारामांसारख्या भारतीय संतांचा अपमान वाटत असेल वृत्तपत्राला. वृत्तपत्रांनी त्यांचं स्वातंत्र्य वापरल्याबद्दल मला आनंद झाला.
मानवता आणि बलात्कार या दोन
मानवता आणि बलात्कार या दोन गोष्टी मेळ खात नाहीत आणि स्वयंघोषित असो का जगन्मान्य, गुरु हा किमान मानवतावादी असावा ही अपेक्षा गैर नाही. ( हे प्रतिसादाला प्रत्युत्तर आहे म्हणून मानवतावाद शब्द वापरला. या शब्दाचा किस पाडू नये ही विनंती त्याजागी सहृदयता वाचल्यास हरकत नाही)
स्वयंघोषित हा शब्द न वापरता
स्वयंघोषित हा शब्द न वापरता फक्त 'अध्यात्मिक गुरू' म्हणणं हा कदाचित ज्ञानेश्वर, तुकारामांसारख्या भारतीय संतांचा अपमान वाटत असेल वृत्तपत्राला. वृत्तपत्रांनी त्यांचं स्वातंत्र्य वापरल्याबद्दल मला आनंद झाला.
सहमत.
-------------------------------------
शिवाय अदितीमुखी हे वचन पाहून मला, एक बेसिक इंस्क्टींक्ट म्हणून, आनंद झालेला. पण नंतर तुकाराम आणि ज्ञानेश्वरांचे अनावश्यक, अस्तिक, अध्यात्मिक, इ इ जिवितकार्य आणि लेगसीज पाहून कंफ्यूजन झाले. असो, पुरोगामी माणसात पूर्ण मेटॅमॉर्फॉसिस झाल्यावर अशा विधानांचा अभिप्रेत अर्थ काय असतो ते कळायला चालू होईल.
ऋषी, मुनी, साधू वगैरे
ऋषी, मुनी, साधू वगैरे शब्दांना मुळात काहीतरी विशिष्ट अर्थ आहेत, पण आपण लक्षणेने हे शब्द विस्तृत अर्थाने वापरतो:
ऋषी = ज्यांना वेदातल्या ऋचा 'दिसल्या' ते. (वेद हे अपौरुषेय मानले असल्याने ऋचांच्या 'रचना' ऋषींनी केल्या, असं म्हणायची पंचाईत, म्हणून 'दिसल्या'.)
मुनी = बहुतेक तरी मन् (विचार करणे इ.) या धातूशी संबंधित. आतला आवाज ऐकणारा ;-)
साधू = चांगला, सरळमार्गी, सद्गुणी वगैरे माणूस.
संत = सत्प्रवृत्तीचा (?). [सती याच शब्दाचे स्त्रीलिंग आहे का?]
तपस्वी = तप (तपस्या) करणारा/ केलेला.
बैरागी = वैराग्य आलेला.
गोसावी = गो [म्हणजे (स्वतःची) इंद्रिये] ताब्यात ठेवणारा (स्वामी) असा अर्थ असावा. [गोनीदांच्या लेखनात गुंसाई असा शब्द वाचून लहानपणी मजा वाटायची. गुंसाई की पुडी वगैरे]
काही शंका:
* मुनी या शब्दाशी काही जैन संदर्भ निगडित आहेत का? जैन संत, जैन ऋषी असे शब्द कधी ऐकलेले नाहीत; जैन मुनी मात्र ऐकलाय.
* शेवटचे दोन शब्द मराठीत हिंदीतून आलेत का?
* शेवटच्या दोन शब्दांना बरेचदा उपहासात्मक छटा का असते? उदा. गोसावडा.
* गोसावी या शब्दाचा नाथपंथाशी संबंध आहे का?
भूकंप, मदतकार्य आणि रोमान्स/प्रणय
नेपाळ. भूकंप. शेकडोंचे हाल. मदतकार्य सुरु. सरकारी यंत्रणा जाणार. खूपशा बिगर-सरकारी संघटना जाणारे. काही तरुण उत्स्फूर्तपणे एखाद्या गटासोबत जाणार.
