नेट न्यूट्रॅलिटी संपली तर...

आज सहज असा विचार आला, की जर नेट न्यूट्रॅलिटी खरंच संपली (समजा) आणि विविध नेट कंपन्यांनी वेगवेगळ्या डेटाला प्रायोरिटी देणारे नेट पॅक्स बाजारात आणले तर खालील पॅक्सच्या खपाची क्रमवारी कशी असेल?

(पॅक म्हणजे त्या पॅकशी संबंधित विशिष्ट साईट लवकर उघडतील, इतर हळू उघडतील किंवा संबंधित साईट चार्ज मध्ये समाविष्ट, इतर साईट्ससाठी जास्तीचे पैसे वगैरे)

१. सोशल नेटवर्किंग पॅक- यात तुम्हाला ठराविक सोशल नेटवर्किंग ट्रॅफिकला प्रायोरिटी मिळेल
२. नॉलेज पॅक - विकिपीडिया वगैरे
३. एंटरटेनमेंट पॅक - यूट्यूब वगैरे
४. इमेल पॅक - फकस्त इमेल
५. अ‍ॅडल्ट एंटरटेनमेंट पॅक - अर्थ स्पष्ट करण्याची गरज नसावी
६. नेट न्यूट्रल पॅक - सब घोडे बारा टक्के (पण विशिष्ट पॅक घेतला असता मिळणार्‍या स्पीडपेक्षा हळूच)
७. एकॉनॉमी पॅक (ठराविक इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना प्रायॉरिटी. इतर कंपन्यांच्या वेबसाईटला अधिक पैसे)
८. बँकिंग पॅक (ठराविक बँकांची साईट वापरणे फुकट. इतर ब्यांकाच्या वेबसाईटना अधिक पैसे)
९. ट्रावल पॅक (ठराविक ट्रॅवल एजण्टांची, तिकीटींग, ट्रॅवल ब्लॉगिंग, हॉटेल बुकिंग इत्यादी साईट वापरणे फुकट. इतर वेबसाईटना अधिक पैसे)
१०. न्यूज पॅक (ठराविक वृत्तपत्रांची, च्यानेलांची साईट बघणे मोफत. इतर न्यूज वेबसाईटना अधिक पैसे)
११. शॉपिंग पॅक (ठराविक ऑनलाईन शॉपिंग फुकट. इतर महाग)
१२. कॉम्बो पॅक्स (वरील पॅक्सचे काँबिनेशन घेता येईल)

आणखी काही पॅक्स सुचत असतील तर तेही प्रतिसादांत समाविष्ट करा. आपण ते मूळ धाग्यात टाकू.
बदल - ऋषिकेश यांनी सुचवलेले प्याक्स यादीत टाकले आहेत. आता बहुतांशी सर्व प्याक्स कव्हर झाल्यासारखे वाटतायत.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

एकॉनॉमी पॅक (ठराविक इन्व्हेस्टमेंट कंपन्यांना प्रायॉरिटी. इतर कंपन्यांच्या वेबसाईटला अधिक पैसे)
बँकिंग पॅक (ठराविक बँकांची साईट वापरणे फुकट. इतर ब्यांकाच्या वेबसाईटना अधिक पैसे)
ट्रावल पॅक (ठराविक ट्रॅवल एजण्टांची, तिकीटींग, ट्रॅवल ब्लॉगिंग, हॉटेल बुकिंग इत्यादी साईट वापरणे फुकट. इतर वेबसाईटना अधिक पैसे)
न्यूज पॅक (ठराविक वृत्तपत्रांची, च्यानेलांची साईट बघणे मोफत. इतर न्यूज वेबसाईटना अधिक पैसे)
शॉपिंग पॅक (ठराविक ऑनलाईन शॉपिंग फुकट. इतर महाग)
कॉम्बो पॅक्स (वरील पॅक्सचे काँबिनेशन घेता येईल)

===

असा एक दिवस येईल जेव्हा रीजनल वेबसाईट्स पॅक निघेल. मग ऐसीच्या मालकांना एका कंपनीशी संलग्न व्हावे लागेल नाहितर सगळ्या नेटवर्कवर ऐसी बघणे महाग झाल्याने लोक ऐसी बघणे बंद/कमी करतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओके. धाग्यात हे सगळे प्याक्स टाकत आहे. पण कसे आणि कुठल्या क्रमवारीत खपतील याचा काही अंदाज मांडता येईल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असले काहीही होणार नाही. अगदी नेट न्युट्रालिटी काढली तरी आत्ता जसे आहेत तसेच प्लॅन चालू रहातील.