नेपाळला मदतकार्यासाठी जातानाही मधल्या वाटांमधून कित्येक जागा/स्पॉट्स नयनरम्य वगैरे असतीलच की. काही क्षण तिथे पोचल्याचा आनंद वगैरे होणारच की.
मदतकार्यादरम्यान एखादी तरुण -तरुणी ; भविष्यातलं जोडपं प्रथमच परिचित होत असेल एकमेकांशी स्वयंसेवक म्हणून. त्यांची वेव्हलेंथ जुळत असेल.
पण प्रलयाच्या पार्श्वभूमीवर असा रोमान्स अस्थानी असेल का ?
तुम्हाला मदतीसाठी जाताना रस्त्यात जी नयनमनोहर दृश्य लागतात; त्यांचा आस्वाद घेत असाल तर तुम्हाला परिस्थितीचं गांभीर्य आहे की नाही;
असं कुणी विचारल्यास काय करायचं ? एखादं मदतकार्याला जाणारं जोडपं मदतीचं काम चोख करत असेल; पण " तिकडे जातच आहोत; जमल्यास जरा फिरुन घेउ, मौज करु " असा विचार करुन निघत असेल; जाताना कंडोम सोबत घेउन जात असेल तर ते उचित असेल का ?
बरं, हे सगळं झूट है, असं प्रेमबिम कै व्हायलाच्च नै पायजेल आणिबाणीच्या परिस्थितीत, आणि चांगली मस्त ठिकाणं रस्त्यात लागली तरी त्यात मनानं बुडून
जायला नको; असं म्हटलं तर एक गोची आहे. आपल्याला काय वाटतं किम्वा काय वाटावं ह्याच्यावर आपलं नियंत्रण असतं का ?
म्हणजे ...नियंत्रण असलेली काही थोर माणसं असलीच तरी ती थोर आहेत, लै मोठ्ठी डॉन आहेत; हे मान्यच.
पण जनसामान्याचं -- आम आदमीचं काय ? आपल्याला अशाही प्रसंगी भलत्याच बाबींचा मोह पडला म्हणून त्याला अपराधगंड/गिल्टी फीलिंग असावं का ?
.
.
एक अगदि साधं(पण अवांतर वाटेलसं) उदाहरण घेउ. समजा पेल्यानं पाणी प्यावं नि थाळीत/ताटात खाणं वाढावं ही जगरहाटी आहे. पण ह्याविपरीत एखाद्याला ताटात ओतून पाणी प्यावेसे वाटत असेल (बशीतून कधी कधी चहा पितात तसे) तर ते चूक का ? कसे ? त्यानं स्वतःलाच 'असं तुला वाटताच कामा नये' हेच्च सांगत रहायचं का ?
.
.
नेपाळ हा पर्यटनावर चालणारा देश. आता सुरुवातीचं सगळं काम ओसरु लागल्यावर, जनजीवन पूर्वपदावर यायला लागल्यावर आपण नेपाळला पर्यटक म्हणून जाणं हीसुद्धा एकप्रकारची मदतच होइल, नै का ?
मनोबा, मस्त लिहिलेले आहेस.
मनोबा, मस्त लिहिलेले आहेस. तुझी शाहकार पोस्ट. एकदम आवडली. शेवटचे वाक्य एकदम मार्मिक.
--
रोमान्स बद्दल तू उपस्थित केलेला प्रश्न उचित व प्रचंड उपेक्षित आहे. की रोमान्स एवढा "Looked down upon" का आहे ? खरंतर भारतात स्त्रीया व पुरुष संबंधांत एक दरी आहे. व एक तरुण व तरुणी ती दरी पार करून एकत्र येत असतील व प्रेम करीत असतील तर ते स्वागतार्ह मानले जायला हवे. पण नाही. प्रेमावर सुद्धा आक्षेप. आणि वर - तुमचे प्रेम हे वासनेने भरलेले आहे - अशी टोमणा कम टीका. जणुकाही अनिष्ट हा शब्द वासना या भावनेसाठी रिझर्व्ड विशेषण असावे म्हणूनच जन्मास आलेला आहे. त्या दोघांनी एकत्र जेवण केले तर ठीक पण एकत्र प्रेम केले तर ठीक नाही ??
रोचक आहे. आणखी बेसिक विचार
रोचक आहे. आणखी बेसिक विचार करायलाही हरकत नाही. म्हणजे, जितके लोक मेले ते अंगावर घरं-इमारती पडून मेले. मुळात लोक भूकंपाने मरत नाहीत तर पक्की सिमेंट काँक्रिटची घरं बांधून त्यात राहिल्याने मरतात. घर बांधून त्यात राहणार्यांनी हा धोका स्विकारलेला आहे हे अध्यारुत आहे. भूकंपात शेकड्याने जंगली प्राणी मेलेत असे होत नाही. मग असा धोका स्विकारलेले लोक मेले तर त्यात वस्तुतः वाईट वाटण्यासारखे काय आहे? बाकी ती मदत वगैरे चांगुलपणा म्हणून योग्य आहे; पण याला नैसर्गिक आपत्ती म्हणणे व बाकिच्यांनी लांब तोंड करुन बसणे याला काही अर्थ नाही.
रोजच्यारोज म्हातारपणामुळे (किंवा गाड्यांच्या अपघातात) मरणारे यापेक्षा कितीतरी अधिक असतील.
अशाच आशयाचा आजचा लोकसत्तातील
अशाच आशयाचा आजचा लोकसत्तातील अग्रलेख वाचनीय आहे.
==
बाकी, @ मनोबा, जोवर जाहिर/सार्वजनिक जागी संभोग करत नाहीत लोकांना काय कळणार तुम्ही नेपाळला/आपात्कालिन भूभागात जाऊन रात्री आपल्या खोल्यांत/तंबूत काय करताय?
आजुबाजूला मदतकार्य चालु असता सार्वजनिकरित्या असे काही वागणे गैर नसले तरी प्रसंगोचित वाटणार नाही.
अजुन बेसीक विचार..
मुळात लोक कधीच कशानेच मरत नाहीत, ते फक्त जन्माला येउन राहिल्याने मरतात. रोजचे आयुष्य जगर्यांनी जन्मुन हा धोका स्विकारलेला आहे हे अध्यारुत आहे. वणव्यात शेकडो लोक मेले असे होत नाही मग असा धोका न स्विकारलेले लोक आणखी कशात मेले तर त्यात वस्तुतः वाईट वाटण्यासारखे काय आहे?
बाकी ती मदत वगैरे चांगुलपणा म्हणून योग्य आहे; पण याला नैसर्गिक आपत्ती म्हणणे व बाकिच्यांनी लांब तोंड करुन बसणे याला काही अर्थ नाही. कारण अनैसर्गीक असेच मुळात काही अस्तित्वात नाही मग नैसर्गीक हे त्यातुन वेगळे कसे काढायचे ?
मला माहित आहे... माझी लागली नसेल तर मी अशी मुक्ताफळे उधळुन पाने च्या पाने भरवु शकतो.
+१
याप्रमाणेच, महाभारतातील यक्षप्रश्नांत यक्ष युधिष्ठिराला विचारतो की जगातले सर्वांत मोठे आश्चर्य कोणते? तर युधिष्ठिर उत्तरतो की जन्मलेला प्रत्येक माणूस आज ना उद्या ना परवा कधीतरी मरणार आहे हे माहिती असूनही आपण जणू काय अमरच आहोत अशा थाटात जगाचे व्यवहार सुरू असतात हे सर्वांत मोठे आश्चर्य होय.
पण प्रलयाच्या पार्श्वभूमीवर
पण प्रलयाच्या पार्श्वभूमीवर असा रोमान्स अस्थानी असेल का ?
इक सूरज निकला था..
कुछ तारा पिघला था
इक आँधी आयी थी
जब दिल से आह निकली थी..दिल से रे SSSSS
दिल से, स्पीड आणि अन्य शेकडो जगालाअमेरिकावाचवतेछाप हॉलीवूडपट बघितले नाहीत का?