सध्या पण टोरंट डाऊनलोड जवळजवळ सर्वच ISP नी थ्रॉटल केले आहे. त्या बद्दल कोणालाच काही दु:ख आहे असे दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहज मिळणारा वाचक(आणि लेखकुवर्ग) मोठ्या प्रमाणात हरवल्यामुळे निष्क्रीय झालेल्या वेबसाईटांचा पॅक. आणि यात निष्क्रीय झालेल्या मराठी संस्थळांचा उपपॅक, याचा क्रम काय लागेल ते माहित नाही पण अशी मराठी संस्थळे जेथे नेटन्युट्रलिटीचा विरोधी भूमिकाही घेऊन दाखवली गेली त्या सदस्यांना इतर वाचक आणि लेखक सोबतीस मिळावेत आणि साईट निष्क्रीय मधून सक्रीयत जाऊन आयएसपीचे उत्पन्न वाढावे म्हणून एक राहत प्याक असावा असा प्रस्ताव मांडावा काय Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरेवरील आधीचे नुसते "माहितगार" सदस्य खाते माझे नाही. गैरसमज नसावा.

एक खरा प्रश्नः

समजा नेट न्यूट्रॅलिटी संपलीच, आणि समजा फेसबुकसाठी वेगळा प्याक घ्यायची गरज निर्माण झाली. अशा परिस्थितीत प्रॉक्शी सर्वर किंवा तसला मध्यस्थ वापरून फेसबुक प्याकला बगल देता येईल का?

असे प्रॉक्शी सर्वर देणार्‍या कंपन्यांनी फेसबुक प्याकपेक्षा कमी पैसे चार्ज करून ही सेवा उपलब्ध करून दिली तर मोबाईल कंपन्यांना काही प्राब्ळम नसावा, रैट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

फेसबुक/तत्सम अ‍ॅप बंद होण्याचा प्रकार होणार नाही, फक्त अ‍ॅक्सेस स्लो असेल त्यामुळे प्रॉक्झीसर्व्हरची गरज भासेल असे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा नेट न्यूट्रॅलिटी संपलीच, आणि समजा फेसबुकसाठी वेगळा प्याक घ्यायची गरज निर्माण झाली. अशा परिस्थितीत प्रॉक्शी सर्वर किंवा तसला मध्यस्थ वापरून फेसबुक प्याकला बगल देता येईल का?

असे प्रॉक्शी सर्वर देणार्‍या कंपन्यांनी फेसबुक प्याकपेक्षा कमी पैसे चार्ज करून ही सेवा उपलब्ध करून दिली तर मोबाईल कंपन्यांना काही प्राब्ळम नसावा, रैट?

माझ्या मते, टेलिकॉम कंपन्या फक्त स्क्याइप, IP Calls सारक्या गोष्टी थ्रोटल करेल, कारण ह्यांच्या मुळे'च' त्यांच्या मुळ टेलिफोनी धंद्याला इजा होते. त्यांना ऐसी, किंवा विकी असल्या सायटी बॅन किंवा थ्रॉटल करण्यात काही रस नसणारे/नाही.

आणि इतका विचार करु नका, भारतात ४-५ तरी मोठ्या ISP आहेत. ज्या स्पर्धेमुळे सध्या आहेत तसेच प्लॅन देत रहातील.
आणि तसेही सरकार कडे BSNL आहेच, जे सर्वात मोठे BB SP आहे. त्यावर जर सरकार नी नेट न्युट्रालिटी ठेवली तर बाकीच्यांना झकत मागे धावायला लागेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठीक आहे, फेसबुकऐवजी स्काईप धरा. मुद्दा असा आहे, की अ-न्यूट्रल टेलिकॉम कंपन्यांना प्रॉक्झी सर्व्हरवाल्या मध्यस्थांबद्दल प्रॉब्लेम नसायला हवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ठीक आहे, फेसबुकऐवजी स्काईप धरा. मुद्दा असा आहे, की अ-न्यूट्रल टेलिकॉम कंपन्यांना प्रॉक्झी सर्व्हरवाल्या मध्यस्थांबद्दल प्रॉब्लेम नसायला हवा.

असणार ना प्रॉब्लेम. लोक स्काईप वापरणार असतील तर दोन प्रॉब्लेम होतात.
१. बँडविड्थ खुप वापरली जाते त्यामु़ळे SP च्या वर लोड येतो, त्यांना जास्त InfraStructure पुरवावे लागते जास्त पैसे न मिळता.
२. त्यांच्या मुळे टेलीफोनीच्या धंद्याला त्रास होतो.

हे जे कोण तुम्ही प्रॉक्झी सर्व्हरवाल्या मध्यस्थ म्हणत आहेत, त्यांचे डीटेल्स कळले की टेलीकॉम कंपन्या त्यांना पण बॅन किंवा थ्रोटल करणारच. चोर शिपायाचा खेळ चालत राहील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शॉपिंग पॅक करमणूकीच्या पॅकमध्ये पाहिजे. ये सरासर नाईन्साफी है.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रतिसाद/ट्रोल पॅक पाहिजे - ज्या संस्थळांवर प्रतिसाद देता येतात तिथे मोठे/छोटे पण मर्यादित संख्येने प्रतिसाद लिहिण्यासाठी एक पॅक. ट्रोलांसाठी किंवा अवांतर बडबड करणाऱ्यांसाठी आणखी तगडा पॅक.

वेगळा विषय पण अशा प्रकारे टिंगल करणारा हा लेख आठवला. - Gym Membership Packages

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.