"स्पीड"मधे शेवटी दोघे एकमेकांवर पडतात तेव्हा एक वाक्य आहे की संकटकाळात जुळलेली नाती दीर्घकाळ टिकत नाहीत. खखोदेजा.
दोन भूकंपांनंतरच्या मदत
दोन भूकंपांनंतरच्या मदत कार्यात सह्भागी होतो. प्रत्यक्ष साईट्वर- समोर जळत असलेल्या सामुहिक चिता,ढिगा-याखाली कोणी असेल का हा प्रश्न, जिवंत उरलेल्यांसाठी करायच्या गोष्टी या कल्पनाशक्तीचा सगळा स्पेस व्यापण्यास पुरेशा होत्या! अर्थात लातूर व कच्छ कांही फार निसर्गरम्य नाहीतच. मात्र 'आपत्ती-नुकसान-पर्यटन' करणारे बरेच भेटले. मदतका-यातील आपली जबाबदारी पूर्ण करून परत येताना अगदी पर्यटन जरी नसले तरी स्थळदर्शन होऊ शकते की! सगळे वातावरणच इतके विअर्ड व उदासवाणे असते की दीर्घकाळ त्याचा परिणाम मनावर राहतोच.
उदगीरात राहीलेल्यांना सर्व
उदगीरात राहीलेल्यांना सर्व जगच निसर्गरम्य वाटत असावे.
हे विधान आमच्या 'मुंबई परिसरातून अन्यत्र गेलेल्या लोकांना अखिल ब्रह्मांडाची प्रगती झाली आहे असे वाटते' या विधानाचा कॉपीराईट भंग करते.
-------------
अॅनि वे, ऑनेस्टली, उदगीर तालुका, अॅट लिस्ट व्हेन आय सॉ इट (मंजे प्री-प्लास्टिक, प्री-पॉलिथिन युगात), वॉज व्हेरी ब्यूटीफूल.
आता ते वितंडवाद घालत नाहीत
आता ते वितंडवाद घालत नाहीत ऐसी वर.
अहो, असं इतक्यात म्हणता येणार नाही. ती सिद्धी प्राप्त करायच्या प्रयत्नात आहे. सिद्धीच्या शाळेच्या धाग्यावरच्या प्रतिसादात महिनाभरात कमावले ते दिवसात गमावले. पण तरीही यापुढे दक्ष राहीन.
------------------------------------------------
बाय द वे, वितंडवाद न होण्यात अपरिमित सुख असतं असा व्यक्तिगत अनुभव येत आहे. पण याचा ऋषिकेशला बोध होईल तो सुदीन! ;)
हो ना!
भूकंप, मदतकार्य आणि रोमान्स/प्रणय
च्यायला कोर्ट पिच्चर पहाताना हसणार्या लोकांना संवेदनाच नाही वगैरे म्हंटले जाते, किंवा रस्त्यावर अपघातात जखमी झालेल्याला मदत करण्याचे सोडून गुलुगुलू गप्पा मारणार्या प्रेमीजनांना शिव्या घालता येणे शक्य आहे काय?
आपल्याला काय वाटतं किम्वा काय वाटावं ह्याच्यावर आपलं नियंत्रण असतं का ?
ह्यातच उत्तर असावं.
संवेदनशीलता
अशा भूकंपानंतर पहिल्यांदा मनोबाचा प्रतिसाद विचित्र आणि अनावश्यक वाटला. नंतर अशा भीषण परिस्थितींत मी कसा रिअॅक्ट करतो याचा आढावा घेतल्यावर मनोबाचं मनन हे काही अस्थानी नाही असं वाटलं.
---------------------------------------------------------------------------------------------------------
लहानपणी कोणाचं काही बरंवाईट झालं तर 'चला, मी तरी सुटलो' असा विचार कधीच येत नसे. याउलट 'अरे, त्या माणसाची स्थिती किती वाईट असेल' असे वाटायचे. शहरात आल्यावर पहिल्यांदा 'दिसणार्या लोकांची' पण 'आपल्याशी संबंध नसलेली दु:खं' असा प्रकार पहिल्यांदा पाहायला मिळाला. खरं तर माहितीच्या अतिरेकानं हळूहळू संवेदनाहिन झालो आहे. लहानपणी कोणाचा वार्धक्यानं होणारा नैसर्गिक मृत्यूदेखिल प्रचंड दु:खदायक वाटायचा. आता प्रत्येक प्रकारच्या मृत्यूंचा एक राष्ट्रीय सरासरी वार्षिक आकडा सवयीचा होऊन गेला आहे. मूळात कॅंसरने १० लाख ऐवजी ९.७ लाख मेले तर ती अचिवमेंट, चांगली घटना मानायची! रेप २० हजार ऐवजी २५ हजार झाले तर बायका ज्या प्रमाणात वाढताहेत त्या प्रमाणात बलात्कार वाढत नाहीयेत म्हणून सुख मानायचं!! शेवटी काहीतरी करून सगळं आलबेल आहे अशी समजूत करून घ्यायची. काश्मिरात आपला कोणी भाऊ, जीजू लष्करात आहे का? जगदलपूरात कोणी पोलिसात आहे का? मग आपलं काम मृत्यूंशी सहानुभूती व्यक्त करण्यापूरतं मर्यादित ठेवायचं. काश्मिर, नक्षलवादी, बाँबस्फोट, दंगली, कँसर, रोड अपघात, शेतकर्यांच्या आत्महत्या, इ इ सांख्यिकीमधली बेल कर्व फॉलो करत असावेत. फार काही वेगळं घडलं तरच आपण ते चर्चितो. अन्यथा स्वतःच्या जीवनाअंती जसा स्वतःचा मृत्यू अटळ आहे असे आपण मानतो तसे स्वतःच्या जीवनादरम्यान इतरांचे असे मृत्यू, स्टॅट्स अटळ आहेत असेच आपण मानत असतो. हे सगळं कमी करता येतं, टाळता येतं, पण असो, फार किचकट आहे असं मानतो. यानंतर येतात त्या प्राकृतिक आपदा. कधी कोणती आपदा येईल काही सांगता येत नाही. इथे नुकसान अनपेक्षित, विशिष्ट क्षेत्रफळात मर्यादित, जलद , इ इ असते. त्यात श्रीमंत आणि गरीब दोन्ही एकत्र भाजले जातात.
जिथे अल्पप्रमाणात का होईना श्रीमंताचे नुकसान होते, तिथे कामापेक्षा जास्त चर्चा होते. भारतात दर्वर्षी १ लाख लोक रोड अपघातात मरत असावेत. मंजे दिवसाला २७५. पण मलेशियाच्या विमानातल्या ३-४ भारतीयांना जे कवरेज मिळालं, त्याच्या एक सहस्रांश देखिल या पैकी कोणाला मिळालं नसेल. हा देखिल असंवेदशीलतेचा प्रकार आहे. पण तो शिष्टसंमत आहे. अगदी नेपाळच्या भूकंपानंतर उ. भारतात कारखाने असलेल्या सिमेंट कंपन्यांचे शेअर घ्या म्हणून सांगणे देखिल शिष्टसंमत आहे. असंवेदनशीलतेचे अनंत पापुद्रे, प्रकार आहेत.
----------------------------------------------------------------------------------------------------------
'जगाची लोकसंख्या अतीव वाढली आहे आणि एके दिवशी तिचा स्फोट होईल' या एकमेव विधानात माणसाची संवेदनशीलता कितीतरीपट कमी करण्याची क्षमता आहे. जगातील अन्य लोकांची आणि आपली economic interdependent union आहे असं आपलं अन्य जगाबद्दलचं मत बनत चाललं आहे. प्रत्येकाला गर्दी नको आहे. भिकारी आणि गरीब नको आहेत. त्यांचे दारिद्रय नष्ट करणे असंभव आहे हे वारंवार सिद्ध झाल्याने ते लोकच नष्ट व्हावेत किंवा करावेत असा विचार समाजात कमी प्रबल नाही.( २००० मधे मी मुंबईत असताना 'लोकलमधे बसायला जागा का नसते?' चे उत्तर ऐकता ऐकता 'एक दिवस लष्कर बोलावून काठावरच्या स्लम्स कंप्लीट उडवून टाकाव्यात' असे माझे मत बरेच दिवस होते.) जे फारच उच्च क्लासचे आहेत ते शोषण करतात, जे आपल्यासारखे आहेत ते स्पर्धा करतात, जे खालच्या क्लासचे आहेत ते घाण करतात. मग आवडतं कोण?
--------------------------------------------------------------------------------------------------------------
संवेदनाहिनता फक्त सामाजिक स्तरावरच आहे असं नाही. ती व्यक्तिगत स्तरावर देखिल वाढत आहे. मुलगा दिल्लीला नोकरी करतो. आईबाप कोणत्या ओरीसाच्या जिल्ह्यात. भौतिक संबंध पदवीच्या वेळेसच तुटलेला. फक्त आठवड्याला फोन. अचानक एक दिवस ऑफिसात फोन - 'आई वारली आहे, ये'. 'मला जायला लागेल' असं बॉसला सांगून लगेच मयताला हजर. ८-१० दिवसांनी परत रुजू. 'तब्येत चांगली नव्हती का?', 'काही त्रास होता का? 'वय झालं होतं का?' असे चार फॉर्मल प्रश्न. १५ व्या दिवशी सगळं पूर्ववत. छोटं कुटुंब. सगळ्यांचा एकमेकांसाठी वेळच कमी. जितका वेळ उपलब्ध त्यात सगळी कामं उरकायची. मग कसच्या आठवणी, कसचे ऋणानुबंध आणि कसला लळा?
थोडक्यात, फार कै कोणाशी जीव लावावा अशी परिस्थिती नाही आणि मानसिकता नाही.
----------------------------------------------------------------------------------------------------------
दृश्य किंवा दिखाव्याची संवेदनशीलता सर्वात श्रेयस्कर. मेसेज, सहानुभूती, स्वतःला अज्जिबातच फरक पडणार नाहीत असे नगण्य पैसे, दोन मिनिटं शांतता, मेणबत्त्या, चार लोकांत मृतांची महती सांगणं, इ इ. पण जर कोणी मनस्वीपणे झटून मदत करत असेल (आणि दिसायला, बोलायला रुक्ष असेल तरी) संवेदनशील म्हणायला पाहिजे. नेपाळच्या निसर्गाचं सौंदर्य भूकंपानं कमी होणार नाही. पण त्याचं अस्थानी कथन नको. आणि मदतीच्या प्रयत्नांत कोणाचे धागेदोरे जुळले तर वाईट काय? पण धागेदोरे जोडायला हा फोरम उत्तम म्हणून तिथे जाणे असंवेदनशील. तेच दारू पिण्याचं, सेक्स करण्याचं म्हणता येईल. मदतीचं काम झाल्यावर तुम्ही काय करावं काय नाही यावर प्रोटोकॉल नाही. पण दिवसभरात जे पाहिलं त्याचा परिणाम "सामान्य मनुष्याच्या" मनावर व्हायला हवा. अॅक्शन सिनेमात विनाश पाहणं वेगळं आणि प्रत्यक्ष पाहणं वेगळं. पण यातही कोणी स्थितप्रज्ञ हृदयाचा असेल तर आपण अशा काळात नॉर्मल सेक्स करत होतो हे भीषण प्रसंग वर्णता वर्णता सांगू नये. तुमच्यासाठी करणं नॉर्मल असेल, पण ऐकणाराची परिपक्वता देखिल महत्त्वाची आहे.
या निमित्तानं मला मी बॅचलर असताना पाहिलेला कोणतातरी मराठी (कि हिंदी?)चित्रपट आठवला. त्यात ज्या दिवशी अभिनेत्रीची आई मरते त्याच दिवशी दोघांत संभोग होतो, आणि तो तिला सॉरी म्हणत असतो. काही प्रसंगी काही गोष्टी करू नयेत असा संकेत असावा.
शर्ट -- टी शर्ट --लायनिंग
नोकरीला लागलो तसा 'वागणूकीचे धडे' (behavioural training) मिळाले. तोवर आपले कपडे, आपला अवतार, ह्याकडे विशेष लक्ष दिले नव्हते.
'फॉर्मल शर्ट' ह्या व्याख्येत म्हणे फक्त लायनिंगचे किम्वा प्लेन शर्ट येतील, क्वचित प्रसंगी चेक्स-चौकटीचेही चालतील.
बिझनेस कॅज्युअल -- सेमि फॉर्मल मध्ये कॉलर असलेला टी शर्ट चालेल.पण त्यावर गमतीशीर्/वैचित्र्यपूर्ण संदेश वगैरे नको.
थोडीफार डिझाइन चालून जाइल म्हणे.
.
.
फॉर्मल शर्टची जी लायनिंग असते; त्यावर उभ्या(किम्वा क्वचित तिरप्या) रेषा असतात.
कॉलर वाल्या टी शर्ट वर खूपदा आडवे पट्टे असतात. (बॅटमॅन खूपदा ज्या टी शर्टात दिसतात तसला टी शर्ट.आडवे पट्टे असलेला.)
.
.
हे आडवं-उभं असायला हवं हे कुणी आणि कधी ठरवलं ?
फॉर्मल शर्टाला आडवी लायनिंग का नसावी ?
कॉलरवाल्या टी शर्टावरील पट्टे आडव्या ऐवजी उभे का नसावे ?
हे नेमकं कधीपासून रूढ आहे ?
ह्या वस्तू वापरात आहेत तेव्हापासून हे असच आहे का ?
की पूर्वी वेगळं कै चालत होतं ?
नोप्स
..आवाज, जत्रा इ इ दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठादिवरील भामट्या गुंडांपासून..
हे अंक मराठी पुरतेच असावेत. सध्याची उच्चवर्णीयांची मराठी, त्यांचं वाचन्-लेखन ...एकूणच सध्याची मध्यमवर्गीय कारकुनी वर्गाची मराठी संस्कृती ही मागच्या दीड दोनशे वर्षापासून साहेबाच्या संस्कृतीवर बेतलेली आहे. त्याचीच नक्कल आहे. चट्ट्यापट्याच्या शर्टात भामटा दाखवणे हे जत्रा,आवाज पूर्वीही सुरुच असणार.
आपल्याकडे टी शर्ट संकल्पना पश्चिमेकडून आलेली आहे. हा विशिष्ट टी शर्ट अमुक विशिष्ट वृत्तीचा हेही आधीपासून पश्चिमेत असणार.
साहेबाचं बघून आपण शिकलो असणार.
अहो, मराठमोळी-देशी धाटनीची नाड्यानं बांधायची भलीमोठ्ठी आतली चड्डी सोडून अंडरवियरसुद्धा साहेबी श्टायलीतली इल्यास्टिकवाली घालायला लागलीतच ना मराठी मंडळी ?
"आपलं घडून गेलेलं धर्मांतर ..." अशाच गोष्टींना म्हणतो मी.
ह्या ह्या ह्या... या बाबतीत
ह्या ह्या ह्या... या बाबतीत मीही लय रट्टे खाल्ले आहेत. मला मुळात बूट घालायलाच आवडत नाही. नोकरीला लागलो तेव्हा बूट काढून ठेवून अनवाणीच हपीसभर हिंडत असे. एकदा सुप्परबॉसच्या लक्षात आलं, आणि त्याने एक मास-ईमेल केली - कुंपणीच्या पॉलिसीप्रमाणे काही लोकांचा पोशाख नाही असं आमच्या निदर्शनास आलं आहे वगैरे. तो मी नव्हेच म्हणून ती मेल मी फाट्यावर मारून टाकली. मग माझ्या बॉसकडे पुडी सोडून त्याने माझे कान उपटवले.
असंच टाय वापरणे, कोट घालणे, कॉटनच्या विजारी न वापरणे, ब्राऊन बूट न वापरणे, बाह्या न दुमडणे, याबाबतही...
असामी असामी मधले मानकामेशेट आठवतात.
थोडस्सं वेगळं
माझी शंका थोडी वेगळी आहे.
मार्केटमध्ये आडव्या लायनिंगचे शर्ट्स उपलब्धच नाहित; असा सिनारिओ का आहे; अशी विचारणा आहे.
हापिसात बिनकॉलरचा किंवा बिनबाह्याचा ड्रेस्/टी शर्ट घातलेला चालत नाही; हे ठाउक्/मान्य आहे.
पण मार्केटमध्ये बिनबाह्याचे व बिनकॉलरचे टी शर्ट/ड्रेस उपलब्ध आहे.
हापिस सोडून इतरत्र तुम्ही ते वापरु शकता.
पण आडव्या लायनिंगचा फॉर्मल शर्ट, उभे पट्टे असणारा टी शर्ट उपलब्धच दिसत नै फार.
ते तसं का अहए; ही शंका.
गेल्या महिन्यात अजोंनी कार ६०
गेल्या महिन्यात अजोंनी कार ६० च्या वेगात जात असेल आणि ती थांबवायची असेल तर ब्रेक आणि क्लच कसा वापरावा अश्या टायपाचा काहीतरी प्रश्न विचारला होता. तेंव्हाच उत्तर द्यायचे होते पण राहुन गेले. काल आमच्या गाडावर प्रयोग करुन काही डाटा मिळवला म्हणुन हे उत्तर.
१. कारच्या इंजिनाला चालू रहाण्यासाठी स्वताच्या फ्रिक्शन पेक्षा जास्त पॉवर निर्माण करावी लागते. त्या पेक्षा कमी पॉवर तयार झाली तर इंजिनाचा वेग ( RPM ) कमी होऊन इंजिन बंद पडते.
२. प्रत्येक गीयर मधे कार अजिबात अॅक्सलिरेटर न वापरता सपाट आणि हॉरिझाँटल रस्त्यावर एका विवि़क्षीत वेगाने जाते. ह्या वेळी इंजिन निर्माण करत असलेली पॉवर इंजिनाच्या फ्रिक्शन आणि कार चे रस्त्याशी होणारे फ्रिक्शन ह्यांना काँपेनसेट करेल इतकी पॉवर निर्माण करत असते. आमच्या कार साठी हे स्पीड्स अंदाजे
पहीला गियर : ८-१० कीमी. पर तास
दुसरा गियर : १६-१८ कीमी. पर तास
तिसरा गियर : २५ कीमी. पर तास
चौथा गियर : ३५ कीमी. पर तास
ह्याचा दुसरा अर्थ, जर गाडी पहील्या गियर मधे असेल आणि अॅक्सिलरेटर अजिबात वापरला नसेल तर १० कीमी. पर तास च्या वरच्या स्पीड मधे इंजिन ब्रेक सारखे काम करते आणि १० कीमी. पर तास पेक्षा स्पीड जर कमी असेल तर इंजिन गाडीला पुढे ढकलते.
अजोंच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर. जर कार ६० कीमी. पर तास वेगानी जात आहे आणि चौथ्या गियर मधे आहे तर
आधी फक्त ब्रेक दाबावा. गाडीचा वेग ३५ कीमी. पर तास होइ पर्यंत इंजिन ब्रेकींग चे काम करेल. वेग ३५ कीमी. पर तास पेक्षा कमी झाला की क्लच वापरावा कारण ह्या खालच्या स्पीड मधे इंजिन गाडीला पुढे ढकलत राहील.
सिलिंग फॅन असे म्हणा, बहुदा
सिलिंग फॅन असे म्हणा, बहुदा फॅनच्या कॉन्स्टंट वार्यामुळे डिहायड्रेशन होत असावे त्यामुळे अंग जड पडणे किंवा लिथार्जी/फटिगसम भावना येत असावी.